Mar 01, 2024
वैचारिक

मेट्रन मॅम.....!!

Read Later
मेट्रन मॅम.....!!
अशी ही एक खारू ताई !

नर्सेस ट्रेनिग कॉलेज मध्ये प्रिया मॅम म्हणून एक मेट्रन होत्या.खूप शिस्तबद्ध,पण दिसायला अगदी साध्या,अन् सोज्वळ.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही कॉलेज ची पिकनिक निघाली होती.नेहमी प्रमाणेच सगळी तयारी झाली होती.मोठी टुरिस्ट बस आणि येणे जाने,खाणे पिणे सगळी सोय होतीच.
पन्नास साठ मुली अन् एक दोन स्टाफ असे निघाले होते पिकनिक ला.
त्या दिवशी मेट्रन मॅम जरा वेगळ्याच उस्ताही मुड मध्ये होत्या.त्यामुळे मुलींची भीती ही कमी झाली होती.मस्त प्रसन्न वातावरण बस चा प्रवास सुरू झाला.बस मधला प्रवास कंटाळवाना जाऊ नये म्हणून एक एन्जॉय रुल बनवला होता.तो म्हणजे बस मध्ये तुम्ही जो काही खाऊ आणलेला असेल तो इतका आणायचा की प्रत्येकाला एक एक तरी मिळाला पाहिजे.मग तो पदार्थ छोटा असो की एखादे बिस्कीट.गाणी गोष्टी, हसि मजा क,कॉमेडी,मिमिक्री,आणीसोबतीला खाऊ. मेट्रन मॅम ही समरसून भाग घेत होत्या.

आयुष्या मध्ये एक असा दिवस असतो की,सदैव त्या व्यक्तीच्या सोबत राहून ही एखादी गोष्ट समजून येत नाही,दिसून येत नाही,पण आचानक ची त्या व्यक्तीचा खरा जीवन पैलू समोर येतो आणि दैदिप्यमांन करून जातो. मेट्रन मॅमचे परमात्म्याशी एकदम स्नेहाचे अन् विपुल श्रध्देचे नाते होते.परमात्म्याला खुश करायचे असेल तर सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे समाजाशी आपुलकीची ,जाणिवेची,मदतीची इच्छा असणे. अशी त्यांची विचासरणी होती.

आता बस ठरलेल्या विसाव्याच्या ठिकाणी थांबत होती.बस थांबल्या नंतर प्रत्येक ठिकाणी मेट्रन मॅम ,बस चे दिशेने येणाऱ्या खाऊ विक्त्रेत्या कडून काही ना काही घेत होत्या.बस थोडीशी हळू झाली की, वि क्रेते लोक वस्तू किंवा खाऊ घेऊन बस जवळ यायचे,अन् मे ट्रन मॅम त्यांच्या कडून काही ना काही घ्यायची च.मग ते शेंगदाणे,फुटाणे असो,लेमलेटच्या वा इतर गोड गोळ्या असो,कधी पेरू ,आंजिर, बोरे, वा भुईमुगाच्या शेंगा.किंवा बॉल पेन कीचैन,अशा छोट्या छोट्या वस्तू.
जसा जसा दिवस सरत होता तसे मुलींना हे लक्षात आले होते की, मेट्रन मॅम प्रत्येकच छोट्या विक्रेत्या कडून काहीतरी घेतच आहेत.आता कुतूहल ही वाढायला लागले होते ,काय असेल बरं या मागचे कारण.??

शेवटी दिवस संपत आला आणि बस परतीच्या मार्गावर होती. न राहून सर्व मुलींनी मेट्रन मॅम ना विचारायचे ठरवले,मॅम तुम्ही छोट्या छोट्या विक्रेत्या कडून काही ना काही का घेत होता?

आपली बस मोठ्या मेन मार्केट ला पण थांबली होती ,आम्ही आठवण म्हणून काय काय खरेदी केले.तुम्ही मात्र काहीच घेतले नाही ,असे का बरे?? मेट्रन मॅम नी स्मित हास्य केले,जणू काय त्यांचे गुपित च पकडले गेले असल्याची कबुली होते ते स्मित हास्य..!आणि मग म्हणाल्या,"मी छोट्या छोट्या विक्रेत्या कडून मुद्दामच काहीतरी घेत होते. त्यांच्या चेहऱ्यवरचा आनंद बघण्यासाठी..!!ते जे धावत आपल्या बस जवळ यायचे त्यांची आशा पूर्णत्वास नेण्यासाठी...!!त्यांचा आजचा दिवस तरी जास्त खाऊ विकला गेला म्हणून घरी जाऊन त्यांनी हीआपल्यासारखा दिवस आनंदात साजरा करावा यासाठी..!!"

आपण मॉल मध्ये,फॅशन स्ट्रीट ,बिग बाजार मध्ये जातो तेथें ब्रँडेड वस्तू असतात,एका साठी दहा ऑप्शन असतात,नाही घेतले तरी,एक कस्टमर गेले म्हणून काही फरक पडत नाही.कंपनीचे सेल्स मन वेळेवर सॅलरी घेतात.त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसण्याची गरज नसते त्यांना.या उलट एखादा छोटा विक्रेता जेव्हा बस कडे आशेने पळत येतो,ओरडुन ओरडुन बोलतो,तेव्हा त्याची कुटुंबे त्याची वाट बघत असतात.त्यांच्याही आनंदाचे कारण ,कदाचित आपण होऊ शकतो...!!

आपण रोज काही पिकनिक ला जाऊ शकत नाही.अन् रोज मौज मजा ही करू शकत नाही.आज मी पिकनिक साठी,शॉपिंग साठी ,मौज मजा साठी जो खर्च करणार होते ते मी अशा पद्धतीने एन्जॉय केला अन् समजा साठी आपण काहीतरी करु शकलो याचा अनुभव घेतला..!!

पिकनिक ची बस कॉलेजच्या आवारात परत आली होती.सर्व मुली आनंदात ,उत्साहात खाली उतरत होत्या,आता फायनल परीक्षे साठी फ्रेश वातावरण निर्माण झाले होते...तसेच पुढच्य वर्षीच्या पिकनिक ची वाट ही बघायची होती .... मेट्रन मॅम सारखी सामाजिक बांधिलकीची,दयेची,अनुभूती घेण्यासाठी....!!!.
©®Sush.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sush

Writer.Blogger.

Something Different

//