माया... भाग 14

मी मिस्टर भास्कर यांना हायर केल होत, मला मायाच वागण वेगळच वाटल होत, ती कोणत्या संकटात सापडू नये एवढच मला वाटत होत



माया... भाग 14

©️®️शिल्पा सुतार
.........

माया एका बेंच वर बसली होती, मिस्टर जॉन सोबत होते, माया वर चार्जेस लावलेले होते, ती गप्प होती, काय बोलणार आता, त्या ब्लॅकमेल करण्याऱ्या मुलाचा खून कोणी केला काही समजत नव्हतं, खूप गोंधळ झाला हा, त्या मुलाने मला फोन केला फोटो पाठवले म्हणून मला पकडल, "काय होईल आता मिस्टर जॉन? माझ्यावर खूनाचा आरोप सिद्ध होईल का,"

"नाही मॅडम अस कश्याला होईल, मोहित सर कुठे आहेत?"

"ते रागवले आहेत माझ्यावर, ते नाही सपोर्ट करणार, त्यांनी मला घराबाहेर काढल, मीनुला पण दिल नाही, बहुतेक मी जेल मध्ये राहील आता, सगळ संपल, हे घ्या, " माया त्यांना सोन्याच्या बांगड्या देत होती.

" काय हे मॅडम? " ते माया कडे बघत होते.

" तुमची फी आता माझ्या कडे पैसे नाहीत, यातून घ्या, उरलेले पैसे पिंटू नाहीतर आशाला देवून टाका. " माया नाराज होती.

" काळजी करू नका मॅडम, आपण निर्दोष आहोत, काहीही होणार नाही, "मिस्टर जॉन.

" आपण तिथे गेल्यावर त्या गोठ्यात कोणी तरी त्या मुलाचा खून केला, नंतर तिथे कोणी दिसल नाही ना, ते सापडले तर मी सुटू शकते, आपण निर्दोष असल्याचे आपल्या कडे काही पुरावा आहे का? "

" मॅडम मी बघतो आहे काही करता येईल का ते, तुम्ही सरांना परत एकदा सगळ सांगा ना," मिस्टर जॉन.

"मोहित ऐकुन घेत नाही काय करू, मी दुपारपासून सांगण्याचा प्रयत्न करते आहे, चिडले आहेत ते," माया वेगळीच शांत झाली होती.

"मी आहे तुमच्या सोबत, मी बरोबर न्याय मिळवून देइन, पण अस कस आपण दोघ सोबत असतांना फक्त तुम्हाला अटक करण्यात आली माया मॅडम? मला नाही म्हणजे कोणी तरी तुमच्या मागे आहे,"

"हो ना तेच समजत नाही, माझ काही झाल तरी तुम्ही पिंटूला प्रोटेक्शन द्या मिस्टर जॉन, एवढी मदत करा, त्याच्या जिवाला धोका आहे, थोडे दिवस त्याला तुमच्या सोबत ठेवा, छोटी मोठी नौकरी लावून द्या, नंतर त्याला आशा कडे सोडा, मी तुमचा खर्च देवून टाकेल , एक तर बरेच वर्षांनी तो सापडला आहे तर आता मी अशी अडकली. "

" मॅडम तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही," ते फोन वर काहीतरी माहिती काढत होते, एक दोन ठिकाणी त्यांनी फोन केला,

मोहित पोलिस स्टेशन मधे आला, त्याच्या सोबत वकील होते, डिटेक्टिव भास्कर होते, माया त्याला बघून उठून उभी राहिली, मोहितने तिच्याकडे बघितले नाही, ते डायरेक्ट आत निघून गेले.

" इन्स्पेक्टर साहेब अजून केस फाईल झाली नाही ना माया वर," मोहितने समोर बसत विचारल.

" नाही साहेब, "

" प्लीज ही केस नोंदवू नका, थोडी माहिती मिळाली आहे आम्हाला," मोहित.

"ठीक आहे साहेब, पण गुन्हा मोठा आहे, खून झाला आहे हे लक्ष्यात ठेवा, मला एक दोन दिवसाच्या वर थांबता येणार नाही, " इंस्पेक्टर.

" ठीक आहे, होईल सॉर्ट तो पर्यन्त, "

मायाला मिस्टर जॉन यांना आत बोलवलं, समोर मोहित बसलेला होता, पोलिसांनी चौकशी सुरू केली ,

" माया मॅडम तुमचा सुरेशचा काय संबंध?"

"कोण आहे सुरेश? " माया मिस्टर जॉन यांच्या कडे बघत होती.

" तो ब्लॅकमेलर जो तुम्हाला पैसे मागत होता, "इन्स्पेक्टर.

" मी ओळखत नाही त्याला, "

" तो का ब्लॅक मेल करत होता तुम्हाला?"

"मी मिस्टर जॉन यांना कामा निमित्त भेटत होती तेव्हा त्यांने आमचे फोटो काढून घेतले, आणि तो पैसे मागत होता, पैसे नाही दिले तर फोटो मोहितला दाखवेल अस बोलला होता तो , " माया.

"तुम्ही दोघ का भेटत होता? "

"मी त्यांना हायर केल होत, ते डिटेक्टिव आहेत, "

" काय काम होत? "

" माझ्या काका काकूंनी आई बाबा भाऊला मारून सगळी इस्टेट नावावर केली अस आधी मला माहिती होत , मला बदला घ्यायचा होता, घरून सपोर्ट नव्हता म्हणून मी ठरवल जावू दे, असे तीन चार वर्ष गेले मी विसरून गेले होते, एक दिवस गावातल्या काकांचा फोन आला त्यांनी सांगितलं की त्यांना पिंटू भेटला, त्यांनी मला त्याचा पत्ता दिला, माझं भाऊ जिवंत हे समजल्यावर मला अस झाल होत की कधी भेटेल त्याला, मी त्या पत्त्यावर गेले तो तिथे नव्हता, काका काकूंच्या भीतीने तो तिथून निघून गेला होता, मला रोज घराबाहेर जाता येत नव्हत म्हणून पिंटूला शोधायला मी मिस्टर जॉन यांची मदत घेत होती, "

" आधी नाही समजल होता का पिंटू जिवंत आहे ते? "

" नाही जेव्हा माझ्या आई बाबांचा एक्सीडेंट झाला होता तेव्हा आम्ही चौघेजण विखुरले गेलो होतो, खूप लहान होतो आम्ही दोघ तेव्हा, मी सुद्धा काका काकूंच्या भीतीने एका मावशी कडे लपून बसली होती, त्यांनी नंतर मला अनाथ आश्रमात सोडलं," माया.

" ठीक आहे पुढे काय झाल?"

" मी आणि मिस्टर जॉन दर आठवड्याला वेगवेगळ्या अनाथ आश्रमात जाऊन माझ्या भावाला शोधत होतो, बहुतेक तेव्हा सुरेशने आमचे फोटो काढून घेतले आणि तो आम्हाला ब्लॅकमेल करत होता की तो ते फोटो मोहितला पाठवेल, बाकी आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, "

"तुम्ही मोहित साहेबां पासून ही बातमी का लपवली होती, "

" पूर्वी मी जेव्हा मोहितला काका काकूंन बद्दल सांगायचे तेव्हा ते मला ओरडत होते अजिबात जायचं नाही त्या गावाला, ते लोक डेंजर आहे, त्यामुळे मी घाबरले होते, मोहितने मला सांगितलं होतं की मी ते काम परत सुरु केलं तर ते स्ट्रीट ॲक्शन घेतील म्हणून मला असं वाटलं की पिंटू सापडल्यावर सांगू त्यांना, त्यामुळे मी स्वतः सुध्दा हे काम करत नव्हती, मिस्टर जॉन यांना सांगितलं होतं, पण कधी कधी ओळख पटवायला मला पण जावं लागायचं, बरेच वर्षे झाले पिंटूला बघितलं नव्हतं, त्यामुळे हे काम अवघड होतं, "

पोलीस इन्स्पेक्टर मिस्टर जॉन कडे बघत होते, त्यांनी सुद्धा मान हलवली की हो हे सगळं बरोबर आहे, मिस्टर जॉन यांनी त्यांच लायसन्स आणि कार्ड पोलीस इन्स्पेक्टरला दिलं, जिथे जिथे ते गेले होते त्या अनाथाश्रमाच नाव पत्ता दिला," तिथल्या सिसीटीव्ही कॅमेर्‍यात असू आम्ही किवा त्या ठिकाणी जे मॅनेजर असतिल त्यांना विचारा,"

" तुमचा भाऊ मिळाला का मग?"

"हो दोन दिवसांपूर्वीच माझा भाऊ मिळाला, त्याच्या जीवाला धोका आहे, काका काकूंना समजलं तर म्हणून आम्ही आधी काका काकूंना अटक करणार होतो, म्हणून त्याला तिकडेच ठेवलं , त्याला प्रोटेक्शनची गरज आहे इंस्पेक्टर, मला भीती वाटते त्याला काही झाले तर एक तर बऱ्याच वर्षांनी तो मला भेटला आहे, मला आता तिकडे जायचं होतं माझ्या भावाला घरी घेऊन यायला, पण तेवढ्यात हा प्रॉब्लेम झाला, " माया.

" सुरेशचा खून कोणी केला असेल माया मॅडम? "

" माहिती नाही, मी काही केल नाही, आम्ही गेलो होतो त्याच्या मागे, पण त्या आधी त्याला चाकू लागला होता,"

" तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? "

" नाही आमच्याकडे काही पुरावे नाही, "

" मग आता कस काय करणार, तुम्ही सांगा." इन्स्पेक्टर मोहित कडे बघत होते.

मोहित उठले, "माझ्याकडे आहे पुरावे, हे आहेत मिस्टर भास्कर त्यांनी सगळी चौकशी केली आहे, माया म्हणते ते बरोबर आहे, आजच तिचा भाऊ भेटला आहे आणि तो आता आमच्या सोबत आहे, माया तो सेफ आहे काळजी करू नकोस, "

माया आश्चर्याने मोहित कडे बघत होती, तिच्या डोळ्यात पाणी होतं, बरं झालं यांना समजलं सगळं ते.

" हा खून माया आणि जॉनने केलेला नाही, " मोहित.

" मग कोणी केला आहे? " इंस्पेक्टर

" हा खून स्नेहाच्या माणसांनी केलेला आहे, "मोहित फोटो दाखवत होता.

" हे फोटो तुमच्याकडे कसे आले?" इंस्पेक्टर.

"माया आणि मिस्टर जॉनच्या मागे मिस्टर भास्कर यांचे लोक होते, त्यांनी घेतले फोटो, हे बघा ही स्नेहा आणि या माणसाने सुरेशला मारल, तिच्या सोबत तो तिथून पटकन निघून गेला, मग माया जॉन तिथे गेले,"

"हे का गेले होते त्यांच्या मागे, "

" मी मिस्टर भास्कर यांना हायर केल होत, मला मायाच वागण वेगळच वाटल होत, ती कोणत्या संकटात सापडू नये एवढच मला वाटत होत,"

" स्नेहा कोण?"

"माझं तिच्याबरोबर पाच वर्षांपूर्वी लग्न होणार होतं पण मी मायाशी लग्न केले त्यामुळे ते तेव्हापासून ती आमच्या मागे आहे, तिने मायाची पूर्ण चौकशी केली , मायाला फसवण्यासाठी तिने तिचा पाठलाग केला त्यांचे फोटो काढून घेतले आणि सुरेश तिच्याच माणूस होता केवळ मायाला फसवण्यासाठी तिने सुरेशचा खून केला." मोहित.

माया आश्चर्याने सगळं ऐकत होती.

"त्यांनी माया मॅडम वर का नाही हल्ला केला मग? "

"तेवढा वेळ मिळाला नसेल तिला किवा एवढी हिम्मत नसेल, मायाला अटक झाली तर माझी बदनामी होईल, आमचा संसार तुटले, मला मायाचा राग येईल, हेच करायच होत स्नेहाला, माझ्या आयुष्यात वापस यायचा चान्स मिळाला असता तिला ,"

" ठीक आहे चौकशी पूर्ण झाली आहे माया मॅडम बहुतेक निर्दोष सुटतील, अजून सांगता येत नाही काही,"

" आम्ही केव्हा घेऊन जाऊ शकतो मायाला, " मोहित.

" काही फॉरमॅलिटी बाकी आहे त्या पूर्ण झाल्याशिवाय त्यांना सोडता येणार नाही, एकदा स्नेहाला अटक केली आणि तिने कबूल केल्यानंतरच माया मॅडमला सोडता येईल त्याशिवाय सोडता येणार नाही, "

" ठीक आहे, "

" हवालदार काका सगळ्यांच काय म्हणणं आहे ते नोंदवून घ्या, एक-दोन दिवस लागतील मोहित साहेब तुम्हाला पोलीस स्टेशनला यावे लागेल, माया मॅडमला उद्या सोडू तुमच्या फॅमिलीला त्रास दिला म्हणून तुम्ही स्नेहाविरुद्ध पोलीस कम्प्लेंट करू शकतात, चला मी येतो मला स्नेहाला अटक करायची आहे, "

हवालदार एकेकाचं म्हणणं नोंदवून घेत होते.

माया मोहित कडे बघत होती, तो बिझी होता, चिडलेले आहेत का हे? काय करू मी, परत माफी मागु का, घरी येवू देतील का की ओरडतील, समजत नाही, मी मिनू शिवाय आणि यांच्या शिवाय ही राहू शकत नाही, सगळ नीट व्हायला हव. पिंटू ठीक होता, मोहित जवळ होता या गोष्टीच समाधान होत.