मायाजाल भाग 5

आता खुनी आणखी धोकादायक होणार.शरद पोहचू शकेल का खुन्यापर्यंत?काय असेल या खुनांचा हेतू?
मागील भागात आपण पाहिलत एक मोठं रॅकेट पकडलं गेलं.अनेक तरुण मुला-मुलींची सुटका पोलिसांनी केली.भावेश वर संशय घ्यावा असे काहीही सध्या तरी नव्हते.हे सगळं घडत असताना,खुनी मात्र थंड डोक्याने सावज शोधत होता..आणि ते सावज होत शशांक देशमुख.कोण होता शशांक???हे नाव ऐकून शरदला एवढा धक्का का बसला??वाचत रहा मायाजाल....

शशांक देशमुख..टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील उगवता तारा.. तरुण वर्गात सर्वाधिक लोकप्रिय आणि भविष्यातील स्टार.शिवाय शशांक शरदचा वर्गमित्र होता.आता ही केस हाय प्रोफाइल झाली होती .शशांक सारख्या सेलिब्रिटीची हत्या झाली.आता प्रचंड दबाव आणि मीडिया अटेन्शन येणार होते.शरद हा विचार करत असतानाच मोबाईलवर कमिशनर साहेबांचे नाव फ्लॅश झाले.व्हॉट इज धिस शरद?काय करताय काय तुम्ही लोक?लवकरात लवकर ऍक्शन घ्या.आय वॉन्ट रिझल्ट....शरद हसला.त्याने समीर,शेफाली आणि कदम सगळ्यांना कॉन्फरन्स कॉल वर घेतले.तेवढ्यात शेफाली म्हणाली,"सर प्रिया मॅडम वेटिंग वर आहेत.शरदने प्रियाला सुद्धा कॉल वर ऍड केले.आता ही केस अतिशय सावध आणि जलद हाताळावी लागेल शरद सूचना देऊ लागला.सर्वांनी लगेच लोकेशन पोहचा. फोटोग्राफर आणि फॉरेन्सिक सह. शरदने बुलेटला किक मारली.पुढच्या अर्ध्या तासात शरद हॉटेलच्या लॉबीत होता.फिल्मसिटी बाहेर असलेले लोटस परडाईझ हे हॉटेल सगळ्या इंडस्ट्रीतील लोकांचे आवडते ठिकाण होते.अनेकदा रेड पडूनसुद्धा कधीही काहीच पोलिसांना हाती लागले नव्हते.शरद पाठोपाठ समीर,शेफाली,कदम,प्रिया सगळे येऊन पोहोचले.चला लवकर..आय वॉन्ट रिझल्ट!!!शरद कमिशनर साहेबांची नक्कल करत म्हणाला.सगळे वरच्या मजल्यावर पोहोचले.समोर शशांकचा मृतदेह पाहून शरदला थोडे वाईट वाटलेच.समोरच्या बेडवर शशांक निर्वस्त्र होता.छातीवर एक विशिष्ट चिन्ह आणि...शशांकच्या डोक्यावरील सगळे केस गायब होते.शरद लगेच सावरला,"शेफाली,मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घे,कदम cctv फुटेज मागवा.प्रियाने तपासणी सुरू केली.गळा कापला गेला होता.फोटोग्राफर वेगवेगळ्या कोनांतून फोटो घेत होता.

हॉटेल लॉबी बाहेर अख्खा मीडिया हजर होता.टीम बाहेर येताच प्रश्नांचा पाऊस पडू लागला.तीन खून झाले,शहराच्या सुरक्षिततेचे काय?पोलीस खुन्याला कधी पकडणार??सगळी टीम सरळ गाडीत निघाली.इकडे सगळा मीडिया बातमी तिखतमीठ लावून पुन्हा पुन्हा दाखवत होता.हेड ऑफिसला पोहचताच शेफालीने शशांकचा फोन आणि लॅपटॉप सायबर सेल च्या ताब्यात दिला.कदम cctv फुटेज दाखवा .कदमांनी पेन ड्राइव्ह जोडला.शशांक रात्री जवळपास 12 च्या सुमारास लॉबीत गाडीतून उतरला.त्याच्याबरोबर आणखी दोन जण दिसत होते.कदम स्टॉप करा,झूम करा.ओम कपूर आणि तो दुसरा कोण आहे????शरद ओरडला,"ते नंतर शोधा आधी कमिशनर साहेबांकडून ओम कपूरच्या नावाचे अटक परवानगी पत्र आणा.आता मात्र सोडायच नाही याला.प्रिया पी एम रिपोर्ट कधीपर्यंत मिळतील.आजच द्यायचा प्रयत्न करते.शरद पण बॉडीवर नखांच्या खुणा आहेत.ड्रिंक्स असेलच आणि बहुतेक......आलं माझ्या लक्षात.शरद अस्वस्थ फेऱ्या मारत होता.अटकेची परवानगी मिळून अटक होईपर्यंत बातमी फुटायला नको होती.ओम कपूर बॉलीवूडमधील मोठं नाव.वेळ घालवून चालणार नव्हतं.एवढ्यात फॅक्स चा आवाज झाला.परवानगी मिळाली. शरद बाहेर पडतच म्हणाला,"कदम जीप काढा,समीर दर्शन पटेलला उचल शेफाली तो दुसरा कोण आहे याचा माग काढ".अक्षरशः धावत येऊन शरद जीपा मध्ये बसला.एवढ्यात फोन वाजला,"बोल पप्पू,खबर खरी आहे.बस का साहेब 100 टक्के खरी आहे."कदम गाडी विमानतळावर घ्या",शरद ओरडला.कदमांनी लगेच टर्न घेतला.गाडी वेगाने धावत होती.विमानतळावर गाडी थांबली.शरदने गाडीतुन उडी मारली आणि शरद आत धावला.अंगावर वर्दी असल्याने कोणी अडवले नाही.ओम कपूर विमानात बसायला आत जाणार एवढ्यात...शरद धावत येत असलेला त्याला दिसला.ओम पळायच्या आधी शरदने त्याला पकडलं.विमानतळ पोलीस लगेच धावत आले.शरदने परवानगी दाखवली.सगळी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बातमी फुटली होती...सगळी इंडस्ट्री हादरली...इतकं मोठं नाव समोर आलं होतं.शरदने ओमला गाडीत टाकले आणि गाडी धावू लागली.
इकडे समीरने दर्शनला फोन लावला.दर्शन लवकर पोलीस स्टेशनला हजर हो!एवढयात प्रसादच्या मित्राचा फोन आला,"सर प्रसादला तुम्हाला काही सांगायच आहे."समीर म्हणाला,"मी येतो हॉस्पिटलमध्ये, तू कुठे आहेस?मी प्रसाद बरोबर आहे.समीरने दर्शनला परत एक मॅसेज केला आणि हॉस्पिटलमध्ये निघाला.इकडे शेफालीने त्या तरुणाचा फोटो खबऱ्याना पाठवला.एवढ्यात तिला सायबर सेल मधून फोन आला.शशांकचा फोन आणि लॅपटॉप अनलॉक केला आहे.शेफाली धावतच संगणक विभागात गेली.मॅडम लास्ट दोनपैकी एक कॉल ओम कपूरचा आहे आणि दुसरा कोणीतरी विनय शर्मा म्हणून आहे.शेफालीने विनयचे अड्रेस डिटेल्स घेतले आणि वेगात बाहेर पडली.शरद ओम कपूरला घेऊन येइपर्यंत सगळीकडे बातमी पसरली होती.ओमची आई वकिलांची अख्खी फौज घेऊन हजर होती.शरद याही बाबतीत हुशार निघाला त्याने कोर्ट प्रोसिजर पूर्ण केल्या होत्या.मिसेस कपूर आदळआपट करतच आत शिरली. त्यात शरदला पाहून तिला राग अनावर झाला.शरद वकिलांशी शांतपणे बोलत होता.अर्ध्या तासाने मिसेस कपूर बाहेर पडली.जाताना शरदला धमकी देऊन गेली.
डॉ .प्रियाने पी एम रिपोर्ट तयार केला आणि घरी आली.रिपोर्ट शरदला मेल केला.प्रियाच्या डोक्यातून काही बॉडीवरची अक्षरे जात नव्हती.तिने चिन्हांच्या प्रिंट सोबत आणल्या होत्या.प्रिया ती चिन्हे पहात असताना मागून थाप बसली,"तायडे!काय बघतोस दाखव की???प्रियाची लहान बहीण स्वरा हसत म्हणाली.तिने प्रियासमोरचे कागद उचलले..तायडे डॉक्टरकी सोडून पोलिसात शिरलीस आता परत पुरातत्त्व मध्ये शिरतेय का???एवढ्यात प्रियाला क्लीक झालं.हा स्वराच्या अभ्यासाचा विषय आहे.प्रियाने स्वराकडे पाहिलं,ये नाही हा तायडे!!तुला मदत करायची म्हणजे????प्लिज स्वरा अस काय करतेस???स्वरा हसली.गप नौटंकी.ही चिन्ह प्राचीन भाषांमधली आहेत हे नक्की.मला दोन दिवस दे फक्त....

काय असेल चिन्हांचे रहस्य???त्यातून खुनी समजेल का?ओम कपूरचा शशांकच्या खुनात सहभाग असेल का?पुढचा बळी जाणार का??वाचत रहा मायाजाल...

🎭 Series Post

View all