मासिक पाळी पर्व दुसरे(भाग 9)

Social

मासिक पाळी (भाग 9) 

(माघील भागात आपण पाहिले अदिती ला छान जॉब लागला होता ) 

आता पुढे.......................

अदिती हुशार होती 
पण तिचा हट्टी स्वभाव हा सगळीकडे सारखाच होता, 

ती तिच्या कामाच्या प्रति खुप जबाबदार होती, 

एखादी गोस्ट जर जमली नाही तर मलाच का जमत नाही म्हणून ती गोस्ट जमेपर्यंत ती त्या गोष्टी चा पिच्छा सोडत नव्हती, 

तिच्या मेहनती च्या जोरावर तिने तिच्या कामाच्या ठिकाणी बाजी मारली होती, 

ती घर व ऑफिस दोनी सांभाळत होती, हे सांभाळताना जर प्राधान्य द्यायचा विषय आला तर ती नोकरी ला देत होती, 

जय चे या उलट होते तो काम व घर हा विषय आला तर घर व अदिती त्याच्यासाठी अगोदर होते मग बाकी  जग 

जय ला तिचा स्वभाव चांगलाच परीचयाचा झाल्यामुळे तो तिच्या कोणत्याही गोष्टी मध्ये डोकं घालत नव्हता, 
वाद नको म्हणून नाही 
तर एकमेकांच्या विचारांचा एकमेकांनि आदर करावा म्हणून, 

कारण जी गोस्ट आपल्याला बरोबर वाटते ती कुणाला तरी चुकीची वाटत असतेस 
व जी आपल्याला चुकीची वाटते ती  दुसऱ्याला बरोबर ,
त्यामुळे तो अदिती च्या मताबरोबरच तिच्या निर्णयाचे स्वागत देखील करत होता,

आणि राहिला आई चा प्रश्न 
तर आई सतत 
असे करू नको?
तसे कर, 
तुझा स्वभाव बदल 
तुझे आता लग्न झाले जरा जबाबदारी घे, 

असे नेहमी उपदेशाचे डोस पाजत असते त्यामुळे अदिती आता तिला देखील काही सांगत नव्हती, 

दिसायला सूंदर 
हुशार, पटकन कुणालाही आपलेसे करून घेणारी अदिती ऑफिसमध्ये सगळ्यांची आवडती बनली होती, 

तिचे बॉस तर तिच्या कामावर खुप खुश होते, 
मोठं मोठ्या मिटिंग देखील ते आता अदिती चा हाताळायला सांगायचे, 

अदिती देखील खुश होती, 
तिचे स्वप्न आता कुठे साकार होत होते, 

एक दिवस ती किचनमध्ये स्वयंपाक करत असते व तिच्या बॉस चा कॉल येतो, 

हाय अदिती, 
बॉस 

हॅलो सर, अदिती 

काय करतेस, बॉस 

काही नाही सर बोला ना , अदिती 


 आपल्याकडे परदेशातून क्लायंट येणार आहेत, व काहीही करून ही डील झाली पाहिजे, आणि माझी ईच्छा आहे, की त्यांना प्रेझेन्टेशन तू दाखवावे, बॉस 


अदिती गोधळून गेली 
तिला काय बोलावे कळेना कारण ती साधी एम्प्लॉई होती तिच्या पुढे खुप सिनिअर होते वयाने व अनुभवाने,
ती आताच कुठे जॉईन झाली होती तिला

कामाची फारशी माहिती ही नव्हती व तिच्यावर इतकी मोठी जबाबदारी टाकण्यात आली, 
भानावर येत ती म्हणाली 
सर मला जमेल का??

हो का नाही जमणार 
व सगळ्यांची अशीच ईच्छा आहे कि हे प्रेझेन्टेशन तुच  करावे, 
बॉस 

सगळ्यांची ईच्छा आहे अशा एका शब्दाने अदिती चा आत्मविश्वास वाढला होता, 
ती सरांना हो सांगून तयारीला लागते, 


इतके मोठे प्रेझेन्टेशन 
तयारी तर करावीच लागेल ना, म्हणून ती कॅलेंडर बघते तर तिच्या लक्षात येते तेव्हा तिची डेट आहे, 

आता नेहमीप्रमाणे तीच अडचण 
आता काय करावे???
मागच्या वेळी प्रमाणे गोळ्या घेऊ का??

नाही नको पुन्हा ते पोट दिसते, 
मग काय करावं , 
आयडिया मी पाळी लवकर येण्यासाठी गोळ्या घेतल्या तर, 
तसेही पुढे ढकलली की पोट, कंबर, पाय खुप दुखतात , 
त्यापेक्षा नको तो त्रास व नको ते टेन्शन, 
येऊन गेला की काळजी मिटली, 
ती मनाशीच ठरवते व कृती देखील करते, 

म्हणतात अनुभवाने माणूस शहाणा होतो पण अदिती च्या बाबतीत नेमके उलटे होत होते,

ती नेमकी अनुभवाने शहाणी होत होती की प्रत्येक गोष्टी च्या अनुभवात शरीराची चाळणी करून घेत होती, 


जाणून घेण्यासाठी 
सोबत राहा, 

क्रमशः .…....

🎭 Series Post

View all