माझ आभाळ आणि मी... भाग 2

वर्गातले मुलं खूप छान आहे, त्यांना छान शिकवायचं , संस्कार द्यायचे, कशाला हवा मला माझा संसार माझी मुलं, वर्गातले मुलच माझे मुलं आहेत,


माझ आभाळ आणि मी... भाग 2
तिथे मी खुश आहे
बाकी कोणी नको मला आता

©️®️शिल्पा सुतार
.........

संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर पटकन सरला घरी आली. रस्त्याने जरा धाक धुक होती तिला, बरं झालं आता सुभाष दिसला नाही, ती जरा घाबरलेली होती,

तिने आई-बाबांना याबद्दल काहीही सांगितलं नाही, त्यांच आता टेन्शन घ्यायचं वय राहील नाही, किती छान राहतो आहोत आम्ही इकडे, आई-बाबां माझी किती काळजी घेतात, खूप आधार आहे त्यांच्या मला, मी आता त्यांची साथ सोडणार नाही, मला आता यात अजिबातच कुठलाही बदल झालेला नको आहे,

रात्रीच जेवण झालं, उद्याच्या नोट्स काढण्यात सरला बिझी होती,उद्या कोणते तास आहे ते तिने परत एकदा बघितल, अर्धा वेळ तर चाचणी परीक्षा होती, अर्धे तास नेहमी प्रमाणे होणार होते, आवरून छान झोपून घेतलं तिने.

सकाळी आवाजाने सरला उठली, आई किचन मधे स्वयंपाक करत होती,

"आई काय चालल आहे, राहू दे ना मी उठते आहे",.. सरला.

"झोप ग जरा वेळ सरला तुझी पण धावपळ होते",.. आई.

बाबा पण उठले होते, रोज प्रमाणे त्यांच काम सुरू होत, चहा ठेवण, दूध तापवण पेपर वाचणे, ते आता त्यांच्या रिटायरमेंट नंतर आईला बरीचशी मदत करत होते, दोघं मिळून मिसळून राहत होते,

असं वागायला पाहिजे पती-पत्नीने एकमेकांशी, सन्मानाने, काळजी घेत, एकमेकाला काय हवं ते बघायला पाहिजे, नाहीतर सुभाष काय करत होते, बायकोचा अपमान करणे, तिला कमी समजणे, तिला न विचारता काहीही डिसिजन घेणे, एवढंच येत होतं त्यांना, नकोच तो विचार, मी बरीच पुढे गेली आहे आता, का भेटले ते काल, सरला उठली आवरायला आत गेली.

सुखी आयुष्य होत त्या तिघांच, काळजी नव्हती कसलीच, आई बाबा आणि ती एकमेकांना छान सांभाळून रहात होते, आईला आता हल्ली वाटायला लागलं होतं सरला अशी किती दिवस राहील आमच्यात, झालं ते झालं, परत लग्न व्हायला पाहिजे तीच , तसं तिने एक दोन दोनदा बोलून पण बघितलं होतं बाबांशी आणि सरलाशी, पण सरला तयार नव्हती परत लग्न संसार साठी,

" आई बाबां मला आता तुमच्या सोबत रहायच आहे ,माझा छान जॉब आहे शाळेत, त्यात मी खुश आहे, आता नको ते घर संसार",.. तिने स्पष्ट नाही सांगितल आईला.

वर्गातले मुलं खूप छान आहे, त्यांना छान शिकवायचं , संस्कार द्यायचे, कशाला हवा मला माझा संसार माझी मुलं, वर्गातले मुलच माझे मुलं आहेत, माझ हक्काच आभाळ, खूप प्रेम देतात ते मूल मला, किती आदर करतात, मी जे म्हणेल ते ऐकतात, किती हुशार झाला आहे वर्ग सहा महिन्यातच, अगदी एकच वेळा सांगितलं मी त्यांना की रोज पाढे म्हणत जा, मी येण्याच्या आधी सगळे पाढे म्हणत असतात,

असे कितीतरी चांगले बदल सरलाने त्या शाळेत केले होते, खूपच जिव्हाळा आणि प्रेम होत तिला त्या शाळेबद्दल, असच हवा ना खरं आयुष्य, आपल्याला हवं ते करायचं, जर कुठल्याही गोष्टीचा टेन्शन नसेल तर हातून नेहमी चांगलेच कार्य होतं, असंच वातावरण आवडत होत सरलाला, ज्यात काही अपेक्षा नाही कोणी काही बोलत नाही, फक्त प्रेम आहे सगळीकडे,

सरला तयार होती, तिघांनी मिळून छान नाश्ता केला,.. "आई बाबा औषध घ्या, मी येते",

"ही एक गोळी संपली आहे सरला, आज आणशील का तू येतांना",.. बाबा.

"हो बाबा तुमच प्रिस्क्रीप्शन द्या, मी आणते आज येतांना औषध",.. सरला.

सरला शाळेत निघाली जातांनाही ती बघत होती सुभाष दिसतो का, बर झाल तो नाही दिसला.

🎭 Series Post

View all