मराठी कथा : सुखांत भाग १४

in this part asutosh mother meets asavri

मराठी कथा : सुखांत भाग १४

क्रमश : १३

आशुतोष " आशु .. थांब थांब .. ओढू नको ... अजून दुखेल ते .. थांब .. अग  काय आहे हे किती रक्त येतंय .. "

आशुतोष ने तिचा हात हातात घेऊन ठेवला .. तेवढ्यात नर्स आली .. तिने पटकन ते पूर्ण काढले .. त्यावर कापूस आणि औषध लावून पट्टी लावून टाकली ..

नर्स " हात जास्त हलवू नका आता .. आणि असा ठेवा .. पाच मिनिटात थांबेल रक्त "

आशुतोष तिच्या पाणीदार डोळ्याकडे बघत  होता .. मनात  म्हणत होता .. " किती ब्रेव्ह झाली आता हि .. एवढे रक्त गेले .. एवढी कळ गेली असेल तरी हू नाही का चू नाही .. परिस्थितीचे चटके लागले कि माणूस आपोआप कडक बनून जातो .. दुखतंय म्हणून मोठं मोठयाने ओरडणारी आशु आता डोळ्यातले अश्रू पण परतवू लागली ..

आसावरी " थँक यु पूजा .. मी ओके आहे आता .. तू बस .. " ती बोलत होती पूजाला पण सांगत होती आशुतोषला .. एकटक त्याच्या डोळ्यात पाहत बोलत होती.

पूजा " मॅम .. मी तुम्हला कॉफी किंवा काही खायला घेऊन येऊ का ?"

आशुतोष " मिस पूजा .. तुम्ही थांबा इथे मी आणतो काहीतरी खायला  सर्वांना .. तू काय खाशील ?"

पूजा " सँडविच ऑर चीझ पिझ्झा "

आशुतोष " आशु .. मिस आसावरी तुम्ही काय खाणार "

आसावरी " मला नको काही "

आशुतोष निघून गेला खाली

पूजा " मॅम .. हे सर किती चांगले आहेत ना .. काही गरज नसताना पण थाम्बलेत ते .. किती अदबीने बोलतात ना "

आसावरी " हमम .. चांगलेच आहेत ते .. म्हणून इथे आहेत .. "

पूजा " तुम्हला लागले ना तेव्हा खूप  टेन्शन मध्ये आले होते .. एवढ्या मोठ्या पोस्ट वर काम करणारा माणूस इतका डाऊन टू अर्थ कसा काय नाही ?.. अगदी तुमच्या सारखेच आहेत . तुम्ही पण नाही का ? पोस्ट चा गर्व नाही करत "

आसावरी काहीच  बोलत नाही .. बोलता बोलता तिचे डोळे मिटले आणि तिला डोळा लागला

आशुतोष ने पूजा ला खायला पिझ्झा आणि कोल्ड ड्रिंक दिले .. आणि प्लेट मध्ये इडली संभार चटणी काढली आणि आणि आसावरीला उठवले , बसवले आणि तिला खायला देऊ लागला

पूजा आशुतोष कडेच बघत होती .. घरातल्या मेंबर सारखी काळजी घेतात हे तर .. नक्की कोण आहेत मॅम चे काय माहित ?"

आशुतोष ने इडली संभार तिला आवडतो म्हणून तीने न सांगता आणला होता.. आणि आता तिला खाऊ घालत होता .. तिने पण काही न बोलता खाऊन  घेतली .. गोळ्या घेतल्या आणि पुन्हा पडून राहिली

आशुतोष ने घडल्यात बघितले १० वाजले होते .. त्याला आई ला आणायला जायचे होते

आशुतोष " मिस पूजा , मी अर्धा तास बाहेर गेलो तर चालेल का ?" तुम्ही नीट लक्ष द्याल का ?"

पूजा " हो सर , नक्कीच , तुम्ही काहीच काळजी करू नका .. "

आशुतोष " ठीक आहे मी आलोच "

पूजा मोबाईल  वर टाइम पास करत मॅम कडे बघत बसली

आशुतोष थोड्याच वेळात त्याच्या  आईला घेऊन आला

आई च्या डोळ्यात पाणी डबडबलेलं .. तिने आसावरीच्या डोक्यावरून हळूच  मायेने हात फिरवला आणि त्या मायेच्या हाताच्या स्पर्शाने आसावरीने डोळे उघडले .. आई  ( आशुतोषची आई ) बघून आसावरी पटकन झोपलेली  उठली आणि " आई .. " असे म्हणून तिच्या कुशीत शिरली .. बराच वेळ दोघी एक्मेकांनीच्या कुशीत रडल्या .. बऱ्याच दिवसन्नी एकाद्या बाळाला तिची आई दिसावी आणि त्या निरागस बाळाने आई च्या कुशीत आनंदाने शिरावे असे झाले होते ..

पूजा ला नक्की काय आणि कसे रिऍक्ट करावे हे कळेच ना

आशुतोष पण भरल्या डोळ्याने खिडकी च्या  दिशेने चेहरा करून त्याच्या अश्रूंना मोकळी वाट करून देत होता ..

आई - " कशी आहेस ग ? कुठे गेलीस होतीस ? किती शोधली आम्ही तुला सगळ्यांनी ? माझा आशु तर सुकला ग तुझी वाट बघून ? रात्र रात्र त्याला झोप येत नव्हती .. घाबरून , दचकून उठायचा .. मला म्हणायचा " आई ती सुखरूप असेल ना .. आई तिला काही झाले तर नसेल ना ? आई  कुठे गेली असेल ? आई तिला कोणी काही करणार नाही ना ? आई सॉरी मी चुकलो ग .. मी तिला नाही सांभाळू शकलो ? "

आसावरी अजूनही आईच्या कुशीतच होती आणि जोर जोरात रडत होती .

आई " बरं  चल आता .. आपण आपल्या घरी जाऊ ? घरी आलीस कि तुला बरे वाटेल .. "

आसावरी " नाही आई , कोणत्या हक्काने येऊ .. आता मी तुमची सुनबाई नाहीये .. आता तो  हक्क दुसऱ्या कोणाचा तरी  आहे .. मी ती जागा नाही घेउ  शकत "

आई " अग  तुला मी कधी सून मानली का ? तू माझी मुलगीच आहेस ? आई कडे येताना कसला विचार करतेस ? आई म्हणतेस ना मला .. मग "

आसावरी " नाही .. मी तुमच्या कोणाच्या प्रेमाच्या लायकीची नाहीये .. मला माझ्या हालवर  सोडून द्या "

आई " अग बाळा , तू आमच्या कुटुंबाची एक सदस्य आहेस .. आणि तू अशी बोलतेस "

आसावरी " बाबा कसे आहेत ? अश्विनी कशी आहे ? दादा कसे आहेत ? वाहिनी कसे आहेत ? "

आई " अग  हो हो .. सगळे तुझी आठवण काढत आहे .. तुला भेटायला सगळे आतुर झालेत .. "

आई " आशु , तू डॉक्टरांना विचार हिला  डिस्चार्ज कधी देतील ते .. आणि चला आपण आताच्या आता गावी जाऊ .. घरी गेल्यावर छान सत्यनारायणाची पूजा घालू  .. देवाने माझ्या लेकीला सुखरूप ठेवले .. हे काय कमी उपकार झाले का देवाचे ?"

आशुतोष " आई तिला नसले यायचं तर तू का फोर्स करतेस ?"

आई " तू गप रे .. मी सांगते ते कर .. चल चल वेळ नको घालवू फुकट .. "

आई " अगो बाई , आसावरी .. केस वाढवलेस कि काय ? किती  छान केस वाढलेत .. आणि कशी सुंदर दिसतंय ग माझे पिल्लू ते "

इतक्या वेळा नंतर आशुतोष चे आता लक्ष तिच्या केसांकडे गेले .. तेव्हा तर ती शॉर्ट हेअर कट मधेच असायची ना "

आसावरी ला मधेच आठवले .. आपली मुलगी .. पियू .. पियू बद्दल कळले तर ? ती बिचारी तिकडे एकटी आहे ? आणि मी आता तिला एकटीला हॉस्टेल ला ठेवून जाऊ ?

आई " आशु बेटा , कसला विचार करते ? हे बघ आता झाले गेले विसरून जा ? पुन्हा नव्याने सुरुवात करा .. बघ त्याच्या चेहऱ्याकडे बघ कसा सुकलंय माझे पोरं .. "

आसावरी " आई.... मी .. मी .. रडताना तिच्या तोंडातून शब्द फुटले नाहीत "

आई " कशाला रडतेस आता ? काय प्रॉब्लेम आहे ? काही सांगायचंय का तुला मला ?"

आई " आशु .. आम्हला दोघीना जरा एकटीला सोड बाळा .. मला बोलायचंय तिच्याशी ?"

आशुतोष " आई एक ना .. आता लगेच नको ना .. तिला बरं नाहीये .. थोडी थांब .. तिला रिकव्हर होऊ दे "

आई " आता अजून किती थांबू रे .. तुमच्या दोघांमध्ये काय झाले माहित नाही ? तू तर काहीच सांगितले नाहीस ? आता मला हिला तरी विचारू दे .. "

आशुतोष " आई , तिचा बीपी सकाळी हाय होता .. थोडे धीराने घे .. आता आलीय ना तू .."

आई " बरं .. बाबा .. नाही आता विचारत "

आई " बघितलेस आसावरी , आता सुद्धा तुझीच काळजी लागून राहिली आहे त्याला .. तू का  असे केलेस बाळा ? नक्की काय झाले होत ? "

आसावरी बेड वर पडून रडत होती .. एव्हाना रडून रडून नाक लाल झाले होते

आशुतोष " हे बघ , आशु .. आता रडून काही उपयोग नाही .. आणि झाले गेले त्यावर पाणी सोड .. याचा  अर्थ तू माझ्या बरोबर संसार कर असे सांगत नाहीये तुला .. तू सुखरूप आहेस हेच आमच्या साठी खूप आहे .. आणि तू तुझ्या सासरी नाही माहेरी जातेय असे समज आणि गावी जा .. थोडी हवा पालट झाला कि बरे वाटेल तुला .. मग माझे तुझ्या कडे एक काम आहे ते झाले कि तू तुझे निर्णय घ्यायला  मोकळी आहेस "

आई " आशु " का? रे ? असे का बोलतोस ? तुझा विश्वास नाहीये का पोरीवर ?"

आशुतोष " मी तिच्या आनंदा साठीच  करतोय हे सगळे .. ती माझ्या बरोबर सुखी नव्हती  म्हणूनच मला न सांगता निघून गेली ना .. मग आत काय जबरदस्तीने बांधून ठेवू   "

आई " अरे पण ती काय म्हणतेय ते ऐकून तरी घे .. आधीच का ठरवतोस ?"

आशुतोष " मग काय करू ? आई .. माझ्या आयुष्याची वाट लावलीय या मुलीने .. अजून काय करू ते सांग ना "

आई " मी तुझी अडचण पण समजू शकते रे बाळा ? पण  जिला बघण्यासाठी जीवाचे रान तू गेले पाच वर्ष करतोय ती समोर आल्यावर इतका रुक्ष वागतोय तिच्याशी "

आशुतोष ने मुद्दामून आई ला काही गोष्टी जास्त सांगायचंय  ठरवल्या  .. म्हणजे घरातल्यांचा नंतर निरस नको होयला

आशुतोष " तिचा एक बॉयफ्रेंड आहे .. ते दोघे एकत्र राहतात "

आई " काय ? हे शक्य नाही ? माझी आशु असे करणार नाही .. तुझा काहीतरी गैर समज झालाय आशु "

आशुतोष " हो मी सांगतोय ते खरं आहे .. तो पण काल पासून होता इथेच .. आता त्याला काहीतरी काम आले म्हणून तो ऑफिस ला गेलाय "

तेवढयात पूजा जी बाहेर गेली होती ती आता आली

पूजा " मॅम , मी जाऊ का आता ? आय थिंक यु आर इन सेफ हॅन्ड्स"

आशुतोष " मिस पूजा .. थँक यु .. आल्या बद्दल .. मी तुम्हला सोडू का ?"

पूजा " नाही मी मॅनेज करेल सर "

आई " आशुतोष अरे विचारतोस काय? जा तिला सोडून ये तिच्या घरी .. एकटी कुठे जाईल  ती ? "

आशुतोष पूजाला सोडायला बाहेर निघाला

गाडी चालवताना आशुतोष " मिस पूजा .. थँक्स ..आल्या बद्दल .. "

पूजा " इट्स ओके सर .. सॉरी मी जरा पर्सनल बोलू का ?"

आशुतोष " हा बोल कि "

पूजा " सर , सिद्ध आणि मॅम फक्त फ्रेंड्स आहेत .. मी ओळखते सिद्ध ला .. तो तसा  मुलगा नाहीये जसे तुम्ही त्याला समजताय "

आशुतोष " ओह .. रिअली .. खर सांगू का सिद्ध माझ्या साठी खूप लांब राहिला .. मला माहितेय आसावरी असे काही करूच शकणार नाही .. मी तिला चांगले ओळखतो "

पूजा " तरी पण तुम्ही आईंना असे का सांगितले ?'

आशुतोष " कसे आहे ना दुःख पेलायची ताकद आपल्याला मन देत असतो . मनाने आपण एक ठरवतो आणि तसे नाही झाले कि मग त्याच दुःख जास्त होते . त्यामुळे आपल्या मनाला आधीच जर वाईट गोष्टी साठी तयार करून ठेवले ना तर मग त्या दुःखाचा प्रभाव कमी पडतो .. मी काय बोलतोय हे थोडे मला तूला समजावणे  कठीण आहे .. ते तसे सांगणे गरजेचे होते .. त्यामुळे आसावरी तिचे निर्णय मोकळे पणाने घेण्यासाठी मोकळी होते .. घरातल्यांच्या दबावा खाली कोणताच निर्णय तिने घेऊ नये या साठी  मी तिचा मार्ग मोकळा करून दिलाय आईची मानसिकता पण पुढे काय होऊ शकते यासाठी तयार केली "

पूजा " हॅट्स ऑफ टु यु सर .. किती प्रेम करता तुम्ही मॅडम वर "

आशुतोष " कमीच पडले ते पण .. असो .. एनीवेज .. थँक्स .. ऑल द बेस्ट .. आणि एक त्या सिद्ध च्या  नादी लागू नकोस "

पूजा हसली " सर ते तुम्ही त्याला नीट ओळखले नाही .. तो बोलतो ना त्याचं पेक्षा त्याच्या कृतीकडे लक्ष द्या .. थोडासा पागल आहे पण दिलसे बंदा बडा चंगा है "

🎭 Series Post

View all