नात्यांची वीण भाग अंतिम (वैशाली देवरे)

निस्वार्थ पण जपलेल्या परिवाराची कहाणी


म्हणतात, गुणवान व्यक्ती कितीही वय झालं तरी हवीहवीशी वाटते,पण शमा काकांच जरा वेगळ‌ होत.जमुनाकाकी सोडली तर मागे काही नव्हतं त्यांना, न मुलबाळ न बॅंक बाॅलेंस , उत्पन्नाचा रूपयां रूपया ते दोघा पुतण्याच्या नावावर जमा करत,खर्चाचा हिशोबही चोख होता.दोन नाती म्हणजे त्यांचा जीव कि प्राण त्यांच्या भविष्याची तरतूद म्हणून दोघं पुतण्यांनी बळजबरीने त्यांच्या खात्यावर टाकलेली रक्कम मृत्यु पुर्वी वळती करून टाकली होती . बायकोसाठी काही ठेवलं नव्हतं इतका निस्वार्थी कुणी असतो का? बरं,पण काका हे आगळेवेगळेच..

एकदा शेजारचा नंदू काकांना म्हणाला होता,"काका जमुनाकाकीचा विचार कर बाबा जरा, तुझं पोटच लेकरू नाही.शेवटी हे पुतणे त्यांची आई सांभाळतील कि काकुला तीची तरतुद केली तर ती सुखाने दोन घास खाईल तरी".

तेव्हा काका म्हणाले होते,"नंदू माझी नात्यांची वीण खुप मजबुत आहे रे...तुझी काकी राणी म्हणून जगेन बघं,मी रुपया सोडून जाणार नाही तु बघं कशी ठेवतील तीला..राणीवाणी,तेवढे संस्कार पेरलेत रे मी चार पिढ्या हि नात्यांची घडी विस्कटायची नाही बघं..".

त्यांना किती विश्वास होता.व तो खराही होता.आज सदा व मनोहर मध्ये, आई व काकी आईला एकमेकांसोबत ठेवायची चढाओढ लागली होती..

मनोहर व सदा दोघेही त्यांच्या बालपणात रमले होते, दोघांच्याही मुलांना व बायकांना आता दोघा आईंना येथे एकटं ठेवणं योग्य वाटतं नव्हतं.शेवटी चर्चा संपत नसल्याने आत्या म्हणाली,"मना तु मोठा आहेस,तु आईला ने व सदा काकी आईला.आलटुन पालटून सांभाळा दोघींना पण सण मळ्यातच करत जा रे एकञ,दादांची नाळ बांधून ठेवा बसं".

आत्याचा शब्द ऐकताच सरिता वहिनी म्हणाली,"वन्स नायं जात आम्ही दोघी ह्या दोघांकडे दोघी बहिणी सुखात राहु येथेच ,भावजींचा सहवास लाभलाय ह्या घराला,दोघांनी आलटून पालटून यावं येथे राहायला.. आमचं घरं असं परक नाही ओ करत काय? जमुना,मी बरोबर बोलते ना?आपण खमक्या हावं आजबी...पोरांनो आपण वाटण्यापेक्षा भावजींच्या मार्गांनी जाऊ रे".

जमुनाकाकींनेही मान हलवली.तीच्या चेहेर्यावर एक अनामिक भाव उमटला,आजही सरिता वहिनी तीच्या बाजूने उभी होती.तीची भिती खोटी ठरली.पोरांनी आजही काकी आईलाच कवटाळलं होतं.दोघींची जोडगोळी अजूनही दोघ मुलांना व परिवाराला जोडून ठेवणार होती.आता सदा व मनोहर जायला निघणार होते.पण त्यांच्यानंतरची पिढी एक अतुट संस्कार व" नात्यांची वीण "कशी अतुलनीय असते याने संस्कारक्षम बनत होती.

बघता बघता शमा काकाला वर्ष झालं पण आजही काकांचे संस्कार व तसेच वातावरण परिवारात होते.शमाकाकांची जागा आता मनोहरने घेतली होती.परिवारामध्ये आपलेपणा, विश्वास,एकमेकांप्रती प्रेम होतंच पण एकनिष्टता व आपण सर्व एक आहोत हि महत्वाची भावना पुढील सात पिढ्या टिकलं अशा पध्दतीने रूजली होती.कारण परिवारात असलेला कुटुंबप्रमुख भक्कम होता.त्याने जपलेला विश्वास, खाल्लेल्या खस्ता,केलेला त्याग हा वाखाणण्याजोगा होताच ..पण त्याची जाण ठेवलेला परिवाराचा हर एक सदस्यही तीतकाच महान होता म्हणून नात्यांमध्ये ओलावा कायम होता.दोन परिवार पण जणू एका धाग्यात रंगलेले होते..हि "नात्यांची वीण"सलामत होती.आपलेपणाच्या ओलाव्यात, निस्वार्थ प्रेमात व एकनिष्ठतेच्या वचनात... बरोबर ना?..


(नाहि तर आजकाल वादविवाद, आपलेच आपल्यांच्या दुःखाचे कारण बनत, एकञ कुटुंबाला फाटा देत फक्त स्वार्थ शोधतो, दुःख सोडा पण सुखात ही भागिदार न‌ होता दुसऱ्यांच्या सुखात झुरत बसतो.. त्यामुळे कशी बरं विणली जाईल नात्यांची विण,"हम दो हमारे दो.."असंच सगळीकडे हवं असतं,पुर्वी दुरचीही नाती आपलीशी वाटत होती आज जवळचीच नाती नकोशी झालीत ,नात्यात क्लेश व दुरावा वाढला,त्याने नातेसंबंध किलिष्ट झालेत...आता आपणचं बदलायला हवं नात्यांची विण घट्ट करायला हवी, एकमेकांना आधार द्यायला हवा, स्वार्थ बाजूला सारून आनंदाने एकञ यायला हवं..तरच नात्यांची मज्जा अनुभलेल नवी पिढी..सख्खे , चुलत करत बसण्यापेक्षा,"आपण एक आहोत"हे बिज पेरलं तर बहरेल नात्यांची सुरेल एक बाग... घट्ट होतील नाती , संस्कारांची शिदोरी मिळेल,नाती बळकट होतील, तणाव निवळेल, आपलेपणा वाढेल, समाजात प्रेमाला उधाण येईल...
चला तर आपणही विणुयात"नात्यांची विण"शमाकाकांसारखी निस्वार्थीपणे)


धन्यवाद

©®वैशाली देवरे..

🎭 Series Post

View all