Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

पुनर्विवाह- भाग १

Read Later
पुनर्विवाह- भाग १

पुनर्विवाह - भाग १

तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चन्द्रबलं तदेव ।
विद्याबलं दैवबलं तदेव
लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि ॥

आणि झालं दोघांच्या मधील तो अंतर पाट दूर झाला.

दोघेही अगदी शांत चेहऱ्याने सर्व काही करत होते.अंतर पाट दूर झाला आणि मग दोघांनी एकमेकांना हार घातला.तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या आणि तीने डोळे मिटून घेतले.त्यानेही एक दीर्घ श्वास घेतला.

ते मनाची तयारी करत होते....!एकमेकांवर येणाऱ्या जबाबदारीची...!एकमेकांवर होणाऱ्या पुढच्या सगळ्या गुण-दोषांची...!


नंतर तीच कन्यादान केलं  गेलं.मग त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं.मग भांगात कुंकू भरलं तर तिच्या डोळ्यातून तिच्याही नकळत एक अश्रू बाहेर आला.त्याने तो स्वतःच्या अंगठ्याने टिपला.तिच्या पायात त्याने जोडवी घातली.

आत्ता सप्त पदी,सप्त वचनांची वेळ होती.

गुरुजींनी वचन/पद  आणि त्यांचे अर्थ सांगायला सुरुवात केली.

लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सात फेरे आणि त्याबरोबर दिली जाणारी वचनं. या गोष्टीला सप्तपदी असं म्हटलं जातं. ही सप्तपदी नवरा आणि नवरीला एकमेकांबरोबर एकत्र करावी लागते. प्रत्येक फेरीनंतर दोघंही एकमेकांना वचन देतात, जे त्यांच्या आयुष्याशी निगडीत असतात. या सात वचनांचा अर्थ दोघांनी आयुष्यभर एकमेकांची साथ देणं हाच आहे. अग्नीला साक्ष ठेऊन भटजीच्या मंत्रजागरात ही वचनं दिली जातात. तसंच यावेळी ध्रुव ताऱ्यालाही साक्ष ठेवण्यात येतं. ध्रुव ताऱ्याची ज्याप्रमाणे अढळ जागा आहे, त्याचप्रमाणे एकमेकांच्या आयुष्यात अढळ जागा राहो यासाठी ध्रुव ताऱ्याची साक्ष घेण्यात येते. सप्तपदीच का? असाही प्रश्न लोकांना पडतो. त्याचं खास कारण आहे की, शरीरामध्ये सात चक्र, सात सूर, इंद्रधनुष्याचे सात रंग, ऋषी सात, धातू सात, सात द्वीप, सात परिक्रमा या सर्व गोष्टी सात असल्यामुळेच सप्तपदीला महत्त्व आहे. भटजींनी सांगितलेली वचनं नवरा आणि नवरी यावेळी पुन्हा म्हणतात.

पहिले पद,पहिले वचन

लग्नाच्या या सप्तपदीचा पहिला फेरा घेताना नवरा आणि नवरी देवाकडून आशीर्वाद मागतात की, त्यांच्या आयुष्यात कधीही धन अथवा खाण्यापिण्याची कमी न पडो. तसंच नवरा यावेळी कल्याण व्हावं आणि नेहमी आनंद देण्याचं वचन देतो तर त्याचवेळी नवरी येणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं वचन देते. दोघेही एकमेकांना योग्य सन्मान देत आयुष्यामध्ये हव्या असलेल्या गोष्टींचं ध्येय पूर्ण करण्यासाठी एकत्र पुढे चालतील अशी प्रार्थनाही यावेळी करतात.

दुसरे पद, दुसरं वचन

दुसऱ्या पदाच्या वेळी युगुल मानसिक, भावनात्मक आणि आध्यात्मक या सर्व पातळ्यांवर एकता हवी असल्याचं वचन देते. एकमेकांवर कायम प्रामाणिकपणाने प्रेम करत राहण्याचं वचन या दुसऱ्या पदामध्ये दोघेही एकमेकांना देतात. दोन शरीर असूनही एक मन असल्याप्रमाणे एकमेकांच्या आयुष्यात मदत करण्याचं वचन देतात. जीवनामध्ये अनेक चढउतार येत असतात. त्या प्रत्येक चढउतारामध्ये एकमेकांची सुरक्षा करण्याचं आणि साथ देण्याचं वचन आणि सर्व काही एकत्र सहन करण्याची ताकद असण्याचं वचन या पदामध्ये दिलं जातं.

तिसरे पद, तिसरं वचन


संसारीक जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी तिसरं पाऊल पुढे टाकताना नवरा आणि नवरी देवाकडून धन आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. अध्यात्मिक सेवा पूर्ण करण्यासाठीही आपल्या सक्षम करावं यासाठीदेखील प्रार्थना करतात. शिवाय आपल्या होणाऱ्या संततीची योग्य काळजी घेता येईल, त्यांना योग्य शिक्षण आणि त्यांच्या गरजा योग्य तऱ्हेने पूर्ण करता येतील यासाठी योग्य क्षमता देण्याची आणि त्यासाठी लक्ष ठेवण्याची प्रार्थना यावेळी हे युगुल देवाकडे करतं. तर आयुष्यभरासाठी एकमेकांसाठी शारीरिक आणि अध्यात्मिक प्रामाणिकपणा निभावण्यासाठीही देवाकडे आशीर्वाद मागतात.

चौथं पद, चौथं वचन

भारतीय समाजात कुटुंबांमध्ये एकात्मता दिसून येते. वरीष्ठांचा सन्मान आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी करणं हादेखील सामाजिक मूल्याचा एक भाग आहे. आपल्या कुटुंबातील योग्य मूल्य राखून ठेवण्यासाठी आणि कुटुंबामध्ये एकता कायम राखण्यासाठी नवरा आणि नवरी देवाकडून आशीर्वाद मागतात. कुटुंबामध्ये सगळ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत आणि सर्वांशी मिळून मिसळून राहण्यासाठीदेखील शुभेच्छा आणि आनंद आणण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. तसंच नवरी कोणत्याही परिस्थितीत आपल्या नवऱ्यावर कायमस्वरूपी प्रेम करण्याचं वचन देते.
वाचा – लग्नासाठी मंडप डिझाईन्स

पाचवं पद, पाचवं वचन

नव्या जीवनाची एकत्र सुरुवात करताना, आपल्या भावी संततीसाठीही आशीर्वाद मागितला जातो. आपल्या पोटी एक छान आणि महान मूल जन्माला यावं जे आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करून पुढे व्यवस्थित जबाबदारी सांभाळेल असा आशीर्वाद मागितला जातो. त्याचबरोबर होणाऱ्या मुलाचे उत्कृष्ट आई – वडील होण्याचं वचन एकमेकांना दिलं जातं. तसंच त्यांना योग्य पालन पोषण देऊन मोठं करण्याचंही वचन देण्यात येतं. यावेळी पती आपल्या पत्नीला नेहमीच मित्राचा दर्जा देण्याचं वचन देतो. तर पत्नी आपलं नातं हे नेहमी प्रेमाने बांधून ठेवण्याचं वचन देते.


सहावं पद, सहावं वचन

प्रामाणिक आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी देवाजवळ पती आणि पत्नी प्रार्थना करतात. तसंच दोघांनाही चांगलं आरोग्य मिळावं यासाठी प्रार्थना केली जाते. आपल्या कुटुंब आणि मुलांप्रती सर्व जबाबदाऱ्या योग्य तऱ्हेने निभावण्यासाठी देवाकडे चांगल्या आरोग्याची मागणी करण्यात येते. नवरा आणि नवरी एकमेकांबरोबर एक संतुलित आणि आनंदमयी जीवन जगण्याची इच्छा यावेळी करतात.

सातवं पद, सातवं वचन

अंतिम वचन, जे हे पवित्र गठबंधन अधिक मजबूत बनवतं. एकमेकांवर प्रेम करण्याचं, विश्वास आणि सहयोग देण्याचं वचन यावेळी देण्यात येतं. दोघेही कायम एकमेकांचे मित्र होतील अशी शपथ घेतात. कोणत्याही परिस्थितीत एकमेकांबरोबर न डगमगता उभं राहण्याचंही वचन यावेळी देण्यात येतं. तसंच आयुष्यात काहीही झालं तरीही एकमेकांबरोबर नेहमी खरं बोलायला हवं ही सत्य परिस्थितीदेखील यावेळी वचनातून समोर येते. आपल्या आयुष्यातील गोडवा आणि प्रेम कायम असंच राहो अशीही यावेळी देवाकडे प्रार्थना करण्यात येते.
प्रत्येक धर्म आणि संस्कृतीमध्ये वेगवेगळी वचनं असतात. पण त्याचा भावार्थ हा एकमेकांप्रती प्रेम, भक्ती, सन्मान आणि प्रामाणिकपणा हाच असतो. या सर्व वचनांचा एकच अर्थ असतो की, आयुष्यात एकमेकांना कायम प्रामाणिकपणे साथ द्यायची आहे. तसंच मृत्यूच्या आधी कोणीही एकमेकांपासून दूर होणार नाही असंही वचन यावेळी देण्यात येतं.


आणि हा विवाह संपन्न झाला.आत्ता तुम्ही दोघे वधू वर एकमेकांशी मनाने,शरीराने ,धर्माने,कर्माने आणि भाव-भावनेने तसेच कर्तव्यतेने एकमेकांसोबत जनभरासाठी बांधले गेले आहात.सर्वांच्या सक्षिने आत्ता तुम्ही पती-पत्नी म्हणून संचार करू शकता.

अस गुरुजींनी सांगितल आणि मग ह्यांचे कपल फोटो,फॅमिली फोटो,जेवण झालं.


आणि पाठवणी ही....!!


आत्ता ते निघाले होते आयुष्याच्या नवीन वाटेवर,नवीन वळणावर....!एकत्र...!लग्न झालं होतं आत्ता प्रवास सुरू झाला होता...!

"या या माप ओलांडून आत या...!" अस म्हणत  तिच्या सासूबाई पुढे आल्या.


तस तिने हसून आणि लाजून माप ओलांडल आणि आत आली.

जास्त कोणी नव्हतं आज घरात आणि अर्थात तशी अपेक्षा ही नव्हती....! जो तो आपल्या कामात व्यस्त असायचा...मग कस कोणी असेल ना?


"बर सुनबाई उद्या आपला आठवडा सुरू होत आहे..तर पूजा लवकर असेल...उठा लवकर....!" सासूबाई.


संध्याकाळची जेवण झाली आणि तिला एका खोलीत आराम करायला पाठवताना तिच्या सासूबाई म्हणाल्या.
तस तिने नुसतीच मान डोलावली.


"अग ए बयो नुसतीच काय नंदी बैलासारखी मान डोलवतेस? होय नाही काहीतरी म्हण...नाहीतर शेजारी पाजारीचे म्हणतील एका दिवसात पोरीची वाचा बसवली...!" सासूबाई"अहो आई नका काळजी करू...उठेन मी लवकर..." ती हसून म्हणाली.


तस त्यांनी डोळे फिरवले  आणि तिला झोपायला सांगून त्या निघून गेल्या.


तिने पाहिलं तर तिची नणंद आधीच झोपली होती. तस तिला हसूच आलं. कारण मॅडम चा मोबाईल एकीकडे होता आणि मॅडम च पांघरूण थोडं त्यांच्या अंगावर तर थोडं खाली  जमिनीवर पडलं होत. त्यात ती पालथी झोपली होती. बर आज चुडीदार तसाच होता अंगावर त्यामुळे मधूनच झोपेत टॉप खाली ओढण्याचं काम ही सुरू होत...!

ही तर गालातल्या गालात हसली आणि पट्कन सगळं नीट करून तिच्या बाजूला झोपी गेली. कारण उद्या लवकर उठायचं होत....! परत नवीन नवीन लग्न झालेल असताना सासूचे टोमणे कोण खाणार ना?

क्रमश:इरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय- सामाजिक कथा
कथामालिका- पुनर्विवाह
भाग- ०१
जिल्हा-सांगली, सातारा


©®रितीका देशपांडे

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ritika

//