मराठीची ऐशी तैशी

मराठीची ऐशी तैशी

मम्मा- मी कात टाकली

टिना- अगं पण का टाकलीस?
फुकट मिळते का?


मम्मा- म्हणजे?


टिना-पानवाल्याकडे मिळते ना


मोना- अगं नाही गं दिदू मम्मा ती कात नाही म्हणत तो कात असतो. यु नो.. तो कात.gender masculine है त्याचं..No but it has no life now so neuter gender.

मोना- मम्मा,आय नो वॉट यू वाँट टू से
कात मीन्स स्कीन ऑफ स्नेक
म्हणजे स्नेक आपल्या घरात????अय्यो. मम्मा आम्ही वर चढतो. तू कात टाकलीस तसा स्नेकला ढूंढ नि बाहेर सोड.

टिना- ए मम्मा कशी सोडेल स्नेकला. How can she know whether it is poisonous or not? It's bit risky. I think we should call snakefriends. I have their contact numbers.

मम्मा- अगं म्हशींनो,गपा जरा मी काय नै टाकलं. सहज बोलले. कुठून कुठे जातात हे पोरी.

--सौ.गीता गजानन गरुड.