माझा होशील ना भाग 11

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की प्रणाली माहेरी गेलेली असते.. ती कायमचीच गेलेली असते हे नमनला सकाळी कळत.. मग नमनला चैन पडत नाही.. नमन पण प्रणालीच्या माहेरी जातो.. आता पुढे..

नमन प्रणालीच्या माहेरी जातो.. तिथे गेल्यावर तिचे बाबा बाहेरच असतात..

"या जावईबापू या.. अहो ऐकलत का?? कोण आलंय बघा.." प्रणालीचे बाबा नमनला बोलावतात.. आणि प्रणालीच्या आईला हाक मारतात..

"नमस्कार बाबा.." नमन

"आलात बरे केला हो.. प्रणाली बघा ना.. आल्यापासून तोंड पाडून बसली आहे.. मी किती विचारलं तरी काहीच सांगत नाही.. आता ती तुमची झाली आहे.. करमत नसेल तिला.." प्रणालीचे बाबा असे म्हणून हसू लागतात..

"बाबा तसे काही नाही.." नमन

"गंमत केली ओ.." प्रणालीचे बाबा

इतक्यात प्रणालीची आई येते..
"अरे जावईबापू या ना आत.. अहो तुम्ही पण बाहेरच काय बोलत बसलाय.. आत तर बोलायचं ना.." प्रणालीची आई

"बोलण्याच्या गडबडीत विसरतोच.. आत चला जावईबापू.." प्रणालीचे बाबा

"तुमचं हे नेहमीचच आहे.." प्रणालीची आई

आत गेल्यावर नमन आणि प्रणालीचे बाबा बसतात..

"अहो तुम्ही चहा पाण्याच तेवढं बघा.." प्रणालीचे बाबा प्रणालीच्या आईला म्हणतात..

"हो.." म्हणून प्रणालीची आई किचनमध्ये जाते..

"प्रणाली आत आहे.. मी तिला बोलावतो.." म्हणून प्रणालीचे बाबा जात असतात.. इतक्यात..

"बाबा नको.. ती कुठे आहे मला सांगा.. मी जातो.." नमन

"तिथे खोलीत आहे बघा.. जा.." बाबा

"बरं.." म्हणून नमन खोलीत जातो..

प्रणाली स्टुलवर चढून वरची बॅग काढत असते.. आणि तिची बहिण स्टुल धरून उभारलेली असते.. प्रणालीची बहिण नमनकडे बघून हसते.. ती काही बोलणार इतक्यात नमन तिला इशारा करून बाहेर जायला सांगतो.. ती बाहेर जाते.. आणि तिच्या जागी स्टुल धरून नमन उभारतो..

प्रणाली बॅग काढून खाली तिची बहिण आहे.. असे समाजून बॅग देते..

बघते तर काय तिथे नमन असतो.. खरंच तो आहे की स्वप्न म्हणून ती डोळे चोळून घेते.. इतक्यात तिच्या हातातील बॅग खाली पडते.. ती थेट नमनच्या पायावरच.. बॅग पडल्यावर नमन ओरडतो.. आणि सगळे गोळा होतात..

"काय झालं.." म्हणून सगळे येतात.. मग प्रणालीची खात्री होते की नमन खरंच आला आहे.. ती त्याच्याकडे बघते आणि टपकन तिच्या डोळ्यातून पाणी येत..

प्रणाली लगेच नजर फिरवते.. आणि दुसरीकडे बघू लागते.. कारण तिला नमनला ते दाखवायचे नसते..

"अगं पणू अशी कशी ग तू.. लागलं ना त्यांना बघायचं तर.." प्रणालीची आई

"अगं त्यांच्याकडे बघितल्यावरच तिच्या हातातून खाली पडलं असेल.. हो ना जीजू.." प्रणालीची बहिण तिची चेष्टा करत होती..

"गप्प ग तू.." प्रणाली चिडून बोलते..

प्रणाली चिडलेली आहे अस दाखवत असते.. पण ती मनातून खूप खूश असते.. नमन आला म्हणून तिला खूप आनंद झालेला असतो..

"तुला थांबायला काय झालं होतं ग.. लगेच गेलीस निघून.." प्रणाली बहिणीला म्हणाली..

"अगं जीजूंनीच सांगितल होतं.." प्रणालीची बहिण

"कोणी काही सांगितलं म्हणून लगेच जायचं का??" प्रणाली नमनकडे बघून म्हणाली..

"ताई तू इतकी का चिडतेस??" प्रणालीची बहिण

"चिडत नाही.. सांगते ग.." प्रणाली

"बरं.." प्रणालीची बहिण

मग नमन बाहेर जाऊन बसला.. थोड्या वेळाने जेवणाची वेळ झाली.. सगळे जेवायला बसले.. प्रणालीची आई सगळ्यांना वाढत होती.. जेवणात वांगीची भाजी होती.. नमनला ती भाजी अजिबात आवडत नव्हती..

प्रणालीला हे माहित होतं.. तरीसुद्धा ती काहीच बोलली नाही.. तिचा राग होता.. म्हणून ती वाढायला सुध्दा गेली नाही..

बिचारा नमन न आवडणारी भाजी सुध्दा आवडीने खाल्ला.. सांगणार कुणाला?? जिला तो सांगू शकत होता.. ती तर बोलतच नव्हती.. मग काय असेल ते खाव लागलं..

दिवसभर प्रणाली त्याच्यासोबत काहीच बोलली नाही.. आता रात्री.. प्रणाली आणि नमनचे अंथरूण खोलीत केले होते.. पण प्रणालीला तिथे झोपायचं नव्हतं..

"मी का झोपू त्यांच्याजवळ.. मी नाही जाणार.. तिथे असताना साधं बघत पण नव्हते माझ्याकडे.. आता मी का बोलू त्यांच्याशी.. जर त्यांना बोलायचं असेल तर स्पष्ट बोलावं ना.. आल्यापासून बघते.. नुसता मागेपुढे करतात.. पण स्पष्ट बोलत नाहीत.. मग मी का बोलू.." प्रणाली मनातच बडबडत असते..

तर इकडे नमनच काही वेगळंच सुरू असत.. "ही किती भाव खात आहे.. धड माझ्याशी बोलत पण नाही.. खरंतर माझंच चुकलं.. मी स्पष्ट बोललो नाही.. बोलायला हवं.. पण हिच्यासोबत कोणी ना कोणी असतंच.. मग कसं बोलणार.. रात्री झोपताना बघू.. बोलायला मिळालं तर सगळं सांगूनच टाकतो.." नमन पण मनात विचार करत असतो..

"जावईबापू तुम्ही त्या खोलीत झोपा जावा.. आम्ही बाहेर झोपतो.." प्रणालीचे बाबा

"नको बाबा.. मी बाहेर झोपतो.." नमन

"अहो नको.. आमचं घर थोडं छोटं आहे.. तुमची गैरसोय होऊ नये म्हणून सांगतोय.." प्रणालीचे बाबा

"नाही बाबा.. गैरसोय कसली.. मला कधी कुठे राहून सवय नाही.. घर सोडून मी कुठे गेलोच नाही.. त्यामुळे थोडं वाटत असेल.." नमन

"मी आज माझ्या बहिणीच्या सोबत झोपणार आहे.." प्रणाली

"हे काय आणि.." प्रणालीचे बाबा

"मग.. बहिण लग्न करून जाणार आहे.. पुन्हा कधी एकत्र झोपायला मिळेल माहित नाही.. म्हणून.." प्रणाली

"हि मुद्दाम करत आहे.. मी हिच्याशी जेवढ बोलायचं प्रयत्न करत आहे.. तितकी ही दूर जात आहे.. नेमकं काय आहे हिच्या मनात.." नमन मनातच म्हणाला..

"बाबा मी बाहेरच झोपतो.. मला चालेल.. त्यात काय एवढं.." असे म्हणून बिचारा नमन बाहेरच झोपला..

बाहेर डास चावतात म्हणून अगरबत्ती लावलेली होती.. नमनला त्याची अॅलर्जी होती.. पण तो काही करू शकला नाही.. तो तसाच झोपला.. मग रात्री त्याला खोकला चालू झाला.. तो जोरजोरात खोकत होता.. प्रणालीला जाग आली.. बाहेर येऊन पाहते तर काय नमन खोकत होता..

मग प्रणालीचे लक्ष अगरबत्तीकडे जाते.. ती लगेच जाऊन अगरबत्ती विझवते.. आणि नमनला पाणी आणून देते.. थोड्या वेळाने नमनचा खोकला बंद होतो.. प्रणाली झोपायला जाते..

"इतक्या रागात असूनही हिला माझी काळजी आहे.. हेच तर खरं प्रेम आहे.." नमन मनातच बडबडत असतो.. नंतल उशीरा त्याला झोप लागली..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

🎭 Series Post

View all