लग्न....

Marriage

लग्न व्याख्या -

1. तो कितीही वेंधळा असला तरी त्याला सांभाळून घ्यायचं असतं...!

2. तिने कसाही स्वयंपाक केला तरी त्याला  कधीतरी "मस्त" म्हणायचं असतं.

3. क्रिकेटमध्ये कितीही interest नसला तरी त्याच्यासाठी ते       enjoy करायचं असतं..

4.  तो कितीही "म्हातारा" झाला तरी त्याला चिरतरूण भासवायचं असतं...!!

5. "मी जाड झालेय का..ह्या तिच्या वाक्याला  कधीही "हो" म्हणायचं नसतं....

6. दोन्ही घरच्या नात्यांना आपुलकीने जपायचं असतं..

7. वेळप्रसंगी आपल्या इच्छांना हसत हसत विसरायचं असतं...!! थोडक्यात काय.? लग्न म्हणजे काय असतं...??? छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये केलेलं compromise असतं... 

8. कारण "we will grow old together" असं एकमेकाला केलेलं promise असतं...

लग्न हे सुद्धा अंदाजावर जन्म घेणारेच नाते असते...! तिथली आकडेवारी ही चुकायचीच...!!

पण आपला साथीदार हा इतकाही वाईट नाही, हे जितक्या कमी वेळात जाणून घ्याल, तितक्या जास्त वेळाचा सुखाचा संसार पुढे आपली वाट पाहत असतो......

सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )