माया... भाग 2
©️®️शिल्पा सुतार
.........
.........
मायाची खरेदी झाली, मोहित काऊंटर वर होता, माया अजूनही फोन मधे बघत होती, तिच्या चेहर्यावर टेंशन होत, मोहित बघत होता, " माया काय झालं? "
"काही नाही."
"मीनुकडे लक्ष दे. "
नंतर ते जेवायला गेले, मीनु खुश होती, ती खूप खेळत होती, "पप्पा मला आईस्क्रीम हव. "
"हो आधी जेवायच आपल्याला,"
मोहित विचार करत होता माया आजकाल अशी का वागते, आता फोन वर बोलतांना मी आवाज ऐकला तरी नाही म्हणते, काय असेल हे अस? , जावू दे, मीच वेगळा विचार करतो आहे वाटत , माझ खूप खूप प्रेम आहे मायावर, तिला स्पेस दिली पाहिजे, आज बघू पण आपण ती नक्की खर बोलत होती का ते,
"माया तुझा फोन दे पाच मिनिट मला मीनुचे फोटो घ्यायचे आहेत. " मोहितने हात पुढे केला.
मायाने फोन दिला, एकदम रीलॅक्स होती ती, मी वाॅशरूमला जावून येते, माया पर्स घेवून निघून गेली, मोहित पटापट पूर्ण फोन बघत होता, कोणाचा फोन आला, कोणाचा नाही, की तिने केला होता फोन, सहा तासात मायाने कोणाला फोन केला नव्हता की फोन आला नव्हता,
काय हे नक्की? कोणाचाही फोन आलेला नाही मायाला, मी काहीही विचार करतो आहे, त्याने तिचे मेसेजेस बघितले, काही विशेष नव्हते, सगळे मेसेज मला केलेले होते आणि तिच्या मैत्रिणीला आशाला "आय एम सॉरी माया" , त्याला वाईट वाटल, त्याने फोन बाजूला ठेवला.
वाॅशरूम मधून मायाने दुसर्या फोन वरून मिस्टर जॉन यांना फोन केला, "काय झालं मिस्टर जॉन?"
"आता थोड्या वेळा पूर्वी आला होता फोन, तो ब्लॅकमेल करणारा पन्नास हजार रुपये मागतो आहे" ,
" बापरे कुठून आणणार एवढे पैसे, तुम्ही बोला त्याच्याशी, वीस हजार रुपये देईल मी, पण फोटो डिलीट करायचे, परत त्रास द्यायचा नाही", मायाला धड धड होत होतं.
"मी सांगून बघतो मॅडम, पण तस आपण काही चुकीच करत नाही" ,
"हो मिस्टर जॉन हे तुम्हाला माहीत आहे मला ही माहिती, बाकीच्यांना काय सांगणार आपण", माया काळजीत होती.
" ठीक आहे, उद्या बोलते", तिने फोन स्विच ऑफ केला.
माया फ्रेश होवुन आली, तिने घरी फोन करून बघितला, तिथे काम करणार्या सरला ताईंने फोन उचलला," जेवले का आई बाबा? "
" हो मॅडम जेवता आहेत ते आता ",
" बर आम्ही येतो थोड्या वेळात", तिने पर्स मध्ये फोन ठेवला, ती आरामात जेवत होती.
मोहित मीनुला खाऊ घालत होता, मधेच तो मायाला एक एक घास देत होता.
"मोहित काय हे, पुरे", ती लाजली होती.
रात्री शॉपिंग डिनर करून ते वापस आले, मीनु झोपून आली होती, मोहित तिला घेवून आत गेला.
माया किचन मधे आली, "सरला ताई आई बाबांनी ( नंदा ताई, आलोक राव... सासू सासरे) औषध घेतल का?"
"हो मॅडम ते तुमच्या बद्दल विचारत होते. "
माया त्यांच्या रूमकडे गेली, ते दोघ बसले होते,
" आई बाबा येवू का एक मिनिट" , ती आत आली, दोघ शांत होते ,
"जेवण झाल का तुमच? "
"हो बरीच काळजी आहे तुला? आम्ही साडे सातला जेवतो, आता दहा वाजले खूप लवकर विचारल. " नंदा ताई चिडल्या होत्या.
" आई मी साडे सातला सरला ताईंना फोन केला होता, तेव्हा तुम्ही जेवत होत्या. " माया
" नौकरांना विचारल की झाल तुमच, काही काळजी नाही, जबाबदारी नाही. " नंदा ताई
माया खाली बघत होती.
"नंदा पुरे, जा बेटा माया आराम कर. " बाबा मधे बोलले.
" हो बाबा, आई सॉरी ते मोहित ऐकत नव्हते, मीनुचा वाढदिवस आहे तर शॉपिंगला गेलो होतो" ,
"ठीक आहे माया जा बेटा खोलीत, मीनु झोपली का? " आलोक राव.
"हो बाबा" माया निघाली.
नंदा ताई बडबड करत होत्या," चांगल आहे, मोहितला दूर केल हिने आमच्या पासुन, बरोबर आहे म्हणा हिला काय माहिती आई बाबा मुलाच नात, शेवटी अनाथाश्रमात मोठी झालेली ती , पण हे ती चांगल करत नाही, बघितल का मोहित आला तरी का भेटायला आपल्याला सदोदित हिच्या मागे असतो तो. "
"पुरे नंदा किती बोलणार, विचार बदल जरा, सोड आता कडवट पणा, किती वर्ष झाले तेच सुरू आहे तुझ, गेले ते बाहेर तर काय झाल, चीड चीड करू नकोस. " तिला मागून बाबांचा आवाज येत होता.
माया त्यांच्या रूम कडे निघाली, तिच्या डोळ्यात पाणी होत तिने ते त्यांच्या रूम मधे जाण्या आधी हळूच पुसल.
" मीनु झोपली का? "
" हो , ती पाच मिनिटात झोपली, माया इकडे ये, काय झालं, "
" काही नाही,"
" आई काही बोलली का? " मोहित तिच्या उतरलेल्या चेहर्याकडे बघत होता.
नाही,
"हे बघ तू आईच टेंशन घेवु नकोस."
"मी ठीक आहे मोहित. "
"आटोप मग चेंज कर माझ्या जवळ ये, ती तुझी व्हाइट मॅक्सी घाल खूप छान दिसते तू त्यात," मोहित मोबाईल मधे बघत होता.
" मोहित तुम्ही आई बाबांना भेटून या ना आता. "
"काय झालं?"
"काही नाही सहज."
"उद्या भेटेन आता नाही आटोप तू. "
" हो आलीच फ्रेश होवुन," माया वॉश रूम मध्ये गेली, बाहेर आली, खूप छान दिसत होती, आरश्यात समोर बसुन ती केस विंचरत होती, मोहित काॅटवर बसुन तिच्या कडे बघत होता.
" माया मीनु आता पाच वर्षाची होईल तिला वेगळ झोपवत जा ना, आय एम नॉट दॅट मच कंफर्टेबल लायक धिस ,"
" ठीक आहे मी बोलते तिच्याशी, तिची रूम तयार आहे, आपल्या रूम मधून तिच्या रूमचा दरवाजा आहे , ती पण कंफर्टेबल राहील आपण ही. " माया हे बोलतांना थोडी लाजली होती.
"हो चालेल , चल आता ये इकडे,"
" हो क्रीम लावते. "
" काय गरज आहे एवढी सुंदर आहेस तू , पुरे आता", लव यू त्याने मायाला जवळ घेतल.
सकाळी लवकर नाश्ता करून मोहित ऑफिसला जायला तयार होता," माया तू येतेस का आज ऑफिस मधे? "
" हो थोड्या वेळाने येते" , तिच्या मनात विचार सुरू होते कोण असेल तो माणूस ज्याने आमचे फोटो काढले काय होईल पुढे जर मोहितला समजल तर? तो घराबाहेर काढेल का मला, तिला घाम फुटला.
"माया... माया ठीक आहेस ना तू, काय झालं?" मोहित काळजीत होता.
"काही नाही, "
" काय विचार करत असतेस आता हल्ली?"
"मी ठीक आहे."
त्याला फोन आला, " मी निघतो. "
"ठीक आहे,"
तो ऑफिसला निघून गेला.
माया त्यांच्या रूम मध्ये आली, तिने लगेच मिस्टर जॉन यांना फोन लावला, "येते मी लगेच, हो भेटू आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी, हो... हो बॅंकेत जाते..
हो. "
हो. "
नंदा ताई तिच्या रूमच्या बाजूने जात होत्या, त्यांनी ऐकल, त्या पटकन बाजूला झाल्या, माया घाईने निघून गेली,
नंदा ताई रागाने खोलीत आल्या, "मी आधी पासून म्हणत होते या मुलीचे लक्षण काही ठीक नाहीत."
" काय झालं नंदा? "आलोक राव.
" हीच काहीतरी बाहेर प्रकरण सुरू आहे." नंदा ताई.
"काहीही काय नंदा हे अस बोलत जावू नकोस"
"मोहिनी घातली हिने तुमच्या सगळ्यांचा डोळ्यावर, पण माझ्या समोर हे चालणार नाही, मला समजत सगळं" नंदा ताई.
" काय झाल? "
" मी स्वतः ऐकल तिला बोलतांना, कोणाला तरी भेटायला गेली ती एवढी तयार होवुन," नंदा ताई रागात होत्या.
"अस मग काय घरच्या कपड्यात फिरेल का ती, ऑफिसला गेली असेल. " आलोक राव.
" नाही, ऑफिसला नाही गेली ती, मी बोलणार आहे आज मोहितशी. " नंदा ताई
" नको नंदा अस करूस, मोहित चिडेल, खर काय आहे ते आपल्याला माहिती नाही. " आलोक राव.
" तिने माझा मुलगा माझ्या पासून तोडला, जेव्हा पासून ही आली आयुष्यात अस होत, अगदी गूढ रित्या ती फिरते सगळीकडे. "
" शांत हो. "आलोक राव विचार करत होते काय आहे हे नक्की.
माया बॅंकेत गेली तिच्या अकाऊंट मधुन पंचवीस हजार रुपये काढले, मिस्टर जॉन फोन करत होते,
"हो येते मी रस्त्यात आहे," माया मिस्टर जॉन नेहमीच्या ठिकाणी भेटले. थोड्या वेळाने ब्लॅक मेल करणार्या मुलाचा फोन आला.
" पैसे समोरच्या झोपडीच्या मागे टोपलीत ठेवा आणि मागे न वळता निघा. "
" तुम्ही आधी फोटो डिलीट करा आणि आम्हाला या पुढे कॉन्टॅक्ट करायचा नाही." मिस्टर जॉन दम देत होते.
" ठीक आहे, केले. "
" काहीही झाल तरी या पुढे तुम्हाला आमच्या कडून पैसे मिळणार नाही," जॉन.
" केले मी डिलीट फोटो,"
त्यांनी पैसे सांगितलेल्या ठिकाणी ठेवले, ते दोघ निघाले, मोहितचा फोन आला," मिस्टर जॉन प्लीज गप्प रहा पाच मिनिट ",
" हो मॅडम, "
" बोला मोहित."
" कुठे आहेस तू माया. "
" ते मी थोडी बाहेर आहे, काम होत थोड. "
" तू आता बँकेत गेली होतीस का? "
" हो थोडे पैसे काढले, काम होत."
"ठीक आहे ये ऑफिसमध्ये, मग बोलू."
हो.. तिने फोन ठेवला, तिचे हात थरथरत होते.
" मॅडम तुम्ही सरांना सगळ सांगून का नाही देत, " जॉन तिच्या कडे बघत होता.
" नाही करता येणार तस मला मिस्टर जॉन, मोहित चिडतील मला घराबाहेर जावू दिल नाही तर काय करणार मी, " माया.
" बरोबर आहे आपल काम होत आल आहे. " जॉन.
" हो ना थोड्या दिवसाचा प्रश्न आहे एकदा सगळ ठीक झाल की सांगेन त्यांना, माफी मागेन. "माया बोलली.
रस्तात मिस्टर जॉन उतरले, माया ऑफिस कडे निघाली.
कार चालवतांना माया विचार करत होती काय होवुन बसल हे, मी खुश होती माझ्या आयुष्यात, इथे काहीही काम होत नाही आणि एक एक संकट येत आहेत , मोहित किती चांगले आहेत, रोज खोट बोलाव लागत मला त्यांच्याशी, काय करू, सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत माझ्या साठी,
सहा वर्षापुर्वी,
मोहित आगाशे अतिशय प्रसिद्ध उद्योगपती, श्रीमंत तरी डाऊन टु अर्थ अशी ओळख होती त्याची.
आलिशान इंजिनिअरिंग कंपनी होती त्यांची, आलोक राव आधी पूर्ण वेळ काम करायचे, मोहित जॉईन झाल्या पासून ते जास्त जात नव्हते कंपनीत, मोहितने परदेशात शिक्षण घेतल्यावर लगेच कामाचा चार्ज घेतला होता, तो जॉईन झाल्यावर सहा महिन्यात कंपनीचे शेअर खूप वाढले होते , खूप छान सुरु होत, मोहित सिरियस होता कामात.
आई बाबांनी त्याच नुकताच लग्न जमवल होत, स्नेहा करोडपती वडलांची एकुलती एक मुलगी होती, अतिशय बोल्ड विचाराची मुलगी होती ती, नंदा ताईच्या नात्यातली होती ती, त्यामुळे त्यांच हे लग्न व्हाव या साठी आग्रह होता.
....
....