Login

माझा होशील ना भाग 10

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की प्रणाली गाण्याच्या क्लासला जात असते.. काही दिवसांनी तिच्या बहिणीच लग्न ठरलं होतं म्हणून तिचे बाबा येतात.. मग प्रणाली माहेरी जाते.. कायमची.. आता पुढे..

नमन नेहमीप्रमाणे सकाळी उठून सगळं आवरला.. आणि नाष्टा करून तो ऑफिसला जायची तयारी करू लागला.. त्याने कपाटातून ड्रेस काढला.. ड्रेस काढल्याबरोबर त्यासोबत एक कागद खाली पडला.. अर्थातच ती प्रणालीने लिहिलेली चिठ्ठी होती..

नमन तो कागद हातात घेऊन वाचू लागला.. चिठ्ठी वाचल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली..

"ही अशी काय आहे?? मला एका गोष्टीने विचारावंस पण वाटल नाही.. इतका उशीर झाला का?? माझ इतकं चुकल का?? प्रेम असे लगेच होत का?? नात्याला वेळ द्यावाच लागतो ना.. हिने मनातलं बोलून दाखवल असत तर मी पण माझ्या मनात काय आहे ते सांगितलोच असतो ना.. प्रणालीने हे बरोबर केलेल नाही.. माझा विचारही न करता हिने परस्पर असा निर्णयच कसा घेतला.. शेवटी माझंच चुकलं.. मी खूपच उशीर केला.." नमन मनात बडबडत होता..

त्याला काहीच कळेना.. आता ती गेली फोन तर कसे करणार.. फोन केल्यावर ती उचलणार पण नाही.. अशा विचाराने तो डबा न घेताच ऑफिसला गेला.. आई बोलवत असताना तिकडेही त्याच लक्ष नव्हते..

ऑफिसमध्ये गेल्यावरही त्याचे कशातही मन लागेना.. तो तसाच बसून राहिला..

"काय नमनशेठ.. काय विचार करताय??." केदार

"काही नाही रे.." नमन

"मला न सांगण्यासारख काही आहे का?? हिच का आपली मैत्री.." केदार

"तसे नाही रे.. तू तर मनातलच अोळखतोस.. तुझ्यापासून काय लपवायचे??" नमन

"सांग मग.." केदार

"अरे प्रणाली माहेरी गेली आहे.." नमन

"अच्छा तो भाभी की याद आ रही है.." केदार मस्करी करत असतो..

"कायमची.." नमन

"काय?? पण का?? भांडलास का तू??" केदार

"नाही रे.." नमन

"मग??" केदार

"अरे मी तिला अजून प्रेमाची कबुली दिली नाही.. तसेही आमच्यात अजूनही कोणतेच नाते नाही.." नमन

"काय?? अवघड आहे बाबा तुझं.." केदार

"उशीर झाला काय रे??" नमन

"अजून नाही.. पण तू आता गेला नाहीस.. तर नक्की उशीर होईल.." केदार

"काय??" नमन

"हो तू जा.. आणि प्रेमाची कबुली दे.." केदार

"मी आणि आत्ता.." नमन

"मग आणि दहा वर्षांनी जा.." केदार

"तू पण ना.." नमन

"मग आधीच उशीर झालाय.. आणि आत्ता म्हणून विचारतोस.." केदार

"बरं जातो.." नमन

"जातो नाही निघ आत्ताच.. नाहीतर खूप उशीर होईल.." केदार

केदारचे बोलणे ऐकून नमन लगेच उठतो.. आणि बाॅसच्या केबिनमध्ये जातो.. सरांना विचारून चार दिवसांची रजा घेतो.. सर पण त्याला लगेच रजा देतात..

बाहेर येऊन केदारला "थॅन्क्स.." म्हणाला..

"अरे दोस्ती मे क्या थॅन्क्यू और क्या साॅरी.. तू सगळं व्यवस्थित करूनच ये.." केदार

"हो नक्कीच.." नमन

नमन ऑफिसमधून घरी येतो.. तो लवकर घरी आल्यामुळे त्याच्या आईला टेन्शन येतं..

"अरे नमन काय झालं तुला.. असा अचानक का आलास बाळ... बरं वाटत नाही का तुला.." आईचे प्रश्न सुरू होतात..

"काही नाही ग आई.. तब्बेत बरी आहे.. तू काळजी करू नकोस.." नमन

"मग इतक्या लवकर कसा आलास??" नमनची आई

"आई.. ऐक ना.." नमन

"बोल बाळ.." नमनची आई

"मी प्रणालीकडे तिच्या माहेरी जात आहे.." नमन

"असा अचानक का?? काय झालंय का??" नमनची आई

"काही नाही ग.. तिच्या बहिणीच लग्न आहे ना.. मग मदतीला जात आहे.." नमन

"तिने बोलावलं आहे का तुला??" नमनची आई

"नाही ग.. मीच जात आहे.." नमन

"अहो.. जातो म्हणतोय तर जाऊ दे त्याला.. नविन लग्न झालंय त्यांच.. एकमेकांच्यात गुंतले आहेत.. चांगलं आहे.." नमनचे बाबा

"ते बरोबर आहे.. पण तुझं ऑफिस.." नमनची आई

"रजा घेतली आहे.." नमन

"बरं जा.. आम्हाला काहीच अडचण नाही.. पण त्यांना त्रास होईल असे वागू नकोस.. तिथे जाऊन मदत कर हं त्यांना.." नमनची आई

"हो ग आई.." नमन थोडा वैतागून म्हणाला..

मग नमन सगळे आवरून जायला निघाला.. तो त्याची बाईक घेऊन जात असतो.. कारण त्याचे आईबाबा कार घेऊन येणार असतात.. प्रणालीचे माहेर तसे जवळच असते.. त्यामुळे तो बाईकनेच जातो..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

🎭 Series Post

View all