Feb 28, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

माया... भाग 9

Read Later
माया... भाग 9
माया... भाग 9

©️®️शिल्पा सुतार
.........

माया कॉलेज मध्ये आली, आशा भेटली, लंच ब्रेक मध्ये त्या कॅन्टीन मध्ये गेल्या." कुठे गेली होती फिरायला माया,"

माया सांगत होती, "आशा मोहित चांगले आहेत,"

" तू खुश आहेस ना, "

" हो, पण आता मला माझ काम बघाव लागेल, तू काही माहिती काढली का? पुढे काय करायच, तो ही विचार करावा लागेल?"

" हो आपल्याला ही केस लढायची असेल तर वकील करावा लागेल पैसे लागतील," आशा डिटेल्स देत होती.

"पैसे नाहीत माझ्याकडे काय करू? "

"मोहित साहेब देतील का पैसे?"

"मला नाही वाटत या कामासाठी ते देतील मला पैसे, मी मागणार ही नाही ओरडतील ते, काय करू या, मला करायच आहे हे काम, "

" परीक्षा झाल्यावर नौकरी बघ तू आधी, "

हो.

नंदा ताई मधे खुप आजारी पडल्या, त्या मोहितची खूप आठवण काढत होत्या, आलोक रावांनी फोन करून मोहितला बोलवून घेतल, मोहित मधुन मधुन घरी जात होता होता, आलोक रावांना काही प्रॉब्लेम नव्हता, त्यांनी बर्‍या पैकी नंदा ताईंची समजूत काढली, त्यांनी मायाला भेटायला बोलवलं, माया टेंशन मधे होती , नंदा ताई बोलल्या नाही तिच्याशी, आलोक राव बोलत होते, त्यांनी मोहित मायाला समोर बसवल, आम्हाला तुमच्या लग्नाचा काही प्रॉब्लेम नाही घरी रहायला या. परीक्षा झाली, पेपर चांगले गेले होते तिला, मोहित माया घरी शिफ्ट झाले.

किती सुंदर मोठा बंगला होता त्यांचा, भरपूर रूम होत्या, घरात चार लोक होते फक्त , नंदा ताई बोलत नव्हत्या तिच्याशी , त्या फक्त मोहित सोबत बोलायच्या , आलोक राव माया सोबत नीट वागत होते, ती त्या दोघांसोबत खूप नीट रहायचा प्रयत्न करायची, जे आहे ते आहे आता ती पण जास्त विचार करत नव्हती, तिने सगळ बाजूला ठेवून खूप सेवा केली नंदा ताईंची, सगळे बघत होते, नंदा ताई ठीक होत्या आता.

बरेच दिवस झाले कुठे गेली नव्हती ती, आशाचा फोन आला, दोघी बराच वेळ बोलत होत्या, माया आशाला भेटायला अनाथाश्रमात गेली होती,

" कस वाटतय घरी,"

"ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण तिथून लगेच निघता येत नाही मला, अडकल्या सारख झाल आहे, काका काकूंच काम कराव लागेल आशा, थोडे पैसे आहेत माझ्या कडे, चल आपण वकीलां कडे जावू,"

" तुझ्या घरी समजल तर? "

"येवू पटकन थोडी चौकशी करायची आहे,"

"तुझी बॉडी गार्ड?"

"ती नाही आज सोबत म्हणून तर पटकन आली ना मी चल, आजच चान्स आहे "

माया आशा वकीलांना भेटले, ते पूर्ण केस समजून घेत होते, किती पैसे होतील ते सांगत होते,

"एकदम तर देता येणार नाही मला पैसे हळू हळू देईन मी चालेल का? "

ते हो म्हटले." तुमच घर शेत बघून घेवू, "

ते तिकडे गेले, लांबून बघत होते घर शेत , माया त्यांना केस काय आहे ते सांगत होती. बराच वेळ झाला. पण आता आज हे काम करून घेवू असा विचार मायाने केला,

मोहित फोन करत होता, मायाचा फोन लागत नव्हता, त्याला काळजी वाटत होती, त्याने तिच्या बॉडी गार्डला फोन केला,

" मी सुट्टीवर आहे साहेब,"

"माया सोबत कोण आहे मग?"

"दुसरे बॉडी गार्ड असतिल तुम्ही विचारा तिकडे, "

मोहित चौकशी करत होता, एक बॉडी गार्ड मायाच्या मागे होता.

"माया कुठे आहे? "

" मॅडम त्यांच्या काकांच्या गावाला आल्या आहेत ,"

"काय काम आहे तिकडे?"

"माहिती नाही साहेब, आम्ही लांबून लक्ष देवून आहोत, आशा मॅडम, माया मॅडम आणि एक वकील आहेत,"

ठीक आहे,

रात्री मोहित घरी आला, जेवण झाल, माया बाकीचे आवरत होती, ती रूम मध्ये आली," कसा गेला आजचा दिवस माया? "

"आशा कडे गेली होती मी तिला भेटायला, "

" काय केल मग आशा सोबत?" चला हे तर खर बोलली माया.

हे अस का विचारता आहेत, त्यांना समजल तर नसेल ना मी काकांकडे गेली ते, "काही नाही मोहित ते इकड तिकडच्या गप्पा केल्या, मग घरी आले मी,"

" अजून? "

"अजून काही नाही,"

"काही सांगायच नाही," मोहित चिडला होता.

"नाही, काय झाल? " माया पूर्ण घाबरली होती.

" माया इथे समोर बस, तू आज गेली होतीस का तुझ्या काकाच्या गावाला,"

हो. माया घाबरली.

" कश्यासाठी? वकील होता का सोबत?"

"हो, मला ते काम करायच आहे , मी काका काकूंना सोडणार नाही, तुम्ही ओरडता म्हणून सांगितल नाही, मला मदत करा मोहित, " माया रिक्वेस्ट करत होती.

"नाही, काही अर्थ नाही त्या केसला माया, किती वेळा सांगितल मी अस करु नकोस, तू गुपचुप गेली होतीस ना तिकडे, तुला समजत का मी काय म्हणतो ते, तुला काय गरज आहे हे सगळ करायची, धोका आहे या सगळ्यात, काका काकूंनी तुला काही केल तर, मला भीती वाटते,"

"मोहित प्लीज, काही होणार नाही, मला तुमच्या मदतीची गरज आहे माझ्या मनातून ही गोष्ट जात नाही, अस करु नका,"

"माया सोड ते, या पुढे ही गोष्ट या घरात बोलायच नाही, तिकडे जायच नाही, माझ ऐकायच नसेल तर घराबाहेर पाउल टाकायच नाही , मला चालणार नाही, या पुढे जर तू तिकडे गेली तर विचार करून ठेव काय होईल, माझ पूर्ण लक्ष असत तुझ्याकडे, " मोहित खूप चिडला होता.

माया खूप घाबरली होती, ती पटकन आत निघून गेली, एकटी बसली होती ती सोफ्यावर, सगळ संपल, आता करू तरी काय? आई बाबा मला माफ करा, मी तुम्हाला न्याय नाही देवू शकत, माझा एवढा लहान भाऊ पिंटू त्याला मारल या लोकांनी, काका काकूंनी तुम्हाला जो त्रास दिला त्याच्या बदला मी नाही घेवू शकत, ती मोबाईल मधे त्यांच्या फोटो बघत होती, अतिशय जुना फोटो तो एकच फोटो राहिला होता, रडून रडून झोपली ती,

मोहित बघत होता, त्याला कसतरी वाटत होत, पण हेच ठीक आहे मायासाठी, अजिबात गरज नाही काका काकू कडे जायची, उगीच डेंजर मधे फसेल ही , ते लोक खुनी आहेत, मी मदत केली असती मायाला पण काही पुरावे नाहीत, उगीच खूप भांडण मारामाऱ्या होतील, आपण लक्ष द्यायला हव माया कडे, ती परत करेल प्रयत्न तिकडे जायचा.

मोहित ऑफिसला गेला, मायाने आशाला फोन केला, "आशा मोहितला समजल आपण तिकडे गेलो होतो ते, खूप ओरडले मला, दम दिला या पुढे त्या केसच नाव काढायच नाही अस, " माया परत रडत होती.

"मी म्हटलं होत अस करु नकोस, सोड ना माया नको रडू, मोहित सरांना जे आवडत नाही ते करू नकोस,"

"आशा पण आई बाबांना पिंटूला शांती मिळेल का? "

" माया अस काही नसत तू उगीच त्रास करून घेवु नकोस, शांत रहा काहीही करू नकोस, तसही आपण काल गेलो तेव्हाही काहीही माहिती मिळाली नाही आपल्याला, उगीच तुला ओरडा बसला. "

माया विचार करत होती जावू दे सोडून दिल मी काका काकूंना, घरचे म्हणतात तस राहू,

संध्याकाळी मोहित घरी आला, माया शांत होती, मोहित नेहमी प्रमाणे तिच्याशी वागत होते, माया गप्प होती, तीच तीच काम करत होती, कुठल्याही गोष्टीत तिला रस वाटत नव्हता, मोहितला ते लक्ष्यात येत होत, तो काही म्हटला नाही, त्याने परत एकदा मायाच्या केसची चौकशी केली होती, काही दम नव्हता कोणताही पुरावा नव्हता, पोलिस केस झालेली नव्हती तेव्हा,

रात्री त्याने मायाला जवळ घेतल, ती रडत होती, " माया सॉरी, मला समजत आहे तुझा त्रास, ते घर शेत आपण विकत घ्यायच का?"

"नाही नको मला काही,"

"मग त्रास करून घ्यायच नाही आता, मला तुझी काळजी वाटते बाकी काही नाही,"

मायाने आता ऑफिस जॉईन केल होत, त्या सोबत आनंदाची बातमी होती ती आई होणार होती, घरचे सगळे खुश होते, काळजी घेत होते तिची, नंदा ताई बर्‍या वागत होत्या, मीनुचा जन्म झाला, माया आता घरी बिझी झाली होती, बाळाच्या आसपास तीच जग होत, नंदा ताई चिडायच्या पण ठीक सुरू होत त्यांच, मोहित खूप खुश होता तिच्या सोबत,

आशाच लग्न झालं होतं, ती येवून जावून होती,

मीनु बरीच मोठी झाली होती शाळेत जात होती. मायाचा वेळ त्यात जात होता, मोहित मीनु तीच जग होत, ती आता रोज थोडा वेळ ऑफिस मधे जात होती, नंदा ताई आलोक राव बर्‍या पैकी थकले होते,

एक दिवस एका नंबर वरून फोन आला, बराच वेळ माया बोलत होती त्यांच्याशी, तिच्या डोळ्यात पाणी होत, "खर आहे ना हे?"

"हो अगदी खर आहे,"

"ठीक आहे मी बघते काय करता येईल," तिने फोन ठेवला, ती बाथरूम मधे जावुन बसली, आई बाबा पिंटूचा फोटो समोर होता, खूप रडत होती ती. काय कराव कस काय चौकशी करणार, मोहितचा काही उपयोग नाही, मला भीती वाटते त्यांची, पण आता मी मागे फिरणार नाही.

तिने आशाला फोन केला, सगळ सांगितल, आशा आश्चर्य चकित झाली, "खर आहे का हे? "

"हो आशा मला मदत कर,"

"तू मोहित साहेबांना सांग,"

"नाही घरचे सपोर्ट करत नाही, ते बोलतील मला खूप, घरा बाहेर जावू दिल नाही तर? आहे ते काम राहून जाईल, हे माझ्यासाठी महत्वाच आहे,"

"हो बरोबर, करू आपण काहीतरी,"

दोघी बराच वेळ बोलत होत्या.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//