माया... भाग 13

गावातली खूप मोठी जमीन माया मॅडमच्या आई बाबांच्या नावावर होती, वाटणी झाल्यावर ती त्यांना मिळाली होती, ते एक्सीडेंट मधे वारल्यावर त्यांच्या विल नुसार ती जमीन त्यांच्या मुलांच्या नावावर आपोआप झाली



माया... भाग 13

©️®️शिल्पा सुतार
.........

मोहित खूप चिडला होता, "मला काहीही ऐकून घ्यायचं नाही माया, खून झाला ना तू गेली होती तिथे, तुला काही झाल असत तिथे तर? ज्या लोकांनी त्या मुलाला मारल ते तुलाही काही करू शकत होते, तू मूर्ख आहे का जरा, ऐकत का नाही तू काही, मला माहिती होतं की तू असंच काहीतरी करत असशील, कोण मदत करत होतं तुला यात? आशा ना, अजून कोण आहे तो माणूस बोल पटकन? "

मिस्टर जॉन.

" आता जो प्रॉब्लेम असेल तो आशाला आणि मिस्टर जॉनला सांगायचा त्यांची मदत घ्यायची, मला काही सांगायच नाही, मला तुझ्याशी बोलायचं नाही, "

" मोहित ऐका ना, " माया रडत होती.

" नाही, तुला माझं काही ऐकायचं नसतं, स्वतःची काही काळजी नाही , मी का ऐकू तुझं, तुला काय वाटतं मला काही माहिती नाही तू कुठे फिरते आता हल्ली ते, मी खूप चिडलो आहे," त्याने तिच्यावर हात उगारला, माया घाबरली, तिचा चेहरा बघून तो मागे झाला, हिच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही.

" बॅग भर माया, निघायच इथून, तुला माझ ऐकायच नाही तर इथे राहायच नाही, पाहिजे तिथे जा मग, काहीही गोंधळ घाल, मला फार राग येतो आहे, उगीच माझा हात उचलेल मी,"

"मोहित नको ना अस, मी काहीही केल नाही, मी रिक्वेस्ट करते मला फक्त थोडं बोलू द्या ना, मला तुम्हाला काही सांगायचं आहे,"माया रडत होती.

" इतके दिवस तू काही सांगितलं नाही ना मला , मग आजच का सांगायचं आहे, तुझ्यावर संकट आलं म्हणून सांगायचं आहे ना, आज जर हे संकट आलं नसतं तर तू सांगितलं नसतं काही, मला काहीही ऐकायचं नाही, बॅग भर पाच मिनिट आहेत, नंतर तुला या घरातून काही मिळणार नाही नीघ इथून,"मोहित.

" मोहित मी कुठे जाणार तुम्हाला सोडून, राग सोडा ना, माझी चूक झाली, पण फक्त थोड बोलू द्या, नंतर तुम्हाला वाटल तर मग मी जाईल इथून मीनुला घेवून, " माया आता खूप घाबरून गेली होती. ती मोहित काय म्हणतो या कडे बघत होती.

" मीनु कुठेही जाणार नाही, ती माझी आहे, ती या घरात राहील, मी समर्थ आहे तिची काळजी घ्यायला, तू तुझा जीव धोक्यात टाकते, माझ ऐकत नाही, मीनु साठी ते मला चालणार नाही," मोहितने जोरात तिच्या दंडाला धरल, तिला जवळ ओढत, "लाज नाही वाटत का माझ्या प्रेमाचा अपमान केला तू, त्या जॉन सोबत फिरते म्हणून तो मुलगा ब्लॅक मेल करत होता ना तुला? ते मला समजू नये म्हणून तू त्या मुलाला पैसे देत होती ना,"

" तस काही नाही मोहित, मिस्टर जॉन मला मदत करता आहेत, आमचे तसे काही संबंध नाही, ते डिटेक्टिव आहेत, "

" रोज उशिरा येत होती तू ऑफिस मधे, मी तुझ इन आऊट टाइम चेक केल आहे, त्याच्या साठी सोन्याचा हार तू मोडला," मोहित सगळ बोलत होता.

" नाही मोहित हे पूर्ण खर नाही, "

" मग काय आहे सत्य? "

पोलिस इन्स्पेक्टरचा फोन येत होता, "मोहित साहेब आम्ही तुमच्या बंगल्या बाहेर आहोत, जरा बाहेर या माया मॅडमला घेवून थोडा प्रॉब्लेम झाला आहे,"

मोहित माया कडे बघत होता," चल पोलिस आले आहेत, तुला बाहेर बोलवत आहेत, मी पूर्वी पण सांगितल होत असे उद्योग मला चालणार नाही, नीघ आता, घरा बाहेर नाही डायरेक्ट जेल मध्ये, "

" मोहित मी काहीही केल नाही, मदत करा, "

शट अप ,

ते हॉल मधे आले, मीनु नंदा ताई घाबरून सगळीकडे बघत होत्या, बाबा बाहेर उभे होते," आई मीनुला घेवून आत जा,"

" मोहित काय झाल? माया का रडते आहेस तू? पोलिस का आले? काय सुरू आहे? माया तू तरी सांग, " नंदा ताई.

मीनु मायाकडे पळत आली, मोहितने तिला मधेच उचलून घेतल,

"मोहित मीनुला द्या ना प्लीज, मी तिच्या शिवाय नाही राहू शकत," माया मीनुला स्वतः कडे घेत होती. सोड तिला माया.

"आई आत जा प्लीज, मीनु जा बेटा आत, "नाही मम्मी पाहिजे,"

नंदा ताई मीनुला घेवून आत गेल्या, मीनु रडत होती, माया तिच्या कडे जात होती, दोन लेडिज पोलिस पुढे आल्या त्यांनी मायाला एरेस्ट केल.

" दुपारी जो खून झाला त्याचा संशयीत म्हणून तुम्हाला अटक करण्यात येत आहे माया मॅडम, तुमचा फोन द्या इकडे, "

"मी काही केल नाही, त्या मुलाला मी ओळखत नाही, आज पहिल्यांदा त्या मुलाला बघितल होत मी "

"चला पोलिस स्टेशन मधे तिकडे बोलू, मोहित साहेब हे वॉरंट या मॅडम विरुद्ध, आज एक खून झाला त्या माणसाचे कधी पासुन मॅडमला फोन येत होते, "

" इन्स्पेक्टर साहेब प्लीज ऐकुन घ्या, " माया अजूनही रिक्वेस्ट करत होती.

" माया मॅडम इथे बोलून काही उपयोग नाही चला, " इन्स्पेक्टर.

ती मोहित कडे बघत होती, मोहित तिच्या कडे बघत नव्हता, सगळ संपल मीनुला भेटली असती एकदा, पोलिस व्हॅन मधे ती गप्प बसलेली होती, तिला काही सुचत नव्हत.

आलोक राव पुढे आले, मायाला धीर आला, "बाबा मी काही केल नाही, विश्वास ठेवा. "

" मला माहिती आहे बेटा, मी पाठवतो मोहितला, काळजी करू नकोस."

मोहित सोफ्यावर बसून होता, त्याने माया कडे बघितल नाही, इंस्पेक्टर पुढे आले, "मोहित साहेब काळजी करू नका चौकशी साठी नेतो आहोत मॅडमला, निर्दोष असतिल तर काही होणार नाही,"

पोलीस मायाला त्यांच्यासोबत घेवून गेले, मिस्टर जॉन आधीच पोलिस स्टेशन मधे आलेले होते.

अलोक राव जवळ येवून बसले," काय झालं मोहित? जा मायाला तुझी गरज आहे, मला नाही वाटत काही केल असेल तिने "

" मला ही तेच वाटत आहे बाबा , तुम्ही आई मीनु कडे लक्ष द्या, सरला ताई दार लावा, घरचे फोन बंद ठेवा, टीव्ही लावू नका, कोणाच काही ऐकु नका, मी येतो," तो बाहेर निघून गेला,

कार मधून त्याने डिटेक्टिव भास्करला फोन लावला, "मला भेटा आता, मायाला ॲरेस्ट केल पोलिसांनी, नेहमीच्या हॉटेल मधे या लवकर, माया एकटी आहे, मला पोलिस स्टेशन मधे जायच आहे लगेच,

"हो, आलोच, "

डिटेक्टिव भास्कर मोहित भेटले,

"काय झालं नक्की ते समजल का? " मोहित काळजीत होता.

हो.. ते सगळं सांगत होते, "इतके वर्ष माया मॅडमला वाटत होत त्यांच्या आई बाबां सोबत भाऊ पिंटू पण वारला आहे, पण दोन महिन्या पुर्वी माया मॅडमच्या गावाहून एक माणसाने माया मॅडमला कॉन्टॅक्ट केला त्याला मॅडमचा भाऊ पिंटू भेटला होता, "

"एक मिनिट कोण? "

पिंटू.

" पण तो वारलेला आहे ना," मोहित आश्चर्य चकित झाला.

"नाही ते आत्ताच समजल, पिंटू जिवंत होता, तो ही माया मॅडम सारख दुसर्‍या अनाथाश्रमात होता, तो या गावात आला होता, चौकशी करत होता, त्या माणसाने ओळखल, त्याला सांगितल या गावात थांबू नको, तुझ्या जिवाला धोका आहे, तुझी बहीण माया तिला कळवतो मी, ती येईल तुला घ्यायला, पिंटूने त्याचा पत्ता दिला, कसतरी ही गोष्ट मायाच काका काकूंना समजली, ते पिंटूच्या मागे होते, तो त्या अनाथाश्रमातुन पळाला, माया मॅडम इतके दिवस मिस्टर जॉन सोबत त्याला शोधत होत्या, "

" ओह माय गॉड, कठिण आहे, "

" माया मॅडमला तुम्ही काकांच्या गावाला जायला नाही सांगितल होत , तरी त्या पिंटूसाठी हे काम करत होत्या, त्यांना वाटल सगळ झाल पिंटू सापडला की सांगू तुम्हाला, पण त्या आधी कोणी तरी या गोष्टीचा गैरफायदा घेतला, त्यांना ब्लॅक मेल करून त्रास देत होत. "

मोहित आश्चर्य चकित झाला होता, "त्या वेळी मायाने मला सांगायचा ना, एवढा विश्वास ठेवतो मी तिच्या वर, बहुतेक घाबरून गेली असेल ती,"

" हो त्यांना वाटल असेल तुम्ही काम नाही करू दिल तर,"

"मी कशाला अस करेल," मोहित.

"कोणी तरी मुद्दाम त्या मुलाला मारल आहे, म्हणजे माया मॅडम संकटात सापडतील," डिटेक्टिव भास्कर.

"हो कोण असेल? तिचे काका काकू असू शकतात,"

"सांगता येत नाही, अजुन कोणी तुमचे दुश्मन? "

" नाही कोणी नाही विशेष, का करता आहेत पण ते अस," मोहित विचार करत होता.

"गावातली खूप मोठी जमीन माया मॅडमच्या आई बाबांच्या नावावर होती, वाटणी झाल्यावर ती त्यांना मिळाली होती, ते एक्सीडेंट मधे वारल्यावर त्यांच्या विल नुसार ती जमीन त्यांच्या मुलांच्या नावावर आपोआप झाली, माया मॅडम आणि त्यांच्या भाऊ मूळ मालक आहेत, ते जिवंत राहिले नाही तर ती जागा प्रॉपर्टी आपोआप काका काकूंना मिळणार होती , तस काही झाल नाही, मुल सापडत नव्हते, आता ते मालक नसल्या मुळे त्यांना ती जागा विकता येत नव्हती. पेपर सगळे माया मॅडम पिंटूच्या नावावर आहेत, ते काका काकूंनी लपवून ठेवले आहेत, "

" ओह माय गॉड, आता पुढे काय? "

" आता आधी तुम्ही मॅडमला पोलिसांच्या ताब्यातुन सोडावा मग बघू पुढे काय ते,"

मोहित डोक्याला हात लावून बसला, "आपण आधीच मायाला सपोर्ट केला असता तर अस झाल नसत, सॉरी माया किती सहन केल तिने, मी तिच्यावर संशय घेतला, किती ओरडलो," तो पोलिस स्टेशनकडे निघाला.

🎭 Series Post

View all