Feb 28, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

माया... भाग 10

Read Later
माया... भाग 10माया... भाग 10

©️®️शिल्पा सुतार
.........

माया आशाला प्लॅन सांगत होती.

"तुला जमेल का नेहमी यायला? "

"हो मी ऑफिसला जाते रोज, तिथून निघत जाईल, लवकर येत जाईल."

आता माया कडे पैसे असायचे, त्या दोघी एका प्रायव्हेट डिटेक्टिव ऐजन्सीत गेल्या, त्यांना काम सांगितल, मिस्टर जॉन करतील तुम्हाला मदत, मिस्टर जॉन समोर येवुन बसले, त्यांनी पूर्ण केस समजून घेतली, "कठिण आहे जुनी गोष्ट आहे, पण करू आपण नीट."

माया आशा खुश होत्या. हे काम कोणीतरी करायला तयार झाल.

ती मिस्टर जॉन सोबत काका काकूंच्या केस मागे होती.
.....

मायाला सगळ आठवत होत, झालेल्या गोष्टींचा विचार करत माया ऑफिस मध्ये पोहोचली, थोड्या वेळाने मोहित आला भेटायला, "बाहेर गेली होती का माया? "

"हो थोड काम होत, ते मी बँकेतून पंचवीस हजार रुपये काढले,"

"ठीक आहे," तो वापस गेला.

माया विचार करत होती, "पैसे तर दिले आता तरी ऐकेल का तो ब्लॅक मेल करणारा, की अजून त्रास देईल, काय माहिती, मोहितला समजल तर काही खरं नाही. "

तिने मिस्टर जॉन यांना फोन केला, "ठीक आहे ना सगळ?, काही फोन त्या माणसाचा? "

"नाही आला फोन, मॅडम तुम्ही टेंशन घेवू नका मी करतो चौकशी कोण आहे या मागे, तुमचा कोणावर संशय, "

"नाही लक्ष्यात येत माझ्या कोण असेल आपल्या मागे? " माया खूप काळजीत होती.

संध्याकाळी ती घरी आली, नंदा ताई चिडलेल्या होत्या, "कुठे फिरते कोणाला फोन करते ही काय माहिती? "

तिने दुर्लक्ष केल मीनुचा अभ्यास घेतला जरा वेळ, तीच लक्ष लागत नव्हत, हे अस चोरुन लपून काम करण आवडत नव्हत तिला, पण काय करणार घरच्यांचा सपोर्ट नव्हता.

जरा वेळाने मोहित घरी आला जेवण झाल मीनु झोपली, मोहित लॅपटॉप वर काम करत होता, माया आवरून आली त्याच्या जवळ येवून बसली, मोहितने लॅपटॉप बाजूला ठेवला तिला जवळ घेतल, "काय झालं माया काही टेंशन? चेहरा का असा झाला?"

"मोहित तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता ना,"

"हो माया."

"तुम्ही आणि मीनु माझ जग आहात, "

" काय झाल काही सांगायच का? "

"नाही," तिची हिम्मत झाली नाही,

" आई काही म्हटली का? "

नाही.

" मग काय झाल? जास्त विचार करू नकोस आराम कर, " मोहित जवळ मायाला बर वाटत होत. तो झोपला , मायाने झोपण्याचा प्रयत्न केला, खूप विचार मनात येत होते, ती उठून बसली.

हे ब्लॅकमेलच मोहितला समजल तर? त्यांनी मला घरा बाहेर काढल तर काय करू? माझ्या अकाऊंट वर किती पैसे आहेत? कुठे राहू मी? परत अनाथाश्रमात की आशा कडे जावु? मीनुला देतील का ते? नाही मी मीनु शिवाय राहू शकत नाही, मला मीनु हवी आहे, मोहित हवे आहेत, काय करू सांगू का मोहितला मिस्टर जॉनच, नको केस साॅल्व्ह होत आली आहे, अगदी एक आठवडा मोहित, मग मी तुम्हाला सगळ सांगेन, तिला धड धड होत होती, तिच्या डोळ्यात पाणी होत, मोहित बाजूला झोपला होता, ती हळूच त्याच्या मिठीत शिरली, मोहित हसला तिला जवळ घेवून झोपला.

प्लेन पिंक साडी लांब छान केस मोकळे सोडलेले, अतिशय रेखीव फिगर, गळ्यात डायमंड मंगळसूत्र मॅचिंग कानातले हातात बांगड्या, माया छान तयार झाली होती,

मोहित आवरून आला, "बापरे तू अशी येणार ऑफिस मधे? आम्ही काही काम करायच का नाही?"

माया हसत होती, "मोहित अति करताय तुम्ही, साधी तर तयारी आहे,"

तो जवळ आला, "माझ्या नजरेतून बघ एकदा स्वतःला मग समजेल,"

माया लाजली होती.

"चल मला चहा दे, मीनुच आवरल का?" मोहित पुढे गेला

"मिनू चल उशीर होतो आहे, " मायाने आवाज दिला.

दोघ डायनिंग टेबलवर येऊन बसले, मिनू आली, मायाने मोहित मीनुला ब्रेकफास्ट दिला,

"वॉव मम्मी तू किती सुंदर दिसतेस ," मीनु उठून आली तिने मायाच्या गळ्यात हात टाकले, तिच्या गालावर पापी दिली,

" हो ना मीनु मी पण तेच म्हणतोय तुझ्या मम्मीला, "

"मोहित मीनु समोर नको," मोहितचा नाश्ता झाला त्याने त्याच सामान घेतलं.

"चल येतेस का माया ऑफिसला? "

"मीनु शाळेत गेली की येते, आई बाबांचा नाश्ता बाकी आहे अजून."

" ठीक आहे निघतो मी,"

आलोक राव, नंदा ताईंचा नाश्ता झाला, माया सरला ताईंना स्वयंपाकाच्या सूचना देत होती, तिने मीनुचा डबा भरला.

मीनु माया निघाली, माया फोन वर बोलत होती," हो आलेच. "

" कुठे जाते आहेस मम्मी? "

"थोड काम आहे बेटा, छान अभ्यास कर स्कूल मधे , सगळ घेतल ना "

हो.

" आज पण बाहेर जाते का तू माया? " नंदा ताईंचा कडवट आवाज आला.

माया धास्तावली," हो येते मी आई, ऑफिसला जाते आहे आपल्या, "

" ठीक आहे, लवकर ये," त्या तिच्याकडे वेगळच बघत होत्या,

माया निघाली, ती स्वतः कार चालवत होती, तिने मीनुला शाळेत सोडल, थोड दूर गेल्या नंतर तिने बघितल पाठीमागे कोणी येत तर नाही ना, लगेच रस्ता बदलला, ती जोरात निघाली, रस्त्यातून तिने फोन लावला," मिस्टर जॉन कुठे आहात तुम्ही? "

त्यांनी लोकेशन पाठवल, त्यांना रस्त्यातून घेवून कार निघाली, दोघ एका ठिकाणी आले, काम झाल, ती समाधानी होती, तरी आज तीन चार तास लागले होते. "चला मॅडम आता इथून, "

"मला यावस वाटत नाही," माया निघत नव्हती.

"समजत आहे मला पण उशीर झाला आहे, लंच टाइम पर्यंत तरी ऑफिसला जा,"

माया आणि मिस्टर जॉन निघाले, "कधी सांगायच सगळ्यांना मिस्टर जॉन?"

"आपण पोलिस घेवून जावू तिकडे, त्या लोकांना अटक झाली की सांगू,"

" ठीक आहे मला एक दोन दिवस जमणार नाही मीनुचा वाढदिवस आहे," ती वापस आली,

ऑफिस मधे लंच ब्रेक झाला, मोहितने जेवायला घेतल, सगळे पदार्थ आवडीचे होते, "काय चव आहे मायाच्या हाताला, माझी खूपच काळजी घेते ती, दोन मिनिट बोलून घेतो तिच्याशी," मायाचा फोन लागत नव्हता, त्याने घरी फोन केला, नंदा ताई होत्या फोन वर," माया निघाली का ऑफिस मधे यायला?"

"ती सकाळी गेली तुझ्या मागे, तिकडे नाही का ती?"

" असेल त्या डिपार्टमेंट मधे, "

" काय झालं मोहित? माया आली नाही का ऑफिस मधे ? कुठे फिरत असते ती काय माहिती? मला तुझ्याशी कधीच या विषयावर बोलायच होत, वाटल तुला आवडणार नाही, माया आता हल्ली तू गेला की नटुण थटुण बाहेर पडते, तू येण्या आधी बरोबर येते, "

" आई अस काही नाही, असेल ती तिकडे, मी मीटिंग मधे होतो, ठीक आहे मी बघतो," मोहित विचार करत होता, कुठे गेली माया? त्याने बॉडी गार्डला फोन लावला," माया कुठे आहे? "

" मॅडम ऑफिस मधे आहेत, "

ठीक आहे, तो तिच्या केबिन मधे गेला ती नव्हती,

मोहित त्याच्या केबिन कडे निघाला, तो विचारात होता, रिसेप्शन मध्ये आला," ऑफिस मधले बरेच लोक कुठे गेले आज?"

"कॉन्फरन्स सुरू आहे ना आज सर , सगळे तिकडेच बिझी आहेत,"

" ओह माझ्या लक्षातच नाही, "तो कॉन्फरन्स हॉल मधे आला, सगळे उठून उभे राहिले, माया लॅपटॉप वर काम करत होती, तो आश्चर्य चकित झाला, त्याने तस दाखवल नाही, येवून समोर बसला," केव्हा आली तू माया ऑफिस मधे "

"आता थोड्या वेळा पूर्वी आली, काय झालं काही टेंशन आहे का,"

" नाही तू लंचला का नाही आलीस ना म्हणून विचारल,"

"मीटिंग सुरू होती अजून दोन तीन तास चालणार आहे ,"

"तू जेवून घे माया,"

" हो अर्धा तास अजून, प्लीज मी कॉन्सन्ट्रेट करू का, "

हो, मोहित केबिन मधे आला त्याने गेट वर फोन करून कोण कधी आल याची लिस्ट मागवली,

ऑफिस हून घरी आल्यावर माया फ्रेश झाली, मिस्टर जॉन यांचा फोन आला, "मॅडम ब्लॅक मेल करणारा परत पैसे मागतोय,"

" मला आता शक्य नाही परत पैसे देण, काय करेल तो? "

" मॅडम आपल फक्त एक आठवडाच काम बाकी आहे तो पर्यंत त्याला सांभाळायला हव,"

"त्याने पैसे घेवुन फोटो डिलीट केले होते ना,"

"अस करतात हे लोक,"

"आता पैसे दिले तरी तो त्रास देईल, मला सारख बँकेतून पैसे काढता येणार नाही, त्याला सांगा अस चालणार नाही," ती बाल्कनीत उभ राहून फोन वर बोलत होती,

" काय करायच मग मॅडम, त्याने रात्रीतून मोहित साहेबांना कॉन्टॅक्ट केला तर? "

" नको अस मी सांगते तुम्हाला, करते पैशाची व्यवस्था, त्याला सांगा एक दोन दिवस दे, "माया टेंशन मधे होती.

ती आत आली, मोहित सोफ्यावर बसलेला होता, मीनु त्याला तिची बूक दाखवत होती, माया एकदम दचकली, यांनी ऐकल तर नसेल ना?

" काय झालं माया? अशी दचकली का? "

" काही नाही,"

" कोणाचा फोन होता, तू फोन वर बोलत होती ना? "

" हो मैत्रीण होती, असच इकडच तिकडेच बोलत होती,"

"मग तू एवढी का घाबरलीस?"

"काही नाही, मी जाते, थोड काम आहे मला," ती आत निघून गेली,

" काय सुरू आहे हीच? चौकशी करावी लागेल," मोहित विचारात होता.

जेवतांना तो मायावर लक्ष देवून होता, मीनु खूप बोलत होती. माया तिच्या विचारात होती, मीनु झोपली, माया आवरत होती," माया इकडे ये," ती येवून मोहित जवळ बसली," माया तुला काही हव का?"

"नाही का काय झाल? "

" तू कसल्या काळजीत आहेस का? "

" नाही कसली असेल काळजी, मी ओके आहे,"

"ठीक आहे काही हव असेल तर सांग,"

हो.

तो झोपला, काही तरी सुरू आहे हीच,

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//