A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session0ed22047967e0928a379305b4721314c314aa7a9d19aac13e844143171240f6abcd20147): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Maza hoshil na part 1
Oct 29, 2020
स्पर्धा

माझा होशील ना भाग 1

Read Later
माझा होशील ना भाग 1

"मला तुझ्याशी काहीतरी बोलायच आहे." नमन त्याची बायको प्रणालीला म्हणाला..

"बोला ना.." प्रणाली

"तू तुझं जीवन जगायला मोकळी आहेस.. मी तुला कोणत्याही बंधनात अडकवणार नाही.. तू माझ्याकडून कोणतीच अपेक्षा करू नकोस.. मी तुझ्या कोणत्याही इच्छा पूर्ण करु शकणार नाही.. तुला जे हवं ते तू करू शकतेस.. तुला कोणतच बंधन नाही.." नमन लग्नाच्या पहिल्या रात्री प्रणालीला म्हणाला.

"का? काय झालं?" प्रणाली

"माझे तुझ्याशी जबरदस्तीने लग्न झाले आहे.. मला तू कधीच पसंत नव्हतीस.. " नमन

हे ऐकून प्रणालीच्या पायाखालची जमीनच सरकली.. तिचे डोळे भरून आले.. तिला काय बोलावे काहीच कळेना.. थोडा वेळ ती शांत बसली.. मग परत ती

"काय??? मग आधीच सांगायचं ना.. लग्न का केलंत माझ्याशी.. माझे आयुष्य असे अर्ध्यावर सोडण्यासाठी का??" प्रणाली

"साॅरी.. पण बाबांपुढे माझ काहीच चालत नाही.. त्यामुळे त्यांनी ज्या मुलीला पसंत केलं तिच्याशीच मला लग्न करावं लागणार होत.. म्हणून मी काही बोललो नाही.." नमन

नमन आणि प्रणालीचे नुकतेच लग्न झाले होते.. प्रणाली नाकी डोळे चांगली असली तरी तिचा रंग सावळा होता.. पण ती कामात खूप हुशार होती.. म्हणून तर नमनच्या बाबांना ती पसंत पडली..

पण नमनच काय?? त्याला सुंदर, रुपवती मुलगी बायको म्हणून हवी होती.. पण याला सावळी बायको मिळाली.. तो दिसायला खूप हॅण्डसम होता.. सगळ्या मुली त्याच्याकडे बघतच बसायच्या.. इतका तो हॅण्डसम होता..

"मी सुंदर आहे तर माझी बायको पण सुंदरच असायला हवी.." असे त्याला सारखे वाटायचे.. पण नशीबाने त्याच्या समोर काहीतरी वेगळंच वाढून ठेवले होते..

नमनला सुंदर बायको हवी होती.. पण बाबांच्या पुढे त्याचे काहीच चाललं नाही.. त्यामुळे बाबांनी पसंत केलेल्या मुलीशीच त्याला लग्न करावे लागले.. तेही अगदी नाईलाजास्तव..

प्रणालीने लग्नानंतरची खूप स्वप्नं बघितली होती.. पण नमनच्या अशा वागण्याने ती खूप दुःखी झाली होती..

"मग आता मी काय करु?? " प्रणाली

"तुझी इच्छा.. " नमन

"आई बाबांकडे जाऊ की इथेच राहू.." प्रणाली

"तुला काय करायचं ते तुझ तू कर.. पण यामध्ये माझ नाव कुठेही यायला नको..." नमन

नमन रागाने अंथरूण घेऊन खाली झोपतो.. प्रणालीला खूप वाईट वाटते.. ती तशीच जागी असते.. तिला झोपच येत नाही..

"माझा रंग सावळा आहे.. यात माझा काय दोष?? नुसता रंगच महत्वाचा आहे का?? माणसाच मन सुंदर असू शकत नाही का?? इतकी मी वाईट दिसते.. " असा विचार ती करत असते. रात्रभर तिला झोपच येत नाही.. विचारातच सगळी रात्र निघून जाते..

पहाट होते आणि ती सगळ आवरून किचनमध्ये जाते.. चहा करून सासू सासर्यांना देते आणि नाष्ट्याची तयारी करू लागते..

प्रणाली नाष्टाची तयारी करते.. नमन अजून उठलेला नसतो.. म्हणून ती सासू सासऱ्यांना नाष्टा बनवून देते.. आणि नमनच्या डब्याची तयारी करू लागते..

"अग प्रणाली लगेच काय कामाला लागलीस?? अगं अजून तू नवीन आहेस.. तुमचं फिरण्याचे वय.. पहिल्यांदा कुठेतरी फिरून या बघू.." नमनची आई..

"नको आई" प्रणाली.

"अग असे काय तुम्ही ? थांब नमनलाच विचारते.." नमनची आई

इतक्यात नमन येतो.. तो नुकताच उठलेला असतो.. समोर प्रणालीला बघून त्याचा चेहराच पडतो..

"आता ही काय निर्णय घेणे काय माहित ? निघून गेली तर बर होईल.." नमन मनात म्हणतो

"अरे नमन तुमचे आताच नविन लग्न झाले आहे.. कोठेतरी फिरायला जा ना दोघेजण.. तेवढाच तुम्हा दोघांना एकांत.." नमन ची आई.

"नको आई.. मला ऑफिसच खूप काम आहे .. आता सुट्टी मिळणार नाही.." असे म्हणून नमन आवरायला जातो..

प्रणाली सुद्धा त्याचा डबा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जाते.. नमन आवरून येतो.. आणि नाश्ता न करताच ऑफिसला जात असतो..

"अहो.. नाष्टा तयार आहे.." प्रणाली

"नको ऑफिसमध्ये खाईन.. खूप उशीर झाला आहे.." नमन

"डबा तरी घेऊन जा.." प्रणाली..

"कशाला बनवत बसलेस?? मी कॅन्टीनमध्ये गेलो असतो.." नमन

"मला बनवायला आवडत म्हणून बनवले.." प्रणाली

नमन रागात डबा घेऊन ऑफिसला जातो.. ऑफिसमध्ये गेल्यावर सगळेच त्याच्या भोवती गोळा होतात..

“अरे काय नमन लग्नाला तर बोलवायच यार.. न बोलावताच लग्न उरकुन टाकलास होय. " एक कलीग नमनला म्हणाला

"अरे थोड गडबडीत झालं.. त्यामुळे तुम्हाला बोलावता आले नाही.. " नमन

"बोलवायला नको म्हणून तर गडबडीने लग्न करून घेतलास काय??.." दुसरा कलीग असे म्हणून हसू लागला

"तसे काही नाही रे " नमन

"तर मग वहिणीला कधी भेटवणार?? " एक कलीग मैत्रीण

"बघू.." नमन

"इतकी सुंदर आहे का?? आम्हाला न भेटवायला.." परत एक कलीग

"तसेच काही नाही.. भेटवतो एकदा.." असे म्हणत नमन रागातच त्याच्या डेस्कवर जाऊन बसतो..

"यांना काय वाटतय.. मला सुंदर बायको मिळाली असणार.. मी मजेत असणार.. नाही माझी सगळी स्वप्न धुळीत मिसळली.. पण कसे आता हिला या सर्वांसमोर आणणार.. सगळे काय म्हणतील?? हसतील हाे माझ्यावर.. अशा मुलीशी काय म्हणून लग्न केलं म्हणतील.." नमन मनातच बडबडत असतो..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मी काही प्रोफ़ेशनल लेखिका नाही.. मनात जे काही येतं ते लिहिते..