नात्यांची वीण भाग -३(वैशाली देवरे)

निस्वार्थ पण जपणाऱ्या परिवाराची कहाणी


सणावाराला व दसरा दिवाळीच्या सणाला शमा बाबाच घर जसं गोकुळ वाटे...आई -बाबा,पोटी संतती नसली तरी मोठी भावजय,मोठ्या भावाची अमानत दोन सोन्यासारखी पोर,दोन सुसंस्कारी सूना व चार नातवंड.कोणी म्हणणार नाही कि ह्या माणसाला कोणीच नाही...जमुनाकाकी तर साऱ्यापरिवाराची सरबराई करता करता थकत नसे.सरितावहिनीपेक्षा मुलं काकीआईचा शब्द सहजच झेलत.शमाकाकाचा आधार व मायेची सावली म्हणजे सरिता वहिनीच्या संसारासाठी एक दैवी देणगीच म्हणायची.कोण?घेत व पुतण्यांची जबाबदारी, ठरवलं असतं तर एखाद पोरग दत्तक घेत किंवा नवा घरोबा करत आपला परिवार व संसारात रमले असते पण एकट्या पडलेल्या ह्या लेकरांची मायेची दोर बनलेत ते

खरंतर भावबंदकी म्हटलं ना? वादविवाद आलाच, भाऊ गेला तर समाजात त्यांच्या मुलांना व वहिनीला ञास देत.नको त्या मार्गाने पैसा व संपत्ती बळकावण्यासाठी बर्याच ठिकाणी राजकारण होतं.पण येथे तस काहीच नव्हतं.उलट आपलं आयुष्य हे सर्वस्वी परिवारावर उधळणारे जमुना काकी व शमाकाका एक आदर्श होते कुटुंबासाठी...

दोन्ही सुनाच बाळांतपण असो कि नातवंडांच आजारपण जमुना काकीला कळताच ती शहर गाठत असे.

"अहो,एकटी पोरगी भांबावेल हो, आपलं माणुस जवळ असलं तर धीर येतो.सरितावहिणी तुम्ही गावावर सांभाळता ना सारं ,मग मी जाते तिकडे आवरायला तिकडची परिस्थिती सावरली कि लगलेच त्या पावलांनी परत येईल बघा.."असंच म्हणतं असे ती.

सरिता वहिनी तर नवलच करत. जमुनाच,

"जमुना अगं किती करशील माय आमच्यासाठी,कधी आईच कर्तव्य केलं नाही गं मी,तुझे भावजी गेलेत दोन वर्ष माझं मन सांभाळणं व त्या कठिण प्रसंगही मला बहिणी वाणी जपलं गं..,तुझे उपकार कसे गं फेडू मी".

तेव्हा काकी म्हणतं असे,"वहिनी आपणचं एकमेकांचे सोबती बघा ,माहेर व माहेरची माणसं फक्त मायेची व दोन क्षणांची,आपला परिवार व आपलं घर जपणं हे आपलं काम व कर्तव्य तेच करते मी.दोघ मुलं आमचा मानसन्मान जपतात , समाजात नाव कमावलं त्यांनी, कौतुक करता थकत नाहित,काकीआई व काका म्हणजे त्यांचे विश्व आहे, हेच तर हवं आम्हाला,अहो पोटची पोर करत नाहीत इतकं करतात ते त्यांच्यासाठी जीव तुटतो हो... आपलं घर व आपला परिवार असाचं बहरावा,फुलावा हिच अपेक्षा हो वहिनी,आपले आई बाबा किती कष्ट केली पण दुःखाचे चटकेही कमी बसले नाहीत त्यांना,वहिनी,कर्ता मुलगा,एक नातवंड गमावल्यावर मेल्याहून मेल्याच आयुष्य जगलेत,पण  आपल्याला देवाने ते दुःख पुन्हा नाही दिलं हिच आपल्या कार्याची परतफेड म्हणायची . आपणं नाती जपली ना?,तर नात्यांमध्ये गोडवा वाढतो हो, जिभेवर साखर व आपलेपणाचा ओलावा असला तर कोणतेही नातं घट्ट होत.मीही तेच केलं व करते ,आता जगणं सोबत व मरणही ह्या परिवारासोबत ".

किती भक्कम होती शमा काकाच्या परिवाराची विण , फक्त आपलेपणाचा वास होता, तुझं माझं नव्हतंच, "आपलं "असल्याने एक एक व्यक्ती त्या नात्यात व ऋणात समावलेला होता.ह्यापेक्षा वेगळी श्रीमंत ती काय?हवी होती परिवाराला.शमाकाकाने ठरवलं असतं तर किती सोपं व आनंदी जीवन जगता आलं असतं त्याला पण येथे भावाप्रती प्रेम व आपल्यावर झालेल्या संस्कारांची ठेव व उपकारांचे जतण केलं होतं त्यांनी निस्वार्थपणे...ना मोह,ना कोणताही मोठेपणाचा आव ,ना कोणावर जोरजबरदस्ती , आपल्या नशिबाला न कोसता, आपलं आयुष्य एकांकी न घालवता , माणसांच्या गर्दीत स्वतःला झोकून देण कठिण पण ते त्यांनी शक्य करून दाखवलं होतं.असे  ऋणानुबंध आजकाल शोधून सापडणार नाहीत ते शमा काकांनी जपले होते...

क्रमशः..


🎭 Series Post

View all