मराठी कथा : सुखांत भाग २२ अंतिम भाग

happy ending

मराठी कथा : सुखांत भाग २२

क्रमश: भाग २१

इकडे आशुतोष ने पियू ला त्याच्या शहरातल्या घरी नेले .. ती झोपून उठली ..

पियू " गुड मॉर्निंग आशु "

आशुतोष " गुड मॉर्निंग पियू "

पियू " आशु , आपण कुणीकडे आलोय .."

आशुतोष " पियू पियूच्या खऱ्या घरी आलीय "

पियू " म्हणजे  हे माझे घर आहे "

आशुतोष " नाही .. आपले दोघांचे "

पियू " आणि मम्मा .. मम्मा च नाहीये का ?"

आशुतोष " मम्मा च पण आहे .. पण मम्मा ला ऑफिस ला जायचं असते ना तर ती ला हे घर लांब पडते ना .. म्हणून ती ऑफिस जवळ च्या घरी राहते ..

बोल बोलता आशुतोष तिला ब्रश करव त  होता .. तिला अंघोळ घालत होता .. तिला छान फ्रॉक त्याने नवीन आणला त्यातला घालून दिला .. तिला ब्रेड बटर जॅम खायला दिले .. बोर्नव्हिटा टाकून तिला दूध प्यायला दिले .. पियू च्या नॉन स्टॉप गप्पा चालू होत्या .. हा तिला खायला  काय बनवता येईल हे नेट वर बघत होता .. तिचे इकडे कोणत्या शाळेत ऍडमिशन करायचे याचे डिटेल्स काढत होता .. त्याच्या अबसेन्स मध्ये तिला कोणी सांभाळायला बाई किंवा मुलगी मिळेल का ते बघू लागला ...

आशुतोष " पियू .. हि रूम आपण तुझ्यासाठी डेकोरेट करू ? पियू ला कोणती बार्बी आवडते ..का प्रिन्सेस आवडते ते सांग मग आपण तसा  वॉल पेपर लावू .. तसे फर्निचर करू "

पियू " आशु पण .. मम्मा इकडे कधीच येणार नाही का ?"

आशुतोष " येईल ना .. पियू ला भेटायला येणारच ना .. नाही आली तर आपण जाऊ मम्मा ला भेटायला "

पियू च्या  चेहऱ्यावर गोड स्माईल आले .. तिने आशूच्या गळ्यात हात टाकला ..

पियू " आशु .. तुला माहितेय का ? तिकडे हॉस्टेल ला होते ना तेव्हा माझ्या बरोबर माझे डॅड नव्हते म्हणून मला माझे फ्रेंड्स हसायचे .. आता इकडे मम्मा नाही म्हणून मला चिडवतील का ?"

आशुतोष " पण तुझ्याकडे मम्मा तर आहेच ना .. नाहीये कुठे ? त्यामुळे तो प्रश्नच नाहीये "

पियू " सध्या तरी तिला हे पटले होते ..  "

पियू चे निरागस प्रश्न आशुतोषला पेचात टाकत होते .. आणि हे हि लक्षात येत होते कि सिंगल पॅरेण्ट होऊन सगळ्या जवाबदारी पार पाडणे सोपे काम नक्कीच नाहीये "

दोन दिवसन्नी आसावरी इकडे शहरात आली .. तिला पियू ची आठवण तर येत च होती पण आता आशुतोष तिला पियू ची जवाबदारी देणारच नाही हे तिला कळून चुकले होते .. आता पुन्हा मनाने कडक होण्याची वेळ आली होती .. पुन्हा मी जगात एकटी आहे हे मान्य करून आहे त्याला फेस करायची वेळ आली होती .

सिद्ध ने आता तिच्या घरी जाणे सोडले होते .. तिला तिच्या एकांताची चीड यावी आणि तिने एका मोमेन्ट ला आशुतोष कडे जावे असेच त्याला वाटत होते .. तिने तसे केलेही असते पण आशुतोष आता आपल्याला माफ करणार नाहीये हे तर तिला कळून चुकले होते ..

पियू  हॉस्टेल ला राहिलेली त्यामुळे आसावरी आजू बाजूला असण्याची तशी तिला सवय नव्हतीच .. पण दोन एक दिवसातून मोबाईल वर बोलणे होयचे .. दोन दिवस तिचे आशु बरोबर मजेत गेले .. तो पण तिला पाहिजे ते सगळे करून देत होता .. खेळत होता , गप्पा मारत  होता  .. .

आशुतोष किचन मध्ये काहीतरी काम करत असताना पियू ने त्याच्या मोबाईल वरून आसावरी ला फोन लावला

पियू " हॅलो मम्मा .. कशी आहे तू ? तुझ्या डोक्याचा बु झाला तो गेला का ?"

आसावरी भरून आलेला कंठ दाबून " मी बरी आहे स्वीटू ..

पियू "मम्मा .. तू इकडे येणार आहेस का मला भेटायला ? मी इकडे मजेत आहे .. आशु ने माझ्या साठी खूप सारी टॉईज आणलेत .. तो मला छान खाऊ पण करून देतो .. उम्म्म .. आज सकाळीच  मी पास्ता खाल्ला "

आसावरी " अरे वाह .. मज्जा आहे मग एका मुलीची .. त्यांना त्रास नको देऊ हा .. तू गुड गर्ल आहे ना "

पियू " हमम.. तू कधी येणार "

आसावरी " येईन कधीतरी .. माझे ऑफिस चे काम संपले कि येईन .." तिला पुढे बोलावलेच नाही तिने फोन कट केला

तेवढयात आशुतोष बाहेर आला

आशु " पियू .. चला चला गरम गरम पराठा खायचा आता आपल्याला "

पियू " पराठा .. वाव .. वाव .. आशु तुला माहितेय का मम्मा ला पण पराठा आवडतो .. आणि हसत हसत तिने सॉस मध्ये बुडवून एक तुकडा तोंडात टाकला "

आशुतोष .. तिच्या डोक्यावर किस करायचा .. मायेने हात फिरवायचा .. अजिबात चीड चीड नाही .. त्रास नाही .. काय पाहिजे ते स्पष्ट सांगते .. नको ते नको सांगते .. लहान असून केवढी समजूतदार झालीय .. एकटेपण माणसाला समजूतदार बनवते वाटते .... आसावरीच्या सगळ्या छटा त्याला तिच्यात दिसत होत्या .. भडकली कि मग कोणाचं ऐकत नाही .. तेव्हा तिला मी पाहिजे होतो म्हणजे पाहिजेच होतो .. तोपर्यंत रडली ..

इकडे पियू शी बोलल्यावर आसावरी ला खूप बेचैनी आली होती .. घरात वस्तू फेकू लागली .. आदळा  आपट  करू लागली .. काचेच्या वस्तू फुटत होत्या .. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या ..

शेवटी सिद्ध धावत आला " ग काय चाललंय काय ? काय अशी करतेस काय ? "

आसावरी " सिद्ध .. मला पियू आणून दे .. तू सांगशील ते मी करेन .. मला माझी पियू दे .. प्लिज सिद्ध .. मला पियू पाहिजे .. "

तिची हि अवस्था बघून सिद्ध च्या पण डोळ्यात पाणी आले

सिद्ध " सॉरी आशु .. तुम्हाला एकत्र नाही करू शकलो .. आणि तुझी लेक पण तुझ्या पासून लांब गेली .. "

आसावरी  पुन्हा कोलॅप्स झाली होती .. आता जगायची आशा पण राहिली नव्हती .. तेव्हा जरी एकटी होती तरी पियू च्या जवाबदारी मुळे काम करायला बळ मिळत होते ..

सिद्ध " तू परत लंडन ला जा .. आणि या वेळेला खरच IVF करून घे .. तोच तुझ्या जीवनचा  आधार असेल .. मला तर सध्या हेच बरोबर वाटतंय .. पियू ची जागा पियू सारखंच दुसरे कोणीतरी भरून काढेल "

आसावरी  शांत एका कोपऱ्यात डोळ्यात अश्रू घेऊन बसली होती .. सिद्ध चे म्हणणे तिला पटले .. इकडे राहिले तर यांच्या आठवणीने मरून जाईल मी .. तिकडे गेल्यावर जवळ नाहीयेत म्हटल्यावर मन तरी जरा शांत होईल ..

आसावरी ने लंडन ला जायची तयारी केली .. पुढील दोन आठवड्यात तिला तिकडे चांगला जॉब ऑफेर झाला नि तिने जायची तयारी केली ..

जायच्या आधी पियू ला डोळे भरून पाहण्यासाठी म्हणून आसावरी आशुतोष च्या घरी निघाली .. पियू ला खूप सारी खेळणी , खाऊ , घेऊन आसावरी आशुतोष च्या दारावर आली आणि बेल वाजवली

दार उघडल्यावरच पियू ने तिला जाऊन घट्ट मिठी मारली .. आसावरी पण तिला प्रेमाने जवळ घेऊन कुरवाळू लागली '

पियू " मम्मा आली .. मम्मा आली .. आशु .. आशु .. हि बघ मम्मा आली आपल्याला भेटायला "

आशुतोष आत निघून गेला ..

असावरीने तिला उचलून घेतले .. घट्ट छातीशी लावून घेतले ..

पियू " मम्मा तू का रडते .. "

आसावरी " नाही ग स्वीटू .. तुला बर्याच दिवसांनी पहिले ना म्हणून अश्रू येत आहेत "

पियू ने तिला तिची रूम  दाखवली .. " हे बघ मम्मा .. आशु ने माझ्या साठी बार्बी चा स्टडी टेबल आणलाय "

आशुतोष काहीच बोलत  नव्हता

आसावरी " पियू .. मम्मा ला आता ऑफिस च्या कामासाठी खूप लांब जायचंय .. मम्मा आता इतक्यात लवकर भेटायला नाही येणार .. चालेल ना तुला .. तू नीट राहशील ना .. "

तसा  पियू चा चेहरा पडला .. डोळे पाण्याने डबडबले

पियू रडक्या स्वरात " नाही .. तू का लांब जातेस .. मला तुझी आठवण आली तर मग .. तुला नाही का येणार माझि आठवण "

आसावरी " येते ना पिल्लू .. खूप येते ना तुझी आठवण .. म्हणून तर लांब जाते .. कोणाला त्रास नको माझ्या आठवणींचा पण "

पियू ने तिला घट्ट मिठी मारली " नको ना मम्मा .. मला तू पण पाहिजेस .. तू का थांबत नाहीस इथे ? तू इथून कामाला का जात नाहीस .. आशु तर म्हणाला हे घर तुझे पण आहे .. मग तू इकडे का नाही येत "

आसावरी " ठीक आहे चल मी निघते .. काळजी घे हा बाळा .... आनंदात रहा .. आणि त्यांना बाबा  म्हण .. नावाने नको हाक मारुस .. "

आसावरी ने मन घट्ट केले आणि जायला निघाली ..

पियू ने तिला घट्ट पकडले होते " थांब ना मम्मा .. नको ना जाऊ .. आशु .. तू सांग ना थांबायला तिला "

शेवटी आशुतोष बाहेर आला

आशुतोष " रडवलंस तिला .. इकडे आणल्या पासून ती एकदाही रडली नव्हती .. "

आसावरी " सॉरी .. चुकलेच माझे .. चाललेय मी आता लंडन ला .. परत कधी भेट होईल माहित नाही म्हणून आले तिला भेटायला .. आत पुन्हा त्रास नाही देणार.

आशुतोष ने पियू ला उचलून घेतले " पियू मम्मा ला बाय कर .. तिला लंडन ला जायचंय .. "

पियू ने आशुतोष च्या खांद्यावर मान टाकली आणि जोरात रडू लागली .. " नाही .. तू थांबवं तिला .. तू थांबवं तिला मला पाहिजे ती "

आशुतोष " मग तू जातेस का ? तिच्या बरोबर ?"

पियू " नाही .. मला तू पण पाहिजेस .. तू म्हणालास ना हे घर माझे आहे म्हणून "

आशुतोष " मम्मा  ला काम आहे बेटा .. तिला जायचंय .. तू बाय  कर तिला "

आशुतोष तिला मुद्दामून तू थांब म्हणून बोलत नव्हता .. तिचा निर्णय तिने घ्यावा असेच त्याला वाटत होते ..

आशतोष ने पियू ला खाली ठेवले ..

आसावरी " आता ती इथे थांबणार नाही .. तू हिला पण घेऊन जा तुझ्या बरोबर .." आणि तो बेडरूम मध्ये निघून गेला

पियू धावत आसावरी कडे गेली ...

आसावरी " चल येते ना .. आपण जाऊ .. "

पियू " नाही .. तू नको जाऊ .. तू इकडेच थांब .. आपण इकडेच थांबू .. हे माझेच घर आहे .. तू माझ्या घरात थांब "

थोड्या वेळाने बाहेरचा रडायचा आवाज थांबला .. एकदम थांबला .. आशुतोष ला कळले कि आसावरी तिला घेऊन गेलेली आहे .. भरल्या डोळ्यांनी त्याने दार उघडले आणि बाहेर हॉल मध्ये आला .. पियू ची खेळणी इकडे तिकडे पडली होती .. एकेक खेळणे तो उचलत होता आणि त्याच्या छातीशी लावत होता ..

सोफ्यावर डोक्याला  हात लावून बसला होता ..

डोळ्यातून घळघळ पाणी येत होते .. पियू च्या खेळण्यांना कवटाळून लिटरली त्याचा इमोशनल बर्स्ट झाला होता ..

तेवढयात पियूच्या हसण्याचा आवाज आला आणि आशु तिच्या रूम कडे धावत गेला .. तर आसावरी आणि पियू बॉल ने दोघी खेळत होत्या ..

पियू खूप खुश दिसत होती .. आणि आनंदाने उड्या मारत होती ..

पियू ने आशुतोषला बघितले

पियू " आशु .. आशु .. तू पण ये ना खेळायला .. आम्ही दोघी किती मजा करतोय .. "

आशु ने आसावरी कडे पहिले   आणि त्याच दाराला उलटा मागे डोके ठेवून शांत बसला ..

आसावरी " मला पियू ने सांगितलंय कि हे तिचे घर आहे .. तिच्या घरात मी थांबले तर चालेल .. चालेल ना .. "

आशुतोष " तुझा माझ्यावर विश्वास असला तर थांब .. "

आसावरी " सॉरी ना आशु .. माझे चुकले ,, प्लिज मला माफ करा .. मी तुमच्या दोघांशिवाय नाही जगू शकणार "

आशुतोष च्या डोळ्यातून पाणी आले ..

आसावरी ने तिच्या हाताने त्याचे डोळे पुसले .. " सॉरी "

आशुतोषने  तिला आणि पियू ला एकदम मिठीत घेतले ..

खेळून खेळून पियू झोपायला आली .. आज पियू खरोखर खूष होती . लहान पणा  पासून तिने मम्मा आणि बाबा दोघांना एकत्र एका घरात कधी पहिलेच नव्हते .. आज तिचे स्वप्न पूर्ण झाले होते ..

तिला झोप आली म्हणून आसावरी तिला बेडवर  कुशीत घेऊन पडली .. तरी ती आशुतोषकडे बघत  होती.. आशु “ तू पण येना माझ्या बाजूला "

आशुतोष  पण तिच्या एका साईडला झोपला आणि तिला थोपटू लागला

आसावरी पण तिला थोपटत होती .. पण तिची नजर आशुतोष कडे होती .. दोघे एकटक दोघांना बघत होते .. तिला त्याच्याशी खूप बोलायचे होते .. तिची अस्वस्थता त्याला दिसत होती पण तो हि शांत एकटक तिला बघत होता .. बघत बघता दोघेही पियू ला प्रेमाने थोपटत होते ..  पियू शांत झोपून गेली ..

जशी पियू झोपली तसा आशुतोष तिथून उठला आणि बाहेर जाऊ लागला ..

ती थांबलीय त्याच्या एक क्षण आनंद तर त्याला झाला होता हे नक्कीच होते पण नक्की कसे वागावे .. काय बोलावे दोघांनाही काहीच कळत नव्हते .. भावनांची  घुसमट होत होती मनात ..

आसावरी " मला बोलायचं होते थोडे "

आशुतोष दारातच थांबला " मला वाटतं .. खूप थकलीय तू .. असे वाटतंय खूप दिवसात शांत झोपली नाहीयेस .. आज थोडा अराम कर .. मग बोलू "

आसावरी " नाही .. जो पर्यंत मनातला विचारांचे वादळ संपणार नाही तो पर्यंत झोप नाही येणार .. एकदा झोपले कि मग लवकर उठणार नाही मी .. पाच वर्षे आठ  महिने .. १७ दिवसांची झोप बाकी आहे माझि"

आशुतोष " म्हणूनच म्हणतोय थोडा वेळ झोप मग बोलू .. "

आसावरी बेड वर पडल्या पडल्याचं रडू लागली .. दुसरीकडे तोंड करून रडू लागली

आशुतोष " प्लिज रडू नकोस .. आता तुला कळलंय ना तू जो माझ्या विषयी विचार करत होतीस तो चुकीचा होता .. का अजून काही शंका आहे मनात "

आसावरी " तुमच्या मनात पण असतीलच ना माझ्या विषयी शंका .. शेवटी मी पाच वर्ष लांब होते तुमच्या पासून "

आशुतोष " माझ्यात आणि तुझ्यात हाच फरक आहे.. माझ्या मनावर माझा ताबा आहे .. माझ्या मनात असल्या शंका कुशंका येतच नाहीत .. "

आसावरी " मी चुकले .. मला प्लिज माफ कराल का ?"

आशुतोष " माझे पाच वर्ष , आठ महिने .. १७ दिवस आणि  १६ तास परत देउ शकशील  तू ?"

आसावरी " सॉरी " रडतच

आशुतोष " एकदा पण माझा विचार आला  नाही का ग तुझ्या मनात ..  मी कसा जगलो असेल .. मी कसा तडपडत असेल तुला जाणवलं पण नाही का ?"

आसावरी " खूप जाणवायचं .. माझाही श्वास कोंडून यायचा .. असे होयचं .. तुमची आठवण जाण्यासाठी डोकं आपटून घेऊ का का काय करू ?"

आशुतोष " आता सुद्धा पियू ला इकडे आणून आज ८ दिवस झाले .. इतका कसला विचार करत होतीस .. सॉरी बोलायला यायला पण तुझा इगो मध्ये येत होता का ?"

आसावरी " इगो .. कसला इगो .. तुम्ही पण त मी नसले तरी चालणारच होते ना तुम्हाला .. त्या दिवशी ,माझे आणि सिद्ध चे लग्न लावायला निघाले होते ना तुम्ही "

आशुतोष " अच्छा .. म्हणजे एवढं होऊन सुद्धा चूक माझीच नाही का ?.. तू मला सॉरी बोलायच्या  आधी तुझा माझ्यावर विश्वास आहे कि नाही याची गॅरंटी मला तरी नव्हती .. मग काय करायला  पाहिजे होते मी .. आणि पोटच्या पोरीला असे सोडून लंडन ला निघाली होतीस .. हा कुठला न्याय .. हे कसले वागणे ? तुला शाबासकी देऊ का त्याची ?"

आसावरी " मला मी नक्की काय करू ते सुचतच नव्हते .. इथे राहून तुमच्या दोघांपासून वेगळे राहणे मला झेपत  नव्हते "

आशुतोष" मग इकडे यायला काय झाले होते ? तेच तर ना म्हणून म्हटले इगो मध्ये येत होता का ?"

आसावरी " मला वाटले कि तुम्हला मी नको असेल तर .. पियू च्या अस्तित्वा विषयी काही शंका असेल तर .. माझ्या चारित्र्या विषयी .. "

आशुतोष " कानाखाली देऊ का ग तुझ्या ? कोणत्या जन्माचा बदल घेतेय तू माझ्या कडून .. का मला त्रास देतेय तू ? ज्या  क्षणी तुला पहिले त्या क्षणी तुझ्या प्रेमात पडलो त्याचा इतका बदला घेतेस का तू ?"

आशुतोष" मला काहीही एक्सप्लनेशन नकोय .. तुझ्यावर माझा विश्वास आहे .. तरी पण तुला मला सांगून बरे वाटणार असेल तर सांग

आसावरी " त्या दिवशी मी कॉलेज मध्ये गेले .. दोन चार दिवस हॉस्टेल लाच राहिले .. मग  प्रिन्सिपॉल मॅडम नि मला त्याच्या घरी आसरा दिला .. त्या पण एवढ्या मोठ्या घरात एकट्या होत्या .. त्यांनी मला मनाला आधार दिला .. मला  त्यांनी एक लंडन युनिव्हर्सिटी ची एक्साम द्यायला सांगितली आणि माझा अभयस पण त्यांनी घेतला .. मी ती परीक्षा दिली आणि मला लंडन युनिव्हर्सिटी ला स्कॉलरशिप मिळाली .. जाण्यासाठी पैसे लागणार होते .. मी आमच्या फॅमिली वकिलांनी फोन केला आणि त्यांना सांगितले कि मला पैशांची गरज आहे .. आमचे घर विकून पैसे येतील ते मला द्याल का ? तर ते मला म्हणाले कि ते घर आता आशुतोष च्या नावावर आहे .. पण ते मला म्हणाले .. बाबांच्या नावाच्या इंशुरंन्स पॉलिसी ची नॉमिनेशन मी आहे .. तर त्यांनी मला सांगितले आठ दिवसन्नी ये मी तुला त्याचे  पैसे मिळवून देतो .. आठ दिवसांनी मी गावी आले होते .. वकिलांच्या घरी जाताना आपल्या घरावरून  गेले तर घराला मंडप घातला होता .. मी वकील काकांना  विचारले .. काका काय प्रोग्रॅम आहे कळला का ? तर ते मला म्हणाले आशुतोष चे दुसरे लग्न आहे .. नंतर म्हणले आधी अश्विनी चे आहे आणि नंतर त्याच मांडवात आशुतोष चे पण लावणार आहे हे कळले ..

दुःखावर दुःख असे सगळे माझ्या डोळ्या समोर येत होते .. मला हरवून एक महिना पण पूर्ण नव्हता झाला तर आशुतोष दुसरे लग्न करत आहेत हे पचायला किती कठीण होते  मला .. काय सांगू ? मेल्या हुन मेले होते .. हतबल झाले होते परिस्थिती समोर ..

तशीच पुन्हा मॅडम कडे आले आणि त्यांनी मला लंडन ला पाठवण्याची सगळी तयारी करून दिली .. असे वाटले बाबा मरून गेले पण मला  नॉमिनी ठेवल्या मुळे माझि निदान लंडन ला जायची सोय झाली होती .. लंडन ला पोहचले .. तिकडचा  अभ्यास सुरु झाला .. आणि मला लगेचच कळले कि मी प्रेग्नन्ट आहे .. तुमच्या लक्षात आहे कि नाही मला माहित नाही पण माझ्या एका कठीण पेपर चा  अभ्यास झाला होता तरी मला भीती वाटत होती म्हणून मी रडत होते तेव्हा आपण एकत्र आलो होतो ..

आशुतोष " तुला असे वाटते का .. कि हा खास क्षण मी विसरून जाईल "

आसावरी " मी आणखीनच कोलॅप्स झाले .. . काय करू ? काहीच कळे ना .. माझि रूम मेट मला  डॉक्टरकडे घेऊन गेली ..  मी ठरवले कि हेच बाळ मला जगण्याला अर्थ देईल .. मला दिशा देईल .. आणि त्याच्या ओढीने मी at  लिस्ट जगू तरी शकेन .. मग तिकडेच डिलिव्हरी झाली .. छोटोशी पियू नर्स ने माझ्या हातात दिली .. किती आनंद होता .. पण मी एकटी होते . माझा  आनंद शेअर करायला पण माझ्या याबरोबर कोणी नव्हते .. मग मी आणि माझि मैत्रीण दोघींनी मिळून पियू ला संभाळायचो .. शिक्षण करायचो .. मग तिकडेच मला जॉब लागला .. आणि तिथून माझे दिवस पालटले .. पियू ला डे केअर मध्ये ठेवावं लागायचे .. पण संध्याकाळ आमच्या दोघींची असायची ..  पियुला बघितल्यावर माझि सगळी दुःख पळून जायची .. सगळा  शिणवटा निघून जायचा .. पण तुमची आठवण मात्र येत राहायची .. जेव्हा जेव्हा आठवण यायची  तेव्हा तेव्हा मी पाहिलेलं मला सगळे आठवायचं आणि मी बेचैन होऊन जायची ..

मग माझी ट्रान्फर इंडियात झाली मी दोन वर्ष बंगलोर मध्ये होते .. आणि गेल्या महिन्यात इकडे आले .. तर तिकडे सिद्ध माझा शेजारी म्हणून भेटला .. आणि नंतर तुम्ही .. हा  माझा पाच वर्षांचा इतिहास आहे ..

आसावरी उठली आणि त्याचे पाय पडकले " सॉरी .. सॉरी.. मला तुम्हाला त्रास नसतो द्यायचा पण आता काय करू ? होऊन गेली ती चूक ... नाही मी जगु शकत तुमच्या शिवाय आणि पियू शिवाय .. प्लिज मला सोडू नका .. प्लिज मला एकटीला नाही झोप लागत .. माझा आत्मा  तळमळतो ... एकटीने नाही जगू शकणार मी .. एकतर मला या जगण्यातून मुक्त करा नाहीतर या त्रासातून  मुक्त करा ..

आसावरी ला पॅनिक अटॅक च आला होता .. काय बोलतेय ? काय  करतेय ? काही कळेना .. आणि दोन मिनिटात तिथेच तिला चक्कर आली .. आणि बेशुद्ध झाली

आशुतोष ने तिला हातावर  उचलून पटकन बेड वर ठेवले .. तोंडावर पाणी मारू लागला ..

आशुतोष " आशु ... आशु .. काय होतंय ..आशु .. .. "

शेवटी त्याने घरी डॉक्टर बोलावले .. त्यांनी तिला पटकन एक इंजेक्शन दिले .. बीपी शूट झाला होता ..  आराम करायला लावला ..

आशुतोष लिटरली डोक्याला हात लावून बसला होता .. विचार करू लागला .. काय करावे आणि  कसे वागावे हेच कळेना .. आत काय  गरज होती का हा विषय  काढायची  तिने .... मी पण तिला कोंडीत पकडायला नको होती .. थांबायला तर मला पण ती हवीच आहे ना .. मग आत माझा इगो मी मध्ये आणतोय का ? यार  इगो काय आहे ..एवढा पण रागवायचा  हक्क नाहीये का मला .. पण ती खूप मेंटल स्टेस मध्ये आहे .. थोडे सबुरीने घ्यायला पाहिजे "

तेवढ्यात दाराची बेल वाजली

आशु ने दार उघडले तर समोर सिद्धार्थ

अरे सिद्ध तू इकडे

सिद्ध " घ्या .. हे सामान घ्या आत आधी .. तुमच्या बायकोने मागवलं आहे "

आशुतोष " म्हणजे ?"

सिद्ध " म्हणजे काय ? तुम्हला बोलली नाही का ती .. ?"

आशुतोष " नाही .. काहीच नाही "

सिद्ध " तुम्ही दोघे नवरा बायको अजब प्रकरण आहे बाबा "

आशुतोष " बोल ना काय ते "

सिद्ध " तिने तिचं ते घर सोडलंय .. मागून सामानाचा ट्रक येतोय .. मी महत्वाचे माझ्या बरोबर घेऊन आलोय "

आशुतोष च्या चेहऱ्यावर गोड हसू आले  " सगळे निर्णय असे गाढवा सारखेच घेते .. "

सिद्ध त्याला हसताना बघून " ओ .. आनंद सोहळा मग साजरा करा .. सामान आत घ्यायचे बघा ..

आशुतोष " तू ये ये .. आता बस .. मी त्या वॉचमन ला बोलवतो तो घेईल आत "

सिद्ध आत आला बसला .. " कुठे आहे कुठे तुमची बायको आणि तुमची लेक "

आशुतोष " दोघी झोपल्यात "

सिद्ध " अरे यार तुमच्या दोघांचे काय खरं नाही  .. इतक्या दिवसांनी भेटलात तर मला वाटलं मी डिस्टरब करतो  कि काय ?"

आशुतोष " विसरू नकोस मी तुझा बॉस आहे ते "

सिद्ध " बॉस ऑफिस मध्ये हो.. इथे कुठे .. इथे तुम्ही माझ्या मैत्रणीचे मिस्टर आहेत .. आणि एक आता तिला जास्त छळू नका .. तू असे का केले नि तसे का केले .. मस्त मिठीत घ्या .. किशी बिशी द्या .. एकदम नॉर्मल होईल वातावरण .. नाहीतर बावळटा सारखे भांडत बसाल .. ती एक रडू बाई नुसते सगळे दुःख आत ठेवते .. मोकळी करा तिला जरा .. चोक अप झालाय भावनांचा .. तर प्रेमाने तो मोकळा करा .. तुम्हाला पण तीच ट्रीटमेंट आहे नाही का ? "

आशुतोष ने सिद्ध ना एक कडकडून मिठी मारली .. "तुझ्या लायकीच्या बाहेर जाऊन तू खूप बोलतोस पण कधी कधी चांगले बोलतोस .. "

सिद्ध " यात पण शिव्या घाला .. असो .. पटलं ना मी सांगितले ते "

आशुतोष " तुझी गर्लफ्रेंड आहे का ? आपण आज सगळे बाहेर पार्टी ला जाऊ "

सिद्ध " हमम .. मुख्य प्रश्न बाहेर आला .. नाही अजून गर्ल फ्रेंड नाहीये .. माझ्या सारखा  मुफट मुलगा कोणाला नाही आवडत .. सगळ्यांना गुळाची ढेप हवी असते ."

आशुतोष " तशी एक मुलगी आहे माझ्या नजरेत तुझ्यासाठी .. तिला तू आवडत असावास ... कदाचित .. "

सिद्ध " हो .. मलाही अंदाजच आहे .. पण माझि चांगली मैत्रीण आहे ती .. उगाच प्रेमाच्या नादात मैत्री तुटायची भीती वाटते मला "

आशुतोष " तिला बोलावं संध्याकाळी .. आपण आज सेलेब्रेट करू .. "

सिद्ध " ठीक आहे .. चला मग आता मला जायला हवे .. "

आशुतोष " का ? आसावरी ला भेट ?'

सिद्ध " नाही आता .. ती येणार म्हटल्यावर मी छान दिसलो पाहिजे नाही का ? जातो जरा तयारी करतो .. बघतो च्यायला आज प्रोपोजच करून टाकतो "

आशुतोष " ठीक आहे .. मी हॉटेल ची बुकिंग करतो मग "

सिद्ध निघून गेला .. पण आशुतोषला कुठून सुरुवात करू ते  सांगून गेला ..

आशुतोष ने पियू च्या रूम मध्ये डोकावून पहिले .. तर गाढ झोपली होती ..

इकडे दुसऱ्या बेडरूम मध्ये आला तर सेम त्याच पोझिशन मध्ये आसावरी पण झोपली होती ..

आशुतोष तिच्या बाजूला जाऊन पडला .. आणि सिद्ध चे वाक्य आठवून त्याला हसू आले .. मनात विचार करू लागला .. हे मी आधीच करायला पाहिजे होत ..असा विचार करतच त्याने तिला त्याच्या मिठीत ओढून घेतले .. तिचे डोळे जरी मिटले होते तरी त्याचा स्पर्श तिला जाणवला होता .. आणि ती पण हक्काने त्याच्या कुशीत शिरली .. त्याच्या कुशीत जाताच .. डोळ्यातले अश्रू बाहेर येऊ लागले .. "

आशुतोष " बास .. बास आता अजिबात रडू नकोस .. "

मनं  जुळली ना कि एकरूपता आपोआप येते ... दोघांनी एकमेकांच्या  स्पर्शातूनच माफी मागितल्या .. एकमेकांवरचे प्रेम सिद्ध केले .. आणि आपला पाच वर्षांचा आलेला स्ट्रेस घालवून टाकला ..

शांती .. सुकूंन ... समाधान प्रेम आणि .. आणि काय ?आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास .. जिथे असतो तिथे सगळ्या दुःखाचा अंत होतो म्हणजेच सुखांत सुरु होतो ..

-----

आज त्याच्या गावच्या घरी सत्य नारायणाची पूजा आहे .. घरात प्रसन्न वातावरण .. दाराला केळीचे खांब लागले .. अंगणात छोटा मंडप ..

घरात बरीच पाहुणे मंडळी आली होती

सिद्ध त्याची गर्ल्फ्रेन्ड अर्थातच पूजा , सोनल .. सोनल चा नवरा अश्विन (आशु )आई ,बाबा , अमित त्याची बायको .. अश्विनी तिचा नवरा तिची मुले .. केतन केशव सगळे छान कपडे घालून मस्त तयार आहेत .. पियू ला मस्त परकर पोलका घालून छान तयार केलीय .. आशुतोष ने शेरवानी घातलीय आणि एकदम गबरू दिसतोय .. आणि आसावरी ... तिने आशु ने तिला आणलेल्या साडीचे उदघाटन केले होते .

घर आणि घरातील सगळे मेंबर खूप खुश होते .. आनंदी होते समाधानी होते  एकत्र होते आणि कुटूंबातील प्रत्येक सदस्य तिथे होता आणि सत्यनारायणाची पूजा घालून हा सोहळा ते हसत खेळत साजरा करत होते..कुटुंबातील प्रत्येक नात्याचे एक महत्व असते आणि त्याची मान मर्यादा आपणच सांभाळावी लागते .. हे धागे विरळ न होता एक दुसऱ्याला जोडून अजून कसे मजबूत बनतील याकडे लक्ष द्यायला लागते . सगळ्यांना एकत्र जोडणारा दुवा जर कोणी असेल तर प्रेम आणि विश्वास .. हे दोन भक्कम खांब ज्या घरात आहेत त्या घराचा पाया मजबूत असतो आणि माया भक्कम असते .. मग कितीही मोठे वादळ येऊ दे नाहीतर भूकंप येऊ दे त्याचा  जरासा परिणाम होईल पण पुन्हा पूर्ववत  होयला वेळ लागत नाही .

https://www.youtube.com/watch?v=_0SeFP1Y2ws&ab_channel=JitendraRajbanshi

 समाप्त!!!

ईराचे  आणि वाचकांचे आभार !!

कथा कशी वाटली ते नक्की सांगा ..

🎭 Series Post

View all