Login

माझा होशील ना भाग 14

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की नमन आणि प्रणाली तिच्या माहेरी राहिले होते.. त्यानंतर नमनला करमत नव्हते म्हणून तो प्रणालीच्या बाबांना सांगून प्रणालीसोबत शेतात जातो.. तिथे रामा काका म्हणजे शेतात काम करणारा गडी असतो.. ते दोघे विहिरीपाशी जातात.. आता पुढे..

प्रणाली आणि नमन दोघेजण विहीरीच्या कठड्यावर बसले होते.. नमन फक्त प्रणालीला बघत असतो.. प्रणालीला अवघडल्यासारखे वाटत होते..

"यांच्या मनात नेमकं आहे तरी काय?? मला काहीच समजेना.. एखाद्याची किती परिक्षा घ्यायची.. काही असेल तर पटकन बोलून रिकामं व्हायचे ना.. हो तर हो.. नाही तर नाही.. जे असेल ते सांगितले तर मोकळे होईल??" प्रणाली मनातच बडबडत असते..

इतक्यात नमन "प्रणा.." म्हणाला.. त्याच्या तोंडातून प्रणा हा शब्द ऐकताच ती त्याच्याकडे बघू लागली.. तेव्हा तिला तो तिचाच आहे हे जाणवले..

"प्रणा म्हणलो तर चालेल ना तुला.." नमन

प्रणाली "हो.." म्हणाली

"मला तुझ्याशी बोलायचं होत.. म्हणून मीच बाबांना विचारल की तुला शेताकडे घेऊन जाऊ का?? आणि त्यांनी लगेच होकार दिला.. " नमन

"हं.." प्रणाली

"काही बोलणार नाहीस का?? मी एकटाच बोलतोय.. तू नुसता हं म्हणत आहेस बोल ना काहीतरी.." नमन

"तुम्हाला काय बोलायच आहे ते बोला.. काय सांगायचे आहे??" प्रणाली

"मला तुझी माफी मागायची आहे प्रणा.." नमन

"माफी का??" प्रणाली

"अगं लग्न झाल्यापासून मी तुला खूप त्रास दिला.. तुला बायको काय मैत्रीण म्हणूनही वागवल नाही.. खरतर तूच माझ्याशी खूप चांगलं वागायचीस.. माझ्यासाठी खूप काही केलं आहेस तू.. मला साॅरी म्हणायची पण लाज वाटतं आहे.. मी तुला कोणताच दर्जा न देताही तू माझ्यासाठी खूप केलंस.." नमन

"मी जे काही केलं ते आई बाबांकडेे बघून केल आहे.. तुमच्यासाठी काही केलेल नाही.." प्रणाली

"मग आता आई बाबांकडे बघून चल घरी.. मला तू लिहिलेली चिठ्ठी मिळाली.. म्हणून तर मी ताबडतोब निघून आलो.." नमन

"मी नाही येणार.. मी इथेच राहणार कायमची.." प्रणालीला खूप वाईट वाटले..

"का?? चल ना प्लीज.. मला म्हणजे आईबाबांना करमत नाही तुझ्याशिवाय.. ते विचारले तर काय सांगणार.." नमन

"मी काहीही सांगेन तुम्ही उद्या जा.. मी माझं बघेन.." प्रणाली

"इतके दिवस होतीस ना.. मग आता काय झालं तुला.." नमन

"मी माझ्या बहिणीचे लग्न होईपर्यंत थांबणार होते.. त्यानंतर मी माहेरी जाणार होते.." प्रणाली

"का??" नमन

"काय करू राहून तिथे??" प्रणाली

"का आम्ही आहोत आणि गाण्याचा क्लास आहे तुझा.." नमन

"तुम्ही??" प्रणाली

"हो.." नमन

"तुम्ही काय असणार??. साधं मित्र बनू शकला नाहीत तुम्ही.. कोणत्या नात्याने यायचं मी घरात.. आणि का यायच. . मला मन नाही का?? मला भावना नाहीत का?? तुम्ही तुमच्या मनात येईल तसं वागणार माणि मी ते आयुष्यभर सोसायचं.. अजिबात नाही.. मी काहीच सोसणार नाही.. मी माहेरीच राहते.. तुम्ही तुम्हाला हवं त्या मुलीशी लग्न करून सुखी रहा.." प्रणाली

"कस करू लग्न.." नमन

"का?? आई बाबांना सांगून करा.. " प्रणाली

"पण ती माहेरीच राहणार म्हणते आणि.." नमन

"तो तुमचा प्रश्न आहे.." प्रणाली "

"पण उत्तर तुझ्याकडे आहे.." नमन

"माझ्याकडे नाही.." प्रणाली

"हो तुझ्याकडेच आहे.." नमन

"कस काय??" प्रणाली

मग नमन प्रणालीच्या समोर गुडघ्यावर बसू आणि हात तिच्या समोर करतो.. प्रणालीला समजेना.. हे असे का बसले आहेत.. तिला काहीच कळेना..

"प्रणा मी कबूल करतो की तू मला सुरूवातीला आवडत नव्हतीस.." नमन

"म्हणजे.." प्रणाली

"ऐक ना.. आज मला बोलू दे.. नाहीतर मी कधीच बोलू शकणार नाही.." नमन

"बरं.." प्रणाली

"हं.. हे सगळं कधी आणि अस झालं.. माझं मलाच कळलं नाही.. पण हेच खरं आहे.. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.. मला आधी आयुष्य म्हणजे एक स्वप्न वाटायचं.. हव तस जगायचं अगदी बिनधास्त.. कारण मला लहानपणापासून कशाचीच कमतरता भासली नाही.. सगळं आयतं मिळत गेलं..

माझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय माझं मी घ्यायचो.. पण लग्नाचा एवढा मोठा निर्णय बाबांनी मला न विचारता परस्पर घेतला.. आणि त्यात तुझा रंग सावळा.. म्हणून मला खूपच वाईट वाटले..

पण हळूहळू मी तुझ्यात रमत गेलो.. तुझ्यात गुंतत गेलो.. कधी कसे काहीच माहित नाही.. पण तू मला आवडायला लागलीस.." नमन

"काय??" प्रणाली

"होय प्रणा.. तू मला आवडतेस.. माझं तुझ्यावर प्रेम बसले आहे.. मी तुझ्यात गुंतत गेलो आहे.. प्लीज माझ्या प्रेमाला लाथाडू नकोस.. मला आयुष्यभराची साथ हवी आहे.. तू देशील.. आयुष्यभर माझ्या सोबत राहशील.." नमन हे बोलत असतानाच प्रणालीच्या डोळ्यातून आपोआप पाणी येऊ लागले..

"तू काहीतरी बोल ना.." नमन

"काय बोलू तेच कळेना.." प्रणाली डोळे पुसतच म्हणाली

"मी काय म्हणालो त्यावर उत्तर दे.." नमन

"हं.. मी जेव्हा लग्न करून तुमच्या घरी आले.. तेव्हा माझ्या उराशी खूप स्वप्नं बाळगून आले होते.. पण तुम्ही पहिल्याच दिवशी असे म्हणालात की मला वाटलं माझी सगळी स्वप्न धुळीत मिळाली.. पण नंतर वाटलं.. सोबत राहून एकमेकांना समजून घेत.. आपण एक होऊ.. म्हणून मी प्रत्येक वेळी तुमच्या सोबत होते.. तुम्हाला साथ देत होते.. पण त्या प्रत्येक वेळी मी मनातच म्हणायचे..
माझा होशील ना..
माझा होशील ना..
विश्वास वाटायचा एक दिवस नक्की तुम्ही माझे होणारच.. पण खूप दिवस झाले तरी तुम्ही प्रेमाने काही बोलला नाही.. मग वाटलं की बहुतेक मीच चुकले.. आता तुम्हाला माझ्या बंधनातून मुक्त करावं.. म्हणून मी माहेरी रहायचा निर्णय घेतला.." प्रणाली

"मग आता तुझा निर्णय काय आहे??" नमन

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..

क्रमशः 

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..





🎭 Series Post

View all