Oct 22, 2020
स्पर्धा

माझा होशील ना भाग 16

Read Later
माझा होशील ना भाग 16

आपण मागील भागात पाहिले की नमन आणि प्रणाली घरी येतात.. नमन अगदी थाटात प्रणालीला बायको म्हणून घेऊन येतो.. दोघांना आनंदी बघून नमनच्या आईबाबांना पण खूप आनंद होतो.. आता पुढे..

नमन आणि प्रणाली घरी आल्यावर नमन त्याचे आवरून लगेच ऑफिसला गेला.. ऑफिसमध्ये गेल्यावर त्याला बाॅसने तातडीने बोलावले..

"आणखी काय आता?? ओरडणार की काय?? चला बघूया.." नमन मनातच बडबडतच गेला..

"मे आय कम इन सर.." नमन

"येस.." सर

"सर तुम्ही मला बोलावलंत.." नमन

"हो तुमच्याकडे एक काम होत.." सर

"कोणते??" नमन

"तुम्हाला आपल्या नवीन प्रोजेक्टसाठी गोव्याला जायचे आहे.. ते ही आजच.." सर

"काय??" नमन सर .

"हो चार दिवस तुम्हाला तेथे रहावे लागेल.. कारण ते प्रोजेक्ट मिटींग चार दिवसासाठी आहे.. तुमच्या रहाण्याची वगैरे सगळी सोय केलेली आहे.." सर

"आमच नातं आजच तर सुरू झालंय लाणि आताच गोव्याला जायचे म्हणजे.. आणखी ताटातूट नको रे देवा.." नमन मनातच म्हणाला..

"काय झाल?? प्रोजेक्ट खूप महत्वाचा आहे.. म्हणून तुमच्यावर जबाबदारी दिली आहे.. काही अडचण असेल तर सांगा.." सर

"सर तसे काही नाही.." नमन

"गुड.. मग जा आणि तयारीला लागा.." सर

"हं.." म्हणून नमन जात असतो.. इतक्यात सर परत बोलवतात.. "मिस्टर नमन.."

"येस सर.." नमन

"तुम्ही तुमच्या मिसेसना पण घेऊन जाऊ शकता.. तुमचं लग्न झाल्यापासून तुम्ही तसे कोठे गेला नाहीत.. हे माझ्याकडून तुमच्यासाठी गिफ्ट समजा.." सर

"काय??"नमन

"हो.. म्हणजे कामही होईल.. आणि तुमचं फिरणंही होईल.." सर

"थॅन्क्यू सर.." नमन एकदम खूश झाला..

"तुम्ही बायकोला नेऊ का?? विचारला असता तर मी होकार दिला असता.." सर

"हो सर.. पण कामाच्या ठिकाणी कस म्हणून.." नमन

"काम काही दिवसभर नाही.. थोडाच वेळ आहे.. बाकी वेळ तुम्ही फिरू शकता.. पण कामाकडे दुर्लक्ष नको.." सर

"येस सर.." म्हणून नमन बाहेर आला..

लग्न झाल्यापासून प्रणालीला कोठे नेलो नाही याची त्याला खंत होती.. पण आता यामुळे तिला घेऊन जाता येईल म्हणून आनंद झाला.. "इतक्या सहजासहजी तिला सांगायला नको.. थोडी गंमत करू.." नमन मनात म्हणाला..

थोड्या वेळाने तो प्रणालीला फोन करतो..
"प्रणाली, मला ऑफिसच्या कामासाठी गोव्याला जायचे आहे.. प्लीज माझी बॅग भरशील का??" नमन फोनवरून प्रणालीला म्हणाला..

"काय??" कधी??" प्रणाली

"आज संध्याकाळी निघायच आहे.. म्हणून तर फोनवर सांगतोय.. मी येईपर्यंत माझी बँंग भरून ठेव.." नमन

"किती दिवसांसाठी जाणार आहात.." प्रणाली थोडी नाराज होते..

"चार दिवस जाणार आहे.." नमन

"काय?? आज तर आलोय आपण.. आणि लगेच चाललाय.." प्रणाली

"ऑफिसच काम आहे.. नाही म्हणून चालत नाही.. जायलाच पाहिजे.." नमन

"बर.." प्रणाली

"आता तर प्रेमाची कबुली दिलेत.. आणि लगेच दुरावा.. बरं इतके दिवस एकटीच होते.. आता प्रेम आहे हे समजलय.. ऑफिसचे काम आहे.. कोण काय करणार??" प्रणाली मनातच म्हणाली..

मग प्रणाली बॅग भरायला गेली.. ती खूप नाराज होती.. तशीच ती बॅग भरून ठेवते.. आणि तो जेवून जाईल म्हणून त्याच्यासाठी स्वयंपाक बनवू लागली..

थोड्या वेळाने नमन आला.. तो एकदम खूश होता.. आल्यावर त्याने हात पाय धुवून आईबाबांना ती गोष्ट सांगितली.. त्यांनी पण लगेच होकार दिला.. आता फक्त प्रणालीलाच ती गोष्ट माहित नव्हती.. ती खूप दुःखी होते.. नमनला खूश बघून ती आणखीनच चिडते..

"प्रणा.. बॅग भरलीस का??" नमन

"हो.." प्रणालीचा कंठ दाटून आला.. आणि ती खोलीत निघून गेली.. नमन लगेच तिच्या पाठोपाठ खोलीत गेला..

"काय झालं??" नमन

"अहं.." प्रणालीने फक्त मान हलवली

"मग रडतेस का??" नमन

"तुम्ही खूश आहात ना.. जा तुम्ही.. माझा काय विचार करताय??" प्रणाली रडतच म्हणाली

"बरं.. मग मी एकटाच जाऊ.." नमन

"हो.. म्हणजे??" प्रणाली डोळे पुसतच म्हणाली

"म्हणजे मी तुला पण घेऊन जायचा विचार करत होतो.." नमन

"काय??" प्रणाली एकदम खूश होऊन म्हणाली

"बरं मग आता तू येणार नाहीस म्हटल्यावर.." नमन मुद्दामच म्हणाला

"तुम्ही तसे कुठं म्हणाला.." प्रणाली

"ऐकून घ्यायचं ना.. बरं मग चलतो.." नमन

"जा.. तुम्हाला माझी गरजच नाही.." प्रणाली थोडीशी रूसून म्हणाली..

"गरज कशी नाही बरं.. आयुष्यभरासाठी साथ देणार आहेस आणि.." नमन

"मग अशी चेष्टा का करता.." प्रणाली

"कारण तू चिडल्यावर खूप गोड दिसतेस.." नमन असे म्हटल्यावर प्रणाली लगेच लाजली..

"जा.. आधी चिडवता आणि मग गोड गोड बोलता.." प्रणाली

"बरं.." म्हणून नमन प्रणालीकडे बघू लागला.. प्रणालीने लगेच लाजून त्याला मिठी मारली..

"बरं चल.. आवर पटकन.. बॅग भर निघायचं आहे आपल्याला.." नमन

"हो.." म्हणून प्रणाली बॅग भरायला गेली..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..


Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मी काही प्रोफ़ेशनल लेखिका नाही.. मनात जे काही येतं ते लिहिते..