Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

पुनर्विवाह- भाग २

Read Later
पुनर्विवाह- भाग २

पुनर्विवाह- भाग २

तिने पाहिलं तर तिची नणंद आधीच झोपली होती. तस तिला हसूच आलं. कारण मॅडम चा मोबाईल एकीकडे होता आणि मॅडम च पांघरूण थोडं त्यांच्या अंगावर तर थोडं खाली  जमिनीवर पडलं होत. त्यात ती पालथी झोपली होती. बर आज चुडीदार तसाच होता अंगावर त्यामुळे मधूनच झोपेत टॉप खाली ओढण्याचं काम ही सुरू होत...!

ही तर गालातल्या गालात हसली आणि पट्कन सगळं नीट करून तिच्या बाजूला झोपी गेली. कारण उद्या लवकर उठायचं होत....! परत नवीन नवीन लग्न झालेल असताना सासूचे टोमणे कोण खाणार ना?


पण इकडे मात्र त्याचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. बेड वरती उताणं झोपून वरती छताकडे एकटक पाहत होता तो..…! मनात असंख्य विचारांची गर्दी झाली होती. काय चुकलं होतं आपलं? काय केलं होत आपण? आणि काय झालं होतं नेमकं? आणि आता काय होतंय नक्की? या सगळ्या प्रश्नांनी त्याला नि त्याच्या मनाला पोखरून काढल होत...! कोणाला सांगायची सोय नव्हती. जो तो आपल्याच नादात...! मूळचा हसता -खेळता असणारा तो आता पूर्णपणे शांत झाला होता. ना आपलं म्हणायला कोणी होतं ना आपलं मानाला कोणी होत...!

बस फक्त तो, त्याचं काम आणि त्याचे विचार....आणि सोबत त्याच्या विचारांचा गोंधळ....! एवढेच काय ते त्याच्या सोबत होते. नवीन आशेची पालवी बनून आलेली \"ती\" कदाचित त्याच्या अंधारमय आयुष्यात प्रकाशाचा शोध नक्की लावणार होती. पण ना हे त्याला माहीत होतं ना हे तिला माहित होतं...!तो म्हणजे शार्दूल...तसा नावाप्रमाणे वाघ पण अलीकडे जास्त बोलायचा नाही. ती म्हणजे कोमल. नावाप्रमाणेच अगदी कोमल. पण वेळप्रसंगी दुर्गा मातेचे रूप धारण करणारी. तो कधी चिडला तर ती शांत राहील अशी तर ती जास्त बडबड करू लागली तर तो गप्प बसेल असा...! एक आग तर एक पाणी....एक नदी तर दुसरा सागर...!एक डोंगर तर दुसरा दरी...एक राजकुमार तर एक राजकुमारी....!

असे दोघे विसंगत वाटत असले तरी शेवटी एकत्र येणारे...! एकाच नाण्याच्या दोन बाजू आणि एकाच बाणाची दोन टोकं...!एखाद्या मुलीचा घटस्फोट होऊन जर का दुसरे लग्न झाले तर? तर तिच्यासाठी सगळं किती अवघड असतं ना? म्हणजे आधीचा तो विचित्र अनुभव, त्यातून पुन्हा एखादा नवीन नात जोडायचं...!

म्हणजे जेव्हा पहिले लग्न होतं तेव्हा ती वेगळीच ओढ, तो हवाहवासा वाटणारा सहवास, ती स्पर्शाची आस, एकमेकांना समजून घेण्याचा ध्यास, सगळंच कसं नवीन नवीन असत नाही?

पण हळूहळू जेव्हा नव्याचे नऊ दिवस असणारा हा भर ओसरू लागतो तेव्हा खर या दोघांमधील संवाद सुरू होतो. ती मुलगी आपलं दुःख एखाद्याकडे मोकळ तरी करू शकते पण एखाद्या जवळ पूर्णपणे सांगायला भीती असतेच ना ?

कारण एखाद्या वरती विश्वास ठेवला आणि त्यांनी जर का आपला विश्वास घात केला तर? ही भीती असतेच की...! त्यामुळे कोणतीही गोष्ट सांगताना विचार करूनच सांगावे लागते. विचारपूर्वकच वागावे लागते...! नाहीतर अनर्थ अटळ असतो नाही का?


एकदा का आपली स्वप्न तुटली की पुन्हा बघण्याची भीती वाटते आणि ती जर का लग्न अशा सामाजिक संस्थेविषयी असेल तर ? विचारायलाच नको...!

मुलीची चूक नसताना तिला मुलगा धोका देतो आणि ती मुलगी उध्वस्त होते.किंवा काही प्रॉब्लेम, अडचणी असू देत ती मुलगी पुढाकार घेऊन सोडवायचा प्रयत्न करते त्याचा उपयोग काय शून्यच ना? कारण एकदा दुधाने तोंड पोळले की माणूस ताक देखील फुंकून पितो. इथे तर उभ्या आयुष्याचा प्रश्न असतो. मग हा संपूर्ण आयुष्याचा निर्णय
घेताना असा घाई गडबडीत थोडीच घ्यायचा असतो? त्याला विचार विनिमय, सल्ले हवेच की...! पण ते सल्ले आणि विचार विनिमय मनाचा गोंधळ सोडवणारे असावेत ना की मनाचा गोंधळ वाढवणारे...! मग सगळं कसं आपोआप सुरळीत होऊ लागते. विस्कळीत होणारी आयुष्याची घडी आपोआप व्यवस्थित बसू लागते. बस त्याला संयम नावाच्या इस्त्रीची गरज असते.

पण हीच परिस्थिती जर का मुलाबद्दल असेल तर? म्हणजे हे अस काहीतरी वाचून धक्का बसला ना? अहो , पण हर तर सत्य आहे. कारण एखाद्या मुलीला एखाद्या मुलाने फसवलं तर जग कांगावा करत...पण त्या मुलाच्या बाबतीत काय? जर एखाद्या मुलीने त्याला फसवलं असेल तर? त्याची चूक नसताना त्याचा विश्वासघाट झाला असेल तर? काही गरज नसताना त्याला असंख्य यातना भोगाव्या लागल्या असतील तर? आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाच्या विचित्र टोमण्यांची तो शिकार झाला असेल तर? त्याची काय चूक?पण हे कोण पाहणार?
ह्या गोष्टीला वाचा कोण फोडणार? ते सगळं जाऊदेत पण एखाद्या नात्याचा बाबतीत त्याच्या मनात जी कलुषितता निर्माण झाली आहे ती कोण दूर करणार?


आपला सो कॉल्ड समाज का?हा समाजाला दूषण देण्याचा हेतू अजिबात नाही बरं का...! पण जर याच समाजाच्या मुळे त्या मुलाची अशी अवस्था झाली असेल तर? आणि आपण समाजात राहतो.समाज म्हणतो ही आणि मानतो ही....! आणि आपण त्याचा एक हिस्सा देखील आहोत. पण; समाज म्हणजे नक्की काय? हे आपल्याला माहिती तरी आहे का? आणि जरी माहिती नसेल तरी कधीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न तरी केला का?

समाजांतर्गत आणि समाजांमधील संघर्ष हे मानवी इतिहासाचे प्रमुख वैशिष्ट्य असले तरी, सर्व समाजामध्ये किमान अलीकडच्या काळात सुसंवाद, शांतता आणि समृद्धीचे जग प्रस्थापित करण्याच्या प्रयत्न सुरू आहे

समाज म्हणजे लोकांचा एक समूह आहे जो इतर गटांशी त्यांच्या आतील लोकांपेक्षा कमी संवाद साधतो. समाजातून येणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांबद्दल आपुलकी आणि सहानुभूती असते. जगातील सर्व समाज वेगवेगळे विधी पाळतात, आपली वेगळी ओळख निर्माण करतात. समाज हा एक मोठा समूह आहे ज्यामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समुदाय असतो ज्यामध्ये सर्व व्यक्ती मानवी क्रियाकलाप करतात. मानवी क्रियाकलापांमध्ये आचार, सामाजिक सुरक्षा आणि निर्वाह इत्यादी क्रियांचा समावेश होतो.


समाज हा व्यक्तींचा समूह असतो, ज्यात सामान्य स्वारस्य असते आणि त्यांची विशिष्ट संस्कृती आणि संस्था असू शकतात. धार्मिक, परोपकारी, सांस्कृतिक, वैज्ञानिक, राजकीय, देशभक्ती किंवा इतर हेतूंसाठी एकत्र जोडलेल्या लोकांचा संघटित गट देखील समाज मानला जाऊ शकतो.
मानव हा मूलत: सामाजिक प्राणी आहे, त्याला इतरांशी जवळीक साधण्याची इच्छा आणि गरज असते. कुटुंबापासून सुरुवात करून, मानवी जीवन हे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक गोष्टींचे परस्परावलंबन आणि सामायिकरण आहे. नागरिकत्व, हक्क आणि नैतिकता या संदर्भात समाजाचा विचार केला जातो. कोणत्याही समाजातील सदस्यांची एकमेकांना मदत करण्याच्या तयारीची ताकद आणि ऐक्याचे मोजमाप करणे याला सामाजिक भांडवल म्हणता येईल.


असा हा आपला समाज...आणि या समाजात राहणारे आपण...! आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट करत असताना आपण समाजाच्या विचार करत असतो म्हणजे मी हे केलं तर लोक काय म्हणतील मी ते केलं तर मला लोक काय म्हणतील किंवा मी असं केलं तर मला नावं ठेवतील का किंवा मी तसं केलं तर हे माझ कौतुक करतील का?


हे असं करतील हे तसं करतील हे असं बोलतील ते तसं बोलते हे असं म्हणतील ते तसं म्हणतील म्हणजे सकाळचा विचार करूनच आपण वागत असतो ना म्हणजे समाज काय म्हणेल आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा काय असेल सामाजिक मान काय असेल याचा आपण विचार करतच नाही आणि या सगळ्यात आपण कधी होते हे आपल्याला समजत नाही असंच काही शार्दुलच्या बाबतीत झालं होतं त्याला सांगून गेला कमी पडले होतेच शिवाय तोही स्वतःला समजून गेला कमी पडत होता पण योग्य वेळी योग्य ती जाणीव करुन द्यायला सोबत तुला कोणीच नव्हता पण आता कदाचित कोमल च्या येण्याने शार्दुल पूर्ववत होईल अशी आशा नक्कीच होती.

पण काय होईल?हे येणारा काळ नि येणारी वेळच ठरवणार होती....!

इरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय- सामाजिक कथा
कथामालिका- पुनर्विवाह
भाग- ०२
जिल्हा-सांगली, सातारा


क्रमश:

©®रितीका देशपांडे
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ritika

//