मर्यादा

स्त्री च्या मानाच्या मर्यादा एका स्त्री नेच जपली सासू म्हणून सुनेची बाजू घेत कावेरीताई नी एक नवा धडा गिरवला स्त्री पुरुष समानतेचा.

" तू तुझ्या मर्यादेत रहा "  विलासराव रागावून गरजले. " त्यांचे ते बघून घेतील तू मध्ये पडू नकोस .... नाहीतर तुझ्या सारख्या चुका करायची मर्यादा सोडून वागायची घाण सवय तिलाही लागेल.पुरुषाचा धाक पाहिजे  बाईला..."

" नुसता धाकच हवा का ? मान ,सन्मान, समुजतदारपणा ,विश्वास, साथ नको का त्यांच्या नात्यात... तुमच्या लेखी त्याचे महत्त्व कधीच नव्हते. तोच वारसा तुम्ही देणार तुमच्या मुलाला... दुसरे काय ? " कावेरी बोलली. " आई एरव्ही तर तिला तिच्या चुका दाखवत असतेस , तिला ठराविक कामाची सक्ती करतेस,  आज काय झालेय तुला? , आजच का एवढा पुळका आला आहे तुला तुझ्या सुनेचा?...." अमोल म्हणाला.

अपराधी मनाने कोपऱ्यात उभी असलेल्या पूर्वाकडे बघत तिने अमोलला प्रश्न विचारला " अशी काय मोठी चूक झाली आहे अमोल तिच्याकडून की तुला तिच्यावर हात उचलायची वेळ आली जरा सांग पाहू मला..... त्यावर अमोल उद्गारला की ...."तुला माहीत नाही आई ,आज मी ऑफिस वरून येताना तिला एका पुरुषाबरोबर हात मिळवताना पाहिले .अग भर रस्त्यात शोभते का हे?...लोक काय विचार करत असतील या दोघांबद्दल ही काय वागायची पद्धत झाली .... आपल्याला एक इज्जत आहे समाजात रस्त्यात तिला असे कोणी पाहिले तर काय इज्जत राहिली माझी.... मी तेच आल्यावर बाबांना सांगितले तेव्हा त्यांनाही ते पटलच नाही..... स्त्रीच्या काही मर्यादा असतात त्यानुसार तिने वागलेच पाहिजे त्याच्या विरुद्ध काही वागले तर समाजात तिच्यामुळे तिच्या घरच्यांची व तिच्या नवऱ्याची इज्जत कमी होते ...काय गरज होती हिला हस्तांदोलन करायची?  असं परक्या पुरुषाच्या हातात कोणी हात देत का?.... तू सांग मला आई आता मी रागवू नाही तर काय करू तिची आरती करू का ? तुझ्या तरी संस्कारात हे बसते का आई सांग मला दे उत्तर आता....." एवढे बोलून अमोल पूर्वाकडे रागाने पाहू लागला. ती बिचारी आधीच भेदरून गेली होती .तिने मान खाली घातली तिच्या डोळ्यातले पाणी हळूच तिच्या हातावर पडलं .आता मात्र कावेरी ताईंना रहावलं नाही ...त्यांनी प्रतिप्रश्न केला अमोलला..." संस्कार संस्कार म्हणजे काय असतात रे ? तुझ्यावर मी काय संस्कार केले नाही, पण मी तुला असं बायकोवर हात उचलायला कधीच शिकवलं नाही ...आणि हे तर माझ्या संस्कारात अजिबात बसत नाही मग तू कुठून शिकलास सांग ना?.... दुसऱ्याचे संस्कार काढणे खूप सोपे असते ,अमोल पण आधी स्वतःचा तोल कुठे जातो ते पाहणे महत्त्वाचे आहे.  काय चूक झाली तिची तिने हस्तालोणंद केलं म्हणून.... त्यात गैर काय आहे  ? स्त्री पुरुष समानता आहे म्हणून संसारात तिचा आर्थिक भार उचलणे किती गरजेचे आहे म्हणून तू तिला नोकरी करायला भाग पाडलं .....मग आता का कां गावा करत आहेस .,.....संस्कारशील सून म्हणून तिने व्यवस्थित घर सांभाळले असते आणि तेवढे आपण सक्षम नक्कीच आहोत.... पण तुम्हाला कमावती बायको पाहिजे ना ! तिचा पैसा पाहिजे पण तिला स्वातंत्र्य द्यायला नको तिच्याकडून घराला हातभार लावण्याची समानतेची  जबाबदारी उचलायची अपेक्षा आहे.... पण तिला समानतेचा दर्जा द्यायची तयारी नाही आणि राहिलं माझं तिला सारखं बोलणं नाहीतर तिच्या चुका काढणं, तर मी तिला माझ्यासारखं सक्षम बनवण्यासाठी तयार करत आहे .....नाहीतर आज जसं तुम्ही माझी मुर्खात गणना केली तशीच तिचीही उद्या होणार काय गरज होती तुझ्या वडिलांना आज मला मूर्ख म्हणण्याची ?काय केलं नाही मी यांच्या संसारासाठी यांच् सगळे मूड्स सांभाळत मी तारेवरची कसरत केलीच ना संसारात इतकी वर्ष आणि आत्ता यांना मी मूर्ख वाटत आहे .मग ते कशाला हवी या घरात जाते मी वेड्यांच्या दवाखान्यात..तिचे बोलणे ऐकून विलासराव चपापले." अग मला तसे म्हणायचे नव्हते."त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कावेरी ताई पुढे बोलू लागल्या " पदोपदी सगळ्यांच्या पुढे केलेला अपमान ,माझी असक्षमता, माझी काम करताना उडलेली धांदल, याच्यामुळे  माझी मुर्खात गणना करतात ते.... पण मी निगुतीने केलेला संसार कधीच दिसला नाही त्यांना....  आणि तशीच उद्या तिचीही स्थिती होऊ नये म्हणून मी थोडसं तिला  कठोरपणाने शिकवत होते..... तिच्या आईने नाही का तिला शिकवलं ? थोडसं ओरडलं ....मी काय तिची वैरीण नाही म्हणून....  ती चालढकल करायची, कानाडोळा करायची म्हणून मी थोडीशी कठोर बोलली ....पण याचा अर्थ ती एकदमच मूर्ख आहे.. नाहीतर ती मर्यादा ओलांडते असं होत नाही आणि राहिला प्रश्न तिच्या भर रस्त्यात हस्तांदोलन करायचा तर तो तिने तिच्या सहकाऱ्यांबरोबर मैत्रीपूर्वक दृष्टीने केलेला स्पर्श होता त्यात वासनेची भावना नसावी आणि हे तिचे मर्यादा ओलांडणे नाही मुळीच.... आणि तिला दोषी ठरवणारा तू किती निर्मळ आहेस रे.... तू नाहीस तुझ्या ऑफिस मधल्या सहकाऱ्यांशी हात मिळवणी  करत ? ....मग ती स्त्री असो वा पुरुष..... मग हे नियम फक्त तिला एकटीलाच का लागू ?. का तू पुरुष आहेस म्हणून तुला सगळी सूट आहे का ? आणि फक्त ती स्त्री आहे म्हणून तिला मर्यादा आहेत का ? मर्यादा तर  लक्ष्मणाने सुद्धा सीतेला आखून दिली होती. जरी  तिने ती ओलांडली पण आपलं पावित्र्य भंग होऊ दिल नाही.... रावणाच्याही राज्यात ....पण शेवटी अग्निपरीक्षा तिलाच द्यावी लागली ना ? अरे पिढ्यान पिढ्या आहेत चालू आहेत हे नियम... स्त्रीला कायम मर्यादाच कुंपण घातलं जातं आणि पुरुष मात्र मोकाट सुटलेला असतो ....पण मी हे परत होऊ देणार नाही. तुमची समाजात काय इज्जत राहते रे ....तुम्ही तिला नोकरीला पाठवता तेव्हा.... तुमची इज्जत अशी कवडी मोलाची आहे का इतक्या शुल्लक कारणावरून जायला....स्त्री वर हात उगारला  तिच्याशी बोलताना वाईट शब्दांचा प्रयोग केला .तिला सन्मान न देता चारचौघात तिचा अपमान करतोस तेंव्हा कुठे जाते तुमची तथाकथित इज्जत .....फक्त तिने तिच्या सहकाऱ्याला हस्तालोंदन केले म्हणून  तुमची इज्जत जाते...... सोडा या भ्रमक कल्पना आणि नव्या विचारांचा अंगीकार करा ती स्वतःच्या पायावर उभी असलेली एक सक्षम स्त्री आहे तिला तिचे निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य आहे आणि तिच्या मर्यादांचे उल्लंघन ती कधीही करणार नाही ह्या तिच्या संस्कारांवर सुद्धा माझा पूर्ण विश्वास आहे तरीही वागणुकीने विचाराने कुलटा ठरत नसते पण पुरुष आपल्या वागणुकीने आणि विचाराने तिला कुलटा ठरवत असतो.... त्यामुळे खबरदार जर तिला हात जरी लावला आणि तिला ओरडलास ह्या गोष्टीला माझा पूर्णविरोध आहे तुझ्या पतीपणाची मर्यादा तू  ओलांडू नकोस" असे बोलून कावेरी ताई यांनी पूर्वाच्या खांद्यावर आश्वासकतेने मायेने थोपटल. भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे आश्चर्याने बघत पूर्वा त्यांच्या कुशीत शिरली ....आज तिला आपल्या आईची खूप आठवण येत होती..... सासू म्हणजे केवळ सारख्या सूचना देणारी कटकट करणारी अशी स्त्री ही तिची चुकीची  कल्पना आज पूर्ण धुळीला मिळाली होती त्यांच्याकडचा तिचा बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा होता आज तिला त्यांच्या अंतकरणातील आईची माया समजली होती कावेरी ताई तिला म्हणाल्या "मी आहे ग पूर्वा तुझी आई ....या घरात तुला साथ देणारी कुणालाही घाबरू नकोस चला हात पाय धु आणि काहीतरी खा सकाळपासून खूप दमून आली असशील.... इथून पुढे तुला दोषी ठरविण्याच्या आणि शिक्षा देण्याच्या यांच्या मर्यादा माझ्यापर्यंत येवून संपतात. चल बघू फ्रेश हो "असं म्हणत एक जळजळीत कटाक्ष खाली मान घातलेल्या विलासराव आणि अमोल यांच्याकडे टाकत त्या पूर्वाला आत घेऊन गेल्या..