A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session965315ee058a371fc510a3de59fe87e8e45906f9fb083e3322b23c1be52413061bbc8ed5): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Maza hoshil na part 12
Oct 23, 2020
स्पर्धा

माझा होशील ना भाग 12

Read Later
माझा होशील ना भाग 12

आपण मागील भागात पाहिले की नमन प्रणालीच्या माहेरी जातो.. तिथे त्याचे स्वागत होते.. पण प्रणाली त्याच्या बरोबर बोलत नाही.. ती त्याच्यावर रागावलेली असते.. म्हणजे ती तसे नाटक करत असते.. आता पुढे..

आज नमन लवकरच उठला.. तसे त्याला लवकर उठायची सवय नसते.. पण पाहुण्यांच्यात म्हणून आणि आज प्रणालीच्या बहिणीच लग्न असतं म्हणून.. तो लवकर उठला..

त्याचं सगळं आवरून तो लग्नाच्या तयारीला लागला.. कोणतेही काम असो.. तो सवयीप्रमाणे करू लागला.. तो काम करताना पाहून प्रणालीला समाधान वाटले.. म्हणजे मी जावई आहे.. असे कसे काम करू असा विचार त्याच्या मनात आला देखील नाही..

तो सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागत होता.. त्यामुळे सगळ्यांना खूप छान वाटत होते.. प्रणालीचे बाबा सुरूवातीला नमनला काम सांगत नव्हते.. जावई आहे.. कसे सांगायचे?? असे त्यांना वाटत होते..

मग नमन "बाबा तुम्ही हक्काने मला काम सांगा.. परक समजू नका.. नाहीतर मी तुमच्यावर रूसणार.." नमन

"अहो जावईबापू.. तुम्ही आमचे पाहुणे.. तुम्हाला मान दिला पाहिजे.. तुम्ही आम्हाला काम सांगायच की आम्ही तुम्हाला.." प्रणालीचे बाबा

"ते काही नाही बाबा.. तुम्ही माझ्या बाबांसारखेच आहात.. मी तुमचा मुलगाच आहे.. असे समजून मला काम सांगा.. त्याशिवाय आपुलकी वाढणार नाही.." नमन

"बरं जावईबापू.. तुम्ही म्हणता म्हटल्यावर सांगायलाच पाहिजे.." प्रणालीचे बाबा

"आणि बाबा.. तुम्ही मला अहो वगैरे म्हणू नका.. आणि नमन नावानेच हाक मारा.. ते जास्त आवडेल मला.." नमन

"अहो पण पध्दत आहे तशी.. जावईला आदर, मान हा द्यावाच लागतो.. अगदी पूर्वीपासून तशी पध्दत आहे.." प्रणालीचे बाबा

"पध्दत आपणच पाडली ना.. बदलायची पण आपणच.. मी वयाने तुमच्यापेक्षा कितीतरी लहान आहे.. आणि तुम्ही अहो वगैरे म्हणता.. मला ते आवडत नाही.. प्लीज माझ्यासाठी ए नमनच म्हणा.." नमन

"बरं.. प्रयत्न करतो.. तुमच्यासोबत बोलायला कोण ऐकणार आहे.." प्रणालीचे बाबा हसत म्हणाले..

हे सगळं प्रणाली ऐकतच होती.. तिला ऐकून खूप छान वाटले.. नमनमध्ये सुधारणा होत आहे हे बघून प्रणालीला खूप छान वाटले..

"हे दाखवतात तसे मुळीच नाहीत.. मोठ्यांचे आदर करतात.. मनाने खूप चांगले आहेत.. मग माझ्या बाबतीतच असे का केलं?.. माझ्या रंगावरून यांनी माझ परिक्षण केलं.. हे खूप चुकीचेच आहे.. मला खूप त्रास दिला.. मग त्याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी.. मला मनवायला हव.. त्यांचं प्रेम व्यक्त करायला हवं.. नाहीतर मला कसे समजणार?.. त्यांनी प्रेम व्यक्त केल्याशिवाय मी नाही जाणार सासरी.. मग कोणीही काहीही म्हटले तरी चालेल.." प्रणाली मनातच बडबडत असते..

"अगं पणू.. काय विचार करत बसलीस.. चल लवकर आवर.. हाॅलमध्ये लवकर जायला बरं.. नाहीतर पाहुणे येतील.." प्रणालीची आई

"हो आई आवरते.." म्हणून प्रणाली आवरायला जाते..

प्रणाली मस्त गुलाबी रंगाची साडी नेसलेली असते.. केसाची छान हेअर स्टाईल करून मस्त अंबाडा घातलेली असते.. हलकासा मेकअप आणि हलकीशी लिपस्टिक लावलेली असते.. डोक्यात फुलांचा गजरा माळलेली असते.. हातावरील मेहंदी खूपच रंगलेली असते आणि ती उठून दिसत असते..

नवर्याचे प्रेम भरपूर आहे.. म्हणून तिला सगळे चिडवत असतात.. "नवरा लाडाचा म्हणून मेहंदी छान रंगली आहे हो.." असे जे ते म्हणत होते.. "तू खूप लकी आहेस.." असेही म्हणायचे..

"छे अस कधी असतं का?? मेहंदीच्या रंगापेक्षा चेहर्याच्या रंगाने नवर्याचे प्रेम ठरते.. त्यांना तर नुसता देखणी बायको हवी असते.. सावळी असेल तर कोणी बघत सुध्दा नाही.." प्रणाली मनातून दुखावलेली असते.. पण लगेच ती सावरते.. कारण बहिणीच्या लग्नात चेहरा पाडून राहिलं तर पाहुणे उगाच काहीतरी बरळत बसतील..

नमन पण गुलाबी रंगाची शेरवाणी घातलेला असतो.. नवरा बायको अगदी ठरवून घेतल्यासारख मॅचिंग केले होते.. त्याने हातात घड्याळ घातलेले होते.. तो खूप हॅण्डसम दिसत होता..

नमन प्रणालीकडे बघतो.. आणि आज तिला प्रणाली वेगळीच दिसत होती.. कारण त्याचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला होता.. तो आधी एक न आवडणारी मुलगी म्हणून बघायचा.. तर आता हक्काची बायको म्हणून बघत होता..

बायको म्हणून तिच्याकडे बघितल्यामुळेच कदाचित त्याला ती आज सुंदर दिसत होती.. तिच्याकडे तो बघत असतानाच तिची पण त्याच्याकडे नजर गेली.. प्रणालीला पण आज नमनची नजर वेगळी वाटली..

नमनच्या नजरेतून एक आपुलकी.. एक प्रेमाची भावना तिला जाणवली.. त्यामुळे ती आपसुकच लाजली.. प्रणाली दिसायला जरी सावळी असली तरी तिचे डोळे बोलके होते.. तिचे केस रेशमी होते.. तिचा आवाज म्हणजे जणू कोकिळाच.. तिचे बोलणे अतिशय मधुर होते.. एक रंग सोडला तर इतर सर्व गुण याच्यामध्ये होते.. त्यामुळेच ती सर्वांची लाडकी होती..

पण लग्न झाल्यावर नमन ते काही न पाहता फक्त तिचे सौंदर्य पाहिला.. आणि तिच्याशी तसे वागू लागला.. त्यामुळे प्रणाली त्याच्यावर नाराज होती.. आता ती त्याच्यापासून लांब जात आहे.. तर तो तिच्या मागे जाऊ लागला.. त्याच्या मनात नेमकं काय आहे.. हे तिला समजेना..

प्रणालीच्या बहिणीच लग्न झालं.. खूप छान पद्धतीने लग्न पार पडले.. नमन जावयाप्रमाणे नाही तर मुलगा म्हणून काम करत होता.. लग्नाला प्रणालीचे सासू सासरे पण आले होते..

आता लग्न झाले आणि वेळ आली पाठवणीची.. बहिणीची पाठवणी होताना प्रणाली खूप रडत होती.. ती रडताना नमन तिच्यापाशी जातो.. त्याला पण खूप वाईट वाटते..

"एखादी मुलगी लहानाची मोठी एका घरात होते.. आणि लग्न झाल्यावर सगळं आयुष्य दुसरीकडे म्हणजे नवरा जेथे राहतो तेथे काढते.. कसे असते.. कशा राहतात या मुली.. प्रणाली पण आलीच होती की आमच्याकडे.. आणि मी तिला त्रास दिला.. तिचे तेथे कोणीच नव्हते.. कसे सहन केलं तिने.. मी एका दिवसासाठी आलोय तर मला इकडे करमेना.. आणि या आयुष्य काढतात म्हणजे ग्रेटच.." नमन मनातच बडबडत असतो..

पाठवणी झाल्यावर सगळे पाहुणे जाऊ लागले.. मग प्रणालीचे सासू सासरे पण जाणार होते..
"चला प्रणाली बेटा जाऊया का??" प्रणालीचे सासरे..

"बाबा.. ते.." प्रणालीला "आता कसे जायचे.. हे तर काहीच बोलले नाहीत.. आणि मी येणार नाही.. हे तर कसे सांगू.. बाबा रागावतील.." असे वाटत होते.. म्हणून ती तेवढंच बोलली..

इतक्यात तिची आई "ती राहू दे ना.. ही पण आता गेली तर घर रिकामं वाटेल.. आम्हाला करमणार नाही.." म्हणाली आईने असे म्हटल्यावर प्रणालीला थोडं बरं वाटलं..

नमन नाराज झाला.. "ही आता आमच्यासोबत आली तरच काहीतरी होईल.. उद्या वगैरे म्हटले की ही येणार नाही.." नमनला अशी भीती वाटत होती..

आता प्रणालीची आईच विचारत आहे म्हटल्यावर नमनच्या आईबाबांना काही बोलताच येईना.. हो म्हणायच तर एक आणि नाही म्हणायचं तर एक अशी परिस्थिती निर्माण झाली..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मी काही प्रोफ़ेशनल लेखिका नाही.. मनात जे काही येतं ते लिहिते..