माझ आभाळ आणि मी... भाग 3

आईकडे आल्यावर सरला पूर्ण तुटून गेली होती, बरेच दिवस ती नुसती बसून असायची, आई-बाबा दोघंच होते घरी ते काळजी करायचे


माझ आभाळ आणि मी... भाग 3
तिथे मी खुश आहे
बाकी कोणी नको मला आता

©️®️शिल्पा सुतार
.........

शाळा नेहमीप्रमाणे सुरू झाली, चाचणी परीक्षा होती आजपासून, सरला वर्गात गेली, मुलांना पेपर वाटले, मुलं पेपर लिहिण्यात दंग होते, ती विचार करत होती,

सरला आणि सुभाषच्या लग्नाला पाच वर्षे झाले होते, ठरवून झाल होत ते लग्न, शिकलेल्या सरलाला लग्ना नंतर जॉब करायचा होता, पण सासरच्या लोकांनी परवानगी दिली नाही, काय कमी आहे घरात अजिबात बाहेर जावुन काम करायच नाही, इथून सुरुवात झाली तिच्या त्रासाला, मन मारून रहात होती ती, तिचे स्वप्नं धुळीला मिळाले होते,

इतर गोष्टीत सरलाला खूप सासुरवास होता, सगळ्यांनी तिच्यावर चिडायच एक हक्काचं ठिकाण होती ती, बोलणी खात होती, त्यात मूलबाळ नाही हा तर विषय मिळाला होता घरच्यांना, सुभाष ही तिची साथ देत नव्हता, ही तर बावळटच आहे, रडकी आहे, ही आमच्या घराण्याला वंश देऊ शकत नाही, मला हिच्या सोबत राहायचं नाही, अस सुरू होत त्याच, नावाला ती घरात होती, दिसेलं पडेलं तेवढं काम करत होती, घाबरून गेली होती ती खूप, शब्दानेही काही बोलत नव्हती कोणाला.

एकदा तिने सासूबाईंना सांगून बघितलं होतं,. "आम्ही दोघ डॉक्टर कडे जातो, व्यवस्थित तपासणी करून घेतो, काय प्रॉब्लेम आहे ते तरी समजेल, मला ही बाळ हव आहे, अस यश आल तर चांगल होईल",

एवढेच बोलल्यानंतर खूप चिडल्या होत्या सासुबाई ,.. "कोणाला डॉक्टरांकडे घेऊन जाते ग तू, मला स्पष्ट माहिती आहे की दोष तुझ्यातच आहे, अजिबात चालणार नाही हे, वर तोंड करून बोलते अजून, हिची रवानगी माहेरीच करायला पाहिजे, ही अशी आजारी पोरगी आपल्या गळ्यात बांधली या लोकांनी",...

त्या नेहमी सुभाषचे कान भरत होत्या,.." किती दिवस वाट बघायची आम्ही, नातू हवा आम्हाला, आता घाई कर सुभाष",

खरंच एक दिवस घरच्यांचा ऐकून सुभाषने दुसरे लग्न करायचं ठरवलं, सरलाला समजल्यावर खूप रडली ती, रात्री सुभाष भेटल्यावर तिने खूप समजवण्याचा प्रयत्न केला त्याला,.. "होईल ठीक आपण डॉक्टर कडे जावू, जरा धीर धरा, असा निर्णय घेवू नका, मला रहायच आहे तुमच्या सोबत",

" मला मूलबाळ हवं सरला, आई बाबा ऐकत नाही, दोष तुझ्यात आहे अस आई म्हणते",.. सुभाष.

"तुम्हाला काय वाटत",.. सरला.

"मला ही तेच वाटत, तू चांगली आहेस, पण मला बाळ हव आहे",.. त्याच्या हट्ट होता.

" ठीक आहे तुम्ही म्हणता तस होईल",.. यांना मी मुल नाही देऊ शकत, तिने पेपरवर सही करून टाकली, त्यांचा घटस्फोट झाल्यावर लगेचच सुभाषने दुसरे लग्न केलं, मीना घरात आली, सरलाला ते सहन होत नव्हत,

"सरला तू इथेच राहा घरी, कुठे जाऊ नको",.. सुभाष बोलत होता,

सरलाने ऐकलं नाही, कशाला राहायचं आता यांच्यात, काय संबंध आता यांचा आणि माझा, यांच्या घरचे काम करायला राहायचं का मी इथे आणि माझ्या नवऱ्याला माझ्या डोळ्यासमोर दुसरी सोबत राहतांना बघायचं का, मला नाही जमणार ते, ती तिचं सामान घेऊन आईकडे निघून आली.

आईकडे आल्यावर सरला पूर्ण तुटून गेली होती, बरेच दिवस ती नुसती बसून असायची, आई-बाबा दोघंच होते घरी ते काळजी करायचे, लहान बहिणीचे लग्न झालेलं होतं, ती तिच्या संसारात सुखी होती, ती यायची अधून मधून भेटायला.

एक दिवस मावशी भेटायला आली, तिच्याजवळ सरला खूप रडली,.. "संपलं सगळं मावशी, मी काय केलं होतं तर माझ्या नशिबात अस दुःख आहे ग, देवाने एक मूल माझ्या पदरात टाकलं असतं तर काय बिघडलं असतं",

"असा विचार करायचा नाही सरला, अजून काहीही संपलेलं नाही, तू हवं तेव्हा तुझं आयुष्य परत उभ करू शकते, अजून काहीच वय नाही तुझ" ,.. मावशी.

" कसं करणार मावशी मी, माझ्यात हिम्मत नाही, मला काही करायच नाही",.. सरला.

"एवढी शिकलेली आहेस तू नोकरी बघ, काहीतरी कर",.. मावशी.

" मला जमणार नाही",.. सरला.

🎭 Series Post

View all