मार्मिक शब्द

Real love

व्यक्त होताना नेहमीच 

माझे शब्द मार्मिक असावेत 

तुझे नी माझे जगण्याचे 

ऋणानुबंध असेच जपावेत 

तुझ्या त्या हळुवार स्पर्श्याचे 

शब्द ही असे अव्यक्त असावेत 

हे प्रेम व्यक्त होतानाचे 

शब्द शब्द माळ गुंफीत जावेत 

तुझ्या अस्तित्वाचा गंध निराळा 

कणा कणात मुग्ध हा वसतो 

तुझ्या सवे या आयुष्याचा 

क्षण क्षण तो नेहमी मनास स्फुरतो 

काही सवाल आयुष्याचे 

नेहमीच या मनाला भिडतात 

उत्तरासाठीचा पाठपुरावा 

पुन्हा निष्फळ हताश माघारी फिरतात...