माझ आभाळ आणि मी... भाग 4 अंतीम

रविवारच्या दिवशी आकाश आणि त्याच्या घरचे इकडे बघायला आले , आल्या आल्या सरलाच्या बाबांनी तिच्या घटस्फोटा बद्दल सगळ्यांना सांगून दिलं


माझ आभाळ आणि मी... भाग 4 अंतीम
तिथे मी खुश आहे
बाकी कोणी नको मला आता

©️®️शिल्पा सुतार
.........

मावशीने काही ऐकलं नाही, बीएड ला अ‍ॅडमिशन करून दिल, दोन वर्षानंतर सरलाला लगेच शाळेत नोकरी लागली, त्यांच्या गावाला शिक्षकांची गरजच होती, त्या शाळेत लहानपणापासून ती शिकली होती त्यामुळे ओळखी होत्या.

आई वडील आता बऱ्यापैकी खुश होते, सरलाची काळजी होती त्यांना, ती तिच्या नोकरीत समाधानी होती, म्हणून बरं वाटलं,

सरला सेटल झाली होती, तिची शिकवायची पद्धत छान होती, बाकीच्या पालकांनी रिक्वेस्ट केली, त्यामुळे काही मुलांची ती ट्यूशन घेत होती, पगारही बऱ्यापैकी येत होता, आई-बाबांना ती छान सांभाळत होती, बहीणही येऊन जाऊन होती, सगळ छान होत.

आता मध्येच हा सुभाष का दिसला काय बोलायचं असेल सुभाषला माझ्याशी, संध्याकाळी ती घरी येत होती सुभाष परत आला मागे,.. "सरला मला बोलायचं आहे तुझ्याशी",

आता सरला थांबली,.. "बोला.. कसं चाललंय तुमचं? घरचे कसे आहेत?",

"सगळे सगळं ठीक आहेत",.. सुभाष.

"तुम्ही मला आता भेटायला का आले आहात",.. सरला.

"मी तुझ्याबरोबर राहायला येऊ शकतो का सरला",.. सुभाष.

" मीना कशी आहे",.. सरला.

"मीना मला सोडून चालली गेली",.. सुभाष.

" का काय झालं? काही प्रॉब्लेम? मूलबाळ वगैरे आहे का नाही तुम्हाला? ",.. एकदा ते घर सोडल्यानंतर सरलाने त्यां लोकांची चौकशी केली नव्हती.

" नाही दोष माझ्यातच आहे",.. सुभाष.

" चांगलं आहे मला केवढी मोठी शिक्षा दिली तुम्ही लोकांनी, आता मीना गेल्यानंतर तुम्हाला माझी आठवण येत आहे का, मला जमणार नाही आता तुमच्यासोबत रहायला तसाही आपला घटस्फोट झालेला आहे, आपला काहीही संबंध नाही",.. सरला.

" का अशी करते आहे सरला तसं बघितलं तर आपल्या दोघांमध्ये काहीच भांडण नाही",.. सुभाष.

" हो बरोबर आहे, मी कधी तुम्हा लोकांना काही म्हटलच नाही, तुम्ही माझ्यावर जो आरोप केला तो मान्य केला, तुम्ही लोक जे म्हणाल ते मी ऐकल, हीच माझी मोठी चुकी झाली, पण मला आता या गोष्टीत पडायचं नाही, मी माझ्या आई-वडिलांबरोबर सुखी आहे, मला माझं जग आहे, मला काय करायचं आहे ते माहिती आहे, माझं आभाळ छान आहे, त्यात आता तुम्ही उगाच मध्ये करू नका",.. सरला.

सुभाष तिला जाऊ देत नव्हता, तिच्या अडवणूक केली होती त्याने,.." मी तुला सोडणार नाही सरला, मला तुझ्या सोबतच राहायचं आहे, माझ प्रेम आहे तुझ्यावर ",

" आता आठवण आली का माझी, जेव्हा मी त्रासात होती तेव्हा कुठे गेले होते तुम्ही? किती विनवणी केली होती मी पण तेव्हा तुम्ही दुसऱ लग्न करून मोकळे झाले, कस वाटल असेल मला तुम्हाला आणि मीनाला सोबत बघून, जबरदस्तीने घटस्फोट घेतला तुम्ही माझ्याकडुन, मला आता वेळ नाही तुमच्यासाठी",.. सरला.

ते दोघे बोलत असताना आकाश त्या शाळेचे ट्रस्टी यांचा मुलगा तिथून जात होते, ते शाळेत सायन्स विषय शिकवत असत, अतिशय हुशार आणि प्रामाणिक म्हणून ते प्रसिद्ध होते, त्यांना पहिल्यापासून सरला आवडली होती.

एग्रीकल्चर विषयात पदवीधर असलेले आकाश एक उत्कृष्ट शेतकरी होते, आधुनिक विचाराचे कुटुंब होतं त्यांच.

आकाश जवळ येऊन थांबला,.. "काही प्रॉब्लेम आहे का सरला",.

"हो मला हे सुभाष त्रास देत आहेत, मला त्यांच्याशी बोलायचं नाही",.. सरला.

"निघायचं इथून सुभाष नाहीतर माझ्याहून कोणी वाईट नाही, आमच्या गावात येऊन आमच्या शाळेतल्या टीचरला त्रास द्यायचा नाही, चल सरला",.. आकाश.

सरला त्याच्याबरोबर पटकन गाडीवर जाऊन बसली, त्याने सरलाला घरी सोडून दिलं,

" खूप धन्यवाद तुमचे",.. सरला.

" कोण होते ते ",.. आकाश.

"माझे मिस्टर होते आमचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला",.. सरला.

" आता काय म्हणत होते ",.. आकाश.

" त्यांना इकडे राहायला यायचा आहे माझ्यासोबत",.. सरला.

"तुझं काय म्हणणं आहे",. आकाश.

" शक्य नाही ते, माझ्यासाठी तो विषय आता संपला आहे, ते लोक काही चांगले नाहीत आणि त्यांच्यासोबत राहण्यात काही प्रगती नाही, मी इथे माझी आई वडिलांसोबत खुश आहे, शाळेतला जॉब मला प्रिय आहे, मला माझ्या आयुष्यात काहीही बदल झालेला नको आहे आता ",.. सरला.

" काळजी करायची नाही यापुढे जर सुभाषने त्रास दिला तर मला फोन कर",.. आकाश.

त्यानंतर सुभाष एकदा दोनदा भेटायला आला होता, सरला त्याच्याशी बोलली नाही, तिने आकाशला फोन केला, आकाशने परत सुभाषला दम दिला, आता तो चांगलाच घाबरला होता, सरलाशी बोलण्यात काही अर्थ नाही, संपला आहे तो विषय, उशीर झाला खूप, सरला गेली हातची.

शाळेच्या कामानिमित्त आकाश आणि सरला यांची नेहमीच भेट होत होती, काही दिवसांनी आकाशने सरलाला लग्नासाठी विचारलं, तिला खूप धक्का बसला,.. "तुम्हाला माहिती आहे ना माझं लग्न झालं होतं आणि माझा घटस्फोट झाला आहे",

"मला काही फरक पडत नाही त्याने, तुला माझ्याशी लग्न करायचं आहे की नाही",. आकाश.

" मला थोडा विचार करायला वेळ द्या",.. तिने घरी आई बाबांना आकाश बद्दल सांगितलं, सगळ्यांना खूप आनंद झाला,

रविवारच्या दिवशी आकाश आणि त्याच्या घरचे इकडे बघायला आले , आल्या आल्या सरलाच्या बाबांनी तिच्या घटस्फोटा बद्दल सगळ्यांना सांगून दिलं,

" आम्हाला काही हरकत नाही, आम्हाला माहिती होती ही गोष्ट आधीपासून",.. दोघांचं लग्न जमलं, लगेचच एका महिन्यात वाजत गाजत लग्न झालं,

शाळेत टीचर असलेली सरला आता शाळेची मालकीण झाली होती, प्रेमळ नवरा, समजूतदार घरचे, खूप खुश होती ती आकाश सोबत,

बरोबर एका वर्षाने तिला मुलगी झाली, तिचे आई बाबा आता तिच्या सोबतच रहात होते, हे नवीन जग हे आभाळ तिला आता खूप प्रिय होतं, त्यातच ती खूप छान रमली होती.

🎭 Series Post

View all