मराठी कथा : सुखांत भाग १०

in this part asavri and ashutosh are talking to each other in the hospital

मराठी कथा : सुखांत  भाग १० 

क्रमश: भाग  9

मिस्टर .. ओ मिस्टर .. हॅलो ... ह्या लो ... उठा .. उठा "

नर्स जोर जोराने हाका मारत होती .

नर्स " काय लोक आहेत . मगाच पासून माझे डोके खात होते .. आता त्यांच्या पेंशट ला शुद्ध आलीय तर दोघेही झोपून गेलेत . वॉचमन .. वॉचमन .. ह्याला उठवा वो .. "

वॉचमन ने अंगाला हात लावताच आशुतोष ताडकन उठला .. भूतकाळ आठवता आठवता त्याला कधी डोळा लागला कळलेच नाही ..

नर्स " त्या तुमच्या पेशन्टला शुद्ध आलीय .. "

आशुतोष धावतच आत जाऊ लागला .. पण दारा जवळ गेला आणि थांबला .. मला बघून हिला आनंद नाही झाला तर .. तिला कदाचित सिद्ध ला पाहिल्यावर बरे वाटेल .. ह्या नालायकाला उठवतो

आशुतोष त्याच पाऊली मागे फिरला आणि सिद्ध ला उठवू लागला

सिद्धार्थ " उठ .. आसावरी ला शुद्ध आलीय .. " 

सिद्धार्थ ला जाग तर आली होती पण हा तिचा नवरा आहे तर हा आत का जात नाहीये ? माझी का वाट बघतोय .. म्हणून तो पडून राहिल्याचे नाटक करू लागला

सिद्ध मनातच " अरे जा .. जाना आत .. आत काय  माझी परमिशन घेतोस कि काय ? बायकोला भेटायला ? नक्की बायकोच आहे ना तुझी ?"

आशुतोष " सिद्धार्थ , अरे उठ .. झोपायची हि वेळ आहे का ? मला माहित नाही मला बघितल्यावर ती कशी रिऍक्ट करेल "

सिद्ध " अब आया उंट पहाड के नीचे " ( मनातच .. अजूनही झोपायचं नाटक करत होता . )

शेवटी  आशुतोष आत गेला

असावरीच्या डोक्याला पट्ट्या बांधल्या होत्या .. कदाचित खूप दुखत असाव्यात .. तिचे डोळे पण बारकावले होते

आशुतोष " हाय .. आत कसे वाटतंय ?"

ती उठायला गेली

आशुतोष " अ ... अ.. झोपून रहा .. हलू  नकोस .. "

आसावरी शांत झाली .. पण दुसरीकडे तोंड करून शांत पडली .. डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या ..

आशुतोष " काही हवंय का ? पाणी देऊ का ?"

असावरीने काहीच रिप्लाय  दिला नाहि

आशुतोष " ठीक आहे .. अराम कर .. मी आहे इथेच .. आणि हो .. तुझा बॉयफ्रेंड सिद्धार्थ पण आहे बाहेर .. त्याला बहुतेक आताच झोप लागलीय . मगाच पासून खूप धावपळ करत होता तो .. मी बोलवू का त्याला ?"

आसावरी काहीच बोलत नव्हती .. शांत पडून राहिली

मधेच तिला काहीतरी आठवले " किती वाजलेत ? अगदी कापऱ्या आवाजात तिने विचारले "

आशुतोष " साडे दहा .. "

आसावरी " माझा मोबाइल कुठेय ?"

आशुतोष " सिद्धार्थ कडे आहे "

आसावरी " मला एक कॉल करायचा होता "

आशुतोष " माझा मोबाईल देऊ का ?"

आसावरी " नको .. माझा नंबर पाठ नाहीये "

आशुतोष " ठीक आहे मी आणतो मोबाईल "

आसावरी " प्लिज सिद्ध ला पाठवाल का ?"

 हे वाक्य ऐकून आशुतोष चा जीव  खूप तळमळला .. त्याचे पायच जड झाले .. कान  गरम झाले .. डोळ्यात अश्रू जमा झाले आणि छातीवर कोणीतरी दगड ठेवावा असे वाटू लागले ..

आशुतोष बाहेर गेला आणि सिद्ध ला उठवू लागला ..

सिद्ध मनात " घे पाठवलेंनं ना बाहेर पाच मिनिटात .. मला माहित होते .. तुला उभे नाही करणार ती डोळ्या समोर ते .. अरे मी पण ओळखतो तिला "

आशुतोष ने एकदा आवाज दिल्यावर या वेळी सिद्ध उठला ..

आशुतोष " जा तीला शुद्ध आलीय .. तिला तुझी गरज आहे .. मी बाहेर थांबतो .. "

सिद्ध उठून आत गेला .. बरच वेळाने सिद्ध बाहेर आला

आशुतोष बाहेर पाहुण्या सारखा बसला होता .

सिद्ध " सर , आसावरी बोलवतेय तुम्हाला आतमध्ये "

आशुतोष  आत गेला .. तिच्या बरोबर सिद्ध पण आला

आसावरी " आशुतोष .. तुम्ही याला ओळखता ना .. हा माझा फ्रेंड आहे बॉयफ्रेंड नाही .. मी आता बरी आहे .. तुम्ही दोघेही गेलात तरी चालेल .. "

आशुतोष आणि सिद्ध दोघे एकदम  " तू अराम कर ग .. नको ते कशाला विचार करतेस "

आसावरी " दोघे अजूनही ऑफिस च्या ड्रेस वर आहेत .. नक्कीच काही खाल्लेही नसेल .. त्यामुळे आता मी बरी आहे .. तुम्ही जा .. प्लिज जा दोघेही "

दोघेही एकमेक्नाकडे बघायला लागले ..

सिद्ध ने तिथलीच खुर्ची ओढली आणि त्यावर बसला .. सर ती खुर्ची ओढा नि बसा .. ती ना तशीच आहे .. ती जे बोलेल ना त्याच्या विरुद्ध केले तरच मज्जा येते .. मग जाम  चिडते ती

आशुतोष " बरोबर .. " आणि आशुतोष ने खुर्ची ओढली आणि त्याच्या शेजारी बसला आणि त्याने सिद्ध ला टाळी दिली

इतक्यात नर्स आली 

नर्स मनात " काय माकडं आहेत दोघे .. पेशन्ट शुद्धीत नव्हता तर भांडत होते आणि आता शुद्धीत आलाय तर गप्प बसलेत .. " आणि अशी रागात लुक्स टाकून निघून गेली

सिद्ध " सर .. ती नर्स बहुदा तुमच्यावर चिडलीय.. कशी तणतणत गेली बघितली का ?

आशुतोष " मी जरा खाली कॅन्टीन ला जाऊन येतो .. हिला खिचडी भात मिळतोय का बघतो ?नाहीतर ११ ला कॅन्टीन बंद होईल .. तुला काही आणू  का सिद्धार्थ ?

सिद्धार्थ " मला आणि तुम्हला व्हेज सँडविच आणि एक कोक आणा .. "

आशुतोष खाली कॅन्टीन ला जाऊन खाणे घेऊन आला .. दोघांनी मिळून तिला उठून बसवली आणि तिला आशुतोष चमच्याने घास भरवू लागला .. तशी तिने त्याच्या डोळ्यात पहिले आणि तिला जोरात रडू कोसळले

सिद्ध " द्या इकडे मी भरवतो तिला .. नाहीतर  खाउदे हाताने .. तिला कोणी काळजी घेतलेली आवडत नाही .. येडी आहे ती "

आशुतोष ने एक नजर रागाने त्याच्याकडे पहिले आणि डोळ्यानेच खुणावले " गपतोस का जरा ?"

सिद्ध " हो खरं आहे हे ? तुम्हला माहित असेलच ? "

आशुतोष ने तिला पुन्हा घास खायला पुढे केला

आशुतोष " उद्या सकाळ पर्यंत आई येतेय .. मग माझे तोंड पण नाही दाखवनार तुला .. आज आता खाऊन घे .. तुला गोळ्या द्यायच्या आहेत "

सिद्ध " मी नाही हा .. हलणार इथून .. सर माझी लिव्ह सॅंक्शन करा "

आशुतोष " सिद्धार्थ ते आणलाय ते खाऊन घे आणि तुझे तोंड बंद कर जरा .. प्लिज "

सिद्ध " ओ सर ,मी म्हणजे तुम्ही नाहीये .. आपण का जायचे इथून ?तुम्ही तिच्या अत्याचारला बळी पडलेले दिसताय .. पण मी बघा  कसे हॅन्डल करतो ते तिला .. बरोबर ऐकते ती माझे "

सिद्ध ने त्याच्या हातातून खिचडीची प्लेट घेतली

सिद्ध " पुढल्या पाच मिनिटात हि खिचडी संपली नाही तर मी इथून तुला जोपर्यंत डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यत हलणार नाही इथून .. आणि जर तू हि खाल्लीस तर मी निघून जाईन .. तूच ठरव तुला खिचडी खायचीय का मी इथे थांबलेले पाहिजे "

तशी आसावरी पटापटा खाऊ लागली . सिद्ध ने आशुतोष ला डोळा मारला

आशुतोष हाताची घडी घालून बसला. बोलता बोलता खिचडी संपली ..

सिद्ध " चला सर आता पण खाऊन घेऊ .. चल आसावरी .. मी निघतो घरी आता .. उद्या येईन सकाळी तुला भेटायला .. रात्री सर थांबणार आहेत तुझ्या बरोबर "

आशुतोष " नाही .. ते तू पण थांब .. तुझे ऐकते ती ... माझे ऐकत नाही .. तिला तुझ्या बरोबर कंफोर्टेबल असेल तर तू पण थांब "

सिद्ध " पण आता तिने खिचडी खाल्ली म्हणजे तिने एक प्रकारे मी जावे म्हणून खाल्लीय तर ती ऐकेल तुमचे .. तिला मी जायला पाहिजे म्हणून तर तिने खिचडी खाल्ली "

आसावरी काही बोलत  नव्हती फक्त डोळे हलवून सगळे ऐकत होती ..

दोघे बाहेर बेंच वर बसून खाऊ लागले

दोघांना सपाटून भूक लागली होती .. सँडविच , आणि कोक पटपट खाऊन घेतले

आशुतोष " सिद्धार्थ , तू पण थांबलास तर बरे होईल .. ती तुझ्या बरोबर कंफोर्टेबल असते .. असे वाटतंय मला "

सिद्धार्थ " अहो सर , आपण आपल्याला कॉंफोर्टेबल करून घ्यायचे .. मी मैत्रीण म्हणून तिच्यावर हक्क दाखवतो .. तुम्ही तर नवरा आहात .. काय हरकत आहे थोडासा हक्क दाखवलात तर "

आशुतोष " प्लिज थांब .. मला काही सुधरत नाहीये .. मी थोडा टेन्शन मध्ये आहे "

सिद्धार्थ " ठीक आहे .. एक काम करू ? मी इकडे बाहेर थांबतो .. म्हणजे झोपतो .. तुम्ही आतमध्ये थांबा .. तिला सांगा कि मी गेलो म्हणून .. आणि जर काही गरज पडलीच तर मी बाहेर असेलच "

आशुतोष " ठीक आहे .. थँक यु .. "

सिद्धार्थ " थँक यु  काय ? माझी खरीच मैत्रीण आहे ती .."

आशुतोष आत मध्ये गेला .. खुर्ची वर बसला .. तिला म्हणाला " तो घरी गेला .. तूला काही लागले तर मला आवाज दे .. १५ मिनिटांनी या दोन गोळ्या घ्यायच्या आहेत

आसावरी मला उठून बसवा म्हणून तिने खुणावले

आशुतोष ने तिला उठायला मदत केली .. पाठीला टेकायला उशी लावली .. ती शान्त बसली ..

आशुतोष ने एकेक गोळी काढली आणि तिला गोळी घ्य्यायला लावली ..तिच्या अंगावर पांघरुण  टाकत होता ..ओले तोंड रुमालाला पुसत होता .. पण तिच्या डोळ्यात आशुतोष बघत नव्हता पण ती मात्र एकटक त्याच्या कडे बघत होती .. तिला असंख्य प्रश्न पडलेले .. दोघांच्याही  मनात विचारांचे काहूर माजले होते पण सुरुवात कोणी करायची ? आणि कुठून करायची ? हि वेळ तर ती नक्कीच नव्हती .. त्यामुळे अशुतोष  शांत होता .

आसावरी " किती बारीक झालेत तुम्ही ? अश्विनी कशी आहे ? कुठे असते ती ?घरी कसे आहेत सगळे ?"

आशुतोष " तू आता अराम कर .. आपण उद्या  बोलू "

आसावरी " तुमची बायको कुठे आहे ?"

आशुतोष " बायको आहे ना .. मी उद्या सांगतो तुला सगळे ? तू झोप आता ?"

आसावरी " तुम्ही का गेले नाही घरी ? तुमची वाट बघत असेल ती ? तुम्ही जा .. मी बरी आहे आता ?"

आशुतोष " आशु प्लिज झोप आता ? "

आसावरी " तुम्ही आई ला कशाला कळवलेत .. मी नाही फेस करू शकत त्यांना ? प्लिज मी तुम्हला भेटले हे कोणाला सांगू नका ? मला कोणाला कोणत्याही प्रश्नाची उत्तरं देता नाही येणार "

आशुतोष " ठीक आहे .. आईला सांगतो नको येउस .. इथे तुझी कोणी वाट बघत नाहीये .. तू जिच्यासाठी देवाला पाण्यात ठेवले होतेस ना तीला तुला भेटायचे पण नाहीये ?"

आसावरी " माझ्यात ताकद  नाहीये कोणालाच फेस करायची .... तुम्ही प्लिज जा .. आताच्या आता जा .. मी एकटी खुश आहे माझ्या आयुष्यात .. "

आशुतोष " हो ते तर दिसतेच आहे .. चांगली व्हीपी झालीस .. एकदम सक्सेसफुल झालीस .. चांगले आहे ना .. तुझी प्रगती झाली हि आनंदाची बाब आहे .. आणि खरंच सांगतो .. तुझ्या आनंदात माझा आनंद आहे .. तुला जर मी आजू बाजूला नसण्याने आनंद होत असेल तर मी आजू बाजूला राहणार पण नाही .. काही प्रश्न मला रात्र रात्र झोपून देत नाहीत .. त्या  प्रश्नांची  उत्तरे मला दे मी परत तुझ्या वाटेला येणार नाही .. "

आसावरी " विचारा ..मी देते  उत्तर "

आशुतोष " हि वेळ नाहीये त्यासाठी .. आता तू झोप .. आपण उद्या बोलू ..

🎭 Series Post

View all