Feb 28, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

पुनर्विवाह- भाग ३

Read Later
पुनर्विवाह- भाग ३


पुनर्विवाह - भाग ३

असा हा आपला समाज...आणि या समाजात राहणारे आपण...! आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट करत असताना आपण समाजाच्या विचार करत असतो म्हणजे मी हे केलं तर लोक काय म्हणतील मी ते केलं तर मला लोक काय म्हणतील किंवा मी असं केलं तर मला नावं ठेवतील का किंवा मी तसं केलं तर हे माझ कौतुक करतील का?


हे असं करतील हे तसं करतील हे असं बोलतील ते तसं बोलते  हे असं म्हणतील ते तसं म्हणतील म्हणजे सकाळचा विचार करूनच आपण वागत असतो ना म्हणजे समाज काय म्हणेल आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा काय असेल सामाजिक मान काय असेल याचा आपण विचार करतच नाही आणि या सगळ्यात आपण कधी होते हे आपल्याला समजत नाही असंच काही शार्दुलच्या बाबतीत झालं होतं त्याला सांगून गेला कमी पडले होतेच शिवाय तोही स्वतःला समजून गेला कमी पडत होता पण योग्य वेळी योग्य ती जाणीव करुन द्यायला सोबत तुला कोणीच नव्हता पण आता कदाचित  कोमल च्या येण्याने शार्दुल पूर्ववत होईल अशी आशा नक्कीच होती.

पण काय होईल?हे येणारा काळ नि येणारी वेळच ठरवणार होती....!


दुसऱ्या दिवशी सकाळी....


कोमल पट्कन उठली आणि तिने आपलं चट्कन आवरलं. कारण सासुकडून तिला नक्किच पहिल्या दिवशी ओरडा नको होता.


अंगावर गुलाबी रंगाची साडी, त्यावर सोनेरी ब्लाउज, गळ्यात मणी- मंगळसूत्र, कपाळावर नाजूक टिकली, केसांना ओले असल्याने क्लिप लावून मोकळे सोडले होते आणि ह्याला शोभायला हातावरची लालसर चॉकलेटी मेहंदी आणि त्यावर हिरवा चुडा....नवी नवरी अगदी उठुन दिसत होती.....!


"चला आवरायला  हवं...अजून साडे पाचच होता आहेत..आणि ह्यांना पण देवळात जायचं असेल. " अस म्हणत ती आवरुन बाहेर आली.


हा तर आपण पाहिलंच नाही की ते कुठे राहतात? पश्चिम महाराष्ट्रमधील सांगली या शहरातील औदुंबर गावी ते रहायचे. दत्त देवस्थान ची ते पूजा ही करायचे.

सांगली शहरापासून सुमारे २५ कि. मी. अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर श्री गुरू दत्तात्रयांचे हे स्थान आहे. नरसोबाची वाडी किंवा गाणगापूर या स्थानांप्रमाणेच औदुंबरला दत्तभक्तांच्या दृष्टीने मोठे स्थानमाहात्म्य लाभले आहे.
नरसिंह-सरस्वतींचा जन्म कारंजा म्हणजे वऱ्हाडातला; परंतु कृष्णाकाठ हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनविली. त्यांच्या वास्तव्याने, तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णाकाठी औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही दोन पवित्र क्षेत्रे निर्माण झाली आहेत. कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी आहे व पैलतीरावर औदुंबर हे क्षेत्र आहे. सांगलीकडून बसने थेट औदुंबरात पोहोचता येते. तेथे रहाण्या-जेवण्याची व्यवस्था होऊ शकते. शिवाय गावात धर्मशाळाही आहेत.
श्री नरसिंहसरस्वती हे श्रीदत्तात्रेयांचे दुसरे अवतार समजले जातात. त्यांच्या तपाच्या तेजाने, शास्त्रपूत आचाराने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्तसंप्रदाय सर्वत्र प्रसार पावला. त्यांचे हे कार्य इतके मोठे आहे की, लोक त्यांनाच दत्तसंप्रदायाचे प्रवर्तक मानतात. त्यांनी सन १४४१मध्ये औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केले, त्यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध पावले. कृष्णेच्या पैलतीरावर अंकलखोप नावाचा गाव आहे आणि ऐलतीरावर भिलवडीजवळ भुवनेश्वरी देवीचे देवालय आहे. भुवनेश्वरी हे शक्तिपीठ असल्यामुळे या परिसरात तपस्वी जनांचा वावर नेहमी असे. कृष्णेच्या तीरावर वृक्षांच्या दाटीमुळे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झाले होते. या निसर्गसिद्ध तपोवनात, औदुंबराच्या दाट शीतल छायेत नरसिंह्सरस्वतींनी एक चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करुन दिले.
या पवित्र वातावरणात कृष्णेच्या पवित्र पात्रात स्नान करून आपणास श्रीदत्तपादुकांचे दर्शन घ्यावयाचे आहे. हा स्नानाचा घाट प्रशस्त आहे.
तुझ्या जळानें मनें आमुची तूं धवळित राही, कृतज्ञभावें तुला वंदिता श्रीकृष्णामाई !अशी कृष्णामाईची मनोमन प्रार्थना करुन आणि शुचिर्भूत होऊन दत्तदर्शनाला जावयाचे. घाटावरून सरळ पादुकांपर्यत जाता येते. हा घाट येथील ब्रम्हानंदस्वामींचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी दत्तभक्तांकडून आर्थिक सहाय्य गोळा करून विसाव्या शतकाच्या प्रारंभी बांधविला आहे.
दत्तचरणांचे दर्शन घेऊन आपण प्रदक्षिणा करू लागला की, बाजूच्या ओवऱ्यांतून दत्तभक्त गुरूचरित्राचे पारायण करीत असताना दिसतील. दत्त संप्रदायात कठोर तपाचरणाला फार मह्त्व आहे. अत्यंत काटेकारपणाने आचारधर्माचे पालन करणाऱ्याला दत्तसाक्षात्कार सुलभ होतो, अशी सांप्रदायिकांची श्रद्धा आहे. गोरक्षनाथ, चांगदेवराऊळ, जनार्दनस्वामी, एकनाथ, दासोपंत, निरंजन रघुनाथ इत्यादि थोर दत्तभक्तांची नावे आठवताच त्यांच्या निग्रही तपाचरणाचा इतिहास आपणाला नतमस्तक बनवितो.
या ठिकाणी स्वत: नरसिंहसरस्वती चार महिने एकांताचा आनंद लुटीत राहिले होते, त्या ठिकाणी त्यांच्या चरित्राचे आणि उपदेशाचे चिंतन करीत राहण्यात औचित्य आहे. त्यामुळे आपोआपच तपाला अनुकूल मानसिक बैठक लाभते.
मंदिराच्या परिसरांत औदुंबर वृक्षाची घनदाट छाया आहे. आकाशात सूर्य तळपत असताना जमिनीवर छाया – प्रकाशाची जाळीदार रांगोळी तरळत राहते. या औदुंबरांच्या छायेतून मंदिरप्रदक्षिणा करुन, वरच्या ’आजोबा’ वडाखालच्या वाटेने गेले की, ब्रम्हानंदस्वामींचा मठ लागतो. हे सत्पुरुष १८२६च्या सुमारास गिरनारहून औदुंबरक्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली. या शांत, प्रसन्न आणि पवित्र वातावरणात त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली. त्यांच्याबरोबर मेरूशास्त्री नावाचे एक विद्वान गृह्स्थ होते. त्यांनी ब्रम्हानंदांच्या सहाय्याने ‘हठयोगप्रदीपिका’ या योगशास्त्रावरील प्रसिद्ध संस्कृत ग्रंथावर ’ज्योत्स्ना’ नावाची टीका लिहिली.
ब्रम्हानंदांचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी भक्त-भाविकांकडून वर्गणी गोळा करुन औदुंबरचा प्रशस्त घाट बांधण्याचे सत्कार्य केले. या ब्रम्हानंद मठातच श्रीवासुदेवानंदसरस्वती (दत्तसंप्रदायातील एक अर्वाचीन सत्पुरूष) यांनी आपल्या जीवनसाधनेची पहिली पावले टाकली होती. पु़ढे या मठात श्रीनारायणानंदतीर्थ या नावाचे एक सत्पुरुष राहात असत.
औंदुबरक्षेत्री चैत्रात कृष्णमाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव, श्री नरसिंह सरस्वती जन्मोत्सव, दत्तजयंती असे उत्सव साजरे केले जातात. ह्या अत्यंत रमणीय दत्तक्षेत्राला अवश्य भेट द्यावी.


औदुंबर गावाच्या परिसरात औदुंबराची असंख्य झाडे असल्यानेच बहुधा या स्थानास औदुंबर हे नाव पडले असावे. औदुंबर हे गाव तसे लहान आहे पण त्याचा महिमा मोठा आहे. येथील ब्रम्हानंद स्वामींचा मठ तसेच भुवनेश्वरी देवीचे मंदिर पाहण्यासारखे आहे.
श्रीनरसिंह सरस्वतींच्या चातुर्मास-निवासामुळे हे क्षेत्र निर्माण झाले आहे. पुण्याहून हुबळीकडे जाणाऱ्या दक्षिण लोहमार्गावर किर्लोस्कर वाडीच्या पलीकडे भिलवडी स्टेशनपासून चार मैलांवर कृष्णेच्या काठी हे ठिकाण आहे. कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी आहे आणि पैलतीरावर औदुंबर आहे. भिलवडीजवळ भुवनेश्वरीचे प्राचीन शक्तिपीठ आहे. त्यामुळे या स्थानी तपस्वी जनांची वर्दळ नेहमी असे.
कृष्णेच्या तीरावरील वृक्षांच्या दाटीमुळे येथे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झालेले होते. त्यामुळें या निसर्गसिद्ध तपोवनांत, औंदुंबरांच्या दाट शीतल छायेत शके १३४४ च्या सुमारास श्रीनृसिंह सरस्वतींनी चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करून दिले. येथील कृष्णेचा घाट शांत आणि प्रशस्त आहे. या घाटावरच दत्तपादुकांचे मंदिर आहे. ज्या घाटावर दत्त पादुकामंदिर आहे, तो घाट येथील ब्रह्मानंदस्वामींचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी बांधविला आहे.
पावसाळ्यांत श्रींच्या पादुका कृष्णेच्या महापुरांत बुडून जातात आणि त्यामुळें नित्योपासना व दर्शन अशक्य होऊन बसते. ही अडचण दूर करण्यासाठीं सन १९२६मध्ये उंच जागीं एक देवघर बांधले आहे. पावसाळ्यांत देव तेथे नेतात आणि तेथेच पूजा-अर्चा होते. श्रेत्रांतील नित्यनैमित्तिक उपासनेसाठी अनेक सरदार-संस्‍थानिकांकडून दाने व इनामे मिळाली आहेत.
मंदिराच्या परिसरांत औदुंबर वृक्षांची घनदाट छाया आहे. आकाशांत सूर्य तळपत असतांना भूमीवर छाया-प्रकाशाची रांगोळी तळपत राहते. या क्षेत्रांत ब्रह्मानंदस्वामींचा मठ आहे. हे सत्यपुरुष सन १८२६ च्या सुमारास गिरनारहून औदुंबर क्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली. येथील शांत, प्रसन्न आणि पवित्र वातावरणांत त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली. कोल्हापूरच्या मंदबुद्धी ब्राह्मणाला श्रीगुरूंनी ज्ञानदान केल्याची गुरुचरित्रांतील कथा याच स्थानांत घडलेली आहे.
असे हे औदुंबर....!


इरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय- सामाजिक कथा
कथामालिका- पुनर्विवाह
भाग- ०३
जिल्हा-सांगली, सातारा


क्रमश:

©®रितीका देशपांडे

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ritika

//