मराठी कथा : सुखांत  भाग १२

in this part sidharth tells ashutosh that he love asavri

मराठी कथा : सुखांत  भाग १२

क्रमश: भाग ११

पहाटे पहाटे खिडकीतून  एक सूर्य किरण आशुतोष च्या चेहऱ्यावर पडले आणि त्याला जाग आली . जरा झोपेतून जागा झाल्यावर त्याला कळले त्याला कि आपण हॉस्पिटल मध्ये आहे .. दुसऱ्या क्षणाला ताडकन उठला आणि आसावरी जवळ गेला . तिच्या डोक्याला हात लावून त्याने चेक केले कि ताप वगैरे नाहीये ना .. सहजच त्याचे लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेले .

शांत झोपलेली असताना आसावरी किती निरागस दिसत होती .. आज जवळ जवळ पाच वर्षां नंतर हा सुंदर  आणि अद्भुत नजारा त्याला दिसला होता . त्याला सहजच आठवले .. जेव्हा रोज सकाळी  आशुतोष तिला उठवायला जायचा तेव्हा आसावरी इतकी नाटकं करायची

उम्म .. आशु फक्त पाच मिनिटे झोपून द्या ना अजून .. फक्त पाचच मिनिटे ... माझे आजचे स्वप्न आता पूर्ण होणारच आहे .. प्लिज "

आशु " आसावरी , तुझे रोजच कसे ग स्वप्न अर्धवट राहते .. चल उठ .. मग उशीर होतो तुला कॉलेज ला जायला "

आसावरी " उम्म .. आशु तुम्ही रोज माझे स्वप्न मोडता .. झोपू द्या ना पाच मिनिटाने उशीर नाही होणार "

शेवटी आशुतोष त्याचे आवरायला जायचा .. आणि हिला उशीर झाला कि  त्याला म्हणायची " तुम्ही स्वतःचे आवरून घेता आणि मला उशिरा का उठवता ?"

मागचं  सगळे आठवले आणि आशुतोष ला थोडेसे हसूच आलं .

आशुतोष ने तिच्या अंगावरच नीट केले .. आणि तो फ्रेश होयला  वॉशरूम मध्ये गेला.

सिद्ध आता तिघांसाठी कॉफी घेऊन आला.

सिद्ध " ए आसावरी .. उठ .. मस्त फ्रेश हो.. गरम गरम कॉफी घे .. बघ मस्त वाटेल तुला " आणि तो तिला उठवू लागला ..

सिद्ध च्या आवाजाने आसावरीला जाग आली ..

ती पण लगेच उठायचा प्रयत्न करू लागली

सिद्ध ने तिला उठून बसण्या  साठी मदत केली ..

सिद्ध " वॉव , यार .. यु आर रिअली ब्युटीफुल .. तो चेहऱ्यावर थोडासा सूर्यकिरण आलाय ना त्याने तुझा चेहरा उजळून निघालाय .. तुझे डोळे तर कसले सुदर दिसत आहेत .. यार .. तुने तो मेरा दिन बना दिया आज का.. कसली दिसतेय तू ? काश ! कि हा नजारा मला रोज दिसला असता.. "

आसावरी " गप  रे सिद्ध .. उगाच काही पण बोलत बसतोस .. "

सिद्ध " आता सूंदर ला सुंदर नाही तर काय बंदर म्हणू .. तू आहेच सूंदर त्याला मी काय करू ? .. खास करून तुझी हि गालावरची खळी आहे ना ती मार डाला .... "

आसावरी ची नजर आशुतोष ला शोधत होती .. तो दिसला नाही तर बहुतेक घरी गेला असे तिला वाटले ..

सिद्ध " तुझा नवरा कुठेय ? तुझ्या या सुन्दर डोळ्यांतून त्याला गायब केलास कि काय ?"

आसावरी " सिद्ध .. थोडा नॉर्मल बोलशील का प्लिज . "

सिद्ध " आसावरी , ऐक ना ... तू बरी हो लवकर .. मला तुला काही तरी  सांगायचंय " असे म्हणत त्याने तीच हात हातात घेतला .. ती लगेच काढून घेत होती पण सिद्ध कसला सोडतोय .

आसावरी " बोल . बोल.. सांगून टाक .. "

तेवढयात आशुतोष बाहेर आला .. त्याने बघितले सिद्ध ने तिचा हात हातात घेतलाय ते ..

आसावरीचा हात बाजूला काढून घेण्याचा प्रयत्न सुरु झाला .. उगाच गैर समज नको म्हणून

सिद्ध " सर .. गुड मॉर्निंग .. मग रात्री झोप लागली का ? का थंडी लागली ? मी बघितले कोणीतरी थंडीने कुडकुडत होते .. "

आशुतोष " अच्छा ! म्हणजे ते ब्लॅंकेट तू टाकलेस का माझ्या अंगावर .. थँक यु .. "

सिद्ध " हो .. मीच बघायला आलो होतो .. पेशन्ट आणि पेशन्ट बरोबर असलेला झोपलाय कि नाही ?"

अजूनही त्याने तिचा हात हातात घेऊन ठेवला होता .. ती काढून घेत होती पण तो सोडतच नव्हता

सिद्ध " चल उठ आशु .. तू फ्रेश हो .. हे घे किट .. आत मध्ये जा .. आत गरम पाणी आहे .. मी घरी जाऊन तुझ्या साठी कपडे घेऊन आलोय .. "

आशुतोष " अरे वाह .. हे बरे केलेस .. आणि तू पण छान फ्रेश होऊन आलास ?"

सिद्ध " यस .. आता एक काम करा .. तुम्ही पण ती कॉफी घ्या .. आणि घरी जा .. तुमची बायको तुमची घरी वाट बघत असेल .. मी आहे इकडे .. मी पूजा ला फोन करून बोलावलंय .. ती पण येईलच .. ती आली कि काहीच टेन्शन नाही "

आशुतोष " मी पूजा येई पर्यंत थांबतो .. मग मी १० वाजता बाहेर जाणार आहे .. आई येणार आहे तिला आणायला  जायचय  मला "

आसावरी " सिद्ध , मी पूजा आल्यावरच फ्रेश  होईन .. आणि माझा  हात सोड .. मला फ्रेश होऊन येऊ दे .."

सिद्ध " येस ऑफकोर्स डार्लिंग "

आसावरी आणि आशुतोष दोघे एकमेकांकडे बघू लागले ..

सिद्ध आसावरीला वॉशरूम पर्यंत हात धरून सोडून आला

आशुतोष ला कॉफी चा मग त्याने दिला  आणि स्वतः पण घ्यायला लागला .

सिद्ध " सर .. अहो तुम्ही जात का नाही घरी ? तुम्हला तुमच्या बायकोची  काही आहे कि नाही ?"

आशुतोष " सिद्ध , दयाट इज नन ऑफ युअर बिझनेस .. आणि एक माझ्या समोर मुद्दामून तिचा हात वगैरे पकडून तुला काय प्रूव्ह करायचंय "

सिद्ध " सर .. हेच कि काल रात्री मला एक छान स्वप्न पडले .. आणि मला असे जाणवलं कि आसावरी माझ्या साठी किती महत्वाची आहे .. आता तुम्ही तर तिला सोडलंय किंवा व्हाटेवर .. तिने तुम्हला सोडलंय .. तुम्ही दुसरे लग्न पण केलंय .. आता तुमचा इथला क्लेम संपलाय .. सो मिस्टर आशुतोष .. आता आसावरी माझी आहे .. आणि मी तिला मिळवणारच .. हा अजून मला भीक घालत नाही ती .. पण मी पण तसा हार मानणाऱयातला नाहीये "

आशुतोष " सिद्ध , वेड लागलाय का तुला ? ती किती मोठी आहे  ? बावळट .. काही पण बलतो "

सिद्ध " कसला विचार करताय तुम्ही .. मला याने काहीच फरक पडत नाही .. माझे तिच्या वर प्रेम आहे हे मला काल रात्रीच जाणवले .. मी बराच वेळ विचार करत होतो .. तुमच्या दोघात साला मी काय करतोय .. तेव्हा मला माझ्या प्रश्नाचे  उत्तर मिळाले कि ये तो कुछ और कनेक्शन है .. सो आता मला काय हवंय ते मला कळलंय .. ती मोठी असो नाहीतर छोटी असो .. नाहीतर दोन मुलांची आई असो ..आय लव हर दयाटस इट "

आशुतोष ला भयानक चीड येत होती . त्याची कॅलर पकडून तिकडून हाकलून लावून द्यावीशी वाटत होती "

आशुतोष " मिस्टर सिद्ध , आय थिंक यु आर सिक .. मुलगी दिसली कि दुसऱ्या कुठल्या नजरेने बघूच  शकत नाही बहुतेक तू "

सिद्ध ओये हॅलो .. माझे प्रेम ते फालतूपणा आणि तुम्ही जी वागतेय ते ? त्याच काय ? दोन दोन बायका केल्यात .. आणि दोघींना फसवताय "

आशुतोष " कानफाड फोडीन  सिद्धार्थ तुझे.. एक शब्द पुढे बोललास तर .. ज्याला  काही माहित नाही त्यांनी माझ्या वर असले घाणेरडे आरोप केलेले  मी खपवून घेणार नाही .. शेवटचे सांगतो तुला .. पुढल्या वेळी मी वॉर्न करणार नाही .. ऍक्शन घेईन "

सिद्ध " हॅलो , धमकी कोणाला देताय .. जावा घरी बायको वाट बघतेय .. तिला दर्शन तरी देऊन या "

आशुतोष " शट अप सिद्ध .. प्लिज स्टॉप इट .. मला खूप त्रास होतोय .. प्लिज .. गेट आऊट फ्रॉम हिअर "

तेवढयात ती कालची नर्स आली

नर्स " झाली सकाळी सकाळी तुमच्या दोघांची तोंडे दिसली .. आता माझा आजचा दिवस पण खराब जाणार आहे .. काय हो तुम्ही लोक कोण आहेत कोण ? त्या पेशन्ट चे नक्की ? "

सिद्ध " मी बॉयफ्रेंड आहे तिचा .. आणि हे तिचे एक्स- हजबंड "

नर्स ने त्यांना दोघांना बघून हात जोडले ..

सिद्ध "सिस्टर .. मला सांगा .. एक्स हजबंड पेक्षा नक्कीच बॉयफ्रेंड चा हक्क जास्त असतो ना "

नर्स " तुम्हला एक सांगू का ? त्यांना कोण हवंय ? याचा पण विचार करा जरा ? आणि मग ठरवा "

तेवढयात आसावरी वॉशरूम मधून बाहेर आली

तिघे आसावरी कडे एकदम बघू लागले

आसावरी " काय झाले ? असे का बघताय सगळे ? .. सिद्ध .. जरा तो टॉवेल पास कर रे "

सिद्ध ने टॉवेल तिला दिला पण नर्स आणि आशुतोष कडे असे बघितले जसे कि बघितले .. शी वॉण्टस मी

नर्स ने तिला बेड वर बसवले .. तिचे टेम्परेचर आणि बीपी चेक केले .. आणि तिला काहीतरी खाऊन एक गोळी खायला सांगितली ..

नर्स ने आशुतोष कडे बघून सांगितले " दुपारी डॉक्टरांचा राऊंड होईल तेव्हा पुढची ट्रीटमेंट कळेल .. तोपर्यंत त्यांना ह्या गोळ्या खाऊ द्या .. आणि मग मी थोड्या वेळाने त्यानं हि सलाईन लावेन "

नर्स " मॅडम .. आराम करा .. तुमचे बीपी थोडे हाय आहे .. काही विचार करताय का ?"

आसावरी " नाही .. काहीच नाही .. असे म्हणून नजर चोरू लागली "

सिद्ध ने तिला बसवली ... पाठीला टेकायला दिले .. कॉफी दिली .. ती पण त्याच्या कडून सगळे करून घेत होती ..आणि आशुतोष बघत होता आणि सहन करत होता .. सिद्ध त्याला ना डिसिजन घेऊन देत होता .. आणि उगाच नको तेव्हा नको तो विषय काढून त्याला त्रास देत होता .. आता तर आशुतोष ला आपण इथे थांबणे म्हणजे काहीतरी अपराध करतोय असेच वाटू  लागले.

आसावरीने कॉफी घेतली ..

सिद्ध तिच्या शेजारी असलेल्या खुर्चीतच बसला होता आणि आशुतोष सोफ्यावर बसला होता .. आशुतोष ने शशिकांत ला सांगून सिद्ध ला ऑफिस ला बोलावून घ्यायला सांगितले .

थोड्याच वेळात सिद्ध ला शशिकांत चा फोन आला

सिद्ध " हॅलो सर .. गुड मॉर्निंग "

शशिकांत " सिद्ध .. आज एक मिटिंग आहे .. विसरू  नकोस काय ? शार्प १० ओ  क्लॉक ऑफिस ला हजर राहा .. खूप इम्पॉर्टन्ट मिटिंग आहे "

सिद्ध पुढे काही बोलणार तर शशिकांत ने फोन कट केला

आशुतोष पेपर वाचत बसल्याचे नाटक करू लागला .. जसे कि मला काहीच माहित नाही ..

सिद्ध " आसावरी .. ऐक ना .. मला अर्जंट काम आहे .. मला आता जावे लागणार आहे .. मी निघतो काय ?"

आसावरी " हो .. चालेल .. तू काळजी करू नको .. मी  आत परफेक्टली ऑल राईट आहे .. थँक्स फॉर एव्हरीथिंग "

सिद्ध " अरे थँक्स यु आर माय जान .. तुला मी मगाशी सांगितलेलं लक्षात आहे ना .. लवकर बरी हो .. मला तुला काही सांगायचंय "

आसावरी " हमम .. जा आता .. "

सिद्ध ने आशुतोषला खुणेने बाहेर बोलावले.

सिद्ध " मिस्टर आशुतोष , मला तुम्ही काय खेळी खेळलित हे समजले नाही असे समजू नका .. योग्य वेळी मी त्याचे उत्तर देईन .. आणि हो अजूनही सांगतो बायकोला फसवलतना तर मी जाऊन सांगेल तुमच्या बायकोला कि तुम्ही इकडे काय धंधे करताय ते "

आशुतोष गालात हसत " तुला माहित नाहीये अजून मी काय चीज आहे .. तुझं करिअर माझ्या हातात आहे .. तुला कळणार पण नाही .. कुठे गायब होशील ते .. असो .. मी काय सांगतो ते नीट ऐक .. मी जर  ठरवले ना तर आत्ता हिला एक लाफा मारून घरी नेऊ शकतो .. तेवढी तर माझ्यात पॉवर आणि हक्क दोन्ही आहे .. पण माझी गणितं सोडवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे .. तुला अजून सांगतो .. तिला जर तुझ्यात इंटरेस्ट असेल तर मी स्वतः तुमच्या दोघांचे लग्न लावून देईन . पण सध्या मला असा त्रास देऊ नकोस .. हि माझी  आधी विनंती  नंतर धमकी  समज ..

🎭 Series Post

View all