मास्क

MAsk Is Our Best Friend


२७ जानेवारी २०२०चा तो दिवस ज्याने आज आपले सर्वांचे आयुष्य अस्तावस्त केलं आणि साथीला जोडीदार दिला मास्क.....
परवाच एका कपड्याच्या दुकानाबाहेर एक पाटी वाचली ज्यावर लिहिलं होत .. “ येथे विविध प्रकारचे मास्क AVAILABLE आहेत.” आतापर्यंत आपल्याला अशा पाट्या दिसत होत्या की विना मास्क प्रवेश निषिद्ध... नो मास्क नो एन्ट्री... पण आता मास्कचाही जमाना बदलत चालला आहे. साधारण २-४ वर्षांपूर्वी मास्क केवळ आपल्याला डॉक्टर, नर्सेस यांच्या तोंडावर दिसायचा तोही ऑपरेशन करत असताना. पण सर्वांवर कोरोनाची कृपा झाली आणि मास्करूपी आधार सर्वांनाच मिळाला. सुरुवातीला कोरोनाच्या भीतीने सर्वचजण फक्त मेडिकलमधील USE AND THROW मास्कच वापरायचे. यामुळे रुग्णांना लागणाऱ्या मास्कचा तुटवडा पडू लागला. न भूतो न भविष्यती: अशा पद्धतीने मास्कचाही काळा बाजार झाला. हळूहळू हा मास्क आपला रोजचा साथीदार बनला.. मेडिकल मास्कसोबत इतर कापडी मास्क बनवण्याची सुरुवात झाली. बाजारात आता फक्त मास्कचे स्वतंत्र स्टॉल लावलेले दिसतात. तिथे ५ रुपये ते ५० रुपये इतक्या किमतीचे मास्क विकायला ठेवलेले असतात. मास्क घ्यायला गेल्यावर तो सेल्समन असा जणूकाही आव आणतो की याच्या मास्कनेच कोरोना लांब राहतो... ‘बाईसाहेब स्टँडर्ड का जमाना है, कुठ तो मास्क घेताय हा घ्या खुलून दिसेल तुमच्यावर ...” खरं सांगू एखाद्या साडीच्या दुकानात गेल्याचा भास होत होता....
आणि आता तर की हा मास्क ट्रेंडच बनला आहे. मुली जशा ड्रेससोबत मॅचिंग ज्वेलरी वापरतात तसं प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग मास्कची फॅशन सुरु झाली आहे. कितीतरी व्हाराईटीजमध्ये आता मास्क बाजारात सहज उपलब्ध होतात. आधी लोकं गाडी, कपडे, बूट यांवरून एकमेकांची मापं काढायची पण आता वापरत असलेला मास्कवरून त्या माणसांचे मूल्यमापन केले जाते. हा या मास्कचा सर्वात मोठा तोटा खरा मुलांना होतो..रोज उठा दाढी करा, दाढी ठेवायची असेल तर मास्क त्या मापाचा घ्या.. नाहीच बसला तर मग अडजस्ट करा. याहून जास्त दुःख

तर काय की कॉलेजमध्ये गेलं की मुलींची रंगरंगोटी केलेली थोबाडं बघता येत नाहीत....हा झाला मुलांचा मुद्दा. पण खरच आयुष्यात माणसाला मरणाच्या भीतीने कोणतीही छोटी गोष्ट आधार म्हणून मिळाली की त्याचही भांडवल होतं... असो हा कोरोना जोवर आपली पाठ सोडत नाही तोवर मास्कच आपला खरा मित्र...

🎭 Series Post

View all