मतलबी नातीगोती भाग-३

नात्यांमध्ये फक्त फायदा शोधणारी नातीगोती


साई मोठा होत होता.सरिता मुलात पुर्णपणे जरी गुंतली तरी नात्यांना वेळ देणं, आपलेपणाचा ओलावा जपत ती साईवरही तसे संस्कार करत होती साईही तसाच बनतं होता...

एकटं जगणं म्हणजे जगणं नसतं,पैसा म्हणजे सारं नाही तर जगण्यासाठी नातीगोती असावीत असंच समिरच मत होतं...पैसा मिळवता येतो .पण नातीगोती पुर्वजन्माचे पुन्य म्हणून लाभतात ती जपायची, त्यांच्यात जीव ओतायचा.आपलेपणा ,आनंद हेच तर जिवन माणसात रहायचं, कोणाच्या कट कारस्थानाकडे समिरने कधीच लक्ष दिलं नाही.. फक्त नातीगोती सांभाळत समिरच आयुष्य चालल होत...

पण म्हणतात ना?नियती काय?दाखवेल सांगू शकत नाही..समिरचही तसंच झालं..व्यवसायावर परिणाम झाला तसा तोही कोलमंडला व भल्या मोठ्या आजाराचा शिकार झाला..आपण सर्वांसाठी सारं केलंय मला कोणतीही अडचण येणार नाही.नातीगोती ह्याच वेळी कामांत येतात ना?सरिताला आता ह्या नात्यांची गरज भासू लागली...
मानसिक आधार , प्रेम,माया,ममता ह्यातून माणुस संकटाला पटकन हरवू शकतो...संकटातल्या माणसाला संकटात नातीगोतीच तर आठवतात.. यांचंही तसंच झालं... दवाखाना, पैशांची चणचण आधार सारं काही हवं असतांना सर्व नात्यांनी आता पळ काढला होता..अर्धा राञी धावत जाणारा समिर एकटा पडला होता.मिञांशिवाय कोणीही नातलग मदतीला नव्हती...

वेळ पडली त्यामुळे सरिता सगळ्यां चे पाय धरत होती पण सगळेच बिझी होते...दादा ही आता त्याचा परिवार व नोकरीत होता.वहिणीला तर जे होतं ते बरंच असंच वाटतं होतं... एखाद्या पाहुण्यासारखी नाती झाली होती.पण समिर व सरिता हरले नाहीत.साई तर ह्या संकटात अधिकच भक्कम झाला.वेळ कठीण होती पण नातीगोती पेक्षा...मायेचे ऋणानुबंध समिरच्या काही आलेत ...समिर चांगला झाला.सर्वकाही पुर्व पदावर येऊ लागल होतं...पण मन माञ कुलूषित झालं‌ होतं..

समिरला आता यांच्या वागण्याचा पश्चात्ताप होत होता.कारण त्याने कामात असूनही फक्त प्रेमापोटी त्याचा किमती वेळ नाती जपण्यासाठी दवडला होता.त्यात कोणतीही स्वार्थ नव्हता कि कोणतीही मोठेपणाची भावना नव्हती.फक्त "नातीगोती असलेला माणुस पैशांच्या श्रींमतीपेक्षा श्रीमंत असतो "हि भोळी समजूत होती...
आज समिरची हि समजूत खोटी ठरली होती.

नातीगोती फक्त गरज असलेली व पैशाला जवळ करणारी एक विकृत जमात आहे हे समिरच्या व सरिताच्या लक्ष्यात आलं होतं पण तोवर खुपचं उशिर झालेला होता.गरज संपली तर रक्ताच्या नात्यांनी ही समिरला दुर सारलं होतं...आता त्यांच्यामागे उरला होता फक्त त्याचा परिवार साई ,सरिता व मैञीत कमावलेली नाती...ती नात्यापेक्षा ही जड झाली होती..‌मायेच्या त्या नात्यागोत्यात एक मतलबी,तिरस्कृत, गरजवंत विकृती जाणवू लागली होती..
समिरला आता नात्यांची त्यांच्या वागणूकीची भिती वाटू लागली होती...

खचलेल्या समिरला माणसांत वावरायची सवय असल्याने पोरकं झाल्यासारखे वाटत होते..पण समिरच्या मिञांनी त्याला सावरत..

"समिर नातीगोती ही मतलबी व गरजवंत असतात,वेळेला मान देत आपली वेळ आली तर पळ काढतात... त्यामुळे ह्या नात्यांच्या चक्रातून बाहेर पड आणि नविन अस्तित्व निर्माण कर.‌"

अशी सूचनाच केली..समिर आता मनातून कठोर झाला होता.सरिताही पुर्णतः बदलली होती कारण मतलबी नातीगोती सांभाळण्यापेक्षा एकटेपणाची संगत आता त्या परिवाराला जवळची वाटू लागली होती...

(खरंतर नातीगोती असावीत ,पण आजकाल शंभरात पाच टक्के नाती स्वच्छ, आपलेपणा जपणारी आहेत,मायेचा ,ममतेचा,आधाराचा ओलावा नात्यात आटत चालला आहे.चढाओढ,मीपणा, वर्चस्व सिद्ध करण्यात नातीगोती आता व्यस्त आहे..".मी "ला जपत "आपले"पणाचा रक्ताची नातीच अंत करतांना दिसत आहेत."हम और हमारे दो बस ..." चौकोनी किंवा ञिकोणी कुटूंब हवी बाकी नात्यांची गर्दी होते...केल्या उपकारांची जाणिव लगेचच राञीच्या अंधारात नष्ट होत आहे.आज एक तर उद्या दुसऱ्याचा हात धरत फक्त फायदा शोधत, मोठेपणा मिरवणारी नाती आता पावला पावलागणिक दिसतं आहेत...पुर्वीचा तो मायेचा संपलेला ओलावा ती मायेची ओढ,नात्यांची मज्जा,एकञित कुटुंब,एकमेकांप्रती प्रेम आटत... "नातीगोती "ह्या संकल्पनेचा अंत दिसू लागला आहे....

हे माझं मत हं...!, तुम्हाला काय?वाटतं जरूर कळवा)

धन्यवाद

©® वैशाली देवरे...

🎭 Series Post

View all