A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session0ed22047967e0928a379305b4721314cec4f481950b619140216e3c1dfc60eff16cdaa6e): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Maza hoshil na part 15
Oct 29, 2020
स्पर्धा

माझा होशील ना भाग 15

Read Later
माझा होशील ना भाग 15

आपण मागील भागात पाहिले की नमन आणि प्रणाली दोघेही बोलत असताना नमन प्रणालीला प्रेमाची कबुली देतो.. आता प्रणाली तिच्या मनात काय आहे ते सांगणार होती.. आता पुढे..

"तुझ्या मनात काय आहे??" नमन

"माझ्या मनात आधीही तेच होते.. आणि आताही तेच आहे.. आणि यापुढेही कायम राहणार. " प्रणाली

"म्हणजे??" नमन

"म्हणजे मी तुमच्यावर अगदी मनापासून प्रेम केलं आहे आणि शेवटपर्यंत करणारच.. जरी तुम्ही माझी साथ सोडली तरीही माझं तुमच्यावर प्रेम कायम राहणार आहे.." प्रणाली

"मी कसाही वागलो तरी तू इतकं कस काय प्रेम करतेस.. तुला माझा राग येत नाही का??" नमन

"येतो ना पण माझं तुमच्यावर प्रेम आहे त्यामुळे मी लगेच विसरून जाते.. तुमच्यावरील प्रेम म्हणून असेल.. एक तर मी एखाद्यावर प्रेम केले की त्या व्यक्तिला कणीच दुखावत नाही.. त्याच्यावर कायमस्वरूपी प्रेम करते.. कदाचित हाच माझा विकनेस आहे.. आणि त्याचा फायदा सगळे घेतात.." प्रणाली

"बरं मग आता मला माझी चूक समजली आहे.. तू मला माफ केलंस का?" नमन

"हो.." प्रणाली

"मग मी उद्या सकाळी निघतो.." नमन

"कुठे??" प्रणाली

"घरी.." नमन

"मग मी.." प्रणाली

"तू म्हणालीस ना तुझं तू जा म्हणून.." नमन चेष्टेत म्हणाला..

"ते आधी मी रागावले होते तुमच्यावर म्हणून.. आणि तुम्ही माझ्यावी व्यवस्थित बोलत देखील नव्हता.." प्रणाली

"आता बोलतो काय??" नमन

"हं.." प्रणाली

"पण तू तर म्हणालीस.. तुम्हाला आवडणार्या मुलीशी लग्न करा म्हणून.." नमन प्रणालीची खेचत असतो.. आणि हळूच हसत असतो..

"हो मग आता तुम्ही कबूल केलंय ना.. माझी साथ देणार म्हणून.." प्रणाली

"कधी.." नमन

"आता.." प्रणाली

"छे.. शोधतो म्हणालो मी.." नमन मुद्दामच म्हणाला..

हे ऐकून प्रणाली रुसून बसते.. नमन जोरात हसू लागला.. ते बघून ती आणखीनच गाल फुगवून बसली.. आणि रडू लागली..

"वेडीच आहेस.. तुला मस्करी पण कळत नाही का?" नमन

नमनने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती लगेच नमनच्या मीठीत गेली..

"मला तुम्हाला दूर करायच नाही.. तुम्ही फक्त माझेच आहात.." प्रणाली

"हो ग राणी.. मी फक्त तुझाच आहे.." नमन

बराच वेळ दोघेही तसेच होते.. थोड्या वेळाने रामा काका आला.. आणि "ताई.. ही घ्या कणसं.." म्हणाला.. तो डोळे बंद करूनच आला होता..

मग नमन आणि प्रणाली भानावर येतात.. नमन त्याच्या हातातील कणीस घेतो.. रामा कणीस देऊन लगेच जातो.. प्रणाली तिचे डोळे पुसून घेते..

"काय झालं रडायला??" नमन

"तुम्हीच तर रडवलात.." प्रणाली

"हे शेवटचंच.. यापुढे तुझ्या डोळ्यातून पाणी येणार नाही.. ही जबाबदारी माझी.. तू फक्त हसत रहायच.. आनंदी रहायचं.." नमन

"हं.." प्रणाली

दोघेही कणीस खाऊन.. थोडा वेळ गप्पा मारून मग घरी आले.. घरी येईपर्यंत रात्र झाली होती.. सगळेजण बसून जेवतात.. मग वेळ आली झोपायची..

"काल रागात यांना बाहेर झोपा म्हणाले.. आता कसं यांना आत बोलवू.. बाबा काय म्हणतील.. प्रणाली हे तू काय केलंस.." प्रणाली मनातच म्हणाली

थोड्या वेळाने बाबा प्रणालीला हाक मारले..
"काय बाबा?? बोलावलात.." प्रणाली

"होय ग.. ते नमनच अंथरूण करतेस ना.." बाबा असे म्हटल्यावर दोघेही एकमेकांकडे बघितले.. दोघांनाही एकत्र झोपायचं असतं.. पण बोलणार कोण??

"बरं बाबा.. करते मी.." म्हणून प्रणाली अंथरूण घेऊन येते..

"अगं हे काय??" प्रणालीचे बाबा

"कुठे काय??" प्रणाली

"काल बहिण होती म्हणून बिचारा नमन बाहेर झोपला.. आज कोण आहे?? उगीचच त्याला बाहेर झोपवू नकोस ग.. बरं दिसणार नाही ते.." प्रणालीचे बाबा

"बरं बाबा.." म्हणून ती अंथरूण घेऊन आत जाते.. दोघांच्याही मनात आनंदाचे उमाळे फुटत होते.. पण ते दाखवून देत नव्हते..

नंतर नमन आणि प्रणाली झोपायला जातात.. आज पहिल्यांदा दोघेही एकत्र झोपणार होते.. पण दोघांनाही झोप येत नव्हती.. दोघेही रात्रभर बोलत बसले होते.. त्यात प्रणालीच लाजण आणि नमनच चिडवण जास्त होत.. कित्येक वर्षे बोललो नाही असे दोघांना वाटत होते.. इतकं बोलण कुठून आलं होतं काय माहित??

पहाटे दोघांना झोप लागली.. त्यामुळे उठायला उशीर झाला.. दोघेही आवरून नाष्टा करून जायला तयार झाले..

"नमन तू येऊन सगळी मदत करायला धरायलास.. खरंच मी खूप खूप आभारी आहे.." प्रणालीचे बाबा

"अहो बाबा.. आभार मानून तुम्ही मला परकं करताय.. मी तुमचा मुलगाच आहे ना.. मग मुलाचं आभार कोणी मानतय का??" नमन

"खरं तर हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे.. पण तुम्ही असेच खूप खूश रहा.. आनंदी रहा.. आणि आमच्याकडे येत रहा.." प्रणालीचे बाबा

"हो आणि लवकरच पाळणा हलू दे.." प्रणालीची आई.. असे म्हटल्यावर प्रणाली लगेच लाजली..

मग दोघेही नमनच्या घरी गेले.. नमन मोठ्या दिमाखात बायकोला घरी घेऊन आला.. दोघेही एकदम आनंदात होते.. ते पाहून नमनच्या आईबाबांना समाधान वाटले.. कारण लग्न झाल्यापासून दोघांच्या चेहर्यावर एक नाराजी होती.. दोघे खळखळून कधीच हसले नाहीत.. त्यामुळे ते त्यांच्या संसारात सुखी आहेत की नाही याची त्यांना शंका होती..

पण आता त्यांचे असे हसरे चेहरे पाहून दोघांनाही समाधान वाटले..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मी काही प्रोफ़ेशनल लेखिका नाही.. मनात जे काही येतं ते लिहिते..