मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..
भाग ८
मार्तंडच्या नजरेत खूप सारे प्रश्न उभे राहिले. मेहरच्या आयुष्यात नक्की काय झालं असेल? हे ऐकण्यासाठी मार्तंड उत्सुक झाला होता. मेहरच्या डोळ्यांत पाणी आलं. सारा भूतकाळ डोळ्यांसमोर पिंगा घालू लागला. राजगडाच्या पायथ्याशी असलेला, हिरव्यागार वनराईने नटलेला शिवापट्टण नावाचा परिसर. त्यात पाच पन्नास घरं असलेली छोटी वाडी. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा शिवापट्टण नावाच्या गावात सुखाने संसार करणारं धनाजी बांदल याचं कुटुंब. गावातली साधी भोळी माणसं. कितीही संकटं येवोत एकजूटपणे त्या संकटाना सामना करणारं एक सुंदर बांदल कुटुंब. अपार कष्ट असूनही कायम आनंदी असणारे माय-बां तिला आठवू लागले. गोठ्यात सुखाने नांदणारी जनावरं ते अगदी देव्हाऱ्यात अखंड तेवणारा नंदादीप! सारं काही तिच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. परकर पोलक्यातली दहा अकरा वर्षाची साऱ्या घरभर मायच्या मागे मागे फिरणारी ‘कावेरी’ तिला दिसू लागली. तिच्यावर जीवापाड प्रेम करणारी माय- बा, मायेने कुशीत घेणारे आबा-आज्जी, संपूर्ण खानदानात एकुलती एक पोर म्हणून लाड करणारे काका-काकू, घराच्या आजूबाजूला राहणारे, तिच्या सोबत भातुकलीचा खेळ खेळणारे तिचे लहानपणाचे सवंगडी. सारेजण तिला आठवू लागले. चुलीसमोर भाकरी थापणारी, भाळी चंद्रकोर रेखलेली, हिरव्या लुगड्यातली हसरी माय आठवू लागली. शेतात काळ्या मातीत राबणारा, खांद्यावर बसवून जत्रेत मिरवणारा तिचा बा तिला आठवू लागला. लहानपणीच्या रम्य आठवणी आठवत असताना मेहरचे डोळे ओसंडून वाहत होते. कंठात दाटून आलेला उमाळा आवरणं तिला कठीण जात होतं. तिनं बोलायला सुरुवात केली.
“हाँ हुज़ूर, उस दख्खन की ही बेटी है हम. शिवापट्टण गांव. हिंदू परिवारमे हमारा जन्म हुआ था. माय कहती थी की, हमारे जनम पर बां ने सारे गाव को शक्कर बाटी थी. बहुत खुश हुये थे वो. उन्होने बडे प्यारसे हमारा नाम कावेरी रखा था. सभी हमसे बहुत प्यार करते थे. माय अपने हाथोसे रोटी खिलाती थी. बा हमे मेले में अपने कंधेपे बिठाके पुरा दिन घुमाते थे. बहुत खुश थे हम अपनी खुशहाल जिंदगीमे अपने माता- पिता के साथ, हमारे रिश्तोंके साथ.. पूरे घर में हम सबके चहीते हुआ करते थे लेकिन हमारी खुशियोंको, हसते खेलते परिवारको किसकी नजर लगी पता नही. पूरी ज़िंदगी तबाह हो गयी..”
मेहर रडू लागली. जुन्या जखमा भळभळून वाहू लागल्या. तो काळा दिवस तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि तिच्या जीवाचा थरकाप उडाला. हुंदके आवरत एक दीर्घ श्वास घेत ती बोलू लागली.
“एक दिन हम आँगनमे अपने दोस्तोके साथ खेल रहे थे. खेल रंग ला रहा था. इतनेमे घोडे दौडनेकी आवाज आ गई. कई घुड़सवार धूल का तुफान उडाते हुये हमारी ओर आ रहे थे. उसपे बैठे हुये सिपाही बडी क्रूरतासे खेतो खलियानोमे अपने घोडे भगाकर सब नष्ट करते हुये दौड रहे थे. कुछ सिपाही रुक गये. वो हमारी गाय, भैस, सब जानवर खिचकर ले जा रहे थे. बा उनका विरोध कर रहे थे. उनसे हाथ जोडकर बिनती कर रहे थे. माय रोती चिल्लाती रही पर उन जालीमोने एक भी ना सुनी. हमारे काका ने भी उनको रोकने की बड़ी कोशिश की पर उन दरिंदों ने मेरे काका को सबके सामने जानसे मार दिया. हम सब वो मंज़र देख फुटफुटकर रोए थे. एकही पल मे अपने शौहर को हमेशा के लिए खो देने के सदमें से काकी बेहोश हो गिर पड़ी..”
मेहरने दोन्ही तळहातांनी आपला चेहरा झाकून घेतला आणि तो मोठमोठ्यांनी रडू लागली. आज इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच कोणाला तरी आपली कर्मकहाणी सांगत होती. इतकी वर्षे मनात दडवून ठेवलेली गोष्ट तिने आहे मार्तंड समोर बोलून दाखवली होती. मेहर सांगू लागली.,
“काका को अपनी आंखोके सामने मरता देखकर बा भी फुटफूटकर रोने लगे. सारे घरवाले लोंग उनके शवके पास बैठकर रो रहे थे. इतने में एक सिपाही की नजर हमपर पडी. हम बहुत डर गये थे. उसने दुसरे सरदारो के साथ कानाफुसी कियी और कुछ सोचे बिना एक पलक झपकतेही उसने हमारा हाथ पकड अपने साथ घोडेपे बिठाकर वहाँसे निकल पडे. हम रोते रहे, चिल्लाते रहे, माय बा रोते हुये हमारे पीछे दौडने लगें. उस बेरहमने बां को जोरसे एक लाथ मारी. बां नीचे जमीनपे गीर गये. मुझे बचाने की वो पुरी कोशिश करं रहे थे.पर नाकाम रहे. माय बा रोते चिल्लाते रहे. हम रोते रहे पर किसीको भी हमपर तरस नही आया..”
हुंदका आवरत ती बोलू लागली.,
“उन सिपाहीयोंने हमे यहाँ लाकर अमिनाबाय को बेच दिया. फिर हमारी पुरी परवरीश अमीनाबायने की. बहुत छोटेसे थे हम जब यहाँ बिजापूरमे इस रंगमहल में लाये गये. अमीनाबाय हमारी माँ बनी. उसनेही हमे पाला पोसा, बड़ा किया. हमे इस्लामकी पूरी तालीम दी गयी. नाच गाना सिखाया गया. हुज़ूर, हम जनमसे तवायफ नही थे.. हमे तवायफ बनाया गया और हम मजबुरीसे तवायफ बन गये. एक मासूम-सी कावेरी को मेहर बना दिया गया। हमने आपको जो भी बताया वो भी अब हमें काफ़ी धुंधला से याद है. यहाँ तक के हम अपनी ज़बान भी अब ठीक से बोल नहीं पातें..”
मेहरचं रडू थांबत नव्हतं. तिची कर्मकहाणी ऐकून मार्तंडला गलबलून आलं. आतापर्यंत तिच्या सोबत दुराचार केलाचा त्याला पश्चाताप होत होता. तिची कहाणी ऐकताना मार्तंडचेही डोळे भरून आले होते. भरल्या गळ्याने तो मेहरला म्हणाला,
“मेहरबाय, आमास्नी माफ करा. आमी तुमचं मन दुकीवलं. इतकं मोठं दुख उरात ठिवून तुमी हसत वागत हुता. खरंच मानलं तुमास्नी. या पुढं कदी बी आमी तुमास्नी दुखवायचो नाय. सबुद हाय आपला.”
मार्तंड भारावलेल्या स्वरात मेहरला सांगत होता. हात जोडत तो वाकला. त्याच्या मनात आता मेहरविषयी आदर होता. त्याच्या नजरेत तिच्याविषयी जिव्हाळा, आपुलकी होती.
“डोळं पुसा मेहरबाय, ह्ये बी दिस जातील. तुमास्नी याद येत आसल नव्हं माय बाची? भेटावं बी वाटत आसल.”
मार्तंडने मेहरला विचारलं. पुन्हा तिचे घारे डोळे भरून आले.
“जी हुज़ूर, बहुत याद आती है. पहले याद आती थी तो बहुत रोया करते थे. लेकिन अब आँसूभी मानों सूख से गये हैं..”
ओठांवर उसनं हसू आणत ती म्हणाली.
“मेहरबाय, रडू नगा. एक दिस आमी तुमास्नी तुमच्या माय बां ची भेट करून दिवू. सबूद हाय आमचा.”
मेहेरचा चेहरा आनंदाने उजळून निघाला पण पुन्हा काहीतरी आठवून कोमेजून गेला. उदासवाण्या स्वरात ती म्हणाली,
“हुज़ूर ये मुमकीन नही है. इस कैदसे मेरी रिहाई नामुमकीन है. अमीनाबाय और उसके आदमी हमे यहाँसे बाहर नहीं निकलने देंगे. माय बा से मिलने का हमारा सपना कभी पूरा नही हो सकता. यहाँ से हमे रिहाई शायद हमारे मौत के बाद ही मिलेगी.”
मेहरच्या डोळ्यांतून मेघ झरू लागले. मार्तंड तिला धीर देत म्हणाला,
“काय बी घोर करू नगा मेहरबाय. आमी तुमास्नी इथून भाईर घिऊन जाऊ. त्यासाठी आमचा जीव गेला तरी बी हरकत नाय पर तुमची हितनं सुटका केल्याबिगर गप बसायचो नाय..”
“हुज़ूर…”
तिने पुढे येऊन तिची नाजूक बोटं त्याच्या ओठांवर ठेवत म्हणाली,
“मेहरबानी करें हुज़ूर, ऐसी बात अपनी ज़ुबांसे मत निकालें. उपरवाला आपको लंबी उम्र दे. आपको हमारी उमर लग जाए.."
मेहर पटकन बोलून गेली. भानावर येऊन तिने तिचा हात मागे घेतला. स्वतःच्याच बोलण्यावर ती लाजली. मार्तंडही जरासा भांबावला. मार्तंडला तिच्या डोळ्यांत त्याच्याविषयी असलेलं प्रेम स्पष्ट दिसत होतं. बरीच रात्र झाली होती. बोलण्यात वेळ कधी निघून गेला दोघांनाही समजलं नाही.
“हुज़ूर, बहुत रात हो गई है. बातों बातोंमे पताही नही चला कीं इतनी देर हो गयी. आप आराम किजीये. हम कल आपसे मिलते हैं. शब्बा ख़ैर..”
मेहर हसून म्हणाली आणि ती त्याला खुदाह हाफ़िज़ म्हणून निघून गेली. ती त्या तिथून मार्तंडच्या कक्षेतून निघून गेली खरी,पण मार्तंडच्या मनात मात्र एक वादळ घोंगावू लागलं होतं. मेहरविषयी प्रेम जिव्हाळा वाटू लागला.
“मेहरबायची सुटका कराय पायजेल. बिच्चारी!! केवढं सोसलंय. मेहरबाय म्या तुमास्नी तुमच्या माय बा कडं घिवून जाणार मंजी जाणारच.”
मार्तंड मनातल्या मनात बडबडत होता. मेहरचा विचार करता करता केंव्हातरी रात्र उलटून गेल्यावर त्याला झोप लागली.
पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
©निशा थोरे (अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा