Oct 18, 2021
प्रेम

माझा होशील का??❣️

Read Later
माझा होशील का??❣️
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

 

माझा होशील का??❣️

असंख्य प्रश्न मनात माझ्या
उत्तरे तू देशील का??
मी तुझीच आहे
पण तू माझा होशील का???
सांग ना माझा होशील का???❣️

जेव्हा मिळतील सगळ्या प्रश्नांची उत्तरे
मी न मागताच ...
तू येशील  का माझ्या पाशी
सांग ना माझा होशील का??
सांग ना माझा होशील का??❣️

कधीतरी मी न सांगताच समजून घेशील का ?
माझ्या मनात काय आहे ते तू ओळखशील का??
सांग ना माझा होशील का??
मी तुझीच आहे ...
पण तू मला तुझी साथ देशील का ??❣️

मी व्यक्त होते तुझ्या कडे
कधी तू ही व्यक्त  होशील  का ??
मला काय आवडते हे
मी न सांगताच समजून घेशील का ?
अव्यक्त तुझे असे असणे मला वेदना देते तू हे समजून घेशील का??
कायम सगळ्यांचा विचार करतोस
कधी तरी माझा विचार करशील का??
सांग ना माझा होशील का??❣️


 

तू सगळ्यांसाठी असतोस
कधी तरी मला वेळ देशील का ??
मी कधीच अपेक्षा करत नाही म्हणून
कधी तरी तू मला जवळ घेशील का??
 कधी तरी मला मी कशी आहे
हे  प्रेमाने  विचारशील का??
कधी तरी हात माझ्या हातात गुंफून
माझ्या सोबत येशील का ??
सांग ना माझा होशील का???❣️

बंध हे नात्यांचे जुळले आहेत
फक्त मी ते सांभाळायचे आहेत का ??
कधी तरी तू ही बोल ना
कधीतरी स्वतःची जबाबदारी घे ना ..
कायम माझ्या कडून अपेक्षा करतोस...
मी पण एक व्यक्ती आहे हे समजून घे ना...
कधी तरी फक्त माझा हो ना ????
कधी तरी माझा होशील का ??❣️

 

सगळ्यांसाठी वेळ असतो  तुझ्याकडे
कधीतरी माझ्यासाठी कधी वेळ काढशील का???
मी न सांगता माझ्या डोळ्यात बघून काय झालं हे समजून घेशील का ??
कधी तरी फक्त तुझं सोबत असणं गरजेचं आहे
हे समजून घेशील का???
कधी तरी फक्त माझा होशील का???
सांग ना माझा होशील का???❣️

❣️❣️रूपा ❣️❣️

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now