मासिक पाळी पर्व दुसरे(भाग 3)

Social

मासिक पाळी (भाग 3) 
( माघील भागात आपण पाहिले जय अदितीला घरातील नियम समजावून सांगत होता ) 

आता पुढे ..........

जय चे बोलणे संपले तरी 
जोरात अदिती बोलू लागली, 

काय मुर्खपना  आहे यार हा, 

स्त्री म्हणजे काय खेळणं आहे का???
आणि हे नियम कसले तिच्यासाठी, 
मासिक पाळी ऐन म्हणजे रोग नव्हे, 
कुणी प्राण्यासोबत देखील असे वागत नाही व तुम्ही माणसासोबत वागता, 

अरे तुझा जन्म झाला ना त्यात या मासिक पाळी चा खुप मोठा वाटा आहे, हे विसरू नको, 

एका स्त्री ला स्वतः च्या च घरात वेगळं ठेवण, प्रत्येकाने येताजाता तिच्याकडे संशयित नजरेने बघणं, 
तिला स्पर्श करणे हे विटाळ मानलं जाणं, 
तिच्या खाजगी बाबी अश्या चारचौघात उघड्या करणे हे कितपत योग्य आहे, 

आणि तू इतका शिकला सवरलेला , या अनिष्ठ परंपरा ना आळा घालावा की खतपाणी द्यावं, 

माझा खुप संताप होतोय व चिडचिड देखील, 

हे बग तुला घरात बोलायला जमत नसेल तर तू नको बोलू पण मी हा अन्याय सहन करणार नाही मी आता जाऊन बोलते, 

असे बोलून ती जायला निघाली, 


ये थांब please 
 आता काही बोलू नको 
मी करतो काहीतरी, 
Believe me  
जय 


ठीक आहे, 
हे बग मला हे शक्य नाही 
तू घरी सांग आपण उद्याच पुण्याला जाऊ, अदिती 

हो बघतो मी, जय 
असे बोलून जय निघून गेला, 

अदिती एका रूम मध्ये होती,नेहमी गर्दी असलेल्या ठिकाणी आज कुणी थिरकले देखील नाही, 
संध्याकाळी आशा काकू नि सगळ्यांना जेवायला बोलावले, 
जेवायला चला सगळे या आवाजाने अदिती देखील बाहेर आली, 

तिला बाहेर आलेले बघताच 
आजी कडाडली तू का आलीस, 

का त्यांना काय झाले, येऊ दे की, 
जय चा चुलत भाऊ म्हणाला, 

करायचं नाही तिला, 
काकू म्हणाल्या, 

हो का , 
अहो वहिनी तुम्ही आतमध्ये च बसा मग, दीर सहज म्हणाला, 


अगोदर घरातील गडी मानस  जेवण करतात मग बायका, 
बायकांन सोबत देतील त्या तुला बस तव्हर, आजी 

आजी काय झालं ग आंटी  ला तिला का येऊ देत नाही तू, छोटा चिनू कळवळून म्हणाला, 

तिला कावळा शिवलाय 
आजी म्हणाली, 


वेदीकाची  तळपायाची आग आता मस्तकात गेली, 
ती तावातावाने तशीच माघारी फिरली, 

जय च्या नजरेतून हे सुटले नाही त्याने पटपट आवरून घेतले व कुणी तिच्याकडे जाईल व ती त्यांचा अपमान करेल त्या अगोदरच 
काकू माझ्याकडे दे मी देऊन येतो जेवण म्हणाला, 

काकू ने त्याच्याकडे जेवण दिले, 
व हळूच सांगितले भाजी खुप तिखट आहे , 
पोळी च्या मध्ये तूप व साखर टाकलीये 
तिला सांग , 
भाजी नाही आवडली तर तूप साखर खा पण उपाशी झोपू नकोस, 

काकू चा स्वभाव खुप प्रेमळ होता व तो जय ला परिचित होता पण आजी पुढे त्याच्या घरातील कुणाचे काही चालत नव्हते, 
तो फक्त हो म्हणून ताट हातात घेऊन निघून गेला, 

अदिती खुप भडकलेली असणार हे त्याला माहित होतं त्यामुळे ती जे बोलेल ते गुपचुप ऐकून घेण्याची तयारी त्याने ठेवली होती, 

चल जेवणं आणले आहे, जेऊन घे, जय 

नकोय मला फेकून दे, अदिती 

असे काय बोलते यार, जय 

हो ना मीच चूक आहे ना , 
काय बोलतात यार हे लोक 
शी.........
किळस येते अक्षरशः स्वतः ची 
एखाद्याच्या आयुष्यातील इतकी खाजगी बाब ते कसे काय उघडपणे सांगतात, 
आणि काय म्हणतात 
तिला करायचे नाही, 
बर हेही ठीक आहे पण 
कावळा शिवाला हे काय आहे, 
अदिती चे डोळे लाल झाले होते 
तिचा राग तिच्या बोलण्यातून स्पस्ट दिसत होता, 

तू शांत हो अगोदर please 
जय 
अरे कशी शांत होऊ,
सांग ना, 
माझ्या सहनशक्ती पलीकडे आहे हे, मी  जे ऐकले देखील नाही ते मी अनुभवते आहे, अदिती 

मला खरच कळतंय तुझं म्हणणं 
पण त्याची भावना वाईट नसते अग 
ते सहज बोलतात या विषयावर, 
त्यांना नवीन काही वाटत नाही, 
व मला सांग तू नाही का तुझ्या घरी, तुझ्या बाबशी , मम्मी शी, भैया शी या विषयावर उघडपणे बोलते, इतकेच नाही तर 
तू एक सायन्स स्टुडन्ट आहेस, 
जेव्हा या विषयी शिकवले जात होते तेंव्हा तिथे मुलं व मुली दोनी देखील होते ना 
मग तेंव्हा तुला असे का नाही वाटले 
हा तुझ्या स्त्रीत्वाचा अपमान आहे म्हणून, 

अग भावना समान आहे फक्त परिस्थिती, शब्द व वातावरणाचा फरक आहे, जय ने एका दमात बोलून टाकले,
आता अदिती चा राग थोडा कमी झाला होता, तो तिच्या चेहऱ्यावरून स्पस्ट जाणवत होता, 


ठीक आहे, 
पण आपण जाऊयात उद्या पुण्याला, अदिती 


हो जाऊयात जय 

तितक्यात आजी चा आवाज आला, 
भावड्या तिला सांग 
ताट धुन 
तिथंच पालथे मार, 
चार दिवस त्यातच जेवण दिल जाईल, 

होईल का अदिती घरात सेट 
सोडून पुण्याचे वेध 
की असेल सतत ची कुरबुर , 

जाणून घेण्यासाठी फॉलो करा, 
आणि हो लाईक व कमेंट्स करायला विसरू नका, 

धन्यवाद 

🎭 Series Post

View all