मासिक पाळी पर्व दुसरे(भाग 11)

Social

मासिक पाळी ( भाग 11) 

(माघील भागात आपण पाहिले अदिती ने तिचा त्रास कमी होण्यासाठी वेदनाक्षमक गोळी घेतली होती) 

आता पुढे ..........

जय समोर ती कमकुवत आहे हे कळू नये म्हणून व ऑफिस चे काम विना अडथळा करता यावे म्हणून तिने हा मार्ग अवलंबला होता, 


आता तिचा त्रास कमी नव्हे तर जवळ जवळ पळून च गेला होता,
तिने सगळी कामे नीट केली, 

आता ती प्रत्येक जबाबदारी व्यवस्थित पार पाडत होती, 
वेदनाक्षमक गोळ्यांनी तिला त्या दिवसात देखील त्रास जाणवत नव्हता त्यामुळे ती प्रेझेन्टेशन असो की बाहेर गावी दौरा ती कुठलाही विचार न करता पुढे च असायची, 

पण या सगळ्या मध्ये तिचे स्वतः कडे दुर्लक्ष होत होते व त्याच बरोबर घराकडे, 

ती हळूहळू जय कडे दुर्लक्ष करू लागली, 
जय जे काही सांगायचा तिला ते पटत नव्हते, 
मग दोघात वाद, 
खुप दिवस बोलणे नाही, 
यामुळे तिची आणखी चिडचिड वाढली, 
तिला कशातच समाधान वाटत नव्हते, 

एक दिवस तिचे व जय चे खुप जोराचे भांडण झाले
जय रागाने घरातून निघून जातो, 
अदिती तशीच घरी रडत बसते, 
तेवढ्यात आई चा कॉल येतो, 
  
हॅलो आई, बोल ना अदिती 

काय ग तुझ्या आवाजाला काय झालंय, आई 

काही नाही, अदिती 

खरं सांग , मी आई आहे तुझी  , जय शी काही झाले का ???
आई 


आता अदिती रडू लागली, 
मुळात तिला जय ची चुगली नव्हती करायची आईकडे 
पण तिलाच कळत नव्हते काय होतंय, 
तिला असमाधानी वाटत होते 
कशातच मन लागत नव्हते, 
त्यात तिला जय चा भावनिक आधार देखील राहिला नव्हता, त्याचे प्रेम नव्हते असे नाही 
पण सतत च्या वादामुळे ते दडले होते, 


आई , जय मला समजून च घेत नाही, 
आमचे जमतच नाही अग, 
सतत वाटते काहितरी चुकतेय पण काय ते कळेना, 
अदिती रडत होती व बोलत होती, 

आपल्या लाडक्या लेकीची अशी अवस्था बघून आई ने तिची कशीतरी समजूत काढली व जमेल त्या वाहनाने त्यांनी मुलीचे घर गाठले, 

लेकिसोबत बोलल्या नंतर त्यांच्या लक्षात आले, 
की आपल्याच लेकीने तिच्या संसावर काजळी चढवली आहे, 


आई तिला सांगते, 
तू अगोदर जॉब सोडून दे, 

काय , जॉब सोडून देऊ, 
अग पण का ???
माझ्या नोकरी चा व चिडचिड करण्याचा काय संबंध , 
व तु ही असे अडाणी सारखे बोलशील असे वाटले नव्हते, 
अग मी इतकी शिकले 
मग ते असे घरी बसण्यासाठी का???
अदिती चिडून बोलत होती, 


मी तुला कायमचे घरी बस नाही सांगत, 
तू स्वतः ला वेळ दे,
 स्वतः ला समजून घे,
 स्वतः ला एकदा तुझ्या मर्यादा सांग , 
तू यंत्र  नाहीस एक जीव आहेस हे अगोदर मान्य कर, 
आणि मला विचारशील तर आता तुमच्या नात्याला उभारी आणण्यासाठी एका नवीन जीवाची गरज आहे असे मला वाटते, आई 


हा काय पर्याय झाला का आई, अदिती 

नसायला काय झाले, 
हे बग तू मान्य कर अथवा नको करू, 
पण स्त्री कितीही आधुनिक झाली तरीही अजूनही मुलं जन्माला घालायची शक्ती फक्त तिच्याकडे आहे हे विसरू नको, 
तुम्ही मॉर्डन व्हा, 
शिका , जग जिंका, 
पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन चला , 
पण तुम्ही एक स्त्री आहात हे अमान्य करू नका, 

तिला भावना आहेत त्या जपा, 
तिला ढासळू द्या, 
तुम्हां आजकालच्या शिकलेल्या मुलींना मी नाव नाही ठेवत पण तुम्ही स्वतः ला मॉर्डन ठरवताना 
मर्यादा चे भान ठेवावे असे मला वाटते, आणि तुला सांगू बाळ स्त्री चे आयुष्य असेच असते तिला कुठे ना कुठे थांबावे च लागते, 
बदल हा तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो, 
बग विचार करून पटतंय का?????
आई बोलून मोकळी झाली पण अदिती अडकली त्यात, 

आई खरच बरोबर आहे का??
मी स्वतः ला स्वावलंबी स्वावलंबी ठरवताना, जय चा मिळालेला आधार गमावला का???

मी माझे करियर पणाला लावून बाळाला, जन्म देण्याचा निर्णय घेऊ का ???

अदिती च्या मनात विचाराचे काहूर माजले होते, 


कदाचित बाळाच्या आगमनाने सगळं काही ठीक होईल असे तिला देखील वाटू लागते, 
पण यासाठी जॉब सोडायची काय गरज मी दोन्ही सांभाळू शकते, 

ती आता स्वतः ची काळजी घेऊ लागली,
जॉब व घर सांभाळू लागली, 
तिने ती जय वर कशी अवलंबून आहे हे जय च्या लक्षात आणून दिले, 
आता नेहमी ती जय ला या गोष्टी ची जाणीव करून देऊ लागली की तोच तिचे सर्वस्व आहे, 
आता त्यांचे नाते पूर्ववत झाले होते, 
ती तिचा संसार व नोकरी यामध्ये निवडताना अगोदर संसाराला प्राधान्य देत होती, 

तिचा मुलं होऊ देण्याचा निर्णय तिने जय ला सांगितलं त्याने देखील आनंदाने तो स्वीकारला, 
त्यांच्या आयुष्यात पुन्हा नवीन आशेचा किरण दिसला होता, 
आता ते एकमेकांना पूर्वी सारखे जपत होते, 
एकमेकांचा आदर करत होते, 
जय अदिती च्या मताचा विचार करत होता, 

अदिती ने त्या दिवसात गोळ्या घेणे देखील बंद केले, 
तिला त्रास जाणवायचा पण ती तो सहन करायची, 

अदिती ला हे उशिरा सुचलेले शहाणपण असेल का ???

की असेल ही एका नवीन बदलाची सुरवात 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा, 
धन्यवाद

🎭 Series Post

View all