मायाजाल (अंतिम भाग)

मायाजाल उलगडले..काही प्रश्न सुटले.


मागील भागात आपण पाहिले की रावी हे नाव या सगळ्याचा सूत्रधार म्हणून पुढे आले.ओम कपूरला रावीने जवळजवळ समीरच्या डोळ्यासमोर मारलं.कोण असेल ही रावी?तिचा या सर्वांशी काय संबंध?शशांकच्या लॉकर मधून कोणते पुरावे बाहेर येतील?इन्स्पेक्टर शरद सुकांत रॉयला पकडू शकेल का?या सर्वांची उत्तरे आज उलगडतील आपल्या मायाजालाच्या अंतिम भागात...

रावीचा बदला काय असेल?मुळात ही रावी कोण?समीर आणि शेफालीच्या डोळ्यातील प्रश्न स्पष्ट दिसत होता.इन्स्पेक्टर शरद आणि टीमला हे रहस्य उलगडले.शरदने शशांकचा लॉकरसमीर उघडला आणि....त्या मध्ये सर्वात वर मिळाला एक फोटो.खुद्द शशांकचा स्रीवेशातील.फोटो पाहून शेफाली म्हणाली,"किती सुंदर दिसतोय हा."शरद खिन्न हसला,"हे सौंदर्यच त्याचा शाप ठरलं."आता मला सगळं उलगडत आहे.रावी म्हणजेच शशांक .काय?????हो!!पण।शशांक तर????कदम म्हणाले.शरद हसला,"समीर अर्नाळकरांच्या कथेतला खलनायक इथेही आहे...समीर हसला,सर!!एकदम बरोबर.पण आता मॅडम एस उर्फ सुकांतला पकडायला हवे.कारण तो या सर्वांवर प्रकाश टाकू शकतो..कदम गाडी चला.सगळी टीम निघाली.

इकडे या सगळ्याची कुणकुण सुकांत रॉय उर्फ मॅडम एसला आधीच लागली होती.ओमचा खून झाला.हे ऐकल्यावर सुकांत देश सोडून जायच्या तयारीत होता.जास्तीत जास्त रक्कम परदेशी खात्यात वळवून पळ काढायला सज्ज झाला.सुकांत पहाटे उठला.स्वतःची गाडी घेऊन जाणे धोक्याचे होते.त्याने ट्रॅव्हल एजन्सीकडून गाडी बोलावली.ती गाडी त्याने स्वतःच्या ठिकाणापासून दूर उभी केली.पहाटे तीन वाजता सुकांत बाहेर पडला.लवकरात लवकर देश सोडून पळून जाणे.कारण आजवर या काळ्या मार्गाने अमाप पैसा कमावला होता.तरीही शशांक मात्र अजूनही त्याच्या डोळ्यासमोरून जात नसे.अनेक देखणे आकर्षक तरुण त्याने या धंद्यात लावले.पण शशांक मूर्तिमंत सौंदर्य होता.त्याला अजूनही शशांकच्या पहिल्या रात्रीची आठवण होत होती.शशांकचा रावी मध्ये बदल करणे...त्याला अनेक बड्या डेलिगेट्सना सादर करणे.तरीही तो शशांक उर्फ रावीला स्वतःची मालमत्ता समजायचा. किती विनवण्या करत असे शशांक...पण मॅडम एसला एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच.....या सगळ्या तंद्रीत तो एजन्सीने पाठवलेल्या गाडीत बसला. गाडीने वेग पकडला.विचारांची साखळी तुटली.तो समोर पाहणार एवढ्यात सुकांतच्या डोळ्यांवर झापड येऊ लागली.

इकडे शरदच्या टीमने सुकांतच्या बंगल्यावर छापा मारला.सुकांत बाहेर पडल्याचं लगेच लक्षात येत होतं.त्याला लवकरात लवकर पकडणं आवश्यक होतं.आजूबाजूच्या सगळ्या भागातील cctv फुटेज चेक करा,quick...शरद ओरडत होता.शरदच्या टीमने वेगाने हालचाल सुरू केली.सुकांत गाडीत बसून जाताना दिसला.गाडीचा नंबर लगेच सायबर ब्रॅंचला कळवला.दुसऱ्या मिनिटात डिटेल्स समजले.शेफालीने एजन्सी ऑफिसला फोन लावला.फोन रिसिव्ह होईना.तिने मॅनेजरला मोबाईलवर फोन केला.लगेच ऑफिसला यायचं...सोबत संगणकावर काम करणारे बोलवा. ट्रॅव्हल एजन्सी ऑफिस जवळच होत.सुकांत जाऊन पाऊण तास झाला होता.इकडे एजन्सीच्या ऑफिसात शरदने गाडीला gps आहे का??विचारलं.मॅनेजर म्हणाला,"आहे सर...ट्रेस करा...gps बंद दाखवत होत.शरद वैतागला.तेवढ्यात मॅनेजर हसला,"सर,काळजी करू नका..आमच्या गाडीत ट्रॅकर ठेवतो आम्ही.Gps बंद करून गाड्या गायब होतात..ऑपरेटरने लोकेशन शोधलं....लोकेशन होत....हॉटेल लोटस पॅराडाइझ...

गाडी वेगाने फिल्मसिटीकडे धावू लागली.इकडे सुकांतचे डोळे चुरचुरत होते..डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न करत होता...परत डोळे चोळत होता...तेवढ्यात आवाज आला,"भास नाहीय हा!!मीच तुझी रावी!!सुकांत उठायचा प्रयत्न करत होता..हात बांधले होते.कस....शक्य????? तेवढ्यात शशांक जवळ आला.त्या दिवशी मेला तो शशांकचा बॉडी डबल आणि जिवंत राहिली रावी...हेच नाव दिलंस ना. आता मात्र सुकांतच्या डोळ्यासमोर सगळं स्पष्ट दिसत होतं...तुला संपवायच खूप वेळा मनात आलं.हिंमत मात्र झाली नाही कधीच.प्रसिद्धी, पैसा मोहच वाईट.ठामपणे उभे राहता नाही आलं.विराज गेला.त्याच्या घरच्या लोकांना भेटून आलो.सतत मी या वाईट मार्गाला लावलेल्या,तू विकलेल्या लोकांचे चेहरे डोळ्यासमोर येत.तेव्हाच ठरवलं.या चक्रात मला अडकवलेल्या सर्वांना संपवणार.हे सगळं करायला पूर्वतयारी करावी लागणार होती.जवळपास तीन वर्षे अज्ञात राहण्यासाठी. पैसा, राहणे सगळ्याची तरतुद केली आणि...त्यानंतर माझ्या बॉडी डबलला संपवलं.गेली तीन वर्षे तृतीयपंथी म्हणून जगत राहिलो.या कामासाठी विश्वासाची माणसं गोळा केली.पहिला खून झाला..राणे,तो गृहमंत्र्यांचा मुलगा.आठवतो..मला रावी बनवून त्याच्या मित्रांसमोर विवस्त्र नाचवल होत...अनेक अत्याचार केले.ते सगळं सगळं सव्याज परत हवंय मला.एवढ बोलून त्याने चाकूने सुकांतचा शर्ट फाडला.त्याला पूर्ण विवस्त्र केलं.त्यानंतर त्याने एक स्टिरॉइड्स च इंजेक्शन भरलं..मला इस्ट्रेजॉन टोचत होता ना..हे मात्र पौरुषाने भरपूर आहे.आज तुला पूर्ण तृप्त करणार.असे म्हणून ते इंजेक्शन टोचले.भराभर उत्तेजना चढत होती.रावीने शृंगार सुरू केला.प्रचंड उन्मत्त... त्याला आवडायचा तसा..त्याला हळूहळू हळूहळू मजा येऊ लागली..पण.नंतर मात्र सगळं असह्य होत होत..शरीर उत्तेजित असलं तरी थकलं होत.एवढ्यात मांडीत चाकू घुसला...रक्ताची धार लागली.तरी रावी त्याच्या पौरुषावर आरूढ होती...दुसरा वार छातीवर झाला.तो तडफडत होता.आता शेवटचा वार गळ्यावर होणार एवढ्यात...विजेच्या वेगाने गोळी पाठीतून हृदयात घुसली.रावी उर्फ शशांक तसाच कोसळला.समीर पुढे झाला.कदमांनी रावीला बाजूला केलं.सुकांत रॉयला पकडलं..एक सुडाचा प्रवास संपला. तरीही मायाजाल अजूनही अभेद्य आहे..आपल्या अवती भवती अदृश्य अस.फक्त ते ओळखुन मोहाचे क्षण ओळखायला हवे..मायाजालापासून स्वतःला वाचवायला हवं.शरद स्वगतच बोलला आणि सगळी टीम बाहेर पडली.एक अध्याय संपला..... अनेक प्रश्न उलगडले.

🎭 Series Post

View all