मराठी कथा : सुखांत भाग १९

in this part asavri is telling what happend to them

मराठी कथा : सुखांत भाग १९

क्रमश: १८

वाचकांना कॉन्फ़्युज होतंय का ? आसावरी अश्विनी बरोबर बाहेर पडवीतल्या झोपाळ्यावर बसलीय आणि तिच्या भूतकाळात डोकावतेय .. आता नक्की काय झाले ते कळायला भूतकाळात जावेच लागतय ..

क्रमश : भाग १८

अश्विनी " वाहिनी , पुढे काय झाले ? सांगशील का ? काय असे घडले तुमच्या सोबत

आसावरी " हो सांगते '

अग , कॉलेजला जाताना येताना माझ्या बरोबर एक मैत्रीण असायची .. तिचे नाव सोनल होत .. रोज आम्ही  एकत्र  अभ्यास करायचो .. कधी ती माझ्या बरोबर आमच्या रूम वर पण यायची . ती  तिकडे शहरात राहिलेली , लहानाची मोठी झालेली त्यामुळे एकदम बिनधास्त होती .. पण स्वभावाने खूप चांगली होती .. मला तिचा खूप सपोर्ट होता .. तिच्यामुळे मला एक चांगली मैत्रीण मिळाली होती.

एकदा सोनल घरात असताना आशुतोष  कामावरून घरी आले  . मी  तिघांना चहा केला . आशुतोष पण त्याच

त्यांच्या रुम मध्ये जाऊन फ्रेश होऊन बाहेर आले.

सोनल आणि मी किचन मध्ये दोघी एकमेकींशी बोलत चहा करत होतो .

सोनल ने आशुतोषला बघितले आणि माझ्या  कानात म्हणाली " तुझे मिस्टर कसले हॉट आहेत ग "

मी  " गप ए असे काही बोलू नकोस .. त्यांनी ऐकले तर ओरडतील तुला पण आणि मला पण "

त्यावर सोनल " यु जेलस .. मी काय तुझ्या नवऱ्यावर डोळा ठेवून नाहीये .. आता ते  आहेच हॉट तर काय करायचे ? आणि तिने ते हसत उडवले

मी  " गप .. ग असले काही बाही बोलत नको जाऊस तू माझ्या समोर .. मला नाही आवडत”

सोनल " सॉरी .. सॉरी .."

मला  मनातून खूप जेलस फील होत होते . आशुतोष फक्त माझे आहेत आणि बाकी कुणी त्याच्याबद्दल असे बोललेलं मला आवडेनासे झाले. मनात मात्र त्यांना पाहून ख़ुश होयची .. हा समोर असलेला माझा आहे या विचाराने मन हवेत उडायचे ..कधी कधी त्यांना समोर बघितले कि पोटात फुल पाखरे उडतात कि काय असे होयचं ..  अभ्यास करताना पण मला  सारखे आशुतोष कडे बघावेसे वाटायचे .. 

अशातच एकदिवस आशुतोषला  बाबांचा फोन आला कि माझे  बाबा फायनल स्टेज ला आहेत .. तुम्ही एकदा भेटून जावा . लगेचच आम्ही दोघे  गावी आलो  .. मला   माहीतच नव्हते कि बाबांना लंग्स कॅन्सर आहे ..

बाबांच्या उशाशी बसून  मी रडत होती .. " बाबा .म्हणून तुम्ही माझे लवकर लग्न लावून दिलेत .. तुम्ही आजारी आहेत मला सांगितलेत  पण नाही  "

असावारीचे बाबा " काय सांगून करणार होतो .. पण आता मला कसलेच टेन्शन नाहीये .. तू एका  चांगल्या कुटुंबात पडली आहेस .. पोरी नशीब काढलस बघ .. किती जीव लावणारे सासू सासरे आहेत आहेत .. मुळात आशुतोष खूप चांगला  मुलगा आहे .. तू त्याच्या बरोबर सुखी आहेस .. तुझी प्रगती होत आहे हे पाहून खूप आनंद होतोय मला ..

तेवढ्यात आशुतोष डॉक्टरांशी बोलून आले 

आसावरीचे  बाबा  आशुतोष ला "  माझ्या लेकीची काळजी घ्या .. तिला सांभाळून घ्या .. माझ्या मागे कोणच नाही तिला "

आशुतोष " बाबा .. तुम्ही आता जास्त  बोलू नका... आराम करा .. बघू .. आसावरीची काळजी करू नका .. "

माझ्या  बाबांनी माझा हात आशुतोष च्या हातात दिला आणि पुढील काही मिनिटातच  बाबा गेले ..

आता माझे   माहेरचं संपले होते .. एका कोपऱ्यात बसून रडत बसली .. खूप एकटं वाटत होतं मला  .... आता माझ्या  बाजूने बोलणारे कोणी नाही .. माझि  काळजी करणारे कोणी नाही .. अशा विचार येत होते .. आशुतोष जावइ म्हणून त्यांना  बाकी सगळ्या गोष्टी बघाव्या लागत होत्या .. माझ्या कडे  बघायला त्याना  वेळच नव्हता .. शेवटचे दर्शन घेऊन मी  रूम मध्ये रडत बसली होती .. आशुतोष अंत्यविधी करून मला भेटायला  आले  ..

माझ्या  जवळ आले  .. मला घट्ट मिठीत घेतले त्यांनी  पहिल्यांदा ... मी  पण त्यांच्या मिठीत रडून घेतले .. आज त्याचा हा आधार माला खूप मोठा वाटत होता.

आशुतोष " मी आहे ना .. .घाबरु नकोस .. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर .. माझे अख्खे कुटुंब तुझे आहे .... तुला कधीच एकटे पडून देणार नाही आम्ही .. " आणि  मायेने हात डोक्यावरून हात फिरवत होते  .. माझे  डोळे पुसत होते .. पण माझे  रडणे थांबतच नव्हते .. खूप डिस्टरब झाली होती ..

थोडे दिवस गावीच राहिले .. आणि मग पुन्हा दोघे शहरात आलो  .. मला  कॉलेजला जायला ईच्छाच होयची नाही .. रात्री मला  माझ्याच नेहमीच्या रूम मध्ये एकटे झोपायला भीती वाटू लागली .. एक प्रकारची बेचैनी यायची .. दरदरून घाम यायचा .. असे वाटायचे या जगात मी एकटी आहे ..

यांनी सोनल फोन करून एक दिवस घरी बोलावले .. उद्या पासून हिला कॉलेज ला घेऊन जा .. जरा  लक्ष ठेव तिच्याकडे .. अशा तिला सूचना दिल्या .. आणि सोनल रोज माझ्या बरोबर जायची .. यायची .. हसवायची .. मग हळू हळू मी पुन्हा थोडी नॉर्मल होऊ लागले.. होते ..

एक दिवस माझे  कॉलेज मध्ये लक्षच नव्हते .. कधी एकदा लेक्चर्स संपतात आणि घरी जाते असे मला झाले होते

सोनल " काय ग .. आसावरी .. आज काय नवऱ्याची आठवण येतंय कि काय ? आज अभ्यासात लक्ष नाहीये तुझे ?"

आसावरी " हो ना ग .. अग  आज ह्यांचा वाढदिवस .. काहीतरी स्पेशल तर करायचंय पण काय करू ते समजत नाहीये "

सोनल " अरे यार .. हम है तो क्या गम है .. एक काम करू ? आपण जाताना केक च सामान घेऊन जाऊ .. थोडेसे डेकोरेशन चे सामान घेऊन जाऊ .. आणि तुझे मिस्टर .. मुद्दामून मी त्यांना मिस्टर म्हटलंय बरं का .. ते यायच्या  आधी तयारी करून ठेवू "

आसावरी " ठीक आहे .. पण मला केक बनवता येत नाही .. अग मी बनवून देईन तुला .. तू घराचे डेकोरेशनच बघ .. केक कट करा आणि डिनर ला  बाहेर जा तुम्ही दोघे .. मग काय झालाच कि स्पेशल "

दोघींनी  मिळून छान केक केला .. मी घर सजवले .. रोझेस , पेटल्स , कॅण्डल्स , बलून्स .. सगळे लावून रेडी .. आणि आशुतोष यायच्या आधी छान ड्रेस घालून रेडी "

सोनल " अरे यार .. आसावरी .. ड्रेस कशाला घातलास .. छान साडी घालयचीस ना .. अजून स्पेशल वाटले असते "

आसावरी " नको अग .. एकदम जास्त पण नको ..मला  साडी वगैरे नेसता हि येत नाही आणि आवडत पण नाही .. "

सोनल " येडीच आहेस .. बरं .. ठीक आहे केक तयार झालाय .. मी निघते काय ?"

आसावरी " अरे आता निघते काय ? ते येतीलच ना .. मग केक कट झाल्यावर जा ना "

सोनल " ए मी कशाला थांबू .. कबाब मी हड्डी .. तुम्ही दोघे एन्जॉय करा ना "

सोनल निघालीच .. दार उघडले तर समोर आशुतोष हजर

आशुतोष आत बघताच त्यांना  दिसले कि छान तयारी केलीय .. "

सोनल " अरे .. मिस्टर आशुतोष आले तुम्ही .. विष यु हैप्पी बर्थ डे .. असे म्हणून सोनल ने आशुतोषला एक हलकी मिठी मारली .. "

आशुतोषला पण तिची हि ऍक्शन जरा अनपेक्षितच होती ..

सोनल आशुतोष च्या कानात " तिला साडी नेसायला लावा .. मी सांगते तर नेसत नाहीये " बोलली आणि सोनल घरा बाहेर पडून निघून पण गेली .हे ऐकून  आशुतोष एकदम गोड हसले ..

मला वाटले कि सोनल यांच्या कानात ते खूप हॉट आहेत असे बोलली आणि म्हणून हे हसले .. माझा तर सगळा  मूडच गेला होता .. मी समोर असताना माझ्या समोर तिने यांना चक्क मिठी मारली होती आणि हे पण दात काढून हसत होते तिच्या कडे बघून . पण आज त्यांचा वाढदिवस म्हणून मी गप्प बसले पण कुठेतरी मनात ते सारखे सलत होते .. नक्की कशाचा  राग येतोय तेच कळेना .. आणि का येतोय तेही कळे ना .. सोनल चा का ह्यांचा ? कि माझ्या  समोर तिने ह्यांना मारलेल्या मिठीचा .. खूप अस्वस्थ वाटत होते .. कसे बसे यांना ओवाळले आणि सोनल आणि मी केलेला केक कापला .. त्यांना केक भरवला आणि त्यांनी मला केक भरवला ..

त्यांना केक खूप आवडला .. त्यांनीच सिनेमाची तिकिटे काढून आणली होती .. मग आम्ही बाहेरच पावभाजी खाल्ली आणि सिनेमा बघायला गेलो .. रात्री झोपताना शेवटी मी त्यांना विचारलेच

मी " अहो , ते सोनल ने तुमच्या कानात काय सांगितले ?"

आशुतोष हसायला लागले .. अच्छा तर हे डोक्यात आहे मगाच पासून बघतोय कि अस्वस्थ वाटतेय .. "

मी " मला तिने तुम्हाला असे विष केले ते अजिबात नाही आवडले .. आणि तुम्ही लगेच तिला तुमच्या मिठीत का घेतले ?"

आशुतोष " अग  ए .. मी कुठे ? काहीही काय ?"

मी " मग हसत का होते ? काय बोलली ती ?"

आशुतोष " काही नाही ते माझे आणि तिचे सिक्रेट आहे "

आता मात्र रडायला यायला लागले .. माझ्या पासून लपवत  का आहेत .. स्वतःहून सांगायचे ते राहिले बाजूला आणि आता मी विचारतेय तर सांगत पण नव्हते .. आपली वस्तू कोणीतरी हिरावून घेतल्या  असे मला वाटू लागले होते .. सोनल कशी एकदम मेक अप , नेलं पेंट्स .. लांब केस .. टिकली .. कानातले सगळे घालायची .. आणि मी तिच्या विरुद्ध .. मला ना नटायची  आवड , ना कधी कानातले .. ना कधी टिकली .. माझे  केस तर किती लहान असायचे .. मी स्वतःला आरशात बघू लागले .. असे वाटू लागले ह्यांना मी आवडत असेल ना .. मी अशी टिपिकल मुलीसारखी वावरत नाही .. आणि अजून नवरा बायको सार खे आमचे नाते पण नव्हते ..

त्या दिवशी त्यांनी मला पहिल्यांदा त्यांच्या जवळ घेतली.. त्याच्या मिठीत मला जणू स्वर्ग सुखच वाटत होते .. त्याच्या स्पर्शात मन तृप्त होत होते ..

आशुतोष " मग आत आज पासून तू इकडे का येत नाहीस झोपायला .. "

मी " मला झोप येत नाही एकटीला .. मी इकडे आले तर चालेल का ? बाबा गेल्या पासून एकटिला झोपायला भीती वाटते "

आशुतोष " मग कसला विचार करतेस .. यायचेस ना .. मी हि वाट बघतोय कि तुला कधी तुला माझ्या जवळ यावेसे वाटेल त्याची .. मला वाटत आता ती वेळ आली आहे ..  तुला असे जेलस फील झालेले बघून मला हसू पेक्षा आनंद होतोय ..

माझ्यातला होणारा बदल त्यांना हि जाणवत होता .

रात्री मी  आशुतोष च्या रूम मध्ये यायला लागली ... त्यांच्या  कुशीत मला सेफ वाटायचे .. हळू हळू त्याच्याच जवळ झोपू लागली ..

 मला म्हणाले " नको तो विचार  करत बसू नकोस .. आता अभ्यासावर लक्ष दे .. दोन महिन्यांनी  तुझी फायनल एक्साम आहे .. तू खूप मेहनती आहेस .. अभ्यासात हुशार आहेस .. थोङे लक्ष दिलेस ना तर मला खात्री आहे एक दिवस एका मोठया कंपनीत मोठ्या पोस्ट वर काम करशील .. किंबहुना माझे ते स्वपच आहे तुला असे बघण्याची .. जगात अशी कोणतीच गोष्ट नसली पाहिजे कि आपल्याला माहित नाही .. म्हणून तर तुला कार  पण शिकवली..

.

पुढील दोन महिने खूप मन लावून अभ्यास केला .. पेपर सुरु झाले .. हे स्वतः परीक्षा असली कि मला सोडायला यायचे .. माझा डबा . पाण्याची बाटली बरोबर दयायचे .. कधी वडीलां सारखे .. कधी मित्रा सारखे .. कधी नवऱ्या सारखे माझ्या बरोबर वावरायचे .. असे वाटायचे मी खरंच किती भाग्यवान आहे .. असा नवरा मला मिळाला ..

मी पण परीक्षा कधी संपतेय त्याची आतुरतेने वाट बघू लागले

त्या दिवशी शेवटचा  पेपर होता .. मी सकाळी माझी  जायची तयारी  करत होते.. तेवढ्यात हे मागून आले आणि त्यांनी मला मिठीत घेतले .. " अभ्यास झालाय  का ?.. मी एक गंमत सांगितली तरी पेपर नीट देशील का ?" असे म्हणत त्यांनी माझ्या मानेवर किस केले ..

मी " मानेनेच सांगितले " हो .. "

आशुतोष " आज तू दुपारी घरी आलीस कि तुला एक सरप्राईझ देणार आहे मी ..सो बी रेडी फॉर दयाट  "

मला त्यांचा  प्र्त्येक शब्द माझ्या मनाला मोहरून टाकत होता .. आणि त्यांचा इशारा  पण कळला होता ..

आशुतोष " माझे आज एक ट्रेनिंग आहे .. ते संपे पर्यंत 2 वाजतील .. तुला पण घरी यायला ३ वाजतात  .. तर आज दुपारी ३ वाजता भेटू .. मी आज तुला सोडायला येत नाहीये चालेल का ?"

मी " हो चालेल .. आणि मी पेपर ला हसतच निघून गेले .. पेपर झाल्यावर कधी एकदा घरी जाते असे झाले होते .. सगळ्या  मैत्रिणींना , टिचरला भेटून मी घरी निघाले .. आज सगळे भेटले पण सोनल भेटली नव्हती .. ती ज्या क्लास मध्ये एक्साम ला बसायची त्या वर्गात चौकशी केली तर असे कळले कि पेपर अर्धा तास लवकर टाकून ती निघून गेली.. मला पण जरा वाईट वाटले .. आज भेटायला पाहिजे होती .. तरी पण तिला आमचे घर माहित होते .. इनफॅक्ट तिच्या कडे घराची एक चावी पण असायची .. सेफ्टी म्हणून हरवली तर मी तिला देऊन ठेवली होती ..

म्हणजे आता नाही भेटली तर ती मला भेटायला घरी नक्की येईल अशी खात्री होतीच मला ..

मी घरी आले तर खाली पार्किंग मध्ये आशुतोष ची गाडी होती .. त्यांची गाडी बघताच माझ्या चेहऱ्यावर आनंद पसरला .. गाडी खाली आहे म्हणजे ते घरात आहेत .. मी चावी ने दार उघडले आणि हळूच आत गेले .. म्हटले याचे काहीतरी सरप्राईझ माझ्या अचानक येण्याने बिघडायला नको

🎭 Series Post

View all