मायाजाल भाग 12

शरदला खुनी समजला का?पुढील खून थांबणार का?


शरदच्या मनात सतत हाच प्रश्न होता,नक्की कोण असेल या सगळ्यामगे?काय उद्देश असेल?अर्नाळकरांच्या कथा वाचता वाचता शरद तसाच झोपून गेला.दुसऱ्या दिवशी समीरला बरे वाटत होते.आता लवकरात लवकर शशांकच्या फार्महाऊसवर जाणे आवश्यक होते.काय असेल या ठिकाणी?काय असतील ही उत्तरे???पाहुयात आजच्या भागात.

लवकर उठून शरद आणि समीर तयार झाले.शरद गाडी चालवत होता.दोघे लवकरच लोणावळ्यातील त्या आलिशान भागात पोहोचले.फार्महाऊसवर फक्त देखभाल करणारा वॉचमन होता.शरदने सगळी कागदपत्रे दाखवून त्याला बंगला उघडायला लावला.समीर त्याला सहज म्हणाला,"साहेब नेहमी यायचे का?तेव्हा तो वॉचमन म्हणाला,"महिन्यातून दोन तीन पार्ट्या व्हायच्याच. साहेब असायचे तर कधी ते ओम साहेब किंवा सुधीर साहेब असायचे.पार्टीत काय काय चालायचं रे?वॉचमन थोडा थांबला आणि बोलू लागला,"मोठी लोक आणि त्यांचे शौक पण वेगळे,दारू,वगैरे तर असायचेच पण दरवेळी नवीन नवीन पोर आणायचे.एवढं बोलत त्याने बंगला उघडला.पोलिसांनी सील केल्यावर बंगला कोणीही उघडला नव्हताच.शरद आणि समीर काळजीपूर्वक सगळीकडे शोध घेत होते.जवळपास दोन तीन तास झाले तरीही काही सापडत नव्हतं. दोघेही वैतागले होते.बॉबीने आपल्याला चुकवायला हे लिहिलं नसेल ना!समीर म्हणाला.तेव्हा शरद हसला,"नाही,तो खर बोलत होता.एवढ्यात शरदच लक्ष देवघराकडे गेलं.स्ट्रेनज? शशांक ह्या सगळ्या पार्ट्या इथे करत असताना देवघर?तरीही इथे शोधायला हवे.समीर आणि शरद काळजीपूर्वक शोधू लागले.भिंतीवर एक फारशी वेगळ्या रंगाची होती.समीरने फरशीवर हात दाबताच फारशी बाजूला सरकली.आत एक लिफाफा होता.शरद हसला,"चला,काहीतरी क्लू सापडला."दोघेही बाहेर आले.वॉचमनला थोडे प्रश्न विचारून दोघे निघाले.

इकडे ओम कपूर आता बेफिकीर झाला होता.त्याच्या आईने अडवून सुद्धा तो बाहेर पडला.त्याला कित्येक दिवसात पार्टीत जायला मिळालं नव्हतं.त्याने ड्राइव्हर ला गाडी काढायला लावली.गाडी मुंबईबाहेर पवईकडे धावू लागली.तोवर ओमने त्याच्या काही मित्रांना फोन केले.त्यानंतर त्याने एक नंबर डायल केला,"नवा माल असेल तर पाठव."पाठवतो साहेब.पण सगळं करणारा पाहिजे,उगीच नखरे नको.पलीकडून माणूस हसला,"तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करणारे पाठवतो.ओम हसत म्हणाला,"तीन पाठव.ओमने फोन ठेवला.गाडीने वेग पकडला होता.बरेच दिवस घरात कोंडल्याने ओमला आता बरं वाटत होतं आणि भीतीसुद्धा.काहीतरी घडतंय अस त्याला वाटायचं पण काय??ते कळत नव्हतं.ओम गाडीतून उतरून बंगल्यात आला.मस्त शॉवर घेतलं,उंची अत्तर लावून फ्रेश झाला.त्याचे मित्र आले.त्यांनतर एक तासाने ते तीन तरुण आले.ओम पहातच राहिला.गोरे,घारे, देखणे आणि पिळदार शरीराचे,साधारण पंचविशीत असलेले.मुंबईत स्वतःची स्वप्न पुरी करायला आलेले.त्या तिघांना ओमने आत घेतलं.ओमचा एक मित्र पुढे आला,"ओम चिकना माल आहे रे."ओमने त्या तिघांना आतल्या खोलीतून चेंज करायला सांगितला. अत्यंत तंग,सगळे अवयव दाखवणाऱ्या लेदर पॅन्ट आणि वर लेदर जॅकेट गळ्यात पट्टा असा पोशाख करून ते बाहेर आले.त्यांनतर सुरू झाला तो विकृत खेळ.अचकट, विचकट डान्स करायला लावणे,अंगावर फटके मारणे,तिघांचे कपडे ओढून फाडून काढणे आणि.....बऱ्याच दिवसांनी ओम याचा आनंद घेत होता.खून,धमकी सगळं सगळं तो विसरला होता.धुंदीतच बेडरूमकडे निघाला.बाकीचे मित्र निघून गेले.पहाटेचे तीन वाजले होते.ते तिघे विवस्त्र उभे होते.ओमने त्यांना शिवी हासडली×××××चल आत.असे म्हणत ओमचा तोल गेला.डोळे बंद झाले.

हळूच ओमने डोळे उघडले.ओमला काहीच दिसत नव्हते.ओम घाबरला त्याने उठायचा प्रयत्न केला.त्याचे हातपाय बांधले होते.अंगावर एकही कपडा नव्हता. अचानक त्याला काहीतरी आठवलं,हे सगळं आधीसुद्धा घडलं आहे.तेवढ्यात आवाज आला,"आठवतंय का काही?आणि खोलीत उजेड आला.समोरची वयक्ती पाहून ओम जोरात ओरडला,"तू........आणि तो बेशुद्ध झाला.

इकडे शरद आणि समीरने लिफाफा फोडला.शशांक कॉलेजला असताना कसा होता?शरदला सहज जुनी आठवण आली.लिफाफ्यातील मजकूर समीर वाचू लागला.जर हा लिफाफा कोणाला सापडला तर याचा अर्थ मी या जगात नाही .मला खूप गर्व होता,रूप,देखणं शरीर,अभिनय क्षमता आणखी काय हवं??????असं वाटायचं मला.पण....इथे आणखी बरंच काही सुद्धा लागत.हे लवकरच नशीब दाखवणार होत मला.मी सुरुवातीला छोटी मोठी काम करत होतो.माझं काम लोकांना आवडत होत.पण ...मोठा ब्रेक मिळत नव्हता.एक दिवस एका मोठ्या संस्थेत मालिकेसाठी ऑडिशन होते.मी गेलो.त्यांनी मला इंटिमेट सिन करायला सांगितला. मी म्हणालो,"सर त्यासाठी समोर नायिका हवी ना".तेव्हा तो असिस्टंट हसला,"मी आहे की!!मला ते कसतरी वाटलं पण.....हा पण खूप मोठा होता.त्याने कॅमेरा रेडी केला.मला शर्ट काढायला लावला,माझ्या जवळ जात हात फिरवायला लागला.खूप राग आला.कसबस दृश्य देऊन बाहेर पडलो.रूमवर आलो.मित्राला सांगितल्यावर तो हसला.अरे इथं फक्त अभिनयावर पुढं जाणारे लोक दुर्मिळ असतात.वेळ पडली तर मोठे मोठे रोल मिळवायला हे सगळं.....तरीही मनाला पटत नव्हतं.ती घटना विसरायचा प्रयत्न करत असताना मला त्यांच्याकडून शॉर्टलिस्ट झाल्याचा फोन आला.मी इच्छा नसताना तिथे गेलो.आता निर्माते आणि दिगदर्शक होते.खूप छान वागले माझ्याशी.मला मोठा ब्रेक मिळाला.मला खूप आनंद झाला होता.त्यानंतर शूटिंग सुरू झाले,प्रोमो आले.मालिका गाजू लागली.मला आता सगळं स्वर्गात असल्यासारखे वाटत होते.लवकरच मालिकेचे दोनशे भाग पूर्ण झाले.सतत मालिका अव्वल स्थानावर होती.या निमित्त लोणावळ्याला पार्टी होती.मी गेलो.पार्टीत भरपूर मजा येत होती.ड्रिंक्स घेतले जात होते.मी लवकर निघायच्या विचारात असताना मला निर्माते सुरेश यांनी एक ड्रिंक घेऊन जा अस म्हंटल.मी ती ड्रिंक घेतली.झिंग येऊ लागली,डोळे बंद होऊ लागले.......दुसऱ्या दिवशी डोळ्यावर उन्ह आली.मी उठलो तर काय????मी त्याच बंगल्यात होतो..पूर्ण विवस्त्र आणि माझ्या बाजूला इंडस्ट्रीतील दोन बडे अभिनेते होते.बाहेर काही लोक असावेत.मी रागाने बाहेर आलो....तेव्हा मला माझे निर्माते,दिग्दर्शक आणि मॅडम एस .....तिघे होते.मॅडम एस..फक्त नावाला मॅडम प्रत्यक्ष तो पुरुषच आहे.मॅडम एस म्हणजेच ड्रीमलाईन प्रोडक्शन आणि अनेक चॅनल चे मालक असणारे सुकांत रॉय.....मी चिडून शिव्या देऊ लागलो.सुकांत शांत होता.त्याने मला कालचा विडिओ दाखवला.मला म्हणाला,"तू मला आवडलास, माझ्याकडे रहा.... नाहीतर हे व्हिडिओ.... मी फसलो होतो.सुरुवातीला अनिच्छेने पण नंतर ....हळुहळू हळूहळू हे रॅकेट चालवायला मी मदत करू लागलो.सगळं छान चालू असताना तो आला...विराट राजे.मॅडम एसला तो हवा होता.... मी तो मिळवून दिला पण....त्या पोराने आत्महत्या केली..त्यानंतर शशांक म्हणजे एक मेलेलं मन घेऊन जगणार यंत्र आहे.जर मी मेलो तर या लोकांना सोडू नका बाकीचे पुरावे माझ्या लॉकर मध्ये आहेत.

लिफाफा वाचल्यावर शरद म्हणाला,"चल,लगेच मुंबईला निघायला हवे.दोघे लगेच तयार झाले.गाडीत अर्नाळकरांच पुस्तक तसच होत.समीरने पुस्तक पाहिलं.खूप छान आहे सर हे पुस्तक. यात सिरीयल किलर स्वतःच्या मरणाचा भास उभा करतो आधी आणि मग ......काय???????शरद चमकला.समीर लवकर शेफालीला फोन लाव.विराटच्या आत्महत्येचे डिटेल परत तपास.पुढचे टार्गेट ओम आणि मॅडम एस आहे.......समीर चमकून पाहतच राहिला.

शरदला खुनी कळला का?ओमला कोणी पकडलं आहे???मॅडम एस वाचणार का????वाचत रहा मायाजाल

🎭 Series Post

View all