मत्सर

द्वेष भावना

नुकतेच  वंदना च्या धाकट्या दिराचे लग्न झाले. अंकिता  इंजिनियर  देखणी अनिकेत आणि तिचा जोडा खूप शोभून दिसत असे.

पहिले काही दिवस नव्याची नवलाई सारे हॅप्पी गो लॅकी दिवस .जसजसे दिवस जातील तशी वंदना अंकिता वर जळू लागली. त्यांचा रोमान्स तिचे वर्किंग वुमन पगार या सर्वामुळे तिला हीन भावनेने ग्रासले.ती अंकिताचा द्वेष करू लागली.आपले सदैव घर कामे करणे तिला कमी दर्जाचे वाटू लागले. मग ती सारखी तिच्यावर कामे लादू लागली. तिला कामाची जास्त सवय नव्हती पण तिला शिकायची इच्छा होती.ती वेळ मिळेल तेंव्हा शिकायचं प्रयत्न करायची. पण वंदना तिच्या कामातल्या चुका वारंवार सुलभा ताईला तिच्या सासूला दाखवून द्यायची. सुलभाताई म्हणायच्या शिकेल हळू हळू.तुला तरी कुठे जमत होते आलीस तेंव्हा पण शिकलीस ना.आता तूच तिची मोठी बहीण होवून शिकव तिला सगळे. चुका दाखवून दिल्या की माणूस घाबरून अजूनच चुका करतो समजून सांगितलं की विश्र्वासचे रूपांतर आत्मविश्र्वासा मध्ये होते .तू जेंव्हा आलीस तेंव्हा मी  पण जर तुला सारखी रागावले असते तर तू शिकली असतीस का .अजुन लहान आहे अंकिता शिक्षण घेताना स्वयंपाक शिकणे जमले नसेल तीला, पण तुझ्यासारखी नवीन शिकायची आवड आहे हो नाहीतर आजकालच्या मुली पगाराचा टेंभा मिरवतात .स्वयंपाकघरात येत सुधा नाहीत. वंदना तू खप चांगली गुरू होशील तिची आणि एक सांगू गुरुपण मिळते परिश्रमाने पण टिकते अजरामर. टीकाकार होण्यापेक्षा गुरू हो तिची मनात अजुन गोडी आहे तोपर्यंत नाते निर्माण कर .एकदा का तिढा पडला किगुंता होतच जातो. तू समंजस आहेस मत्सर द्वेष करणे खूप सोपे असते. एखाद्याला समजून घेणे कठीण.तिच्यात नोकरी करण्याची धमक असली तरी घर

सांभाळणे जी कमीपणाची गोष्ट समजू नये. तुम्ही दोघी मला सारख्याच ज्या त्या  भुमिकेत चपखल.आणि माझा विश्वास तू सार्थ ठरावशिल ही माझी खात्री आहे.

सासूचे तर बोलणे ऐकून  वंदना ल स्वतःच्या द्वेष भावनेचे वाईट वाटू लागले.तिने स्वतःमध्ये बदल करून सुलभाताई चां विश्वास सार्थ करून दाखवला अंकिता ची गुरू होवून लाडकी ताई बनली अंकिताचे पानही वंदना वाचून हलेना.सुलभा ताईंनी अखेर मत्सर रुपी मंथरेला चौकटी बाहेरचं काढले होते.