मायाजाल भाग 11

मायाजाल आणखी गुंतत चालले आहे.कोण असेल खुनी?


गृहमंत्र्यांचा मुलगा???बातमी वनव्यासारखी पसरली.शरदचा फोन सतत खणखणत होता.प्रेस,राजकीय नेते,वरिष्ठ अधिकारी प्रत्येकाला उत्तर द्यावी लागत होती.शरदसारखा अनुभवी अधिकारीसुद्धा चक्रावला होता.खुनी नक्की कोणत्या उद्देशाने हे सगळं करतोय?मागील सगळी लोक विराटच्या प्रोफेशनशी संबंधित होती.पण आता इथे काय संबंध असेल?वाचूया मायाजाल.



देसाईंच्या आलिशान फ्लॅटमध्ये त्यांचा ऐन पस्तिशीतील मुलगा विवस्त्र पडलेला होता.गळा चिरून मारले होते.अंगावर अनेक खुणा होत्या.त्याशिवाय पुन्हा एकदा एक विशिष्ट चिन्ह जांघेवर कोरले होते.शरदने लगेच फोटो प्रियाला पाठवला.एवढ्यात कमिशनर आणि गृहमंत्री आत आले.शरद म्हणाला,"सर ही पद्धत सेम आहे,गृहमंत्री हताश होऊन मृतदेह पाहत होते पण शरदच वाक्य ऐकताच देसाई चिडले,"त्या प्रकरणाशी संबंध जोडू नका,कमिशनर चांगल्या ऑफिसरकडे द्या केस."शरदला प्रचंड राग आला होता.तो उलट उत्तर देणारच होता एवढ्यात फोन खणखणला,"सर सुधीर घोष सापडलाय."शरदने टीमला उरलेली कारवाई करायला सांगितली.cctv फूटेज पाहिलं,काही खास आढळलं नाही.शरद बाहेर पडताच त्याने समीरला फोन लावला,"कुठे सापडला सुधीर घोष?सर तो एका फोटोशूट साठी लोणावळ्यात आहे.शरद हसला,"गुड,आपल्याला लोणावळ्याला जायचेच आहे.लोकल पोलीस स्टेशनला कल्पना द्या.संध्याकाळी निघू.तेवढ्यात प्रियाचा मॅसेज आला.लॅटिन भाषेतील या अक्षराचा अर्थ होता K म्हणजे virasik असा निरर्थक अर्थ तयार झाला.शरदची प्रचंड चिडचिड होत होती.शेफालीला मुंबईत थांबायला सांगून तो समीरला घेऊन लोणावळ्याला निघाला.वाटेत कामाचे अपडेट चालूच होते.शशांकच्या फार्म हाऊसवर जायच्या आधी घोषला गाठायचे ठरले.साध्या वेषात असल्याने सावधगिरी बाळगत ते मिळालेला पत्ता शोधत होते.ज्यांना पत्ता विचारला ते जरा वेगळ्या नजरेने बघत असत.तरीही शोध चालू होताच.


जवळपास अर्ध्या तासांनी लोणावळ्याच्या आतल्या भागात असलेला तो आलिशान बंगला सापडला.लांबून निर्जन वाटत असला तरी दोघेही सावध होते.बंगल्याचा आत गुपचूप प्रवेश केला.आत सगळी सामसूम होती.बाहेर गाडी होती.त्यामुळे घोष आत आहे हे नक्की होत.अचानक घुसमतल्यासारखा आवाज आला.क्षणात समीर आणि शरद पिस्तुल काढून धावले.बेडरुमचा दरवाजा आतून बंद होता.शरदने लॅच वर गोळी मारली एवढ्यात खिडकी सरकवली गेली.आत येत असतानाच सुसाट वेगाने गोळी समीरच्या दंडाला चाटून गेली.समीरने त्याही स्तिथीत गोळी झाडली तोवर समोरच्या वयक्तीने स्वतःला खाली झोकून दिले होते.खाली पडलेल्या समीरला सावरेपर्यंत गाडी वेगाने गेटबाहेर पडल्याचा आवाज झाला.शरदने लगेच स्थानिक पोलिसांना मदत मागितली.समीरला उपचारासाठी दवाखान्यात नेलं.तोवर सांगितलेल्या नंबरची गाडी स्ट्रेस झाली का?हे सतत विचारत होता शरद.खुनी हुशार निघाला.गाडी निर्जन ठिकाणी सोडली होती.समीरला फार दुखापत झाली नाही,हीच एक समाधानाची बाब होती.सुधीर घोष शरदच्या समोर तडफडत मेला होता.जांघेत आणखी एक चिन्ह होते..शरद प्रचंड अस्वस्थ झाला.हाती येतायेता खुनी निसटला होता.बाकी सगळ्या गोष्टी पूर्ण करताकरता संध्याकाळ झाली.त्यामुळे आता इथेच आराम करून त्यानंतर उद्या शशांकच्या फार्महाऊसवर जायच हा निर्णय शरदने घेतला.



हॉटेलवर आल्यावर त्याने शेफालीला फोन लावला.शेफाली बोलू लागली,"सर ,या मंत्र्यांच्या मुलाचे फोन डिटेल्स चेक केलेत. अनेक बाबी समोर आल्या. त्यात दर्शन पटेल सोबत नियमित बोलत होता हा.दर्शनला उचलते.विनयचा नंबरसुद्धा आहे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये.या दोघांचीही चौकशी करावी लागेल.तसेच त्याचा इतर इतिहास सुद्धा शोधायचा आहे.शरदने शेफालीला जपून रहायच्या सूचना देऊन फोन ठेवला.शेफालीची बुलेट बिल्डिंगमध्ये आली.पाच फूट सात इंच उंच आणि वेल बिल्ट शेफाली प्रथम नजरेत कोणाला पोलीस वाटत नसे.समोरच्या टोळक्यातुन एकाने शिट्टी मारली.शेफालीने बुलेट पार्क केली.जीन्स आणि व्हाईट शर्ट मध्ये ती कमालीची आकर्षक दिसत होती.शेफाली टोळीकडे येताना अचकट विचकट हसन चालू होतं.काय रे कोणी मारली शिट्टी?या प्रश्नावर एक टपोरी पुढ आला.तो काही बोलायच्या आधी एका फटक्यात शेफालीने त्याला आडवा केला. बाकीची पोर हालचाल करण्याआधी शेफालीने विजेच्या चपळाईने धुलाई सुरू केली.त्यानंतर त्या शिट्टी मारणाऱ्याला पकडून म्हणाली,"नाव लक्षात ठेव इन्स्पेक्टर शेफाली फ्रॉम क्राईम ब्रँच."तिचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत सगळी टोळी गायब झाली होती.शेफाली वॉचमनकडे आली,"काका ,तुम्ही तक्रार का करत नाही?कोणाकडे करू ताई?यात या सोसायटीतील कितीतरी पोर आहेत.शेफालीने ओळखपत्र दाखवलं.पुढच्या मिनिटाला शेफाली दर्शनच्या फ्लॅटच्या दारात होती.बेल वाजली.दर्शनने शेफालीला पाहिलं.तो तिला धक्का मारून पळणार एवढ्यात त्याच्या पायात पाय अडकवून एक पंच नाकावर बसला.त्याला डोळ्यासमोर अंधारीच आली.



पुढच्या मिनिटाला शेफालीने दर्शनला बेड्या घातल्या.दर्शन आता गयावया करू लागला,"प्लिज ,मी स्वतःहून सगळं सांगतो,मला असं बेड्या घालून नेऊ नको.शेफालीने कदमांना बोलावलं.बोल गृहमंत्र्यांचा मुलगा विश्वास आणि तुझा काय संबंध?तू गेल्या वर्षभरापासून त्याच्या नियमित संपर्कात आहेस.दर्शन बोलू लागला.मी काय काम करतो तुम्हाला माहीत आहेच मॅडम.असेच एक दिवस मला एक फोन आला.त्यात एक ऑफर होती.विश्वासला नादी लावायचं बदल्यात मागेल तेवढे पैसे.सुरुवातीला मी नकार दिला.तेव्हा मला समोरील वयक्तीने एक लिफाफा पाठवला.त्यात विश्वास,शशांक आणि मॅडम एस चे सगळे कारनामे होते.wait, शेफाली त्याला थांबवित म्हणाली.म्हणजे विश्वास???हो मॅडम,अनेक तरुण सुंदर मुलांना हेरून विश्वासला पुरवलं जायच.त्यातील कित्येक पोर पुढे गायब होत.मी आतापर्यंत केलेली पाप एवढी होती की वाटलं साथ द्यावी.त्यानंतर मला विश्वासच्या डिटेल्स लिफाफ्यात पाठवल्या गेल्या.हळूहळू हळूहळू विश्वासला माझी सवय लागली.त्याला रोज एकजण हवा या स्तिथीत आणलं.गृहमंत्र्यांनी मला अनेकदा मारण्याची धमकी दिली.म्हणूनच मघाशी मी पळून जात होतो.आठ दिवसांपूर्वी मला फोन आला.त्या प्लॅन नुसार मी विश्वासला आठ दिवस भेटलो नाही.तो व्याकुळ झाला.मग मी त्याला भेटायचं कबूल केलं.त्याच इमारतीत खालच्या मजल्यावर फ्लॅट मध्ये आम्ही भेटायचो.यावेळी मी त्याला तुझ्या फ्लॅटवर असेल तरच येणार म्हणालो. तो आम्ही यायचे व जायचे फुटेज डिलीट करायचा पैसे चारून.त्याचाच फायदा घेऊन मिस्टर एक्स ने विश्वासला संपवलं मॅडम.त्यानंतर मला पन्नास लाख रु व हे शहर कायमच सोडून जा असा लिफाफा मिळाला.पण.....त्याआधी मी तुला पकडला.चला कदम खाली आलेत .


इकडे प्रियाने सुधीरच्या बॉडीवरील चिन्हाचा अर्थ पाठवला.इंग्लिश C. म्हणजे virasikc असा विचित्र शब्द तयार झाला.शरदला आता फक्त मॅडम एस कोण ते शोधायचे होते.ओम कपुरवर परत हल्ला झाला नव्हता.त्यामुळं त्याने पोलीस संरक्षण नाकारले.तरीही शरदने त्याच्यावर गुप्त पाळत ठेवली होती.आता शशांकच्या फार्म हाऊसवर याच्या बाबत रहस्य उलगडणार होते.परंतु या सगळ्यामागे आहे कोण???थोडाचा विरंगुळा म्हणून शरदने अर्नाळकरांच्या रहस्य कथांचे पुस्तक वाचायला घेतले.पण मनात मात्र हेच रहस्य घोळत होते.काय असेल या मायाजालाचा शेवट?

🎭 Series Post

View all