नात्यांची वीण भाग-२(वैशाली देवरे)

निस्वार्थ पण जपलेल्या परिवाराची कहाणी


मनोहरचे बाबा गेले आणि काही दिवसांतच मनोहरची आई सरिताने खुप विचार करून डोक्यावर परिणाम करून घेतला.एकतर विधवा बाई त्यात दोन लेकरांची आई,माहेर म्हणाल तर फक्त नावाला हो...!, सरिता वहिनीचे आईवडिल लवकरच सोडून गेलेले,दोन भाऊ ,पण आता बहिणीची जबाबदारी पडेल कि काय?,भावजी गेले तसे दोघांनी बहिणीशी संबध संपवलेच...

एकदा शमाकाका त्यांना म्हणाले,"दादाराव वहिनीला दोन दिवसांच माहेरपण दिलं तर तीच मन पलटेल हो,तीला आधार वाटेल मी काय?हो ,करतो सारं, पण शेवटी दिर पडतो ना?,भावांजवळ मन मोकळं झालं तर तब्बेतीत सुधारणा होईल बघा..".

तर तीचे भाऊ म्हणाले,"अहो आता आम्ही आमचे संसार बघायचे कि ह्या वेडीला ".

तेव्हा शमाकाका चिडलेच होते..,"अहो जितीजागती बाई ती ,भावजयी आहे माझी , तुमच्या जीवावर नाही पोसणार मी ,मला वाटलं म्हणून बोललो ,पण वेडिबीडी बोलायचं नाही हं...!, येथून पुढे मीच तीचा भाऊ..".

त्यादिवसापासून शमाकाकांनी सरितावहिणीला काही कमी पडू दिलं नाही अगदी लहान बाळासारखं सांभाळलं,पण त्यात जमुनाकाकींची साथ लाख मोलाची बरं,खरतर बाईचा अहंकार जास्त खच्चीकरण करतो पण जमुना काकी शमाकाकाची प्रेरणा होती.नव-याला साथ देताना कधीच मागेपुढे पाहिलं नाही तीने, फक्त एक उपकार होता सरिता वहिणीचा तिच्यावर .. बिच्चारीने अख्ख आयुष्य निशावर केलं बरं...जमुना काकी लग्न करून आली लाडकी लेक लाडकाकोडात वाढलेली पण सासरी काय?काम जमेना बिच्चारीला सरिता वहिनीने जपलं तीला बघता बघता लवकरच दिवस गेलेत.व एका मुलाच आईपण जमुनाकाकींच्या पदरी आलं..अधीच धांदरट त्यात लेकरू पदरी ,एकञ रहात होते पोरगं वाढत होतं मोठं होतं होतं..त्यातच तालुक्यात शमाकाकाला बड्या पगाराची नोकरी लागली.भल्लामोठा वाडा व सरकारी नोकरचाकर दमतीला मग काय?चार वर्षांच्या अशोकला घेऊन त्यांनी तालुक्याला बिर्हाड टाकलं..सोबत सदा व मनोहरलाही घेतलं शिक्षणासाठी.सुखात संसार चालू झाला पण तोच काळाने घात केला.एके दिवशी अशोक सापडेनासा झाला शोध घेतला तर  शेजारच्या बारवंमध्ये तरंगत होता..जमुनाकाकींने धसकाच घेतला..कारण पहिलं बाळांतपण तसं अवघड होतं व त्यानंतर कधीच आईपण पदरी पडणार नाही असं डाक्टरांनी सांगितलेल होतं...

हा धसका पचवण सोपं नव्हतं पण सरिता वहिनीने हिमत दिली,"जमुना मनोहर व सदावर पहिला तुझा हक्क... आजपासून ते तुला काकी आई म्हणतील तु हक्काने त्यांचं करतेस ना?आता तेच तुझे मुलं...तुझ्याच हाताखाली ठेव व तुच जप "म्हणतं दोघांनाही जमुनाच्या हवाली केले.आजवर कधीच पहिला हक्क गाजवला नाही..हेच उपकार खुप होते..दिवस जात होते, जमुना विसरत होती,सदा व मनोहर काकीआईला जीवापाड जपत होती तोच परिवारात काळाने घात केला व कर्ता पुरुष हिरावला... आजवर मज्जेत आयुष्य घातलेला शमाकाका बिथरला व तडक नोकरी सोडून गावी निघून आला.तो आजतागायत त्याने भावाच्या व घराच्या कर्तव्यात वाहून दिलं.वयाच्या सतराव्या वर्षी जगाचा निरोप घेऊन मोकळा झाला..पण "नात्यांची विण"एकदम घट्ट विणून गेला .,

सदा , मनोहर, सरिता वहिनीला कधी दुरावा न देत.अंथरूणावर खिळलेल्या आईवडिलांची सेवा करत, घर संसार सांभाळण सोपं नव्हतं.दुष्काळ ,संकटे असोत कि आडचणी.कमावणारा एक व खाणारी तोंडे सात खुपचं अवघड परिस्थिती पण घरोघरी शिकवणी घेत व लोकांकडे पडेल ते काम करत घर संसार सांभाळला काकांनी,शिकलेला पण त्या शिक्षणाचा कधीच अहंकार बाळगला नाही.गावच्या वेशीवर गरीबांना मोफत शिकवणी देणारा हा शमाकाका गावच्या तरूणाईचा गळ्यातला ताईत होता.गावच कोणतही पोरगं पास झालं ना?तर सर्वात जास्त आनंद याला होई...असा माणसाळलेला होता शमाकाका.. शमा काका गेला तर त्यादिवशी सा-या गावात कुणी चुल पेटवली नाही बरं..

माणुसकी , नातं, आपलेपणा व परिवाराच भल्ल जपणारी माणसं खुप मोजकी त्यातलं एक पानं म्हणजे शमाकाका..
सणासुदीला,पुतणसुणा व नातवंडे येणार त्याआधीच यांच्या घरात वर्दळ सुरू होई, किराणा भरणं, पोरांना खाऊचे डब्बे,झाडांना झोके बांधून घेणं..सायकलींना आईल मारणं, विटीदांडू बनवून ठेवणं... सारंच तयारीनिशी राही, एकुलती एक बहिणी तीला तर जीवापाड जपत काका.. शेलभर दुर तीचं गाव पण रोज तीचा चेहरा पहाण्यासाठी जात ते. तिच्या घरी दोन घोट चहा निमीत्त पण बहिणीची खुशाली जाणून घेण...एक स्टिलची किटली व त्यात लिटर दोनलिटर दुध भरून ते आत्याच्या दारात रोज दहाच्या ठोक्याला हजर म्हणजे हजर हं...!

अशी हि नात्यांमध्ये मुरलेली मुर्ती आज सा-यांना परक करून गेली होती..

क्रमशः

बाकी कथा पुढील भागात...

🎭 Series Post

View all