माया... भाग 11

संध्याकाळी वाढदिवस खूप छान झाला , पाहुणे गेले घरच्यांच जेवण झाल, खूप खुश होती मीनु, तिघे रूम मध्ये आले, मायाने तिचे डोळे झाकले



माया... भाग 11

©️®️शिल्पा सुतार
.........

दुसर्‍या दिवशी मोहित लवकर ऑफिसला निघून गेला, मायाची चौकशी करावी लागेल, त्याने डिटेक्टिवला फोन केला, "मिस्टर भास्कर थोड्या वेळाने ऑफिस मध्ये या,"

" येस सर."

थोड्या वेळाने भास्कर आले, "काय झालं आहे मिस्टर मोहित ?"

"थोड पर्सनल काम होत," मोहितला कसतरी वाटत होत अश्या पद्धतीने मायाची चौकशी करायला.

बोला.

" आजकाल माया.. माझी बायको वेगळीच बिझी असते, लपून छापुन कुठे तरी जाते, शोधल की ऑफिस मध्ये आलेली असते, काय चाललय तीच ते समजत नाही. मला काळजी वाटते,"

"तुम्हाला काय वाटत? कोणाला भेटायला वगैरे जातात का मॅडम? कोणी ओळखीचे वगैरे आहेत का त्यांचे,"

" तिचे नातेवाईक आहेत, काका काकू त्यांच्या बद्दल तिच्या मनात राग आहे, त्यांनी तिच्या आई बाबांना मारला अस तिला वाटत, ते तर काम करत नसेल ना ती?"

"शक्यता आहे, त्यांना अजून कोणी मित्र मैत्रिणी?"

" एक मैत्रीण आहे आशा, तीच लग्न झालं,"

"या गावात आहे का त्या?"

"हो आशा या गावात आहे, "

" ठीक आहे त्यांच्यावर लक्ष द्याव लागेल,"

" काय असेल हे मिस्टर भास्कर, म्हणजे माझा माझ्या बायकोवर विश्वास आहे, तरी मला समजून घ्यायच आहे नक्की काय आहे हे प्रकरण, माया कुठल्या संकटात तर नाही ना, " मोहितला काळजी वाटत होती.

" मी करतो चौकशी, थोडा वेळ द्या,"

ठीक आहे, ते गेले.

माया सराफ बाजारात गेली होती, तिने घरातून तिचा सोन्याचा हार मोडायला आणला होता, आशा होती सोबत," आशा तू जा त्या दुकानात, मी गेली तो दुकानदार ओळखेल मला, लगेच मोहितला फोन करेन, "

आशा गेली. "मला थोडे पैसे लागत होते, सोन आहे माझ्या कडे, "

" बघु, एवढा मोठा हार तुमच्या कडे कसा? "दुकानदार विचारात होता.

" माझ्या लग्नाचा आहे,"

"आता का मोडताय? "

"पैशाची गरज आहे, हॉस्पिटलमध्ये पैसे लागतात," आशा कसतरी बोलली, देता की नाही पैसे काय माहिती.

"ठीक आहे मोडू नका, गहाण ठेवा, "

" ठीक आहे, " आशाने हार गहाण ठेवला, भरपूर पैसे आले ते घेवून आशा कार मधे येवून बसली, तिने ते पैसे मायाला दिले, दोघी निघाल्या,

मिस्टर भास्कर यांच्या ग्रुप मधले लोक त्यांच्या मागे होते, आशाला घरी सोडून माया निघाली, मिस्टर जॉन भेटले,

" हे घ्या पन्नास हजार रुपये, एक आठवडा पुरले पाहिजे, आज देवू नका त्या ब्लॅक मेल करण्याला, दोन तीन दिवसांनी द्या, शक्य होईल तर आकडा कमी करता आला तर बघा, मला अजून कॅश अरेंज करता येणार नाही, मग जे होईल ते होईल,"

"ठीक आहे मॅडम," मिस्टर जॉन.

ती पटकन घरी वापस आली,

संध्याकाळी तिने घर डेकोरेट केल, उद्या मीनुचा बर्थडे पार्टी होता, ती तिच्या फ्रेंड्सला आमंत्रणाचे फोन करत होती,

मोहित आज उशिरा घरी आला, माया मीनु सोबत हॉल मधे होत्या , तो आल्या आल्या कपाटात काही तरी शोधत होता, माया आल्यावर तो बाथरूम मधे निघून गेला,

रात्री तो विशेष बोलला नाही, लवकर झोपून गेला, माया घाबरली होती, यांना नक्की काहीतरी समजल आहे, ब्लॅक मेल करण्याऱ्याने कॉन्टॅक्ट तर केला नसेल ना यांना, तिने मिस्टर जॉन यांना मेसेज केला, "दिले का पैसे?"

"नाही उद्या देणार आहे, काय झालं मॅडम,"

"मोहित बोलत नाही माझ्याशी, मला भीती वाटते त्यांना काही समजल तर नसेल ना,"

"एवढी काळजी करू नका माया मॅडम , समजल तरी मी आहे ना मी समजून सांगेन मोहित साहेबांना,"

ठीक आहे तिने झोपून घेतल.

आज मीनुचा वाढदिवस होता, सकाळी शाळेत साजरा होणार होता, त्या नंतर ते मंदिरात जाणार होते, संध्याकाळी घरी मुलांसाठी पार्टी होती, मीनु अति खुश होती, माया मोहित तिला शाळेत सोडून आले, घरी पार्टीची तयारी सुरू होती, दुपारी मीनुच्या आवडीच जेवण होत, त्या आधी ते मंदिरात जावून आले,

मोहित शांत होता जरा, तो विशेष मायाशी बोलत नव्हता, ती रडवेली झाली होती, ती त्याच्या जवळ जावून बसली, "मोहित तुम्ही रागवले का माझ्यावर?"

"माया तुला काय महत्वाच वाटत मी जे म्हणतो ते की तुला स्वतः च खर करायच असत,"

"मोहित तुम्ही म्हणता ते महत्वाच आहे माझ्या साठी,"

"तुझ्या वागण्या बोलण्यातुन तस वाटत नाही," तो अजूनही चिडलेला होता.

"काय झालं मोहित माझ काही चुकलं का? " माया समजुतीने घेत होती.

" हा प्रश्न तू स्वतःलाच विचार, "

माया आत निघून गेली, "काय करू मी, एकीकडे मोहित एकीकडे केस, बस एक आठवडा मोहित, मग तुम्ही जे बोलाल तेच करेन मी, "

मायाला खूप फोन येत होते, ती बाजूला जावुन फोनवर बोलत, मोहित मागे आला, "एनीथिंग अर्जंट माया? काय सुरू आहे,"

माया काही म्हटली नाही, ती घाबरली होती. फोन दे, तिने फोन दिला त्याने तो खिश्यात टाकला, त्याने तिला हाताला पकडून जवळ ओढल, "माया काय विचारतो आहे मी, तुझ काय सुरू आहे? तू काय लपवते आहेस?"

" इकडे या," ती मोहितला तिच्या सोबत घेवून गेली.

" ही मीनुची रूम, मी सिक्रेट रित्या सजवली, तुम्ही म्हणत होते ना तिला वेगळ झोपव, तर आज आपण तिला ही रूम प्रेझेंट देवू, आपल्या रूमला अटॅच ही आहे आणि आपल्याला ही मोकळ रहाता येईल," माया हे बोलतांना लाजली होती.

मोहित बघत बसला तिच्याकडे, "ओह हे सुरू आहे का हीच, त्यासाठी गुपचूप बाहेर जाते का ही, अकाऊंट मधून पैसे काढले होते , फोन वर बोलते आहे ही, "

" आवडली का सजावट? "

हो.

त्याने पटकन मायाला जवळ ओढून घेतल, घट्ट मिठी मारली,

" काय झालं मोहित?"

"काही नाही माया,"

मोहित विचार करत होता, "सॉरी माया मी आता हल्ली काहीही विचार करत असतो, तु माझ्यासाठी घरासाठी इतक करते, तुझ्या मागे डिटेक्टिव लावला, मी का अस करतो आहे, या पुढे संशय घेणार नाही तुझ्यावर."

जेवण झाल, मोहित माया मीनु आत रूम मध्ये आले, मीनु शाळेत काय काय झालं ते सांगत होती, ती तिची बॅग आणायला पळाली,

" मोहित तुम्ही मीनुला सांभाळा, थोड काम बाकी आहे मी करते, ती इकडे येतं कामा नये, " माया हळूच म्हटली.

" ठीक आहे, "

माया रूम मधे होती, तिचा फोन वाजला, मिस्टर जॉन नाव दिसलं, ओ माय गॉड तिने इकडे तिकडे बघितल, मोहित नाही ना, तिने दरवाजा लावून घेतला, "बोला मिस्टर जॉन?"

" मॅडम तुम्हाला येतं येईल का आता, थोडी महत्वाची माहिती समजली आहे."

" नाही माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, घरी पार्टी आहे. "

" अगदी पंधरा मिनिट,"

" उद्या नाही होणार का काम, नाही आता जमेल तर बघा, तस महत्वाच काम आहे,"

"ठीक आहे येते मी," माया रूम मधे आली तिने मोहितला इशारा केला मी येते अर्धा तासात.

" ठीक आहे लवकर ये," त्याला वाटल रूम साठी काहीतरी घ्यायला गेली असेल,

ती गेल्यावर मिस्टर भास्कर यांचा फोन आला, "मॅडम आत्ताच कार घेऊन बाहेर गेल्या आहेत, "

" हो माहिती आहे ती घरातला सामान घ्यायला गेली आहे,"

"नाही माझ्यासमोरच मॅडम आता एका माणसाला भेटल्या,"

" भेटू द्या मिस्टर भास्कर मला माहिती आहे, थोडं घरातलं काम आहे त्यासाठी ती गेली आहे," मोहित.

"पण हा मनुष्य तुमच्या घरातल्या लोकांच्या लिस्टमध्ये नाही वेगळाच दिसतो आहे, तो मॅडमशी काहीतरी बोलत होतं मॅडमचे चेहऱ्यावर टेन्शन होतं दोघेजण कुठेतरी निघून गेले, "

" मग तुम्ही का नाही गेले त्यांच्या मागे, "मोहित वैतागला होता.

" माझा असिस्टंट गेला आहे, त्याचा फोन आला की कळवतो, "

"काही कळवू नका मला माहिती आहे माया दुकानात गेली आहे, " मोहितने फोन ठेवला .

डिटेक्टिव्ह भास्करचा असिस्टंट माया आणि मिस्टर जॉनच्या कार मागे होता,

" मला असं वाटत आहे माया मॅडम आपल्या कारचा कोणीतरी पिच्छा करता आहे, काय करावं, "मिस्टर जॉन आरश्यातुन मागे बघत होते.

" आता काय करायचं, "मायाने कार जोरात घेतली पिच्छा करणारा बराच मागे होता, एकदम एक पाय वाट लागली तिकडून ते आत निघून गेले, भास्करच्या असिस्टंट सरळ हायवेने पुढे गेला,

काम झाल, माया खुश होती.

जरा वेळाने ती घरी आली, तिच्याकडे दोन बॅग भरून सामान होतं, मोहित बघत होता, तिने लगेच ते सामान मिनूच्या रूम मध्ये ठेवलं, ती येऊन मोहित जवळ बसली, "काही समजले नाही ना तिला,"

"नाही खेळते आहे, मिळालं का सगळं सामान,"

"हो मोठा टेडी बेअर मिळत नव्हता त्यासाठी बरंच फिरावं लागलं, दाखवू का सामान,"

"नको नंतर बघतो," माया नॉर्मली फिरत होती, आवरत होती, मोहित लक्ष देऊन होता, हे मिस्टर भास्कर काय सांगत आहेत त्यांचं ऐकायला नाही पाहिजे, मायाला समजलं तर कसं वाटेल,

संध्याकाळी वाढदिवस खूप छान झाला , पाहुणे गेले घरच्यांच जेवण झाल, खूप खुश होती मीनु, तिघे रूम मध्ये आले, मायाने तिचे डोळे झाकले, "तुझ्या साठी सरप्राईज आहे मीनु,"

ते तिला तिच्या सुंदर रूम मध्ये घेवून आले, "वॉव मम्मी पप्पा किती छान आहे ही रूम, बेड मस्त, वॉव टेडी बेअर,"

मायाने तिला जवळ घेतल, "तू आता बिग गर्ल आहेस ना म्हणून तुझी रूम आम्ही रेडी केली, हे बघ या रूमचा डोअर आमच्या रुम मधे आहे, फक्त तुला तिथे न झोपता इथे झोपायच, झोपशील ना?"

" ओके हो मम्मी मी इथे राहणार, वॉव हा स्टडी टेबल खूप छान आहे, माझी फ्रेंड परी तिची अशी रूम आहे, ती तिथे रहाते, आय विल कीप माय रूम क्लीन, आय एम सो हॅप्पी, थँक्यू," तिने माया आणि मोहितला छान पप्पी दिली, ती तिच्या वस्तू बघत होती, माया मोहित ही खुश होते, ते त्यांच्या रूम मध्ये आले.

" माया मीनु सोबत मी पण खुप खुश आहे, मग आता काय विचार आहे," तो जवळ आला, तिला मिठी मारली,

" मोहित सोडा मीनु फक्त तिकडे आहे, दार बंद नाही,"

"ठीक आहे मी झोपवून येतो तिला, तू फ्रेश हो,"

गुलाबी रंगाच्या नायटी मध्ये माया खूप छान दिसत होती, मोहितने काही ऐकल नाही, दोघांनी छान सोबत वेळ घालवला.


🎭 Series Post

View all