Login

मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग ५

हि कथा एका शूरवीर मावळ्याची.. त्याच्या अनोख्या प्रेमाची..



मार्तंड.. एक अनोखी प्रेम कथा..

भाग ५

अमीनाबाईने आवाज दिला आणि मार्तंड थांबला. मागे थांबलेले सरदार त्याचा पराक्रम पाहून अवाक् झाले. त्याच्या तळपत्या तलवारीचा नजराणा साऱ्यांनीच आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. मनात कुतूहल जागं झालं. थांबलेल्या सरदारांपैकी एक सरदार अमीनाबाईजवळ येत मार्तंडकडे पाहून म्हणाला.

“हे कोन म्हनायचं? नवीन दिसत्यात..”

“ये जहाँपनाह आदिलशाह के दरबार के सिपाही हैं.. हुज़ूर बाजी घोरपडेजी के सिपाही. ये देखिये उनकी मुहर..”

अमीनाबाईने उत्तर दिलं. तिचं उत्तर ऐकून त्या सरदारानं त्याच्याकडे एक नजर टाकली आणि मार्तंडकडे पाहून तो सरदार म्हणाला,

“काय नाव म्हनायचं आपलं? पराक्रमी हाईसा पर शक्ती नाहक वाया चालली की.. शाही सत्तेफुडं आपली शक्ती वाया घालवन्यापरीस आमच्या राजाच्या सैन्यात ये.. आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी आपली शक्ती खर्ची घाल. आमच्यात ये. मान बी मिळंल.. सुखी हुशील.”

हा गनिमी कावा मार्तंडच्या लक्षात आला आणि गालातल्या गालात हसत मोठ्या हुशारीने तो त्याला म्हणाला,

“मार्तंड नाव हाय माजं.. एक डाव सबूद दिला म्हंजी परत फिरत नस्तू आमी. आमी आदिलशा बादशाला समदं आयुष्य तेंच्या सेवेत देन्याचा सबुद दिलाय.. आन येकदा का सबुद दिला तर दिला.. आमी त्यास्नी सोडून कूटं बी जानार न्हाय..”

मार्तंडने त्यांना स्पष्टपणे सांगितलं. तो सरदार गूढ हसला. अमीनाबाईकडे पाहत तो म्हणाला,

“आमच्या सरकारास्नी तुमच्याशी बोलायचं हाय.”

“जी हुज़ूर..”

मोठ्या अदबीनं अमीनाबाई उत्तरली. मार्तंडकडे पाहून म्हणाली,

“जनाब, आप सबके विश्रामकी पुरी व्यवस्था की है.. हमारे सेवक आपको वहाँ लेकर जायेंगे. आपको किसी बात की शिकायत नहीं होगी हुज़ूर.. शब्बा खैर..”

असं म्हणत तिने सेवकांना आवाज दिला. तिचा आवाज ऐकताच सेवक धावत तिथे आले. अमीनाबाईने त्यांना सैनिकांच्या निवासस्थानी घेऊन जायला सांगितलं. मार्तंड आणि त्याचे साथीदार त्यांच्यासोबत रंगमहालातून बाहेर पडले. मेहर त्याच्या रुबाबदार चालीकडे कौतुकानं पाहत होती. अमीनाबाईने तिला आतल्या खोलीत जायला सांगितलं. मेहरने मान डोलावली आणि ती तिच्या कक्षेत निघून गेली.

अमीनाबाईशी बोलण्यासाठी ती मंडळी थांबली होती. तिने त्यांना आतल्या दालनात नेलं समोर मांडलेल्या बैठकीवर बसायला सांगितलं. पानाच्या विड्याचा तबक त्यांच्या पुढे ठेवला. त्या सरदारच्या नवाबानं बोलायला सुरुवात केली.

“अमीनाबाय, ये जो मार्तंड है उसपर कडी निगरानी रखनी है| हमारे सरकार को यह शक है ये सीवा का जासूस हो सकता है| तुम्हे उसकी पूरी ख़बर निकालनी है| उसे एक दो दिन के लिये रंगमहल में रोक लो और अगर वो सीवा का जासूस हुआ तो अपने लोगोंसे कहकर उसके टुकड़े टुकड़े कर दो..| इस काम का तुम्हे अच्छा इनाम मिलेगा| काम में ज़रासी भी बेपरवाही नहीं होनी चाहिये..|”

असं म्हणत नवाबाने तिच्याकडे मोहरांची थैली फेकली. ती आनंदाने थैली उचलत म्हणाली,

“आप बिलकुल फ़िक्र मत किजीये हुज़ूर, आपका काम हो जायेगा..”

त्यांचं बोलणं सुरू होतं. मेहर त्यांच्यासाठी रंगीत सरबताचे प्याले घेऊन आत येत असताना ते बोलणं तिच्या कानावर पडलं. मेहर काळजीत पडली. तिच्या त्या नाजूक घाऱ्या डोळ्यांत पाणी आलं.

“त्याने आपल्या जीवाची पर्वा न करता माझी रक्षा केली आणि हे सारे त्याच्याच जीवावर उठलेत.या अल्लाह, ये कैसा अजीब इंसाफ़ है तुम्हारा..?”

मेहर मनातल्या मनात बडबडली. सरबताचं तबक घेऊन आत येताच तिला पाहून सरदार म्हणाला,

“अमीनाबाय, इस काम के लिए मेहर को उस मार्तंड के छावनी में भेज दो.. मलिका ए हुस्न आपल्या जलव्यांनी त्याला घायाळ करील आणि सगळी खबर काढून आनल. इस को वहाँ भेज दो..”

“जो हुकुम हुज़ूर..”

अमीनाबाई होकार देत मेहरकडे पाहून अर्थपूर्ण हसली. मेहर तिथून बाहेर आली. पण तिच्या मनात एक वादळ घोंगावत होतं.

“ज्याने माझा जीव वाचवला, त्याच्याशीच गद्दारी? नही यें नही होगा हमसे| हम उस अल्लाह के नेक बंदे पे कोई आँच नही आने देंगे..”

मार्तंडला भेटून सर्व खबर देऊन त्याचा जीव वाचवायचा हे मेहरने मनाशी पक्कं केलं. तिने तिच्या जिवलग मैत्रिणीला सायराला तिच्या महालात बोलवून घेतलं. हाताला धरून पलंगावर बसवत ती सायराला म्हणाली,

“सायरा तू मेरी सबसे अज़ीज़ सहेली है, मेरा एक काम करोगी?”

नटखट हसू ओठांवर आणत सायरा म्हणाली,

“तेरे लिए तो मेरी जान भी हाजीर है मेरी जान.. बोल तो सही क्या करूं?”

मेहर कसल्यातरी चिंतेत दिसत होती. तिचा चिंतीत चेहरा पाहून सायराही गंभीर झाली.

“क्या हुआ मेहर? सब ठीक तो है ना?”

काळजीपोटी सायराने विचारलं.

“सायरा, तुम्हे सिपाहियोंके छावनी में जाकर वहाँ मार्तंडसे मिलना है..”

“कौन मार्तंड? वही ना जिसने उन सरदारों से तुम्हारी जान बचाई थी?”

सायरा उत्सुकतेने डोळे मोठे करून म्हणाली.

“हाँ वही, उसे कहना की, मेहर उनसे अकेलेमे मिलना चाहती है.. कल शाम तालाब के किनारे पीपलके पेड के पास आ जाएं.. बहुत ज़रूरी गुफ्तगू करनी है.. हम इंतजार करेंगे..”

मेहरचं बोलणं अर्धवट तोडत तिला चिडवण्याच्या हेतूने सायरा म्हणाली,

“हाय! क्या बात है मेरी जान.. इतनी बेताबी? क्या चल रहा है मेहर? कही दिल तो नही आ गया उसपे?”

आणि ती मिश्किलपणे हसू लागली. तिला दटावत मेहर म्हणाली,

“मज़ाक नही सायरा, बहुत ज़रूरी बात है..”

“ठीक है, मैं उसको तेरा संदेसा दे दूंगी.. फ़िक्र मत कर..”

मेहरने तिला सैनिकांच्या राहण्याच्या ठिकाणी जायला सांगितलं. सायराने तिथे जाऊन मार्तंडला मेहरचा निरोप दिला. मार्तंड विचार करू लागला.

“कश्यापाई बोलवलं आसंल? काय नवा कावा आसंल? काय बी कळंना.. जाऊन तर बगू. सरकारांनी ज्ये जोखमीचं काम सोपवलं हाय त्ये बी हुईल. काय खबर घावली तर बरंच हाय..”

मार्तंड स्वतःशीच बडबडत होता.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मार्तंड आपल्या घोड्यावर बसून तळ्याकाठी आला. सूर्य अस्ताला निघाला होता. तळ्यातल्या पाण्यावर सोनेरी किरणे शांतपणे रेंगाळली होती. अस्ताला जाणाऱ्या सूर्याची लाली साऱ्या आकाशात पसरली होती. हवेत मंद गारवा पडू लागला होता. मार्तंड तळ्याकाठी असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली येऊन थांबला. त्याच्या घोड्याला झाडाजवळ बांधलं आणि तो मेहरची वाट पाहू लागला. हळूहळू संध्याकाळ ओसरत चालली होती. अजून मेहरचा तपास नव्हता.

“अजून बी का आली नसल? डाव तर नसल ना? पैश्यासाठी इमान इकणारी माणसं ही. काय बी करत्याल..”

मार्तंड एकटाच स्वतःशी बोलत होता. त्याला मेहरच्या वागण्यावर संशय येऊ लागला होता. जसजशी सायंकाळ ओसरत चालली होती तसंतसं त्याच्या मनात संशयाचं भूत जास्तच डोकावू लागलं. तो जाण्यासाठी निघाला. इतक्यात थोड्या अंतरावर चार भोई एक मेणा घेऊन त्याच्या दिशेने येताना दिसले. त्यांच्या सोबत सायरा आणि काही दासींही होत्या. मेणा झाडाखाली ठेवण्यात आला आणि मेण्यातून एका बुरखा परिधान केलेली स्त्री उतरून बाहेर आली. तिने सायराला आणि बाकीच्यां लोकांना थोडं दूर अंतरावर उभं राहायला सांगितलं.
ती बुरखाधारी स्त्री मार्तंडच्या दिशेने चालत येत होती. मार्तंडने सावध पवित्रा घेतला. तिने चेहऱ्यावरचा पर्दा मागे टाकला. मावळतीची सोनेरी किरणे तिच्या चेहऱ्यावर पसरली. धारदार नाक, सुंदर मदमस्त नयन, बाणासारख्या कोरीव भुवया डाळिंबीच्या रंगाचे लालचटूक ओठ. कोणालाही भुरळ पडेल असं तिचं बावनकशी सोन्यासारखं रूप होतं. कपाळावरची हिऱ्याची बिंदी चमकत होती. कानात घातलेल्या हिऱ्याच्या मासोळ्या, हातातलं कंगण.. तिच्या सौन्दर्यात अजूनच भर घालत होतं. मेहरने स्मित हास्य करत भाळी आपल्या नाजूक बोटं नेत त्याला सलाम करत ती म्हणाली,

“आदाब हुज़ूर..”

मार्तंडने तिच्याकडे न पाहताच प्रश्न केला.

“कश्यापाई बोलवलंय मला?”

“हुज़ूर, यहाँ आपकी जान को ख़तरा है.. आपको जान से मार डालने की साज़िश रची जा रही है.. आप यहाँ से जल्द से जल्द चले जाएं..”

ती काळजीने सांगत होती मात्र मार्तंड बेफिकीरपणे हसून म्हणाला,

“जीवाला धोका तर कुटंबी हाय. म्या मरणाला घाबरत नसतुय. आन मरणाला घाबरून असा भेकडासारखा पळूनबी जात नसतुय.. पर तुमी का सांगताय मला ह्ये.?”

“आपने हमारी जान बचाई है.. यें एहसान हम ज़िंदगीभर भूल नहीं सकते.. हम आपके किसी भी काम आ सके तो हम इसे अपनी खुशनसीबी समझेंगे..”

मेहरने उत्तर दिलं.

“त्याची काय बी गरज नाय.. माझी फिकीर करायची तुमास्नी गरज नाय. माजा म्या हाय समर्थ. आन तसा बी तुमच्यासारख्या नाचणाऱ्या बायवर माजा इस्वास न्हाय..”

थोड्याश्या ताठ्यानंच मार्तंड म्हणाला. त्याच्या या वाक्यासरशी मेहर संतापाने लाल झाली. तो संताप मेहरच्या डोळ्यातून वाहू लागला. रागाने फणफणत मेहर म्हणाली.

“क्यूँ नाचनेवाली लडकीयाँ इन्सान नही होती? उनकी कोई इज्ज़त नही होती? हुज़ूर, कोई भी लडकी अपने खुशी से तवायफ नही बनती..”

तिच्या डोळ्यात आसवं जमा झाली. तिच्या बोलण्याने, डोळ्यातलं पाणी पाहून मार्तंड थोडा वरमला.

“म्हंजी तसं नव्हतं म्हणायचं मला. कुटं बी जा धोका हायच की.. तुमी मला सांगिटलंसा, सावधान केलंसा. काय कारण हाय? म्हणून इचारलं. तुमास्नी दुखवायचं जराबी मनात नव्हतं माज्या. लय मेहरबानी झाली.”

“उसकी जरुरत नही हुज़ूर, आपने हमारी हिफाज़त की.. आपको खतरों से आगाह करना हम अपना फ़र्ज़ समझते हैं.. आपको यकीन हो या ना हो, पर ये सच है, बाकी आपकी मर्ज़ी.. चलते है, खुदा हाफिज.."

असं म्हणून रागाने मेहर तिथून निघून जाऊ लागली.

“थांबा वाईच मेहरबाय..”

मार्तंड तिला थांबवून म्हणाला.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
0

🎭 Series Post

View all