मराठी कथा : सुखांत   भाग २

in this part sidharth vists asavaris home with ice cream

मराठी कथा : सुखांत   भाग २

क्रमश: भाग १

दुसऱ्या दिवशी सकाळी आसावरी उठली मागच्या अंगणातच तिने व्यायाम केला . योगा  केला. सकाळी फ्रेश झाडांना पाणी घातले .. स्वतः चा   नाश्ता करून ती मस्त ऑफिस वेअर घालून तिच्या ऑफस ला निघाली .. जाता जाता लॅपटॉप .. बॅग घेतली घर बंद करून कार ने ऑफीस ला पोहचली

आसावरी ची नवीन शहरात नुकतीच बदली झाली होती .. ती व्हीपी मार्केटिंग च्या पोस्ट वर आज पासून रुजू होणार होती .. व्हीपी लेव्हल ची म्हणून तिचे ऑफिस मध्ये ग्रँड वेलकम झाले .. मार्केटिन्ग टीम शी ओळख करून झाली .. तिने पण आपल्या बद्दल ची माहिती दिली .. तिची काम करण्याची पद्धत कशी आहे .. तिला काय आवडत नाही .. वगैरे असले सगळे फंडे सांगून झाले .. तिला तिची केबिन दाखवली .. 

स्टाफ मध्ये कुजबुज होऊ लागली .. लेडी ती सुद्धा मार्केटिंग च्या फिल्ड मध्ये .. आणि इतक्या लहान वयात कशी काय इतकी वरती पोहचली .. शिवाय दिसायला पण कसली सुदर आहे .. वगैरे वगैरे .. तिच्या साठी हे काही नवीन नव्हते .. समोर बोलायची कोणाची हिम्मत होणार नाही एवढी तर ती स्ट्रिक्ट होती .. मागून लोक आपल्याला काय म्हणतात याचा  विचार   करत बसलो  तर जगायलाच नको नाही का ?

तिच्या असिस्टंट पूजा  ने तिला इथल्या क्लाएंट ची लिस्ट दिली ..

आसावरी " पूजा हि तर लिस्ट मी नंतर चेक करेन .. मला डेड क्लाएंट ची लिस्ट पाहिजे .. आता पर्यंत जे आधी क्लाएंट होते पण काही कारणाने त्यांनी आपल्याशी डील करणे सोडून त्या क्लाएंट ची लिस्ट आणि एक रिपोर्ट पाठव .. साधारण काय कारण झाले कि क्लाएंट आपल्या बरोबर बिझनेस  करायचा थांबला .. आणि एक.. रिपोर्ट ची मला घाई नाही .. उद्या दिलास तरी चालेल फक्त तो बरोबर असला म्हणजे झाले .. "

पूजा " यस मॅम .. आय विल डू द्याट "

आसावरी जी कामात घुसली ती घुसलीच .. एकदा का कामात गेली कि तिला काहीच दिसत नाही .. आठवत नाही ..

पूजा बाकीचे रिपोर्ट्स बनवे पर्यंत तिने लिस्ट समोर दिली ती पाहत होती ..

मधेच तिच्या मीटिंग होत्या .. कॉल्स होते .. असा पहिलाच दिवस तिच्या अंडर काम करणाऱ्यांच्या लक्षात आले कि ती स्वतः तर वर्क होलिक आहे आणि आपल्याला पण दामटवून काम करून घेणाऱ्यातली आहे .. काही जण तिच्या वर इतके इम्प्रेस झाले कि त्यांना पण काम करायला नवीन जोश आला ..

संध्याकाळी घरी आली .. फ्रेश झाली .. तिच्या पुरते जेवण तिने बनवले .. जेवून घेतले आणि थोडा वेळ काम करत बाहेर मागच्या अंगणात  मध्ये बसली ..

सिद्धार्थ पण कामावरून उशिरा आला .. ऑफीस असले कि त्याचे शेड्युल टाईट असायचे मग  इकडे तिकडे  बघायला वेळ मिळत नसे ..

तरी एकदा  दोनदा त्याने वेळात वेळ काढून एकदा नजर टाकलीच .. ती मस्त खुर्चीवर पाय पसरवून लॅपटॉप मांडीवर घेऊन चष्मा लावून काम करत होती .

सिद्धार्थ ने त्याचे जेवण केले आणि थोडा वेळ काम करून कंटाळा आला .. आणि त्याच्या मनात काय आले रात्री ९. ३० ला त्याने आसावरी च्या  दाराची बेल वाजवली ..

आसावरी ने दारातून च बाहेर पहिले तर हा हातात आईस क्रिम चे को न  घेऊन आला होता ..

तिने जरा वैतागतच दार उघडले

सिद्ध " हाय .. कामात आहेस का ? तुला डिस्टरब केले का ? "

आसावरी " एस नक्कीच आता मी तुझ्या मुळे  डिस्टरब झालेय आलरेडी "

सिद्ध " अग  बाजूला हो .. मला आत तर येऊ दे .. तुला तुझ्या  आईने शिकवलं नाही का ग ? पाहुण्यांना या म्हणावं .. बसा म्हणावं .. " आणि त्याचा त्याचा तोच आता आला आणि तिथल्या डायनिग टेबल वर बसला

सिद्ध " चल ये आईस क्रिम खायला .. वितळून जाईल "

आसावरी " नाही नकोय मला .. थँक यु .. तू खा आणि राहिलेलं घेऊन जा "

सिद्ध " मग ते  फ्रिज मध्ये टाक मी उद्या  रात्री येईन खायला "

आसावरी " सिद्धार्थ .. काय चाललंय तुझे ?"

सिद्ध ने आइस क्रीम खायला सुरुवात केली

सिद्ध " कुठे काय ? मी आईस  क्रिम खातोय .. अरे वाह एका दिवसात घर छान लावलेस "

आसावरी " थँक यु .. तू कॉफी घेशील का ?"

सिद्ध " आज कशी काय एवढी मेहरबानी ?"

आसावरी " तुझी पेंडिंग राहिलेली कॉफी दिल्या शिवाय तू माझा पिच्छा सोडणार नाहीस ना .. म्हणून म्हटले "

सिद्ध " हो .. हो .. म्हणजे हा टोमणा होता तर "

सिद्ध " मी ना टोणगा आहे .. मला असल्या टोमण्यांनी  काही फरक पडत नाही "

आसावरी " मला ना खूप राग येतोय .. तू असा इतका फ्रेंडली का वागतोस ? माझी तुझी ओळख पण नीट नाहीये .. तू रात्री माझया घरात  का आलास .. तुला नाही रे मला इशू होतील. तू नको माझ्या  नादी लागूस प्लिज”

सिद्ध " भलाई का तो जमाना हि नहीं रहा "

आसावरी " प्लिज जा तू इथून .. "

सिद्धार्त " ए हॅलो .. गप आईस क्रिम खा  ते मग मी जातो .. "

आसावरी " नकोय मला तुझे आइस्क्रीम "

सिद्धार्थ " माझे नाहीये बाबा ते .. बेल्जियम चोको चिप्स .. फ्लेवर आहे "

आसावरी " शट अप .. कुठल्या मातीचा बनलाय तू .. एवढा तुझ्या तोंडावर मी अपमान करतेय तरी तू जराही मागे हटत नाहीस "

सिद्धार्थ " अरे तीच तर माझी खासियत  आहे .. मला जर समोरचा त्रास देत असेल ना तर मी जास्त एन्जॉय करतो .. त्याला मी दगड फोडणे असे म्हणतो .. दगडाला पाझर फुटे पर्यंत मी त्याला फोडत राहतो .. लवकरच तुला पण पाझर फुटणार आहे "

आसावरी " इस बार तुम्हारा पाला गलत इन्सान से पडा है .. "

सिद्ध "  हा फोटो  कोणाचा आहे?  .. तुझ्या बहिणीची वगैरे मुलगी आहे ती ?"

आसावरी " प्लिज लिव्ह सिद्धार्थ "

 सिद्धार्थ" ओके .. म्हणजे हा सेन्सिटिव्ह विषय आहे .. ठीक आहे नको सांगुस ... "

आसावरी "तुला काय समजायचे ते समज .. आय डोन्ट केअर .. माझ्या पर्सनल गोष्टी मला लोकांना सांगायला आवडत नाही दयाटस  इट"

सिद्धार्थ "मी मूळचा ... या गावाचा .. तू कुठची आहेस ? आणि तुझ्या घरी कोण कोण असते ?"

आसावरी  उठून बाहेर अंगणात गेली आणि तिचे काम करत बसली "

सिद्धार्थ "अरे वाह .. या सगळ्या घरात  सगळ्यात जास्त पिझन्ट प्लेस जर कुठे असेल तर हे अंगण आहे .. खुप मस्त आहे

आसावरी  एक नाही दोन नाही

सिद्ध "चला म्हणजे मी तुझ्या घरात केव्हाही येऊ शकतो .. निदान माझ्या पासून तुला काही धोका नाहीये हे तर नक्कीच तुला पटलंय म्हणायचे "

आसावरी  "कशा वरून ?"

सिद्ध " तू मी इथे असताना बाहेर बसून आरामात काम करतेयस .. म्हणजे तुला एवढा तर विश्वास आहेच ना .. कि मी काहीही न करणार पाखरू आहे त्यालाच आपण इतके निग्लेक्ट करतो "

सिद्ध ने तिचे आईस क्रिम फ्रिज मध्ये ठेवायला फ्रिज ओपन केला .. आणि फ्रीजर मध्ये ठेवून टाकले

सिद्ध "तुझ्या फ्रिज मध्ये व्हिस्की ची बॉटल आहे .. ती दिसली मला .. तू घेतेस कि काय ?"

आसावरी "तुला काय करायचंय .. तू जा ना तुझ्या घरी .. तुला ऑफिस नाहीये का उद्या ? तूला नसेलही पण मला आहे ...प्लिज जा आता .. मला झोपायचंय "

सिद्ध "ठीक आहे जातो .. हे आईस  क्रिम संपवून टाक .. नाहीतर उद्या मी परत येईन खायला "

 आसावरी "ते तू घेऊन जा आणि उद्या आरामात तुझ्या घरातच खा "

सिद्ध "माझ्या कडे फ्रिज नाहीये ग .. "

आसावरी "मग आता खा अजून एक "

सिद्ध "उद्या खाईन ना .. घाई काय आहे "

आसावरी "मी ते फेकून देईन हा "

सिद्ध "अग  लोकांना अन्न  मिळत नाही .. तुला कसला माज आलाय.. फेकायला "

आसावरी "सिद्धार्थ .. जातोस का आता "

सिद्ध "उद्या येईन काय ? आणि मी नको असेल यायला तर तेवढं आईस  क्रिम खा "

सिद्ध ने दार उघडले आणि निघाला

सिद्ध "दार नीट लावून घे .. आणि निघून गेला "

तो गेल्यावर आसावरी ने दरवाजा लावून घेतला .. आणि सुटकेचा श्वास टाकला

ज्या फोटो ला बघून सिद्ध ने तिला प्रश्न विचारले हो ते  .. त्या फोटो ला हातात घेऊन ती  म्हणाली "गुड नाईट स्वीटू "

आणि त्या फोटो फ्रेम ला तिने हातात घेतले आणि मायेने कुरवाळले आणि छातीशी लावले .

आसावरी एक सिंगल पॅरेण्ट होती .. ती फोटोतली दुसरी तिसरी कोण नसून तिची मुलगी पियू होती .. आसावरी चा जॉब मार्केटिंग चा असल्यामुळे तिला कायमच फिरावे लागत असे .. आणि त्यात मुलगी लहान आणि तिला सांभाळणारे पण कोणी नाही .. कधी कधी तिला बाहेर गावी पण जावे लागत असायचे म्हणून पियू ला पाचगणीच्या एका मोठ्या स्कूल आणि बोर्डिंग ला ठेवले होते .. महिन्यातून एकदा तिला भेटायला ती जायची ..

आत ती सिंगल पेरेंट आहे म्हणजे नवरा आहे का नाहीये ? मेलाय का जिवंत आहे ? का डिवोर्स झालाय .. हे कळेल हळू हळू ..( जसे मला सुचेल तसे मी सांगेन हा तुम्हाला ")

सकाळी नेहमी प्रमाणे ऑफिस ला जायला निघाली .. पण आज तिने सिल्व्हस लेस ब्लाउज .. मस्त कलमकरि  कॉटन साडी ..नेसून गेली

आज तर बघायलाच नको ऑफिस मध्ये माना वळून वळून बघून लोकांच्या मान दुखायला लागल्या .. सुंदर  तर होतीच पण म्हणतात ना परफेक्ट तशी होती .. जे करेल ते परफेक्ट म्हणजे स्टाईल सुद्धा परफेक्ट .. बघणाऱ्या पोरींना सुद्धा हेवा वाटेल अशी ती तयार होयची ..

 पूजा "मॅम .. आज तुम्ही खूप सुंदर दिसताय .. खूप छान तयार  होता तुम्ही "

आसावरी "हमम .. थँक यु ..  "

पूजा "मॅम हि लिस्ट आहे डेड क्लाएंट ची .. आणि हा रिपोर्ट "

आसावरी "ठीक आहे .. मी डिटेल चेक करेन ..आज ४ वाजता आपल्याला xyz लिमिटेड मध्ये जायचंय .. बी रेडी विथ प्रेझेन्टेशन "

पूजा "मॅम .. मी पण येऊ? "

आसावरी "हा काय प्रश्न झाला ? तू मार्केटिंग dept मध्ये काम करतेस आणि मी बाहेर येऊ का ? असे विचारतेस ?"

पूजा "मॅम .. आधीचे सर मला ने त  नव्हते बाहेर "

आसावरी "ते रमन ला घेऊन जायचे ना .. माहितेय मला .. प ण  मला तू बरोबर पाहिजेस .. तुला काही प्रॉब्लेम आहे का ?"

पूजा "मॅम .. तुम्ही बरोबर असल्यावर काय प्रॉब्लेम असणार "

आसावरी "गुड .. मग लाग तयारीला .. उद्या पासून असेच आपण रोज बाहेर जाणार आहोत .. रोज एक क्लाएंट मीटिंग "

पूजा "ठीक आहे .. मॅम  तुमच्या बरोबर काम करायला मज्जा येतेय मला "

 आसावरी "गुड .. "

🎭 Series Post

View all