Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

माया... भाग 8

Read Later
माया... भाग 8माया... भाग 8

©️®️शिल्पा सुतार
.........

मोहितला आनंदाची बातमी समजली, मायाने लग्नासाठी होकार दिला, मॅडमला हाताशी धरून खरेदी झाली, मोहित एक दोनदा मायाला भेटायला आले, ती वेगळाच अंतर ठेवून होती,

"जावू दे लग्नानंतर वागेल बोलेल मोकळ, " मोहित विचार करत होते.

लगेच आठ दिवसात साध्या पद्धतीने लग्न झाल, मोहित खूप खुश होता, माया लग्नात साधी सुंदर दिसत होती, आशा आश्रमातल्या इतर मुली खूप मदत करत होत्या, सविता मॅडम सोबत होत्या.

मोहित कडून कोणी आल नाही, मोहितला ते अपेक्षित होत , स्नेहाच्या घरच्यांनी खूप विरोध केला पण मोहितच्या पॉवर पुढे त्यांच काही चालल नाही.

"माया आटोप मोहित साहेब खाली वाट बघत आहेत," सविता मॅडम.

आशा मायाच सामान पॅक करत होती, तिच्या डोळ्यात पाणी होत, माया गप्प होती, "आशा नको वाटत तिकडे जायला,"

"माया छान आयुष्य सुरु कर, बाकीचा विचार सोड, रोज फोन करशील ना मला?" आशा ही इमोशनल झाली होती.

"हो, मला मदत करशील ना, " माया तिला येवून भेटली.

"हो जो पर्यंत काहो रिस्क नाही तो पर्यंत कर हे काम," माया निघाली, सगळ्या मुली खाली पर्यंत सोडायला आल्या होत्या, खूप इमोशनल वातावरण झाल होत, सविता मॅडमच्या डोळ्यात पाणी होत.

ते बंगल्यावर आले, मोहितच्या घरच्यांनी मायाला घरात घ्यायला नकार दिला, बंगल्याच्या आत पाउल ठेवू दिल नाही, मोहित एकटा आत गेला होता बोलायला.

माया कार मधे होती, ती बर्‍या पैकी घाबरली होती, कशी आहे ही अशी नवीन आयुष्याची सुरुवात, काय कराव? आता कोण कोण आहे यांच्या कडे माहिती नाही, मी जावून बघु का? पण हा सिक्युरिटी गार्ड सोडणार नाही मला आत , ती कार मध्ये विचार करत बसली होती.

थोड्या वेळाने मोहित आला, कार निघाली, ती त्याच्या कडे बघत होती, तो काही बोलला नाही, मायाने काही विचारल नाही, ते एका पॉश सोसायटी मधे आले, माया तीच सामान घेत होती,

"असू दे नंतर येईल सामान चल,"

दहाव्या मजल्यावर लिफ्ट थांबली, दारा पुढे सुंदर फुलांची रांगोळी काढली होती, डेकोरेशन होत, मोहितने पुढे जावून दार वाजवल, एका बाईने दार उघडल, वेलकम सर वेलकम मॅडम, एक मिनिट तिने आरती केली, माप ओलांडून माया आत आली.

छान मोठा फ्लॅट होता, तीन बेडरूम होते, माया मोहितचा रूम खूप मोठा होता, त्याला लागून टेरेस होता, दोन तीन केअर टेकर होते.

काय झालं असेल मोहितच्या घरी? माया त्याच विचारात होती, वाटल होत लग्ना नंतर फॅमिली मिळेल, ते ही नाही, इथे ही माझ्या नशिबात एकटे पण, मोहितच्या आई कश्या असतिल? बाबा कसे असतिल? मला हव होत त्यांच्या सोबत, काय करतील चिडतील थोड, बोलतील, पण ते सोबत असते तर किती छान वाटल असत , मला माझे आई बाबा आठवत नाहीत, फॅमिली लाइफ कस असत, तिकडे राहिलो असतो, विचारू का? सांगतील का मोहित?

मोहित आत स्टडी रूम मधे बसुन काहीतरी काम करत होता, माया तिकडे गेली, तिने दारावर टकटक केली,

मोहित बघत होता किती सुंदर दिसते आहे ही लाल साडीत, परफेक्ट फिगर, गोरा रंग, साडीतून दिसणार तीच अंग, गळ्यात मंगळसूत्र शोभत होत तिला, काळे मणी त्यात तिची गोरी उंच मन, केसांची सैल वेणी तिने घातली होती, त्यात बर्‍याचश्या बटा तिच्या चेहर्‍यावर रूळत होत्या, घाबरलेले डोळे, एकदम अल्लड खूप सुंदर आहे माया.

मोहितच्या अश्या बघण्याने माया गोंधळली, ती वापस जात होती,

"माया काही हव का, आत ये,"

"तुम्ही बिझी आहात का नंतर येते," ती हळूच बोलली,

"नाही तुझ्यासाठी कधीच बिझी नाही मी, बोल पटकन,"

"ते.. ते तुमचे आई बाबा काय म्हटले, आपण तिकडे का नाही रहात, मला आवडेल तिकडे तुमच्या कडे, इथे कोणी नाही आपल्या सोबत, बोर होत आहे. "

" इथे येवून बस माझ्या जवळ, माझ्याशी बोल, पुस्तक हव असेल वाचायला तर घे, " मोहित उठून आला.

" नाही तुम्ही करा काम, मी जाते, "

" तू फ्रेश हो माया, आपण थोड्या वेळाने जेवण करू, ओके, मला थोड काम आहे, "

माया परत रूम मधे आली," काय यार काहीच समजल नाही, कोणाला विचारणार, मोहित काही सांगत नाही, "

रात्रीच जेवण झाल, मायाला सुचत नव्हत काही, रूम वर ती आशा सोबत बोलत बसायची, अभ्यास होता, इथे काय करायच, काम ही काही नव्हत, अभ्यास करावा तर सामान लावल नव्हत, ती विचार करत थोडी पडली, तिला झोप लागली , रात्री जाग आली मोहित तिच्या शेजारी झोपलेले होते, ती पटकन उठून बसली, बापरे हे केव्हा येवून झोपले शेजारी, तिने एकदा त्यांच्या कडे बघीतल, मोहित आरामात झोपलेला होता. तिला खूप धडधड होत होती, थोडी बाजूला सरकून मधे उशी ठेवून ती झोपली, सकाळी जाग आली तर मोहित जागेवर नव्हता, तो रेडी होत होता ऑफिस मध्ये जाण्या साठी,

" गुड मॉर्निंग माया, अटोप फ्रेश हो,"

दोघ नाश्ताला बाहेर आले, मायाला काही सुचत नव्हत, घर नवीन त्यात काल पासुन मोहित नुसते तिच्या कडे बघत होते,

आज मायाने गुलाबी ड्रेस घातला होता, नको ती साडी, उगीच खूप सावरावी लागते, ती बाहेर आली, नाश्ता आला, तिने तो मोहितला वाढून दिला,

" माया हा गुलाबी रंग खूप छान दिसतो तुला," मोहित बघत होता केस धुतले का हिने, हलकी लिपस्टिक लावली होती, वाह काय रूप आहे हे.

माया अजून अवघडून गेली होती. त्यात काट्या चमच्याने तिला जेवता येत नव्हत, चमचा वापरतांना प्लेटचा जोरात आवाज होत होता, माया नुसती बसुन होती ती काही खात नव्हती.

"माया हे तुझ घर आहे आरामात रहा, नसेल वापरायचे चमचे तर काही हरकत नाही, हाताने खा."

मायाला बर वाटल, हे गेल्यावर नाश्ता करते मी .

" मी येतो दुपारी घरी जेवायला, ओके," तो तिच्या जवळ गेला, त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले.

" मला कॉलेजला जायच होत,"

"सोमवार पासून जा आज आराम कर, उद्या सुट्टी असेल ना, परीक्षा कधी आहे "

" पुढच्या महिन्यात,"

" काही वाटल तर फोन कर, " तो गेल्या, घराला सिक्युरिटी चांगली होती. कोणाला आत पाठवू नका, कोणी आल तर मला सांगा, मोहितने स्ट्रीक्ट वाॅर्निंग दिली.

मोहित गेल्यावर मायाने आरामात नाश्ता केला, नंतर तिने पूर्ण घर फिरून बघितल, घर खूप सुंदर होत , थोड्या वेळाने तिने आशाला फोन केला," कोणी नाही इथे आशा कंटाळा आला मला काल पासुन इथे,"

"मोहित सर कुठे गेले? "

"ऑफिसला,"

"त्यांची ही हिम्मत तुला सोडून जायची,"

"आशा ऐक ना आम्ही त्यांच्या घरी नाही दुसर्‍या फ्लॅट वर आहोत, त्या लोकांना मी पसंत नाही मला टेंशन येत आहे, कायम एकट राहिलो आपण आता वाटत होत फॅमिली असावी, " माया नाराज होती.

" काळजी करू नकोस, मोहित सर करतील काही तरी,"

" मी सोमवारी येते कॉलेजला, "

" ठीक आहे, "

दुपारी मोहित वापस आला, माया बाल्कनीत बसलेली होती, ती तिच्या विचारात होती, काय करता येईल पुढे? इथून मी माझ काम कस करणार, ते काम पण गरजेच आहे, थोडी माहिती गोळा करावी लागेल, कॉलेजला जावू तेव्हा काहीतरी करता येईल,

मोहित तिच्या जवळ येवून उभा राहिला, त्याने मागून मायाला मिठी मारली, ती एकदम घाबरली, "काय करता आहात,"

"काय झालं माया इतकी का घाबरली, शांत हो,"

"तुम्ही प्लीज अस करु नका, सोडा, मला वेळ हवा आहे,"

"रिलॅक्स माया , काळजी करू नकोस, मोकळ रहा बोल माझ्याशी, चल जेवून घे," मोहित माया आत गेले.

जेवतांना ती घाबरलेली होती, कसतरी जेवून ती रूम मधे आली, मोहित तिच्या मागे आला, माया जवळ बसला, तिचा हात हातात घेतला," माया मला माहिती आहे तुझ्या साठी हे नवीन आहे, कुठल्याही गोष्टीची बळजबरी नाही, आरामात रहा, आपण फ्रेंडशिप करू या का, हे बघ मोकळ राहील बोलाल तर तू कंफर्टेबल राहशील,"

"हो ठीक आहे, सॉरी," माया खाली बघत होती, यांना राग तर आला नसेल ना.

त्याने हात पुढे केला, मायाने हात मिळवला,

"माया माझ्यासाठी तू खूप महत्त्वाची आहे, आरामात रहा माझ्या जवळ, मी येतो संध्याकाळी तयारी करून ठेव आपण छान डिनर साठी जावू,"

दोघ छान सोबत रहात होते, माया आता थोड मोकळ बोलत होती मोहित सोबत, मोहित तिची खूप काळजी घेत होता, मस्त मैत्री झाली होती त्यांची, कॉलेज सुरू होत मायाच,

मोहित चांगला आहे हे मायाला पटल, तासनतास बोलत होते ते, मोहित शिवाय आता मायाला करमत नव्हत,

एक दिवस मोहित घरी आला, "माझी बॅग भर माया मला आॅफिशीअल टूर वर जाव लागेल ,"

" तुम्ही कधी येणार? "

"एक आठवड्याने,"

" मी काय करू तो पर्यंत घरी, "

"चलतेस का सोबत,"

नाही.

"ऑफिसचे काम करावे लागतील ना माया, छान रहा," तो निघून गेला,

दोन तीन दिवस झाले, माया घरी कंटाळली होती, आता हल्ली तिला मोहितची वेगळीच ओढ प्रेम वाटत होत, ते तिच्या वागण्यातून दिसत होत, तरी तिने तीच प्रेम व्यक्त केलं नव्हत,अजून दोन तीन दिवस मोहित येणार नाही, ती नाराज होती , ती त्याला सारखा फोन करत होती,

" काय झालं माया माझी खूप आठवण येते का तुला?" मोहित हसत होता.

" नाही तस नाही, मी ठेवते फोन, " माया गडबडली.

" बोल तस, येवु का मी घरी," मोहित.

" नाही तुम्ही करा तुमच काम," माया लाजली होती खूप.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी अचानक मोहित घरी आला, माया टीव्ही बघत होती, मोहित आत आला, माया पळत जावून त्याला भेटली, दोघ खूप खुश होते," मोहित बर झालं तुम्ही आले, मी नाही राहू शकत तुमच्या शिवाय, आय लव यू," ती लगेच गप्प झाली, काय बोलली मी, मोहितने तिला मिठी मारली, "लव यु टु माया," छान प्रेम बहरल होत त्यांच, आता कोणी वेगळ करू शकत नव्हत त्यांना.

पुढच्या आठवड्यात ते छान फिरून आले, "जावू ना मी ऑफिसला माया, " मोहित तिला मुद्दामून चिडवत होता.

" हो मी पण कॉलेजला जाते, " माया लाजली.

"ठीक आहे भेटू मग संध्याकाळी, चल तुला सोडून देतो कॉलेज पर्यंत, " दोघ निघाले.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//