Feb 22, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

नात्यांची वीण भाग-१(वैशाली देवरे)

Read Later
नात्यांची वीण भाग-१(वैशाली देवरे)


शाम बाबांच्या तेराव्याचा कार्यक्रम संपला.सगळे नातलग आता परतीला निघणार होते.तेरा दिवसांचा सगळ्यांचा एकञ सहवास कुणाचेच पाय घराबाहेर निघत नव्हते.जमुनाआजी शाम बाबांच्या पलंगाजवळ जाऊन एकटक बघत होती.कारण तेरा दिवस भरलेल्या घरात थोडं दु:ख विसरत होती आजी आज सगळं घर खाली होणार मग बाबांची कमी जाणवणार होती.आजीला स्तब्ध बघत

मनोहर म्हणाला,"काकीआई काय?गं,अशी उदास उभी,चल तिकडे सगळे बसलेत तेथे जाऊयात,मला माहितेय तुझ्या मनात काय? चाललं ते.."

मनोहर बोलत होता तोच सदा ,"काकीआई...काकी आई.."
आवाज देत पोहचला..

मनोहर म्हणाला,"काय?रे सदा , काय? झालं..".

"अरे काही नाही,काकी आई घरात दिसली नाही म्हणून घाबरलो रे,ते जरा काकीआईशी बोलायचं होतं रे...सगळे जमलेत पडवीत तर तिकडेच बोलू चलं".

"काय?रे काय? बोलायचं तुला".

"तु चल ना? तिकडे, सांगतो ना?".

म्हणतं दोघेही जमूनाआजीला घेऊन पडवीत गेली.आत्या , मनोहर व सदाची आई सरिता , मनोहर व सदाची कारभाररिणी ...सगळ्यांची मुलं सारेच पडवीत बसली होती.सगळ्यांच्या मुखी फक्त शमाकाकांचंच कौतुक, आत्याच्या तर डोळ्यातले अश्रू थांबतच नव्हते..

मनोहर म्हणाला,"अगं आत्या आता तुच रडत बसशील तर काकीआईकडे कोणी बरं बघायचं...तीला सावरायचं सोडून काय?तुच रडत बसतेस गं..".

हे ऐकताच आत्या जोरात रडू लागली,"मना ,अरे शमादादाने किती प्रेमाने जपलं रे आपल्याला,खरी नात्यांची किंमत तर त्याला होती रे, आपण जपू का?रे तसे नातेसंबंध,दादाच एकच होतं,घरात  कितीही वैरभाव असले ना?तरी चारचौघात परिवाराला सांभाळून घेणं, परिवाराला साथ देणं ,परिवाराच वजन जपत होता तो..सारा गावं घाबरायचा रे त्याला,त्याच एकच स्वप्न होतं बघ मना, "परिवारात एकी हवी".

"हो गं आत्या..आठवत ना मला,बाबा गेले तेव्हा मी दहा वर्षांचा असेन,शमाकाकांची छान नोकरी होती, गावाकडे आजी-आजोबांना आईबाबा सांभाळत होती.बाबा गेले समजताच शमाकाका आले तसे ते इथलेच झाले बघं आपली हक्काची पाच आकडी पगाराची नोकरी सोडली काकांनी..त्यादिवसांपासून आजवर सा-या परिवाराचा भार त्यांनी वाहिला.. किती गं आठवणी ठेवून गेला काका,कसे गं ऋण फेडू ह्या देवमाणसाचे...".

मनोहरलाही भरून आलं.. जमुना आजीने मनोहरला कवटाळलं.तीच दुःख तसं मोठं होतंच.पोटच मुलबाळ नाही.जबाबदारीच्या जाच्यात दोघांनीही इतकं वाहुन घेतलं कि पोटच सहा वर्षाच बाळ गेलं तसं सदा , मनोहर व मोठ्या भावाचा परिवारलाच त्यांनी आपल म्हणून जपलं होत.जमुनाकाकींनी कधीच मुलांना परकं केलं नव्हतं, त्यांचं सुख दुःख असो कि सरिताची जबाबदारी त्यांनी कधीच झिडकारली नाही.

क्रमशः

बाकी कथा पुढील भागात ...
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Vaishali Deore

Housewife

मी कोणी महान लेखिका नाही...शब्दांना थोडासा साज देण्याचा प्रयत्न बस

//