Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

माया... भाग 7

Read Later
माया... भाग 7माया... भाग 7

©️®️शिल्पा सुतार
.........

संध्याकाळी मोहित अनाथाश्रमात आला, मॅडम खाली होत्या त्यांना भेटला, "मला लग्न करायच आहे मायाशी, तुम्ही मदत करा. "

"तिने होकार दिला का?" मॅडम मोहित कडे बघत होत्या.

"नाही ती नकार देते आहे,"

" मग बळजबरी करू नका,"

" मॅडम प्लीज तिच्या आयुष्यात कोणी दुसरा मुलगा नसेल तर काय हरकत आहे , तुम्ही प्लीज तिला समजून सांगा ना रिक्वेस्ट करतो मी. " मोहित.

" ठीक आहे मी बोलते पण अंतिम निर्णय तिचा असेल, "

" मी भेटू का मायाला, "

"हो जा, "आशा माया बोलत बसल्या होत्या, मोहित आत आला त्या एकदम गप्प बसल्या," कस वाटत आहे आता माया? "

" ठीक आहे मी,"

त्याने ज्यूस खाण्याचे पदार्थ आणले होते,

" तुम्ही इथे परत का आले आहात मोहित? " माया.

" का म्हणजे तुला भेटायला, "मोहित.

"तुम्ही येवू नका इथे आता मी ठीक आहे,"

"परवा डॉक्टर कडे जायच ना, गोळ्या औषध घेतल का आज? " मोहित काळजीत होता.

" मी जाईन अवि सोबत,"

" कोण अवि?"

"माझा मित्र आम्ही दोघ लग्न करतोय," माया खाली बघत बोलली.

मोहित दोन मिनिट थांबला, त्याने माया कडे बघितल, नंतर आशा कडे बघितल, आशा गडबडली," मी बाहेर आहे तुम्ही बोला."

"आशा थांब कुठे जायची गरज नाही, ही तुझी रूम आहे, मोहित तुम्ही जा इथून," माया.

"आशा कोण अवि? " मोहित तिच्याकडे बघत होता.

"माझा भाऊ ,"

"मला अविला भेटायच आहे, बोलव त्याला इथे," मोहित चिडून बोलला.

"का काय काम आहे, तो बिझी असतो, तुम्ही जा इथून," माया चिडली होती.

" अविला बोलव आता इथे, आशा ऐकु आल ना, "

" नाही तुम्ही म्हणाल तस सगळे वागणार नाही इथे मोहित, तुमच्या इशाऱ्यावर प्रत्येक गोष्ट होणार नाही, अवि बिझी आहे, " माया.

" माया मी तुझ्याशी बोलत नाही आशाशी बोलतो आहे, " मोहित.

" सांगितल तेवढ कर आशा , फोन नंबर दे त्याचा, माया मला माहिती आहे तू खोट बोलते आहेस, तुझी पूर्ण चौकशी केली आहे मी, आशा एक मिनिट मला बोलायच आहे माया सोबत, "

" मी बाहेर आहे ", आशा पटकन बाहेर निघून गेली,

मोहित माया जवळ येवून बसला, त्याने तिचा हात हातात घेतला, " माया तू का अस करतेस, मला माहिती आहे, स्नेहाने चुकीच केल, या पुढे अस होणार नाही, मी आहे ना सोबत, प्लीज बिलीव मी आपण सोबत खुश राहु, लग्न करून घेवू, आय लव यू, "

" मला तुमच्या कडच्या लोकांची मला भीती वाटते," माया.

"मी आहे ना, मी काळजी घेईन तुझी, होकार दे " मोहित एवढ प्रेमाने बोलत होता माया शांत झाली.

"चोवीस तास थोडी सोबत राहणार आहात का तुम्ही, "

" तुझी साठी बॉडी गार्ड ठेवू आपण, "

" मोहित माझ आयुष्य वेगळ आहे, मला काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून नीट करायच्या आहेत, त्या साठी मला वेळ हवा आहे, " माया.

" तू म्हणशील तर मी मदत करेन तुला, नंतर सांग तू तुझ काय म्हणण आहे ते, मी उद्या येईन आपण डॉक्टर कडे जावू,"

मोहित निघून गेला, माया विचार करत होती या मोहित पुढे कोणतही कारण चालत नाही, काय करू मी? आशा आत आली, "माया तू लग्न कर मोहित साहेबांबरोबर, तुझ चांगल होईल ऐक, "

" आशा.... तू पण, "

दुसर्‍या दिवशी ते डॉक्टर कडे गेले, पाय ठीक होता, टाके आठ दिवसानी काढणार होते, तिथून निघाले, अनाथाश्रमात आले,

"माया तू काय विचार केला, काय प्रॉब्लेम आहे तुझा ते सांग, बोल काय झाल,"

" तुम्ही मला खरच मदत करणार ना?"

हो.

" ते माझे काका काकू,...."

सविता मॅडम आल्या, "काय म्हटले डॉक्टर? चल आत माया, थॅन्क्स मोहित साहेब,"

"आठ दिवसानी टाके काढणार आहेत,"

ओके.

" माया सोबत बोलत होतो पाच मिनिट मी येतो घेवून तिला" मोहित.

" ठीक आहे," मॅडम आत गेल्या.

" तू अनाथ आहे ना माया मग काका काकू कसे?"

"माझे चुलत काका काकू आहेत ते, त्यांनी माझ घर शेती घेतली, आई बाबा भावाला मारल, "

" काही पुरावा आहे का तुझ्या कडे? "

नाही,

" कधी झाल हे? "

" साधारण पंधरा वर्षापुर्वी, "

"तेव्हा पोलिस केस वगैरे काही केली होती का? "

" नाही तेव्हा मी एकटी उरली होती, एका मावशींने मला अनाथाश्रमात आणून सोडल म्हणून मी वाचले नाहीतर तेव्हा माझ पण काहीतरी केल असत या लोकांनी, " माया इमोशनल झाली होती. त्याने तिला हळूच मिठी मारली, "माया आता काळजी करायची नाही, मी आहे ना,"

"मोहित ही केस माझ्या साठी खूप महत्वाची आहे,"

" हो, मी करतो चौकशी," मोहित घरी आला, त्याच्या असिस्टंटने तो पर्यंत अवीला फोन लावला होता, अवी कॉलेजचा विद्यार्थी होता, ते काम झाल, काही दम नव्हता अवी प्रकरणात,

" ते मायाच्या काका काकूंच काय मॅटर आहे बघा जरा, "

"हो सर मी करतो चौकशी,"

सकाळ पर्यंत मोहित कडे सगळी माहिती होती, मोहित मायाला भेटायला आला.

"मी चौकशी केली काका काकूंची, ते त्यांच होत घर, तुमच्या बरोबरीने वाटण्या झाल्या, तुमच्या वाटणीची जमीन विकल तुझ्या बाबांनी आणि तुझे आई बाबा भाऊ एक्सीडेंट मध्ये गेले ना, "

" हो तस सांगितल त्यांनी, पण मला शंका आहे की काका काकू आहेत या मागे,"

"एक तर आपल्या कडे काही पुरावे नाहीत, काळ जुना होता, मला अस वाटतय तू या सगळ्यातून बाहेर पड, जास्त विचार करू नकोस, डेंजर लोक आहेत ते, त्यांना समजल तू केस ओपन करते आहे ते तर ते तुझ बर वाईट करतील, सोड ते आणि माझ्या सोबत छान आयुष्य सुरु कर, " मोहित.

" पण ऐकुन तर घ्या एकदा मोहित मला अस वाटत की ," माया कळकळीने बोलत होती.

" पुरे माया त्रास करून घेवू नकोस, आणि एवढी ही नाही ती प्रॉपर्टी ज्या साठी रिस्क घेतेस तू , " मोहित

" ती जेवढी असेल ती माझ्या साठी प्रिय आहे, " माया.

" मला अस नव्हत म्हणायच, आता तू या साठी वेळ नाही घालवायला पाहिजे,"

" पण माझ्या फॅमिलीला झालेला त्रास त्याच काय? "

" आता काय करू शकतो का आपण,"

" मला अस मला वाटत एकदा ट्राय केल असत,"

" काही गरज नाही, काय हव तुला घर का? लॅण्ड का? मी देतो तुला, " मोहित.

" नाही अस नाही, " यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, यांना समजत नाही मी काय म्हणते ते, माया वैतागली, हेच एक महत्त्वाच काम होत मला, त्या कामाला मोहित नाही म्हणतात, आई बाबा पिंटू मिस यू, तिच्या डोळ्यात पाणी होत.

मोहित तिच्या जवळ येवून बसला. " माया काय अस या साठी कश्याला त्रास करून घेते. सोड ते आणि माझ्या बरोबर छान आयुष्य सुरु कर, आपण लग्न करून घेवू ,"

काय करू? हे मला मदत करणार नाही, काका काकूंना मी सोडणार नाही, या साठी मला वेळ हवा, "हे बघा मोहित मला दोन तीन महिने वेळ द्या, नंतर करू आपण लग्न,"

"काय काम आहे या वेळात, हे बघ माया तू जर परत तुझ्या काका काकूंचा विचार करत असशील तर मी आधीच सांगतो तू अस काही करणार नाही, नाही तरी या पुढे तुझ्या सोबत बॉडी गार्ड असेल ती मला रोज रीपोर्ट करेल,"

" प्लीज मोहित अस नका ना करू, "

" कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही मी आधीच सांगतो, उद्या मी फोन करतो होकार देशील तू मला ही अपेक्षा ठेवतो, चल मी तुला रूम मधे सोडतो, " माया रूम मध्ये आली मोहित तिथून निघाला, खाली ऑफिस मध्ये आला मॅडम बसलेल्या होत्या, थोड बोलायच होत," तुम्ही मायाला लग्ना साठी तयार करा ना मॅडम, माया तशी रेडी आहे, थोड काहीतरी तिच्या मनात आहे पण, "

"मी बोलते तिच्याशी, तुमच्या घरून काही प्रॉब्लेम नाही ना,"

"आहे प्रॉब्लेम पण तरी मी करेन सगळं ठीक, तुम्ही अजिबात मायाची, काळजी करू नका तिची पूर्ण काळजी घेईन मी, आई बाबा पण ऐकतील ते माझ्या शिवाय राहू शकत नाही,"

" ठीक आहे मी बोलते रात्री माया सोबत कळवते तुम्हाला, " सविता मॅडम.

मोहित घरी गेला.

माया रूम मधे नुसती बसली होती, आशा ऑफिस मधून आली," काय झालं ग मोहित साहेब आले होते का आज ही, कसला विचार सुरू आहे, "

" आशा मोहित ऐकत नाही लग्न कर म्हणता आहेत, "

" तू बोलली का त्यांच्याशी, "

" हो काका काकू विरुद्ध काही पुरावे नाहीत माझ्या कडे, मोहित म्हणता विसरुन जा जे झाल ते, मी काय करू मला माहिती आहे ते घर शेत आमच होत, काकांच्या वाटणीची त्यांनी विकल आणि आमच बळकावला त्या साठी त्यांनी आई बाबांच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते, मी काय करू आशा, मला न्याय हवा आहे," माया रडत होती, आई बाबा माझा भाऊ गेले, मी अशी अनाथाश्रमात लहानपणा पासुन आहे, आता मोहित म्हणता विसरून जा ते, कस विसरू तू सांग.

" पण ते आठवून ऊपयोग नाही, होईल काही तरी अचानक देव त्यांना शिक्षा देईल, तु प्रामाणिक आहे देव तुझी मदत करेल, "आशा.

" कस पण?, कसा न्याय देवू मी घरच्यांना," माया रडत होती.

" माया सगळ सोड मोहित साहेबांना होकार दे, तुझ भविष्य सिक्युर कर बाकीच्या गोष्टी होतील की नाही आपल्याला माहिती नाही, त्या साठी ही चांगली संधी नको जायला," आशा तिच्या जवळ बसुन समजावत होती.

मॅडम आत आल्या," आशा बरोबर बोलते आहे माया, लग्न करून घे,"

"मॅडम तिकडे सगळे लोक राग राग करतील माझा, " माया.

" मी बोलले मोहित साहेबांशी, ते बोलले काही प्रॉब्लेम नाही, नाहीतरी लग्न झाल्यावर थोड्या फार प्रमाणात त्रास हा सगळ्यांना होतो, मग हे स्थळ का नको? विचार कर तुझ चांगल करून घे, मोहित साहेब खूप चांगले आहेत, "

ठीक आहे. मी देते होकार.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//