मातृत्वाची चाहूल (लघुकथा - एक)

एक हृदयस्पर्शी लघुकथा
प्रभा एक अल्लड स्वभावाची आयुष्याचा मनमुराद आनंद घेणारी उच्च शिक्षित मुलगी होती. ती जशी होती तशीच शिकवण ती लोकांना देत असे.
पण का कुणास ठाऊक अल्लड स्वभावाची आयुष्याचा मनमुराद आनंद लुटणारी मुलगी प्रभा आज मात्र खूपच उदास होती. कुठली तरी गोष्ट तिच्या मनाला सारखी टोचत होती. आणि ते कारण मातृत्वाची ओढ. हो तिला मातृत्वाची ओढ लागली होती.
प्रशांत आणि प्रभाच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली होती. पण त्यांना मूल होत नव्हतं त्यांनी आपल्या बाळासाठी खूप प्रयत्न केला होता पण तरीही तिला आईच सुख मिळत नव्हत. आणि हीच गोष्ट तिच्या मनाला सारखी टोचत होती. ती एक सारखा याच गोष्टीचा विचार करत होती आणि आपल्या आयुष्याचा आनंद घ्यायलाच विसरली होती.
एक दिवस दुपारच्या वेळी प्रभा अशीच खिडकीत वीचारमग्न बसलेली असताना तिच्याकडे तिची धाकटी बहीण संगीता आली तिला दोन जुळी मूल होती.
खर तर प्रभा आणि संगीता दोघी नुसत्या बहिणी नव्हत्या तर बहिणींच्या नात्यात मैत्रिणी होत्या. आपल्या ताईला मूल होत नाही. आणि याचा तिने धसका घेतला आहे हे बघून संगीताला वाईट वाटल आणि तीने एक निर्णय घेतला. \"आपल्या दोन बाळांपैकी एक बाळ तीला देण्याचा\"
खर तर हा निर्णय घेण सोप्प नव्हत. आपल्या काळजाचा तुकडा कुणाला तरी देणं अवघड होतं. पण तेच अवघड काम करायला संगीता आली होती.
तीने आपल्या ओल्या डोळ्यांनी क्षणभर आपल्या बाळाकडे पाहिलं त्याला जवळ घेतल आणि हळूच तिच्या समोर ठेवलं.
ते बघून प्रभाला काही सुचेचना तिने लगेच त्याला हृदयाशी कवटाळून घेतल.
काही क्षणा नंतर...
ओल्या नजरेनेच दोघी ऐकमेकींकडे पाहू लागल्या.